व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख १०

गीत १३ ख्रिस्ताचा आदर्श

बाप्तिस्म्यानंतरही येशूच्या ‘मागे चालत राहा’

बाप्तिस्म्यानंतरही येशूच्या ‘मागे चालत राहा’

“जर कोणाला माझ्यामागे यायचं असेल, तर त्याने स्वतःला नाकारावं आणि दररोज आपला वधस्तंभ उचलून माझ्यामागे चालत राहावं.”​—लूक ९:२३.

या लेखात:

हा लेख आपल्या सगळ्यांनाच आपल्या समर्पणानुसार जीवन जगायला मदत करेल. तसंच, खासकरून ज्यांचा अलीकडेच बाप्तिस्मा झाला आहे त्यांना विश्‍वासू राहायलाही हा लेख मदत करेल.

१-२. बाप्तिस्मा झाल्यानंतर एका व्यक्‍तीला कोणते आशीर्वाद मिळतात?

 बाप्तिस्मा घेऊन यहोवाच्या कुटुंबाचा भाग बनणं ही खूप आनंदाची गोष्ट आहे! जे बाप्तिस्मा घेतात त्यांना स्तोत्रकर्ता दावीदसारखंच वाटतं. तो म्हणाला: “तुझ्या अंगणांत राहण्यासाठी तू ज्याला निवडतोस आणि आपल्याजवळ येऊ देतोस, तो माणूस सुखी आहे!”​—स्तो. ६५:४.

यहोवा त्याच्या अंगणात असंच कोणालाही आणत नाही. मागच्या लेखात चर्चा केल्याप्रमाणे, यहोवासोबत जवळचं नातं जोडण्याची इच्छा असल्याचं जे दाखवून देतात त्यांनाच तो त्याच्याजवळ आणतो. (याको. ४:८) जेव्हा तुम्ही समर्पण करून बाप्तिस्मा घेता तेव्हा यहोवासोबत तुमचं एक खास नातं तयार होतं. आणि त्यानंतर तुम्ही या गोष्टीची खातरी ठेवू शकता, की तुम्हाला “काहीच कमी पडणार नाही इतक्या आशीर्वादांचा वर्षाव” तो तुमच्यावर करेल.​—मला. ३:१०; यिर्म. १७:७, ८.

३. समर्पण केलेल्या आणि बाप्तिस्मा घेतलेल्या भाऊबहिणींवर कोणती महत्त्वाची जबाबदारी आहे? (उपदेशक ५:४, ५)

खरंतर, बाप्तिस्मा फक्‍त एक सुरुवात आहे. हे पाऊल उचलल्यानंतर तुमच्यावर कितीही मोह आले आणि कितीही समस्या आल्या, तरी तुमच्या समर्पणाच्या वचनानुसार जीवन जगायचा होता होईल तितका प्रयत्न करायची तुमची इच्छा असेल. (उपदेशक ५:४, ५ वाचा.) येशूचे शिष्य या नात्याने त्याच्या उदाहरणाचं अनुकरण करायचा आणि त्याच्या आज्ञेचं पुरेपूर पालन करायचा होता होईल तितका प्रयत्न करा. (मत्त. २८:१९, २०; १ पेत्र २:२१) आणि हेच करण्यासाठी हा लेख तुम्हाला मदत करेल.

परीक्षा आणि मोह आले तरी येशूच्या ‘मागे चालत राहा’

४. येशूचे शिष्य कोणत्या अर्थाने “वधस्तंभ” उचलतात? (लूक ९:२३)

बाप्तिस्म्यानंतर तुमच्या आयुष्यात समस्याच नसतील असं होणार नाही. खरंतर, येशूने म्हटलं की त्याच्या शिष्यांना “वधस्तंभ” उचलावा लागेल आणि असं त्यांना “दररोज” करावं लागेल. (लूक ९:२३ वाचा.) मग येशूला असं म्हणायचं होतं का, की त्याच्या शिष्यांना नेहमी त्रासच सहन करावा लागेल? मुळीच नाही. खरंतर तो असं म्हणत होता की त्यांना मिळणाऱ्‍या आशीर्वादांसोबत त्यांना समस्यांचा सामना करावा लागेल. आणि त्यातल्या काही समस्या तर खूप त्रासदायक असतील.​—२ तीम. ३:१२.

५. त्याग करणाऱ्‍यांना कोणते आशीर्वाद मिळतील असं येशूने म्हटलं?

