मुलांनो—बाप्तिस्मा घेण्यासाठी तुम्ही तयार आहात का?
“तुमच्यामध्ये असा कोण आहे की त्याला बुरुज बांधावयाची इच्छा असता तो अगोदर बसून व खर्चाचा अंदाज करून आपल्याजवळ तो पुरा करण्याइतकी ऐपत आहे की नाही हे पाहत नाही?”—लूक १४:२८.
हा लेख आणि पुढील लेख बाप्तिस्मा घेण्याची इच्छा असलेल्या तरुणांना लक्षात ठेवून लिहिण्यात आले आहेत
१, २. (क) आज देवाच्या लोकांना कशामुळे आनंद होतो? (ख) बाप्तिस्म्याचा अर्थ समजण्यासाठी ख्रिस्ती पालक आणि मंडळीतील वडील मुलांना कशा प्रकारे मदत करू शकतात?
मंडळीतील वडिलांनी १२ वर्षांच्या क्रिस्टोफरला म्हटलं: “तुझ्या जन्मापासून मी तुला पाहत आलोय आणि आता तू बाप्तिस्मा घ्यायचं ठरवलं आहेस हे ऐकून मला खूप छान वाटलं. पण, तुला एक विचारू का? ‘तू बाप्तिस्मा घ्यायचं का ठरवलं आहेस?’” वडिलांनी हा प्रश्न विचारण्यामागं एक खास कारण होतं. दरवर्षी हजारो तरुणांचा बाप्तिस्मा होत आहे हे पाहून आपल्याला खूप आनंद होतो. (उप. १२:१) पण, बाप्तिस्मा घेण्याचा काय अर्थ होतो हे मुलांना समजावं आणि बाप्तिस्मा घेण्याचा निर्णय त्यांचा स्वतःचा निर्णय असावा अशी ख्रिस्ती पालकांची आणि मंडळीतील वडिलांची इच्छा आहे.
नीति. १०:२२; १ पेत्र ५:८) म्हणूनच, ख्रिस्ती पालकांनी वेळ काढून आपल्या मुलांना येशूचे शिष्य असण्याचा नेमका काय अर्थ होतो हे शिकवलं पाहिजे. तसंच मंडळीतील वडीलदेखील, ज्या मुलांचे पालक सत्यात नाहीत त्यांना समर्पण आणि बाप्तिस्म्याचा काय अर्थ होतो हे समजून घेण्याकरता प्रेमळपणे मदत करू शकतात. (लूक १४:२७-३० वाचा.) एखादं बांधकाम पूर्ण करण्यासाठी ज्या प्रकारे तयारी करावी लागते, त्याच प्रकारे मुलांनीही बाप्तिस्मा घेण्याआधी चांगली तयारी केली पाहिजे. असं केल्यामुळे, यहोवाची अगदी “शेवटपर्यंत” विश्वासूपणे सेवा करणं त्यांना शक्य होईल. (मत्त. २४:१३) मग, सदासर्वकाळ यहोवाची सेवा करत राहण्याचा निर्णय घेण्यासाठी मुलांना कशामुळे मदत होऊ शकते? चला याविषयी आता थोडी माहिती घेऊ या.
२ एका ख्रिस्ती व्यक्तीसाठी समर्पण आणि बाप्तिस्मा एका नवीन जीवनाची सुरवातच आहे, असं आपल्याला बायबलमधून समजतं. हे एक असं जीवन आहे ज्यामध्ये आपल्याला यहोवाकडून अनेक आशीर्वाद तर मिळतातच, पण त्यासोबतच सैतानाकडून होणाऱ्या विरोधालाही सामोरं जावं लागतं. (३. (क) येशूच्या आणि पेत्राच्या शब्दांवरून आपल्याला बाप्तिस्म्याच्या महत्त्वाविषयी काय समजतं? (मत्त. २८:१९, २०; १ पेत्र ३:२१) (ख) या लेखात आपण कोणत्या प्रश्नांवर चर्चा करणार आहोत, आणि का?
