अभ्यास लेख १३
यहोवा आपलं संरक्षण कसं करतो?
“प्रभू विश्वासू आहे आणि तो तुम्हाला बळ देईल आणि त्या दुष्टापासून तुमचं संरक्षण करेल.”—२ थेस्सलनी. ३:३.
गीत १८ देवाचे खरे प्रेम
सारांश *
१. येशूने यहोवाकडे शिष्यांसाठी काय विनंती केली?
आपल्या मृत्यूच्या शेवटच्या रात्री येशू या गोष्टीचा विचार करत होता, की आपल्या शिष्यांना पुढे कोणकोणत्या समस्यांचा सामना करावा लागेल. शिष्यांवर प्रेम असल्यामुळे त्याने यहोवाला अशी विनंती केली: “त्या दुष्टापासून त्यांना सांभाळ.” (योहा. १७:१४, १५) आपण स्वर्गात गेल्यानंतर सैतान यहोवाच्या प्रत्येक सेवकाचा छळ करेल, हे येशूला माहीत होतं. त्यामुळे आज आपल्याला संरक्षणाची गरज आहे.
२. यहोवा आपल्या प्रार्थना नक्की ऐकेल असं आपण का म्हणू शकतो?
२ येशूवर प्रेम असल्यामुळे यहोवाने त्याची विनंती ऐकली. यहोवाला आनंद होईल असं जर आपण वागलो, तर तो आपल्यावरसुद्धा तेवढंच प्रेम करेल. तसंच, आपण मदतीसाठी आणि संरक्षणासाठी त्याच्याकडे प्रार्थना केली तर तो ती नक्कीच ऐकेल. शिवाय, एक प्रेमळ पिता असल्यामुळे तो नेहमीच आपल्या मुलांची काळजी घेईल. कारण त्याने जर आपली काळजी घेतली नाही, आपलं संरक्षण केलं नाही तर त्याच्या नावाची बदनामी होईल.
३. आज आपल्याला यहोवाच्या संरक्षणाची गरज का आहे?
३ आज आपल्याला यहोवाच्या संरक्षणाची कधी नव्हती इतकी गरज आहे. कारण सैतानाला स्वर्गातून काढून पृथ्वीवर फेकण्यात आलं आहे आणि ‘तो खूप क्रोधित झाला आहे.’ (प्रकटी. १२:१२) तो काहींना असा विचार करायला लावतो, की त्यांनी आपला छळ केला तर एकाअर्थी ते ‘देवाची पवित्र सेवा करत आहेत.’ (योहा. १६:२) आणि काही तर असे आहेत, की ते देवावर विश्वास ठेवत नाहीत, तरीसुद्धा ते आपला छळ करतात. कारण आपण त्यांच्यासारखं जगत नाही. लोकांनी कोणत्याही कारणासाठी आपल्याला छळलं तरी आपण घाबरणार नाही. कारण बायबल असं म्हणतं: “प्रभू विश्वासू आहे आणि तो तुम्हाला बळ देईल आणि त्या दुष्टापासून तुमचं संरक्षण करेल.” (२ थेस्सलनी. ३:३) तर यहोवा कोणत्या दोन मार्गांनी आपलं संरक्षण करतो, ते आता आपण पाहू या.
यहोवाने आपल्याला संपूर्ण शस्त्रसामग्री दिली आहे
४. इफिसकर ६:१३-१७ या वचनांनुसार आपलं संरक्षण करण्यासाठी यहोवाने आपल्याला काय दिलं आहे?
४ सैतानाच्या हल्ल्यांपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी यहोवाने आपल्याला संपूर्ण शस्त्रसामग्री दिली आहे. (इफिसकर ६:१३-१७ वाचा.) ही शस्त्रसामग्री खूप मजबूत आहे. पण आपण जर त्यातलं प्रत्येक शस्त्रं घातलं आणि सतत त्याचा वापर केला तरच आपलं संरक्षण होईल. प्रत्येक शस्त्र कशाला सूचित करतं, ते आता आपण पाहू या.
५. सत्याचा पट्टा काय आहे, आणि आपण तो का बांधला पाहिजे?