कदाचित तुम्ही घरच्यांकडून विरोधाचा सामना केला असेल, किंवा राज्याच्या कामाला पहिलं स्थान देण्यासाठी तुम्ही पैसा आणि इतर गोष्टींचा त्याग केला असेल. (मत्त. ६:३३) तुम्ही असं केलं असेल तर यहोवाने तुमचा विश्‍वासूपणा नक्कीच पाहिलाय याची खातरी तुम्ही ठेवू शकता. (इब्री ६:१०) तसंच, येशूचे शब्द किती खरे आहेत हेही तुम्ही अनुभवलं असेल. त्याने म्हटलं: “ज्यांनी माझ्यासाठी आणि आनंदाच्या संदेशासाठी घरदार, शेतीवाडी, तसंच बहीणभाऊ, आईवडील आणि मुलंबाळं सोडून दिली आहेत, त्यांच्यापैकी प्रत्येकाला सध्याच्या काळात छळासोबत शंभरपटीने घरंदारं, शेतीवाडी, बहीणभाऊ, आईवडील आणि मुलंबाळं आणि येणाऱ्‍या जगाच्या व्यवस्थेत सर्वकाळाचं जीवन मिळाल्याशिवाय राहणार नाही.” (मार्क १०:२९, ३०) तुम्ही केलेल्या त्यागांच्या तुलनेत तुम्हाला मिळालेले आशीर्वाद कितीतरी पटीने मोठे आहेत.​—स्तो. ३७:४.

६. बाप्तिस्म्यानंतरही ‘शरीराच्या वासनेशी’ लढत राहणं का गरजेचं आहे?

बाप्तिस्म्यानंतरही तुम्हाला ‘शरीराच्या वासनेशी’ लढावं लागेल. (१ योहा. २:१६) कारण अजूनही तुम्ही आदामचेच वंशज आहात. तुम्हाला कदाचित काही वेळा प्रेषित पौलसारखंच वाटेल. त्याने म्हटलं: “मला देवाचा नियम खरंच, अगदी मनापासून आवडतो. पण माझ्या शरीरात मला दुसराच एक नियम दिसून येतो. तो माझ्या मनातल्या नियमाशी लढतो आणि मला माझ्या शरीरात असलेल्या पापाच्या नियमाचा कैदी बनवतो.” (रोम. ७:२२, २३) तुमच्यातल्या पापी मनोवृत्तीमुळे तुम्ही कदाचित निराश व्हाल. पण समर्पणाच्या वचनावर विचार केल्यामुळे मोहांचा प्रतिकार करायचा तुमचा निश्‍चय आणखी पक्का होईल. ते कसं?

७. यहोवाला समर्पण केल्यामुळे तुम्हाला त्याला विश्‍वासू राहायला कशी मदत होईल?

जेव्हा तुम्ही यहोवाला समर्पण करता तेव्हा स्वतःला नाकारत असता. म्हणजेच यहोवाला न आवडणाऱ्‍या इच्छांना आणि ध्येयांना तुम्ही ‘नाही’ म्हणता. (मत्त. १६:२४) जेव्हा तुमच्यावर परीक्षा येतात तेव्हा काय करायचं यावर तुम्ही विचार करत बसत नाही. कारण यहोवाला विश्‍वासू राहण्याशिवाय इतर सर्व पर्यायांकडे तुम्ही पाठ फिरवलेली असते. यहोवाला खूश करायचा तुमचा निर्धार पक्का असतो. आणि या बाबतीत तुम्ही ईयोबसारखेच वागत असता. जेव्हा त्याच्यावर खूप कठीण समस्या आल्या, तेव्हा त्याने अगदी ठामपणे असं म्हटलं: “मी माझा खरेपणा सोडणार नाही!”​—ईयो. २७:५.

८. समर्पणाच्या प्रार्थनेवर विचार केल्यामुळे तुम्हाला मोहांचा प्रतिकार करायला कशी मदत होईल?

जेव्हा तुम्ही तुमच्या समर्पणाच्या प्रार्थनेवर विचार करता तेव्हा तुम्हाला मोहांचा प्रतिकार करण्यासाठी लागणारं बळ मिळतं. उदाहरणार्थ, एखाद्या दुसऱ्‍या व्यक्‍तीच्या जोडीदारात तुम्ही नक्कीच आवड घेणार नाही. म्हणजेच त्याच्यासोबत फ्लर्टींग करणार नाही. कारण तुम्ही आधीच त्या गोष्टीला ‘नाही’ म्हटलेलं असेल. त्यामुळे तुम्ही जर तुमच्या मनात अशा प्रकारच्या वाईट विचारांना खतपाणी घातलं नाही, तर नंतर  ती भावना मनातून उपटून टाकायची गरजच पडणार नाही. असं करून तुम्ही ‘वाईट लोकांच्या मार्गापासून वळाल.’​—नीति. ४:१४, १५.