३ मुलांनो तुमचीदेखील बाप्तिस्मा घेण्याची इच्छा आहे का? जर आहे तर त्यासाठी तुम्हाला नक्कीच शाबासकी दिली पाहिजे. कारण हे तुमच्या जीवनातलं सर्वात उत्तम ध्येय आहे. बाप्तिस्मा घेऊन यहोवाच्या साक्षीदारांपैकी एक होणं हा खरंच एक खूप मोठा बहुमान आहे. मोठ्या संकटातून बचावण्याकरता हे खूप महत्त्वाचं पाऊल आहे आणि म्हणून एका ख्रिश्चनानं बाप्तिस्मा घेणं गरजेचं आहे. (मत्त. २८:१९, २०; १ पेत्र ३:२१) यहोवाची सदासर्वकाळ सेवा करण्याचं वचन तुम्ही त्याला दिलं आहे हे बाप्तिस्मा घेण्याद्वारे तुम्ही दाखवून देता. हे वचन पूर्ण करण्याची तुमची मनापासून इच्छा असते. तेव्हा बाप्तिस्मा घेण्यासाठी तुम्ही तयार आहात का, हे पाहण्यासाठी पुढील प्रश्न तुम्हाला मदत करतील: (१) हा निर्णय घेण्याइतपत मी प्रौढ आहे का? (२) हा माझा व्यक्तिगत निर्णय आहे का? (३) यहोवाला आपलं जीवन समर्पित करण्याचा काय अर्थ होतो, हे मला समजलं आहे का? या प्रश्नांवर आता आपण थोडी चर्चा करू या.
बाप्तिस्म्याचा निर्णय घेण्याइतपत प्रौढता प्राप्त करणं
४, ५. (क) बाप्तिस्मा घेण्यासाठी वयानं मोठं असण्याची गरज का नाही? (ख) एक ख्रिस्ती व्यक्तीसाठी प्रौढ असण्याचा काय अर्थ होतो?
४ केवळ वयानं प्रौढ झाल्यानंतर किंवा वयाची एक विशिष्ट मर्यादा पार केल्यानंतरच बाप्तिस्मा घेतला नीतिसूत्रे २०:११ यात असं म्हटलं आहे: “वृत्ती शुद्ध आहे की नाही, नीट आहे की नाही, हे मूलसुद्धा आपल्या कृत्यांनी उघड करते.” तेव्हा, चांगलं ते करण्याचा आणि आपल्या निर्माणकर्त्याला आपलं जीवन समर्पित करण्याचा काय अर्थ होतो हे एका लहान मुलालाही कळतं. त्यामुळे, ज्या मुलांनी या बाबतीत प्रौढ असल्याचं दाखवून दिलं आहे आणि यहोवाची सेवा करण्याचं वचन दिलं आहे, त्यांच्यासाठी बाप्तिस्मा घेणं हे एक महत्त्वाचं आणि योग्य पाऊल आहे.—नीति. २०:७.
पाहिजे, असं बायबल सांगत नाही.५ प्रौढ असण्याचा काय अर्थ होतो? प्रौढता ही नेहमीच एखाद्याच्या वयाला उद्देशून नसते. बायबलनुसार ज्या व्यक्तीनं चांगलं काय आणि वाईट काय हे पारखण्याकरता आपल्या “ज्ञानेंद्रियांना” प्रशिक्षित केलेलं असतं, ती व्यक्ती प्रौढ असते. (इब्री ५:१४) चांगलं काय ते एका प्रौढ व्यक्तीला माहीत असतं आणि तेच करण्याचा तिनं आपल्या मनात निश्चय केलेला असतो. त्यामुळे, अशा व्यक्तीला चुकीची गोष्ट करण्याकरता प्रवृत्त करणं इतकं सोपं नसतं. शिवाय, योग्य ते करण्यासाठी तिला नेहमी कोणीतरी सांगण्याची गरज नसते. त्यामुळे, बाप्तिस्मा घेतलेली मुलं आपले आईवडील किंवा इतर मोठे लोक सोबत नसले तरीही योग्य तेच करतील अशी अपेक्षा करणं चुकीचं ठरणार नाही.—फिलिप्पैकर २:१२ पडताळून पाहा.