५ सत्याचा पट्टा बायबलमध्ये जी सत्यं दिली आहेत, त्यांना सूचित करतो. आपण हा पट्टा आपल्या कंबरेला का बांधला पाहिजे? कारण सैतान “खोटेपणाचा बाप” आहे. (योहा. ८:४४) तो हजारो वर्षांपासून खोटं बोलत आला आहे आणि ‘संपूर्ण पृथ्वीवरच्या लोकांना फसवत’ आहे. (प्रकटी. १२:९) पण बायबलमधली सत्यं त्याच्या जाळ्यात अडकण्यापासून आपल्याला वाचवतात. तर मग, सत्याचा हा पट्टा आपण कसा बांधू शकतो? यहोवाबद्दल सत्य शिकून, ‘पवित्र शक्तीने आणि सत्याने’ त्याची उपासना करून आणि सर्व गोष्टींत प्रामाणिकपणे वागून आपण हा पट्टा बांधू शकतो.—योहा. ४:२४; इफिस. ४:२५; इब्री १३:१८.
६. नीतिमत्त्वाचं कवच काय आहे, आणि आपण ते का घातलं पाहिजे?
६ नीतिमत्त्वाचं कवच म्हणजे यहोवाचे नीतिमान स्तर. आपण हे कवच का घातलं पाहिजे? युद्धाच्या वेळी कवच सैनिकाच्या हृदयाचं रक्षण करतं. अगदी तसंच, नीतिमत्त्वाचं कवच जगाच्या वाईट प्रभावापासून आपल्या हृदयाचं, म्हणजेच आपल्या मनाचं रक्षण करतं. (नीति. ४:२३) आपण पूर्ण मनाने यहोवावर प्रेम करावं आणि त्याची सेवा करावी, अशी त्याची इच्छा आहे. (मत्त. २२:३६, ३७) पण आपण पूर्ण मनाने यहोवाची सेवा करू नये, यासाठी सैतान खूप प्रयत्न करतो. त्यासाठी तो आपल्या मनात जगातल्या गोष्टींबद्दलचं प्रेम निर्माण करतो; अशा गोष्टी ज्या यहोवाला अजिबात आवडत नाहीत. (याको. ४:४; १ योहा. २:१५, १६) आणि त्याची ही युक्ती काम करत नसेल तर तो आपल्याला घाबरवतो, धमकावतो म्हणजे मग आपण असं काहीतरी काम करू ज्यामुळे यहोवाचं मन दुःखी होईल.
७. नीतिमत्त्वाचं कवच आपण कशा प्रकारे घालतो?
७ चांगलं काय आणि वाईट काय याबद्दल यहोवाने जे स्तर घालून दिले आहेत, ते आपण ऐकतो आणि त्याप्रमाणे जीवन जगतो, तेव्हा आपण नीतिमत्त्वाचं कवच घालत असतो. (स्तो. ९७:१०) काहींना मात्र असं वाटतं, की यहोवाच्या स्तरांमुळे आपल्याला हवं तसं स्वातंत्र्य मिळत नाही. पण आपणसुद्धा तसं समजून यहोवाचे स्तर पाळायचं सोडून दिलं, तर आपण अशा एका सैनिकासारखे होऊ जो भर युद्धात आपलं कवच काढून टाकतो. कारण ते खूप जड आहे असं त्याला वाटतं. असं करणं खरंच किती मूर्खपणाचं ठरेल! पण जे यहोवावर प्रेम करतात त्यांच्यासाठी त्याच्या ‘आज्ञा कधीच कठीण’ किंवा जड नसतात. उलट, त्यांचं पालन केल्यामुळे आपलं संरक्षणच होईल, असं ते मानतात.—१ योहा. ५:३.
८. तयारी दाखवणारे जोडे पायांत घालणं म्हणजे काय?
८ पौल आपल्याला असंही सांगतो, की आपण शांती देणारा आनंदाचा संदेश घोषित करण्यासाठी आपली तयारी दाखवणारे जोडे पायांत घालावेत. म्हणजेच, आपण राज्याचा आनंदाचा संदेश सांगण्यासाठी नेहमीच तयार असलं पाहिजे. आपण बायबलचा संदेश इतरांना सांगतो तेव्हा आपला स्वतःचा विश्वास मजबूत होतो. म्हणून संधी मिळेल तेव्हा आपण हा संदेश इतरांना सांगितला पाहिजे. जसं की, कामाच्या ठिकाणी, शाळेत, व्यापारी क्षेत्रात, घरोघरचं प्रचारकार्य करताना, खरेदी करताना, सत्यात नसलेल्या नातेवाइकांशी किंवा ओळखीच्या लोकांशी बोलताना आणि काही कारणांमुळे घरातून बाहेर जाता येत नसेल, अगदी तेव्हासुद्धा. पण आपण जर घाबरून प्रचारकार्य करायचं सोडून दिलं तर आपण अशा एका सैनिकासारखे होऊ जो युद्धात आपल्या पायांतले जोडे काढून टाकतो. त्यामुळे त्याच्या पायांना जखम होऊ शकते आणि शत्रू सहजपणे त्याच्यावर हल्ला करू शकतो. शिवाय, त्याला आपल्या सेनापतीचे आदेशही पाळता येणार नाहीत.