९. समर्पणाच्या प्रार्थनेवर विचार केल्यामुळे उपासनेशी संबंधित कामांना पहिलं स्थान द्यायलाही कशी मदत होऊ शकते?

तुम्हाला सभांना नियमितपणे जाणं कठीण जाईल अशी नोकरी करायची संधी मिळाली तर काय? अशा वेळी काय करायचं याचा तुम्ही विचार करत बसणार नाही. कारण तुम्ही आधीच ठरवलेलं असेल की तुम्ही अशी कोणतीही नोकरी निवडणार नाही, ज्यामुळे तुम्हाला नियमितपणे सभांना जायला जमणार नाही. त्या वेळी तुम्ही असं म्हणणार नाही, की ‘सध्या मी ही नोकरी करतो आणि मग नियमितपणे सभांना कसं जायचं ते बघतो.’ उलट, येशूच्या उदाहरणावर विचार केल्यामुळे तुम्हाला मदत होईल. त्याने आपल्या पित्याचं मन आनंदित करायचा निश्‍चय केला होता. आपणही यहोवाला समर्पण केलं आहे. त्यामुळे येशूप्रमाणेच त्याला न आवडणाऱ्‍या गोष्टींना लगेच आणि ठामपणे नकार द्यायचा तुम्ही निर्धार करू शकता.​—मत्त. ४:१०; योहा. ८:२९.

१०. बाप्तिस्म्यानंतरही येशूच्या ‘मागे चालत राहायला’ यहोवा तुम्हाला कशी मदत करेल?

१० खरंतर समस्या आणि मोहांमुळे तुम्हाला येशूच्या मागे ‘चालत राहायची’ इच्छा आहे हे दाखवून द्यायची संधी मिळत असते. आणि असं करत असताना तुम्ही याची खातरी ठेवू शकता की यहोवा तुम्हाला मदत करेल. बायबल म्हणतं: “देव विश्‍वासू आहे आणि तुम्ही सहन करू शकणार नाही अशी एकही परीक्षा तो तुमच्यावर येऊ देणार नाही. तर, परीक्षेच्या वेळी तिच्यातून बाहेर पडायचा मार्गही तो तयार करेल, म्हणजे तुम्हाला ती सहन करता येईल.”​—१ करिंथ. १०:१३.

येशूच्या मागे चालत राहण्यासाठी तुम्ही काय करू शकता?

११. येशूच्या मागे चालत राहण्याचा एक चांगला मार्ग कोणता आहे? (चित्रसुद्धा पाहा.)

११ येशूने पूर्ण मनाने यहोवाची सेवा केली आणि प्रार्थनेमुळे त्याचं यहोवासोबत एक जवळचं नातं होतं. (लूक ६:१२) खरंतर, आपल्याला यहोवाच्या जवळ नेतील अशा गोष्टी नियमितपणे करणं हा बाप्तिस्म्यानंतर येशूच्या मागे चालत राहण्याचा एक चांगला मार्ग आहे. बायबल म्हणतं: “आपण आतापर्यंत जी प्रगती केली आहे, त्याच मार्गाने आपण पुढेही चालत राहू या.” (फिलिप्पै. ३:१६) तुम्हाला वेळोवेळी अशा भाऊबहिणींचे अनुभव ऐकायला मिळतील ज्यांनी त्यांची सेवा वाढवली आहे. कदाचित ते सुवार्तिकांच्या प्रशालेला उपस्थित राहिले असतील किंवा ते प्रचारकांची गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा करत असतील. जर तुम्हाला असं करणं शक्य असेल तर तुमच्यासाठी हे एक चांगलं ध्येय असू शकतं. यहोवाचे लोक त्यांची सेवा वाढवण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. (प्रे. कार्यं १६:९) पण सध्या असं करणं तुम्हाला शक्य नसेल तर काय? ज्यांना हे करणं शक्य आहे त्यांच्यापेक्षा तुम्ही कमी आहात असा विचार करू नका. कारण आपल्या या शर्यतीत धीराने धावत राहणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. (मत्त. १०:२२) हे कधीच विसरू नका की तुमच्या  क्षमतेनुसार आणि परिस्थितीनुसार यहोवाला खूश करण्यासाठी तुम्ही जे काही करता त्याची तो कदर करतो. बाप्तिस्म्यानंतर येशूच्या मागे चालत राहायचा हा सगळ्यात महत्त्वाचा मार्ग आहे.​—स्तो. २६:१.

