आपलं ख्रिस्ती ऐक्य बळकट करण्यासाठी तुम्ही कसा हातभार लावू शकता?
“ज्यावर सर्व शरीर आधारित आहे ते आधार देणाऱ्या प्रत्येक अस्थिबंधनाने जोडलेले आणि एकत्र बांधलेले असते. आणि प्रत्येक भाग त्याने जसे कार्य करायला पाहिजे तसे करतो.”—इफिस. ४:१६, ईझी-टू-रीड व्हर्शन.
१. सुरवातीपासूनच देवाच्या कार्यात कोणती विशेष गोष्ट दिसून येते?
निर्मितीच्या अगदी सुरवातीपासूनच येशूनं यहोवासोबत ऐक्यानं कार्य केलं आहे. इतर सर्व गोष्टींची निर्मिती करण्याआधी यहोवानं येशूला बनवलं. त्यानंतर, येशूनं आपल्या पित्यासोबत एक “कुशल कारागीर” म्हणून काम केलं. (नीति. ८:३०) यहोवाचे सेवकदेखील एकमेकांसोबत ऐक्यानं काम करतात. उदाहरणार्थ, नोहा आणि त्याच्या कुटुंबानं एकत्र मिळून तारू बांधलं. त्यानंतर, निवासमंडप बांधण्याकरता आणि त्याला पुन्हा खोलून, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेण्याकरता सर्व इस्राएलांनी एकत्र मिळून काम केलं. शिवाय मंदिरात, लयबद्धपणे संगीत वाघे वाजवून आणि सुरात सूर मिळवून सुंदर गीतं गाण्याद्वारे त्यांनी यहोवाची स्तुती केली. यहोवाच्या सेवकांनी एकमेकांसोबत संघटितपणे कार्य केल्यामुळेच त्यांना या सर्व गोष्टी करता आल्या.—उत्प. ६:१४-१६, २२; गण. ४:४-३२; १ इति. २५:१-८.
२. (क) पहिल्या शतकातील ख्रिश्चनांमध्ये कोणती विशेष गोष्ट होती? (ख) या लेखात आपण कोणत्या प्रश्नांवर चर्चा करणार आहोत?
२ पहिल्या शतकातील ख्रिश्चनांनीदेखील एकमेकांसोबत एकतेनं कार्य केलं. म्हणूनच पौलानं त्यांची तुलना एका शरीरासोबत केली. शरीराचे अवयव वेगवेगळे असले तरी ते सर्व एकत्रितपणे काम करतात. त्याचप्रमाणे, या ख्रिश्चनांच्या क्षमता १ करिंथकर १२:४-६, १२ वाचा.) त्यांचं नेतृत्व करणाऱ्या येशूचं त्यांनी अनुकरण केलं. आज आपल्याबद्दलही हेच म्हणता येईल का? प्रचारकार्यात, मंडळीत आणि कुटुंबात आपण एकमेकांना कसं सहकार्य करू शकतो?
आणि जबाबदाऱ्या वेगवेगळ्या असल्या तरी त्यांनी एकमेकांसोबत मिळून एकतेनं काम केलं. (प्रचारकार्यात एकमेकांना सहकार्य करा
३. प्रेषित योहानाला कोणता दृष्टांत पाहायला मिळाला?