९. आपण विश्वसाची मोठी ढाल हातात का घेतली पाहिजे?
१ पेत्र ३:१५) किंवा, चांगल्या पगाराच्या नोकरीची संधी समोर आली, पण तिच्यामुळे जर आपल्या उपासनेत अडथळा निर्माण होणार असेल, तर ती नाकारण्याचं बळ आपल्याला मिळेल. (इब्री १३:५, ६) आणि विरोध असतानाही यहोवाची सेवा करत राहायला विश्वासामुळेच आपल्याला मदत होईल.—१ थेस्सलनी. २:२.
९ विश्वासाची मोठी ढाल म्हणजे यहोवावर आणि त्याच्या सगळ्या अभिवचनांवर असलेला आपला विश्वास. विश्वासाची ही मोठी ढाल आपण हातात का घेतली पाहिजे? कारण तिच्यामुळे ‘त्या दुष्टाचे सगळे जळते बाण विझवायला’ आपल्याला मदत होऊ शकते. विश्वासाच्या या ढालीमुळे धर्मत्यागी लोकांच्या शिकवणींपासून आपलं संरक्षण होतं. तसंच, लोक आपल्या विश्वासाची थट्टा करतात तेव्हा आपण खचून जात नाही. इतकंच नाही, तर इतर जण जेव्हा यहोवाचे स्तर मोडायचा दबाव आपल्यावर आणतात तेव्हा त्याचा प्रतिकार करायचं बळ आपल्याला मिळतं. जसं की, शाळेत किंवा कामाच्या ठिकाणी सत्याची बाजू घ्यायला आपल्याला मदत होते. (१०. तारणाचा टोप काय आहे, आणि आपण तो का घातला पाहिजे?
१० तारणाचा टोप म्हणजे यहोवाने आपल्याला दिलेली आशा. ही आशा अशी आहे, की आपण यहोवाच्या इच्छेप्रमाणे वागलो, तर तो आपल्याला भविष्यात सर्वकाळाचं १ थेस्सलनी. ५:८; १ तीम. ४:१०; तीत १:१, २) ज्या प्रकारे एका सैनिकाचा टोप त्याच्या डोक्याचं रक्षण करतो, त्याच प्रकारे आपली आशा आपल्या विचारांचं रक्षण करते. ते कसं? ही आशा आपल्याला समस्यांमुळे निराश न होता देवाच्या अभिवचनांवर लक्ष लावायला मदत करते. तर मग, तारणाचा हा टोप आपण कसा घालू शकतो? प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत यहोवासारखा विचार करून. जसं की, धनसंपत्तीच्या बाबतीत. आपण नाश होणाऱ्या धनावर नाही तर देवावर आपली आशा ठेवू.—स्तो. २६:२; १०४:३४; १ तीम. ६:१७.
जीवन देईल आणि आपला मृत्यू जरी झाला तरी तो आपलं पुनरुत्थान करेल. (११. पवित्र शक्तीची तलवार काय आहे, आणि आपण ती का वापरली पाहिजे?
११ पवित्र शक्तीची तलवार म्हणजे देवाचं वचन, बायबल. या तलवारीत सर्व प्रकारचा खोटेपणा उघड करण्याची ताकद आहे. तसंच, खोट्या शिकवणींपासून आणि वाईट सवयींपासून लोकांची सुटका करण्याचीही ताकद तिच्यात आहे. (२ करिंथ. १०:४, ५; २ तीम. ३:१६, १७; इब्री ४:१२) बायबलचा चांगला अभ्यास करून आणि संघटनेकडून मिळाणाऱ्या प्रशिक्षणाचा फायदा घेऊन आपण ही तलवार चांगल्या प्रकारे वापरायला शिकू शकतो. (२ तीम. २:१५) पण या सगळ्या शस्त्रसामग्रीशिवाय, यहोवा आणखी एका मार्गाद्वारे आपलं संरक्षण करतो. तो कोणता आहे, ते आपण पुढे पाहू या.