६, ७. (क) बॅबिलोनमध्ये असताना दानीएलापुढे कोणती आव्हानं होती? (ख) दानीएलाची प्रौढता कशी दिसून आली?
६ पण, लहान मुलं खरंच अशा प्रकारची प्रौढता दाखवू शकतात का? दानीएलाच्या उदाहरणाचा विचार करा. त्याला बॅबिलॉनमध्ये आपल्या आईवडिलांपासून लांब नेण्यात आलं तेव्हा तो कदाचित एक किशोरवयीन होता. त्या ठिकाणी त्याला देवाच्या आज्ञा न पाळणाऱ्या लोकांमध्ये राहावं लागलं. पण, दानीएलाच्या परिस्थितीकडे थोडं बारकाईनं लक्ष दिल्यास आपल्याला हे कळतं, की त्या ठिकाणी एक खास व्यक्ती म्हणून त्याला वागवण्यात येत होतं. राजाची सेवा करण्यासाठी काळजीपूर्वकपणे निवडण्यात आलेल्या तरुणांपैकी तो एक होता. (दानी. १:३-५, १३) एकंदरीत दानीएलाला इस्राएलमध्ये कधीच मिळाली नसती इतकी मोठी प्रतिष्ठा बॅबिलोनमध्ये मिळाली होती.
७ मग या सगळ्या गोष्टींप्रती दानीएलाची काय प्रतिक्रिया होती? बॅबिलोनी लोकांच्या प्रभावामुळे तो बदलला का किंवा त्याचा विश्वास कमकुवत झाला का? मुळीच नाही! बायबल म्हणतं की बॅबिलोनमध्ये असताना “आपणास विटाळ होऊ देऊ नये असा दानीएलाने मनाचा निश्चय केला” आणि खोट्या उपासनेशी संबंधित सर्व गोष्टींपासून तो दूर राहिला. (दानी. १:८) यावरून तो विचारांनी प्रौढ असल्याचं दिसून येतं.
८. दानीएलाच्या उदाहरणातून तुम्हाला काय शिकायला मिळतं?
८ दानीएलाच्या या उदाहरणातून तुम्ही काय शिकू शकता? एक प्रौढ तरुण व्यक्ती कठीण परिस्थितीतही विश्वासात खंबीर असते. ती सरड्यासारखी परिस्थितीनुसार रंग बदलत नाही. उदाहरणार्थ, राज्य सभागृहात देवाचा मित्र असल्याचं नाटक करून, शाळेत जगाचा मित्र असल्यासरखी ती वागत नाही. याउलट, परीक्षा प्रसंग येतात तेव्हाही ती विश्वासू राहते.—इफिसकर ४:१४, १५ वाचा.
९, १०. (क) अलिकडेच झालेल्या विश्वासाच्या परीक्षांना आपण कसं तोंड दिलं आहे याबद्दल विचार केल्यानं मुलांना कसा फायदा होईल? (ख) बाप्तिस्म्याचा काय अर्थ होतो?
९ हे खरं आहे की आपण सर्वच अपरिपूर्ण आहोत. त्यामुळे, तरुणांकडून आणि मोठ्यांकडूनसुद्धा कधीकधी चुका होतात. (उप. ७:२०) पण, जर तुमची बाप्तिस्मा घेण्याची इच्छा असेल, तर यहोवाची आज्ञा पाळण्याचा तुमचा निश्चय किती दृढ आहे याचं परीक्षण करणं सुज्ञपणाचं ठरेल. तेव्हा, स्वतःला विचारा, ‘गेल्या काही काळापासून मी यहोवाच्या आज्ञेनुसार वागत आलो आहे का?’ तसंच, तुमच्या विश्वासाची परीक्षा झाली तेव्हा तुम्ही कशी प्रतिक्रिया दाखवली होती त्याचाही विचार करा. त्या वेळी, काय करणं योग्य आहे हे तुम्हाला ठरवता आलं होतं का? दानीएलाप्रमाणे, तुम्हालाही कोणी सैतानाच्या जगात यशस्वी होण्याकरता तुमच्या कौशल्यांचा वापर करण्याचं उत्तेजन दिलं होतं का? जेव्हा यहोवाच्या आणि तुमच्या इच्छेमध्ये तफावत निर्माण होते, तेव्हादेखील देवाची इच्छा काय आहे हे समजून घेणं तुम्हाला शक्य होतं का?—इफिस. ५:१७.