३ पहिल्या शतकात, प्रेषित योहानाला एक दृष्टांत देण्यात आला. या दृष्टांतात तो सात देवदूतांना कर्णा वाजवत असताना पाहतो. जेव्हा पाचवा देवदूत कर्णा वाजवतो, तेव्हा योहानाला एक “तारा” आकाशातून पृथ्वीवर पडताना दिसतो. हा तारा त्याला दिलेली किल्ली वापरून अथांग डोहाचं दार उघडतो. आणि त्याचबरोबर त्या अथांग डोहातून भट्टीच्या धूरासारखा धूर बाहेर येऊ लागतो. त्या धुरातून मग टोळांची मोठी टोळधाड बाहेर येऊ लागते. पण हे टोळ कोणत्याही वनस्पतीचं किंवा झाडाचं नुकसान करत नाहीत, तर “ज्या माणसांच्या कपाळांवर देवाचा शिक्का नाही” त्यांचंच नुकसान करतात. (प्रकटी. ९:१-४) या टोळधाडीमुळे किती मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं, याची कल्पना योहानाला होती; कारण मोशेच्या काळात इजिप्तमध्ये त्यामुळे काय घडलं होतं, हे त्याला माहीत होतं. (निर्ग. १०:१२-१५) योहानानं पाहिलेली ही टोळधाड, खोट्या धर्माविरुद्ध जोरदार संदेश घोषित करणाऱ्या अभिषिक्तांना सूचित करते. आणि त्यांच्यासोबत असे लाखो लोकदेखील आहेत ज्यांना पृथ्वीवरील जीवनाची आशा आहे. हे लोक अभिषिक्तांना साथ देऊन एकजुटीनं प्रचारकार्य करतात. त्यांच्या या कार्यामुळेच आज खोट्या धर्मातून बाहेर येण्यास आणि सैतानाच्या वर्चस्वातून मुक्त होण्यास बऱ्याच लोकांना मदत झाली आहे.
४. देवाच्या लोकांना आज कोणतं काम करण्याची जबाबदारी आहे, आणि ते पूर्ण करण्याचा एकमेव मार्ग कोणता आहे?
४ अंत येण्याआधी जगभरातील लोकांना “सुवार्ता” सांगण्याची जबाबदारी आज आपल्यावर आहे. हे एक अतिशय मोठं काम आहे! (मत्त. २४:१४; २८:१९, २०) “जीवनाचे पाणी” पिण्याकरता तहानलेल्या सर्वांना, म्हणजे बायबलचं सत्य समजून घेण्याची इच्छा असणाऱ्यांना ते शिकवण्याची जबाबदारी आज आपल्यावर आहे. (प्रकटी. २२:१७) पण मंडळीत असणाऱ्या बंधुभगिनींसोबत जेव्हा आपण “एकत्र बांधलेले” असू आणि एकमेकांना सहकार्य करू, तेव्हाच हे करणं आपल्याला शक्य होईल.—इफिस. ४:१६.
५, ६. प्रचारकार्य करत असताना आपण संघटित असल्याचं कसं दिसून येतं?
५ जास्तीतजास्त लोकांना प्रचार करण्याकरता आज आपल्याला हे कार्य सुसंघटितपणे करण्याची गरज आहे. आणि यासाठी मंडळीत मिळणाऱ्या मार्गदर्शनामुळे आपल्याला मदत होते. क्षेत्रसेवेसाठी एकत्र आल्यानंतर, आपण लोकांना राज्याची सुवार्ता सांगण्याकरता जातो. त्यांना बायबल आधारित साहित्यही देतो. आजपर्यंत आपण अशी लाखो साहित्यं जगभरातील लोकांना दिली आहेत. कधीकधी तर खास प्रचार मोहिमेतही सहभाग घेण्याचं प्रोत्साहन आपल्याला दिलं जातं. असं केल्यामुळे, आपण राज्याचा संदेश घोषित करणाऱ्या इतर लाखो बंधुभगिनींसोबत एकत्र मिळून काम करत असतो. ही आपल्यासाठी एक विशेष गोष्टच आहे! शिवाय सुवार्तेचा प्रचार करताना, आपल्याला मदत करणाऱ्या देवदूतांसोबतही आपण एकत्र मिळून काम करत असतो.—प्रकटी. १४:६.
