व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास करण्यासाठी एक टीप

अभ्यास करण्यासाठी एक टीप

“नवीन काय आहे?” या टॅबचा चांगला उपयोग कसा कराल?

JW लायब्ररी  ॲप आणि jw.org/mr या वेबसाईटवर “नवीन काय आहे?” (What’s New) या विभागात अलीकडेच प्रकाशित केलेली नवनवीन साहित्यं दाखवली जातात. या नवीन साहित्यांबद्दल माहीत करून घ्यायला तुम्ही या विभागाचा वापर कसा करू शकता?

JW लायब्ररी

  • JW लायब्ररीवर वेगवेगळ्या लेखमालिका आहेत. एखादा लेख ज्या लेखमालिकेत आला पाहिजे त्या लेखमालिकेच्या सूचीमध्ये त्या लेखाचा विषय समाविष्ट करून तो लेख प्रकाशित केला जातो. तर जेव्हा “नवीन काय आहे?” या विभागात एखादी लेखमालिका दिसते, तेव्हा तुम्ही त्या लेखमालिकेची सुधारित आवृत्ती डाऊनलोड करू शकता. आणि मग त्या लेखमालिकेत तारखेच्या क्रमानुसार दिलेल्या सूचीमध्ये सर्वात वरती येणारा लेख तुम्ही वाचू शकता.

  • मासिकांसारखी मोठी प्रकाशनं एकाच वेळी पूर्णपणे वाचता येत नाहीत. म्हणून ही मासिकं पूर्ण वाचून होईपर्यंत तुम्ही ती “Add to Favorites” या लिस्टमध्ये ठेवू शकता.

JW.ORG

पण काही गोष्टी, जसं बातम्या किंवा घोषणा फक्‍त jw.org/mr या वेबसाईटवरच येतात. म्हणून नवीन लेखांबद्दल जाणून घेण्यासाठी तुम्ही वेबसाईटचं “नवीन काय आहे?” हे पेज नियमितपणे तपासून पाहू शकता.