अभ्यासासाठी विषय
दबावाखाली असतानाही धैर्य दाखवा
यिर्मया ३८:१-१३ वाचा. यिर्मया संदेष्ट्याने आणि एबद-मलेख नावाच्या षंढाने धैर्य कसं दाखवलं ते पाहा.
संदर्भ लक्षात घ्या. यिर्मयाने धैर्याने यहोवाचा संदेश कसा सांगितला? (यिर्म. २७:१२-१४; २८:१५-१७; ३७:६-१०) आणि त्यामुळे काय झालं?—यिर्म. ३७:१५, १६.
सखोल संशोधन करा. यिर्मयाला कोणत्या दबावाचा सामना करावा लागला? (जेरमाया २६-२७ ¶२०-२२) बायबल काळातल्या विहिरी कशा असायच्या आणि त्यांचा वापर कशासाठी केला जायचा यावर संशोधन करा. (इन्साइट-१ ४७१) यिर्मयाला जेव्हा चिखलाने भरलेल्या विहिरीत टाकण्यात आलं तेव्हा त्याला कसं वाटलं असेल? एबद-मलेखला कशाची भीती वाटत असेल?—टेहळणी बुरूज०७ २/१ २३ ¶६.
तुम्हाला काय शिकायला मिळतंय यावर विचार करा. स्वतःला विचारा:
-
‘यहोवा त्याच्या एकनिष्ठ सेवकांचं ज्या प्रकारे रक्षण करतो त्याबद्दल या अहवालातून मला काय शिकायला मिळतं?’ (स्तो. ९७:१०; यिर्म. ३९:१५-१८)
-
‘कोणत्या परिस्थितींत मला धैर्य दाखवावं लागेल?’
-
‘दबावाखाली असताना योग्य ते करता यावं म्हणून मी धैर्य कसं वाढवू शकतो?’(टेहळणी बुरूज११-E ३/१ ३०) a
a आपल्याला कोणकोणत्या प्रकारे वैयक्तिक अभ्यास करता येऊ शकतो हे जाणून घ्यायला जुलै २०२३ च्या टेहळणी बुरूज अंकातला “अभ्यास करण्यासाठी एक टीप” हा लेख पाहा.