६ संपूर्ण जगभरात प्रचारकार्यामुळे झालेल्या परिणामांबद्दल जेव्हा आपल्याला इयरबुकमध्ये वाचायला मिळतं, तेव्हा आपल्याला किती आनंद होतो! शिवाय आपल्या अधिवेशनांकरता लोकांना आमंत्रित करण्यासाठी संपूर्ण जगभरात आपण कशा प्रकारे संघटितपणे काम करतो, त्याचाही विचार करा. अशा अधिवेशनांमध्ये आपल्याला एकाच प्रकारची माहिती ऐकायला मिळते. आणि तिथं सादर केल्या जाणाऱ्या भाषणांमुळे, नाटकांमुळे आणि प्रात्यक्षिकांमुळे यहोवाला सर्वोत्तम ते देण्याचं प्रोत्साहन आपल्याला मिळतं. यासोबतच, दरवर्षी जगभरातील आपल्या बंधुभगिनींसोबत जेव्हा आपण स्मारकविधीला उपस्थित राहतो, तेव्हादेखील आपल्यातील ऐक्य दिसून येतं. (१ करिंथ. ११:२३-२६) यहोवानं आपल्यासाठी केलेल्या गोष्टींची कदर व्यक्त करण्यासाठी आणि येशूच्या आज्ञेचं पालन करण्यासाठी, जगभरात आपण सर्व जण त्या दिवशी, म्हणजे निसान १४ च्या सायंकाळी एकत्र येतो. शिवाय त्या महत्त्वपूर्ण प्रसंगी आपल्यासोबत जास्तीतजास्त लोकांना उपस्थित राहता यावं म्हणून स्मारकविधीच्या काही आठवड्यांआधीच आपण सर्व जण संघटितपणे त्यांना आमंत्रण पत्रिका देण्याचा प्रयत्न करतो.
७. एकत्रितपणे काम केल्यामुळे कोणती गोष्ट शक्य झाली आहे?
७ केवळ एक टोळ काही विशेष नुकसान करू शकत नाही. त्याचप्रमाणे, केवळ एकट्यानं सर्व लोकांना प्रचार करणं आपल्याला शक्य नाही. पण आपण सर्व जण एकत्र मिळून काम करत असल्यामुळे, लाखो लोकांना यहोवाबद्दल सांगणं आणि त्यांच्यापैकी काहींना देवाची उपासना करण्यास मदत करणं आपल्याला शक्य झालं आहे.
मंडळीत एकमेकांना सहकार्य करा
८, ९. (क) ऐक्याचं महत्त्व समजावून सांगण्याकरता पौलानं कोणतं उदाहरण दिलं? (ख) आपण मंडळीत एकमेकांना कसं सहकार्य करू शकतो?
८ ख्रिस्ती मंडळी कशा प्रकारे संघटित असते हे पौलानं इफिसमधील मंडळीला स्पष्ट केलं. त्यानं असंही म्हटलं, की मंडळीतील प्रत्येकानं याबाबतीत “आपली वृद्धी” करून घेतली पाहिजे. (इफिसकर ४:१५, १६ वाचा.) एक ख्रिस्ती व्यक्ती कशा प्रकारे मंडळीतील एकता टिकवून ठेवण्यास आणि मंडळीला तिचे मस्तक असणाऱ्या येशूचं अनुकरण करण्यास मदत करू शकते, हे स्पष्ट करण्यासाठी पौलानं मानवी शरीराचं उदाहरण दिलं. त्यानं म्हटलं, की शरीर “प्रत्येक अस्थिबंधनाने जोडलेले” असते, म्हणजे शरीर सुरळीत चालण्याकरता प्रत्येक अवयव एकमेकांना जोडलेला असतो आणि त्याद्वारे तो एकमेकांना सहकार्य करत असतो. तर मग आपण तरुण असोत अथवा वृद्ध, आपलं आरोग्य चांगलं असो किंवा नसो, आपल्यातील प्रत्येकानं काय करण्याची गरज आहे?