१० या प्रश्नांची उत्तरं माहीत असणं गरजेचं का आहे? कारण यामुळे बाप्तिस्मा खरंच किती गंभीर गोष्ट आहे याची जाणीव तुम्हाला होईल. बाप्तिस्म्यावरून तुम्ही यहोवाला एक महत्त्वपूर्ण वचन दिलं आहे हे दिसून येतं. तुम्ही सदासर्वकाळ पूर्ण मनानं त्याच्यावर प्रेम करण्याचं आणि त्याची सेवा करण्याचं वचन त्याला देता. (मार्क १२:३०) बाप्तिस्मा घेणाऱ्या प्रत्येकानं यहोवाला दिलेलं वचन पाळण्याचा निर्धार केला पाहिजे.—उपदेशक ५:४, ५ वाचा.
ही तुमची व्यक्तिगत इच्छा आहे का?
११, १२. (क) बाप्तिस्मा घेण्याच्या विचारात असलेल्या व्यक्तीनं कोणत्या गोष्टीची खात्री केली पाहिजे? (ख) बाप्तिस्म्याबद्दल यहोवाचा दृष्टिकोन बाळगण्यासाठी तुम्हाला कशामुळे मदत होईल?
११ बायबल म्हणतं की यहोवाचे सर्वच लोक, अगदी मुलंदेखील “संतोषाने” म्हणजे स्वतःच्या इच्छेनं त्याची सेवा करतील. (स्तो. ११०:३) त्यामुळे, ज्या व्यक्तीला बाप्तिस्मा घेण्याची इच्छा आहे, तिला या गोष्टीची खात्री असली पाहिजे की ही तिची व्यक्तिगत इच्छा आहे. त्यामुळे सर्वांनीच आणि खासकरून जे सत्यात लहानाचे मोठे झाले आहेत, त्यांनीही आपल्या इच्छेचं काळजीपूर्वक परीक्षण केलं पाहिजे.
१२ मोठं होत असताना कदाचित तुम्ही अनेकांना बाप्तिस्मा घेताना पाहिलं असेल. कदाचित, तुमच्या काही मित्र-मैत्रिणींचा किंवा भाऊ-बहिणींचा बाप्तिस्मा झाला असेल. पण, एक विशिष्ट वय झाल्यामुळे किंवा बाकीचे लोक बाप्तिस्मा घेत आहेत म्हणून मीही बाप्तिस्मा घेतला पाहिजे असा विचार करू नका. तर मग, बाप्तिस्म्याबद्दलचा तुमचा दृष्टिकोनही यहोवासारखाच आहे, याची खात्री तुम्हाला कशी करता येईल? बाप्तिस्मा घेणं इतकं महत्त्वाचं का आहे याचा पुरेपूर विचार करा. याबद्दलची अनेक चांगली कारणं तुम्हाला या लेखात आणि पुढील लेखात पाहायला मिळतील.
१३. बाप्तिस्मा घेण्याचा तुमचा निर्णय मनापासून आहे की नाही हे समजण्यास तुम्हाला कशामुळे मदत होईल?
१३ बाप्तिस्मा घेण्याचा निर्णय मनापासून आहे की नाही हे पाहण्याचा एक मार्ग म्हणजे आपल्या प्रार्थनांचं परीक्षण करणं. तुम्ही वारंवार यहोवाला प्रार्थना करता का? आणि प्रार्थनेत तुम्ही काही विशिष्ट गोष्टींचा उल्लेख करता का? या प्रश्नांच्या उत्तरांवरून यहोवासोबत असणारं तुमचं नातं किती जवळचं आहे हे समजण्यास तुम्हाला मदत होईल. (स्तो. २५:४) अनेक वेळा यहोवा आपल्या प्रार्थनांचं उत्तर बायबलद्वारे पुरवतो. तेव्हा, यहोवासोबतचं आपलं नातं आणखी घनिष्ट करून त्याची सेवा करण्याची आपल्याला मनापासून इच्छा आहे का, हे पाहण्याचा अजून एक मार्ग म्हणजे बायबलचा अभ्यास करण्याची आपली सवय तपासून पाहणे. (यहो. १:८) स्वतःला विचारा: ‘मी नियमितपणे बायबलचा अभ्यास करतो का? कौटुंबिक उपासनेत मी आनंदानं सहभाग घेतो का?’ या प्रश्नांच्या उत्तरांवरून बाप्तिस्मा घेण्याचा तुमचा निर्णय मनापासून आहे की नाही हे समजण्यास तुम्हाला मदत होईल.