या लढाईत आपण एकटेच नाहीत
१२. आपल्याला आणखी कोणाच्या मदतीची गरज आहे, आणि का?
१२ एखादा सैनिक कितीही अनुभवी असला तरी, एका भल्यामोठ्या सैन्याचा आपण एकट्याने सामना करून जिंकू शकत नाही, हे त्याला चांगलं माहीत असतं. लढाई जिंकण्यासाठी इतर सैनिकांची गरज आहे, याची त्याला जाणीव असते. अगदी तसंच, सैतानाचा आणि त्याच्या साथीदारांचा आपण एकट्याने सामना करू शकत नाही. त्यांच्यासोबतची आपली लढाई जिंकण्यासाठी आपल्याला भाऊबहिणींच्या मदतीची गरज आहे. त्यासाठीच यहोवाने आपल्याला जगभरातला ‘बंधुसमाज’ दिला आहे.—१ पेत्र २:१७.
१३. इब्री लोकांना १०:२४, २५ या वचनांनुसार सभांना उपस्थित राहिल्यामुळे आपल्याला कशा प्रकारे मदत होईल?
१३ भाऊबहिणींची मदत आपल्याला सभांमध्ये मिळू शकते. (इब्री लोकांना १०:२४, २५ वाचा.) आपण सगळेच कधी ना कधी निराश होतो, पण सभांना उपस्थित राहिल्यामुळे आपल्या मनाला उभारी मिळू शकते. भाऊबहिणींनी मनापासून दिलेली उत्तरं ऐकून आपल्याला प्रोत्साहन मिळतं. आणि बायबलवर आधारित भाषणांमुळे आणि प्रात्यक्षिकांमुळे आपल्याला यहोवाची सेवा करत राहायची प्रेरणा मिळते. तसंच, सभांच्या आधी आणि नंतर जेव्हा आपण इतरांशी बोलतो, तेव्हा आपल्याला खूप बरं वाटतं. (१ थेस्सलनी. ५:१४) याशिवाय, सभांमध्ये आपल्याला इतरांना मदत करायचीही संधी मिळते आणि त्यामुळे आपल्याला आनंद मिळतो. (प्रे. कार्यं २०:३५; रोम. १:११, १२) सभांमुळे इतर काही मार्गांनीही आपल्याला मदत मिळते. त्या आपल्याला प्रचाराची आणि शिकवण्याची कौशल्यं वाढवण्यासाठी मदत करतात. उदाहरणार्थ, ‘शिकवण्याची साधने’ यात दिलेली वेगवेगळी प्रकाशनं आणि व्हिडिओ यांचा सेवाकार्यात कसा वापर करायचा, हे आपण तिथे शिकतो. म्हणून सभांची चांगली तयारी करा. सभांमध्ये लक्ष देऊन ऐका. शिकलेल्या गोष्टी लागू करा. या सगळ्या गोष्टी केल्यामुळे तुम्ही ‘ख्रिस्त येशूचे एकनिष्ठ सैनिक’ व्हाल.—२ तीम. २:३.
१४. यहोवा आणखी कोणाद्वारे आपल्याला मदत करतो?
१४ आपल्या मदतीसाठी असंख्य शक्तिशाली स्वर्गदूतसुद्धा आहेत. फक्त एक स्वर्गदूत काय करू शकतो, हे तर आपल्याला माहीतच आहे. (यश. ३७:३६) मग स्वर्गदूतांचं मोठं सैन्य काय करू शकतं याचा विचार करा. यहोवाच्या या शक्तिशाली सैन्यासमोर कोणताही माणूस किंवा दुष्ट स्वर्गदूत टिकू शकत नाही. यहोवा सगळ्यात शक्तिशाली आहे, त्यामुळे तो जर आपल्यासोबत असेल, तर आपल्या विरोधकांपेक्षा आपण नेहमी शक्तिशाली ठरू; मग ते किती का असेनात. (शास्ते ६:१६) आणि हे किती खरं आहे! त्यामुळे कामाच्या ठिकाणी किंवा शाळेत तुमची थट्टा होत असेल किंवा सत्यात नसलेले तुमचे नातेवाईक तुमचा विरोध करत असतील तर घाबरून जाऊ नका. हे नेहमी लक्षात ठेवा, की या लढाईत तुम्ही एकटे नाहीत. तुमच्या मदतीसाठी अनेक जण आहेत. आणि आपण जर यहोवाच्या मार्गदर्शनाचं पालन केलं तर तो नेहमी आपल्यासोबत असेल.