९ येशूनं मंडळीचं नेतृत्व करण्यासाठी वडिलांना नेमलं आहे. आणि आपण सर्वांनी त्यांचा आदर करावा आणि त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार चालावं अशी त्याची इच्छा आहे. (इब्री १३:७, १७) असं करणं नेहमीच सोपं नसतं. पण त्यासाठी आपण यहोवाकडे मदत मागू शकतो. वडिलांकडून मिळणाऱ्या प्रत्येक सूचनेचं पालन करण्यासाठी यहोवाचा पवित्र आत्मा आपल्याला मदत करेल. आपण जर नम्र वृत्ती जोपासली आणि वडिलांना सहकार्य केलं, तर आपल्या मंडळीला आपली किती मदत होऊ शकते, याचा विचार करा. यामुळे आपल्या मंडळीत ऐक्य असेल आणि एकमेकांप्रती असणारं आपलं प्रेम आणखी बळकट होत राहील.
१०. मंडळीची एकता टिकवून ठेवण्यासाठी, साहाय्यक सेवकांची कशी मदत होते?
१० मंडळीची एकता टिकवून ठेवण्यासाठी मंडळीत काम करणाऱ्या साहाय्यक सेवकांचीदेखील मदत होते. ते वडिलांना मदत करण्यासाठी खूप मेहनत घेतात. त्यामुळे ते जे काही करत आहेत, त्याबद्दल आपण कदर बाळगली पाहिजे. उदाहरणार्थ, क्षेत्रसेवेसाठी आपल्याजवळ पुरेसं साहित्य आहे का, या गोष्टीची ते काळजी घेतात. तसंच सभांना येणाऱ्या नवीन लोकांचं स्वागत करण्याचं कामदेखील ते करतात. सभागृहाची डागडूजी आणि स्वच्छता करण्यासाठी ते खूप कष्ट घेतात. जेव्हा या बांधवांना आपण सहकार्य करतो, तेव्हा आपण संघटित असल्याचं आणि ऐक्यानं यहोवाची सेवा करत असल्याचं दिसून येतं.—प्रेषितांची कृत्ये ६:३-६ पडताळून पाहा.
११. तरुण लोक मंडळीच्या ऐक्याला कसा हातभार लावू शकतात?
११ काही वडिलांनी बरीच वर्षं मंडळीत पुष्कळ परिश्रम घेतले आहेत. पण वय झाल्यामुळे पूर्वीइतकं करणं आता कदाचित त्यांना शक्य होत नसेल. अशा वेळी मंडळीतील तरुण बांधव त्यांना मदत करू शकतात. जर या बांधवांना योग्यपणे प्रशिक्षित केलं, तर मंडळीत आणखी जबाबदाऱ्या हाताळणं त्यांना शक्य होईल. शिवाय आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात परिश्रम घेतल्यामुळे, सध्या साहाय्यक सेवक म्हणून काम करणाऱ्या बांधवांना पुढे कदाचित एक वडील या नात्यानं सेवा करणंदेखील शक्य होईल. (१ तीम. ३:१, १०) काही तरुण ख्रिस्ती वडिलांनीही इतकी प्रगती केली आहे, की ते आता विभागीय पर्यवेक्षक या नात्यानं बंधुभगिनींना मदत करत आहेत. आपल्या बंधुभगिनींना मदत करण्यासाठी पुढे येणाऱ्या अशा तरुण लोकांकरता आपण नक्कीच कृतज्ञ आहोत.—स्तोत्र ११०:३; उपदेशक १२:१ वाचा.
कुटुंबात एकमेकांना सहकार्य करा
१२, १३. कुटुंबात एकमेकांना सहकार्य करण्यासाठी कोणती गोष्ट मदत करू शकते?
१२ एकमेकांना सहकार्य करण्यासाठी, आपण आपल्या कुटुंबातील सदस्यांना कशी मदत करू शकतो? त्यासाठी दर आठवड्याची कौटुंबिक उपासना आपल्याला मदत करेल. जेव्हा पालक आणि मुले यहोवाबद्दल शिकण्यासाठी एकत्र वेळ घालवतात, तेव्हा त्यांचं एकमेकांवर असणारं प्रेम आणखी बळकट होऊ लागतं. कौटुंबिक उपासनेदरम्यान, प्रचारकार्यात कसं बोलता येईल याचा सराव ते करू शकतात. त्यामुळे प्रचारकार्याची चांगल्या रीतीनं तयारी करण्यास त्यांना मदत होईल. शिवाय, जेव्हा ते एकमेकांना सत्याबद्दल बोलताना ऐकतात आणि कुटुंबातील सर्वांचं यहोवावर प्रेम असल्याचं आणि त्याचं मन आनंदित करण्याची त्यांची इच्छा असल्याचं ते पाहतात, तेव्हा त्यांच्यामधला नातेसंबंध आणखी घनिष्ठ होत जातो.