समर्पणाचा अर्थ
१४. समर्पण आणि बाप्तिस्मा यांत काय फरक आहे?
१४ समर्पण आणि बाप्तिस्मा यांत काय फरक आहे, हे कदाचित काही तरुणांना समजत नसेल. उदाहरणार्थ, काही जण कदाचित असं म्हणतील की आम्ही यहोवाला आमचं जीवन समर्पित केलं आहे, पण बाप्तिस्मा घेण्यासाठी आम्ही अजून तयार नाही. पण, असं म्हणण्यात खरंच काही अर्थ आहे का? समर्पण म्हणजे एक अशी प्रार्थना ज्यामध्ये तुम्ही यहोवाला, सदासर्वकाळ त्याची सेवा करण्याचं वचन देता. आणि बाप्तिस्मा घेणं एक अशी गोष्ट आहे ज्याद्वारे तुम्ही यहोवाला समर्पण केल्याचं इतरांना दाखवून देता. त्यामुळे, बाप्तिस्मा घेण्याआधी देवाला आपलं जीवन समर्पित करण्याचा काय अर्थ होतो हे समजून घेणं महत्त्वाचं आहे.
१५. समर्पणाचा काय अर्थ होतो?
१५ तुम्ही यहोवाला आपलं जीवन समर्पित करता, तेव्हा तुमच्या जीवनावर आता त्याचा अधिकार असल्याचं मत्तय १६:२४ वाचा.) यहोवाला हे वचन देणं एक अतिशय गंभीर गोष्ट आहे. (मत्त. ५:३३) मग तुमच्या जीवनावर, तुमचा नाही तर यहोवाचा अधिकार आहे याची जाणीव असल्याचं तुम्ही कसं दाखवू शकता?—रोम. १४:८.
तुम्ही त्याला सांगत असता. इथून पुढं त्याची सेवा करणं हीच तुमच्या जीवनातली सर्वात महत्त्वाची गोष्ट असेल असं वचन तुम्ही त्याला देता. (१६, १७. (क) स्वतःचं जीवन यहोवाला समर्पित करण्याचा काय अर्थ होतो, हे उदाहरण देऊन स्पष्ट करा. (ख) समर्पण करणारी व्यक्ती खरंतर यहोवाला काय म्हणत असते?
१६ हे समजण्यासाठी आपण एका उदाहरणाचा विचार करू या. असं समजा की तुमच्या मित्रानं तुम्हाला एक गाडी भेट म्हणून दिली आहे. गाडीची सर्व कागदपत्रं तुम्हाला सोपवल्यावर तो म्हणतो: “आजपासून ही गाडी तुझी!” पण, नंतर तो तुम्हाला सांगतो की “गाडीची चावी मात्र माझ्याकडे राहील आणि मीच तुझ्यासाठी गाडी चालवेन.” मग अशा भेटीबद्दल आणि ज्या मित्रानं ती भेट दिली, त्याच्याबद्दल तुम्हाला कसं वाटेल?