यहोवा नेहमी आपलं संरक्षण करत राहील
१५. यशया ५४:१५, १७ या वचनांनुसार कोणीही देवाच्या लोकांना प्रचार करण्यापासून का रोखू शकत नाही?
१५ सैतानाच्या मुठीत असलेलं हे जग बऱ्याच कारणांमुळे आपला द्वेष करतं. जसं की, आपण राजकारणात आणि युद्धात भाग घेत नाही; आपण देवाच्या नावाबद्दल इतरांना सांगतो, फक्त त्याचंच राज्य या पृथ्वीवर शांती आणेल असा प्रचार करतो आणि त्याच्या नैतिक स्तरांचं पालन करतो. तसंच, सैतान ‘खोटारडा आणि खुनी’ आहे, असंही आपण लोकांना सांगतो. (योहा. ८:४४) याशिवाय, आपण अशी घोषणा करतो, की सैतानाच्या जगाचा लवकरच नाश होणार आहे. असं असलं तरी, सैतान आणि त्याचे लोक आपल्याला प्रचार करण्यापासून कधीच रोखू शकणार नाहीत. उलट, जमेल त्या मार्गाने आपण यहोवाची स्तुती करत राहू. सैतान कितीही शक्तिशाली असला, तरी संपूर्ण जगात प्रचार करण्यापासून तो आपल्याला थांबवू शकला नाही. आणि हे फक्त यहोवाच्या संरक्षणामुळेच शक्य झालं!—यशया ५४:१५, १७ वाचा.
१६. मोठ्या संकटाच्या वेळी यहोवा आपल्या लोकांचं संरक्षण कसं करेल?
१६ भविष्यात यहोवा आपल्या लोकांचं संरक्षण कसं करेल? मोठ्या संकटादरम्यान तो दोन मार्गांनी त्यांचं संरक्षण करेल. पहिला मार्ग, पृथ्वीवरचे राजे मोठ्या बाबेलचा, म्हणजे खोट्या धर्माच्या साम्राज्याचा नाश करेल, तेव्हा यहोवा आपल्या विश्वासू सेवकांचं संरक्षण करेल. (प्रकटी. १७:१६-१८; १८:२, ४) दुसरा मार्ग, यहोवा हर्मगिदोनात सैतानाच्या जगाच्या उरलेल्या भागाचा नाश करेल तेव्हासुद्धा तो आपल्या लोकांचं संरक्षण करेल.—प्रकटी. ७:९, १०; १६:१४, १६.
१७. यहोवासोबत आपलं नातं मजबूत केल्यामुळे आपल्याला कशी मदत होईल?
१७ यहोवासोबत आपलं मजबूत नातं असलं, तर सैतान कधीच आपलं कायमचं नुकसान करू शकणार नाही. उलट, त्याचाच कायमचा नाश होईल. (रोम. १६:२०) म्हणून यहोवाने दिलेली सगळी शस्त्रसामग्री आपण घालू या आणि तिचा वापर करत राहू या. तसंच, सैतान आणि या जगाच्या विरोधात असलेली लढाई एकट्यानेच लढण्याऐवजी आपण भाऊबहिणींची मदत घेऊ या आणि त्यांनाही मदत करत राहू या. याशिवाय, आपण यहोवाच्या मार्गदर्शनाचं पालन करत राहू या. या सगळ्या गोष्टी केल्या तर आपण याची खातरी बाळगू शकतो, की यहोवा आपल्याला बळ देईल आणि आपलं संरक्षण करेल.—यश. ४१:१०.
गीत ४६ यहोवा राजा बनला आहे!
^ परि. 5 यहोवा त्याच्यासोबतचं आपलं नातं धोक्यात आणणाऱ्या गोष्टींपासून आपलं संरक्षण करेल आणि त्यांचा सामना करायचं बळ देईल, असं अभिवचन बायबल आपल्याला देतं. पण आपल्याला संरक्षणाची गरज का आहे? यहोवा आपलं संरक्षण कसं करतो? आणि त्याच्याकडून संरक्षण मिळावं म्हणून आपण काय केलं पाहिजे? या प्रश्नांची उत्तरं आता आपण पाहू या.