१३ पती-पत्नी कशा प्रकारे एकमेकांना सहकार्य करू शकतात? (मत्त. १९:६) जेव्हा पती-पत्नी यहोवावर प्रेम असल्याचं दाखवतात आणि एकत्र मिळून त्याची सेवा करतात, तेव्हा त्यांच्यातलं ऐक्य आणि आनंद टिकवून ठेवणं त्यांना शक्य होतं. अब्राहाम आणि सारा, इसहाक आणि रिबका, एलकाना आणि हन्ना यांचं ज्याप्रमाणे आपसात प्रेम होतं, त्याप्रमाणेच पती-पत्नीनंसुद्धा एकमेकांवर प्रेम असल्याचं दाखवून दिलं पाहिजे. (उत्प. २६:८; १ शमु. १:५, ८; १ पेत्र ३:५, ६) जेव्हा ते असं करतात, तेव्हा त्यांच्यात ऐक्य असतं आणि यहोवासोबतचा त्यांचा नातेसंबंधही आणखी मजबूत होतो.—उपदेशक ४:१२ वाचा.
१४. जर तुमचा विवाहसोबती यहोवाची सेवा करत नसेल तर आपलं वैवाहिक नातं मजबूत ठेवण्याकरता तुम्ही काय करू शकता?
१४ आपण यहोवाला न मानणाऱ्या व्यक्तीशी लग्न करू नये अशी स्पष्ट ताकीद बायबल आपल्याला देते. (२ करिंथ. ६:१४) पण आपले असेही काही बंधुभगिनी आहेत, ज्यांचा विवाहसोबती सत्यात नाही. उदाहरणार्थ, काहींना लग्नानंतर सत्य मिळाल्यामुळे त्यांचा विवाहसोबती कदाचित सत्यात नसेल. तर काहींनी सत्यात लग्न केलं असेल, पण त्यांचा विवाहसोबती नंतर सत्यात टिकून राहिला नसेल. अशा वेगवेगळ्या परिस्थितीत असूनही त्यांनी बायबलच्या सिद्धांतांचं पालन करून आपला वैवाहिक नातेसंबंध टिकवून ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. हे नेहमीच सोपं नसतं. उदाहरणार्थ मेरी आणि तिचा पती, डेव्हीड ही दोघंही सत्यात होती. पण नंतर डेव्हीडनं सभांना जायचं सोडून दिलं. अशा परिस्थितीतही मेरीनं एक चांगली पत्नी असल्याचं दाखवून दिलं आणि ख्रिस्ती गुण दाखवत राहण्याचा प्रयत्न केला. तिनं आपल्या सहा मुलांना यहोवाबद्दल शिकवलं. आणि या सर्व काळादरम्यान ती सभांना व अधिवेशनांना जात राहिली. काही वर्षांनंतर, मुलं मोठी झाली आणि त्यांचं स्वतंत्र जीवन सुरू झालं, तेव्हा मेरीला एकाकीपणा खाऊ लागला. पण अशा परिस्थितीतही ती यहोवाची सेवा करत राहिली. पण त्यानंतर, मेरी डेव्हीडसाठी जी मासिकं ठेवून जायची, ती मासिकं डेव्हीड वाचू लागला. यानंतर, त्यानं काही सभांना उपस्थित राहण्यास पुन्हा सुरवात केली. त्याचा ६ वर्षांचा नातू, त्याच्यासाठी नेहमी एक जागा राखून ठेवायचा. आणि डेव्हीडनं सभा चुकवली, तर तो त्यांना म्हणायचा: “आजोबा आज तुम्ही सभेला का नाही आला? मी तुमची वाट बघत होतो.” या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणजे, शेवटी २५ वर्षांनंतर डेव्हीड पुन्हा यहोवाकडे परतला. यहोवाची पुन्हा एकदा एकत्र मिळून सेवा करणं शक्य झाल्यामुळे तो आणि त्याची पत्नी, मेरी आता खूप खूश आहेत.