१७ जेव्हा एक व्यक्ती यहोवाला स्वतःचं जीवन समर्पित करते, तेव्हा ती असं वचन देत असते: “मी तुला माझं जीवन देत आहे. इथून पुढं माझ्या जीवनावर आता तुझाच अधिकार आहे.” त्यामुळे या व्यक्तीनं तिच्या वचनानुसार जगावं अशी अपेक्षा करण्याचा यहोवाला पूर्ण अधिकार आहे. पण, समजा ती व्यक्ती यहोवाच्या आज्ञेनुसार जीवन जगत नसेल, तर काय? ती इतरांच्या नजरेआड, सत्यात नसलेल्या व्यक्तीसोबत लग्नाच्या उद्देशानं भेटीगाठी करत असेल, तर काय? किंवा मग ती अशी नोकरी स्वीकारत असेल ज्यामुळे सेवाकार्यात जास्त वेळ घालवणं किंवा मंडळीच्या सभांना नियमित उपस्थित राहणं तिला जमणार नसेल, तर काय? ती व्यक्ती यहोवाला दिलेल्या वचनानुसार जगत आहे असा याचा अर्थ होईल का? नक्कीच नाही. हे जणू गाडीची चावी स्वतःकडेच ठेवण्यासारखं असेल. यहोवाला आपलं जीवन समर्पित करताना जर आपण त्याला असं म्हणत असू, की “माझ्या जीवनावर आता माझा नाही, तुझा अधिकार आहे.” तर, आपण नेहमी यहोवाच्या इच्छेनुसारच करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग ते आपल्या स्वतःच्या इच्छेविरुद्ध असलं तरी. तेव्हा, आपणही येशूचं अनुकरण केलं पाहिजे. त्यानं म्हटलं: “कारण मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे, तर ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून स्वर्गातून उतरलो आहे.”—योहा. ६:३८.
१८, १९. (क) बाप्तिस्मा घेणं एक असा बहुमान आहे ज्यामुळे आशीर्वाद लाभतात हे रोझ आणि क्रिस्टोफरच्या उदाहरणावरून कसं दिसून येतं? (ख) बाप्तिस्म्याच्या बहुमानाबद्दल तुम्हाला कसं वाटतं?
१८ तर मग, बाप्तिस्मा ही एक गंभीर गोष्ट आहे हे स्पष्टच आहे. यहोवाला समर्पण करणं आणि बाप्तिस्मा घेणं हा एक विशेष बहुमान आहे. ज्या मुलांचं यहोवावर प्रेम आहे आणि ज्यांना समर्पणाचा अर्थ माहीत आहे, ती मुलं देवाला आपलं जीवन समर्पित करण्यासाठी आणि बाप्तिस्मा घेण्यासाठी मागंपुढं पाहत नाहीत. त्यांना त्यांच्या निर्णयाचा कधीच पस्तावा होत नाही. रोझ ही बाप्तिस्मा झालेली एक किशोरवयीन मुलगी म्हणते: “माझं यहोवावर खूप प्रेम आहे. त्याची सेवा करण्यात जो आनंद मला मिळतो त्याची तुलना मी कशाशीच करू शकत नाही. बाप्तिस्मा घेण्याचा निर्णय माझ्या आयुष्यातला असा निर्णय होता जो योग्य असल्याची मला पूर्ण खात्री होती.”
१९ लेखाच्या सुरवातीला उल्लेखण्यात आलेल्या क्रिस्टोफरचं काय? १२ वर्षांचा असताना त्यानं बाप्तिस्मा घेण्याचा जो निर्णय घेतला त्याबद्दल आज त्याला कसं वाटतं? तो म्हणतो की त्यानं हा निर्णय घेतला त्याबद्दल त्याला खूप समाधान वाटतं. १७ वर्षांचा असताना त्यानं पायनियर सेवा सुरू केली आणि १८ वर्षांचा असताना त्याला साहाय्यक सेवक म्हणून नियुक्त करण्यात आलं. इतकंच नाही तर आज तो बेथेलमध्ये सेवा करत आहे. तो म्हणतो: “बाप्तिस्मा घेण्याचा निर्णय माझ्यासाठी सर्वात योग्य निर्णय ठरला आहे. आज मी यहोवाच्या सेवेत आणि त्याच्या संघटनेत एक असं काम करत आहे ज्यामुळे मला खरं समाधान मिळतं.” तुम्हीसुद्धा बाप्तिस्मा घेण्याच्या विचारात असाल तर तुम्हाला त्यासाठी कशी तयारी करता येईल? पुढील लेखात या प्रश्नाचं उत्तर देण्यात आलं आहे.