१५. मंडळीतील अनुभवी जोडपी, तरुणांना कशी मदत करू शकतात?
१५ आज सैतान कुटुंबांवर हल्ला करत आहे. म्हणूनच पती-पत्नीनं आपल्या विवाहातील ऐक्य टिकवून ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या विवाहाला कितीही वर्षं झाली असली, तरी त्याला बळकट करण्यासाठी तुम्ही व्यक्तिगत रीत्या काय करू शकता याचा विचार करा. तुमच्या विवाहाला जर अनेक वर्षं झाली असतील, तर तरुण जोडप्यांसमोर तुम्ही एक चांगलं उदाहरण ठरू तीत २:३-७.
शकता. एखाद्या तरुण जोडप्याला तुम्ही तुमच्या कौटुंबिक उपासनेला बोलवू शकता. त्यामुळे, विवाहाला कितीही वर्षं झाली असली, तरी पती-पत्नीनं एकमेकांना प्रेम दाखवलं पाहिजे आणि त्यांच्या नात्यातलं ऐक्य टिकवून ठेवलं पाहिजे, ही गोष्ट त्यांना शिकायला मिळेल.—“चला, आपण परमेश्वराच्या पर्वतावर . . . चढून जाऊ”
१६, १७. देवाचे संघटित सेवक आज कोणत्या गोष्टीची आतुरतेनं वाट पाहत आहेत?
१६ इस्राएली लोक सण साजरा करण्यासाठी यरुशलेमला जायचे, तेव्हा त्यांच्यातही संघटितपणा दिसून यायचा. प्रवासासाठी लागणाऱ्या गोष्टींची तयारी ते करायचे. त्यानंतर ते सोबत मिळून प्रवास करायचे आणि एकमेकांना सहकार्य करायचे. तसंच, मंदिरात पोचल्यावर ते एकत्र मिळून यहोवाची स्तुती आणि त्याची उपासना करायचे. (लूक २:४१-४४) आज, आपण नवीन जगात जाण्याची तयारी करत आहोत. त्यामुळे संघटित राहून, एकमेकांना सहकार्य करण्यासाठी जे काही करता येईल ते करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि हे आणखी जास्त प्रमाणात कसं करता येईल हे शोधण्याचाही आपण प्रयत्न केला पाहिजे.
१७ या जगातल्या लोकांमध्ये ऐक्य क्वचितच पाहायला मिळतं. वाद आणि मतभेद ही त्यांच्यात सामान्य गोष्ट बनली आहे. पण यहोवानं आपल्याला सत्य समजून घेण्यास आणि शांतीनं एकत्र राहण्यास मदत केली आहे. याबद्दल आपण त्याचे किती आभार मानले पाहिजेत! त्याचे लोक आज जगभरात त्याची उपासना, त्यानं घालून दिलेल्या पद्धतीनं करत आहेत. या शेवटल्या काळात खासकरून त्याच्या लोकांमधलं ऐक्य आणखी ठळकपणे दिसून येत आहे. यशया आणि मीखा यांच्या भविष्यवाणीत सांगितल्याप्रमाणे, ते सर्व जण ऐक्यानं “परमेश्वराच्या पर्वताकडे” चढून जात आहेत. (यश. २:२-४; मीखा ४:२-४ वाचा.) जेव्हा पृथ्वीवरील सर्व लोक यहोवाची उपासना करण्याकरता ‘एकत्र बांधल्याप्रमाणे’ आणि संघटीतपणे एकमेकांना सहकार्य करतील, तेव्हा ते दिवस आपल्याकरता किती आनंद देणारे असतील!