बाप्तिस्म्यानंतर तुम्ही यहोवासोबतचं तुमचं नातं आणखी घट्ट होईल अशा काही गोष्टी करण्याचं ध्येय ठेवू शकता (परिच्छेद ११ पाहा)


१२-१३. तुमचा आवेश कमी होत असेल तर तुम्ही काय करू शकता? (१ करिंथकर ९:१६, १७) (“ शर्यतीत धावत राहा” ही चौकटसुद्धा पाहा.)

१२ तुम्हाला कधी असं वाटलंय का, की तुम्ही प्रार्थना करायच्या म्हणून करताय? किंवा तुम्हाला प्रचारकार्य कंटाळवाणं वाटतंय का? किंवा सुरुवातीला तुम्हाला बायबल वाचायला जशी मजा येत होती तशी आता येत नाही का? जर बाप्तिस्म्यानंतर तुमच्यासोबत असं झालं, तर असा विचार करू नका की आता यहोवाची पवित्र शक्‍ती तुमच्यावर नाही. आपण अपरिपूर्ण असल्यामुळे आपल्या भावना नेहमी एकसारख्याच असतील असं नाही. तुमचा आवेश कमी होतोय असं तुम्हाला वाटलं तर तुम्ही पौलच्या उदाहरणावर विचार करू शकता. त्याने येशूचं अनुकरण करायचा पुरेपूर प्रयत्न केला तरी त्याला हे माहीत होतं की त्याचा आवेश नेहमी एकसारखा असणार नाही. (१ करिंथकर ९:१६, १७ वाचा.) त्याने म्हटलं: “इच्छा नसतानाही मी ते केलं, तरी ती माझी जबाबदारीच आहे. कारण देवाने हे काम माझ्यावर सोपवलं आहे.” दुसऱ्‍या शब्दांत पौलला कसंही वाटत असलं तरी  आपली सेवा पूर्ण करायचा त्याचा पक्का निर्धार होता.

१३ पौलप्रमाणेच तुम्हीसुद्धा फक्‍त भावनांच्या आधारावर निर्णय नाही घेतला पाहिजे. तुमच्या भावना काहीही असल्या तरी  योग्य ते करायचा तुमचा निर्धार पक्का असला पाहिजे. तुम्ही जर योग्य ते करत राहिलात तर काळाच्या ओघात तुमच्या भावनाही त्याप्रमाणे बदलतील. पण तोपर्यंत नियमितपणे उपासनेशी संबंधित असलेल्या गोष्टी करत राहा. त्यामुळे बाप्तिस्म्यानंतरही येशूच्या मागे चालत राहायला तुम्हाला मदत होईल आणि इतर भाऊबहिणींनाही त्यामुळे प्रोत्साहन मिळेल.​—१ थेस्सलनी. ५:११.

“पारख करत राहा . . . सतत तपासून पाहा”

१४. तुम्ही वेळोवेळी कोणत्या गोष्टींचं परीक्षण केलं पाहिजे आणि का? (२ करिंथकर १३:५)

१४ बाप्तिस्म्यानंतर वेळोवेळी स्वतःचं परीक्षण करत राहिल्यामुळेसुद्धा तुम्हाला फायदा होऊ शकतो. (२ करिंथकर १३:५ वाचा.) जसं की, तुम्ही स्वतःच्या जीवनाचं आणि सवयींचं परीक्षण करून पाहू शकता. म्हणजे, दररोज प्रार्थना करण्याच्या, बायबलचं वाचन आणि त्याचा अभ्यास करण्याच्या आणि सेवाकार्यात सहभाग घेण्याच्या बाबतीत मी कसा आहे हे तुम्ही तपासून पाहू शकता. उपासनेशी संबंधित असलेल्या या गोष्टी मनापासून करता याव्यात आणि त्यातून आनंद मिळावा म्हणून तुम्हाला आणखी काय करता येईल हेसुद्धा पाहायचा प्रयत्न करा. उदाहरणार्थ, तुम्ही स्वतःला काही प्रश्‍न विचारू शकता. जसं की, ‘बायबलच्या मुख्य शिकवणी मला दुसऱ्‍यांना समजावून सांगता येतात का? सेवाकार्यात आनंद मिळावा म्हणून मला आणखी काय करता येईल? माझ्या प्रार्थना एकसारख्याच असतात, की मी विशिष्ट गोष्टींसाठीही प्रार्थना करतो? त्यावरून माझा यहोवावर पूर्ण भरवसा आहे, हे दिसून येतं का? मी सभांना नियमितपणे जातो का? सभांमध्ये आणखी चांगल्या प्रकारे लक्ष देता यावं आणि चांगला सहभाग घेता यावा म्हणून मला काय करता येईल?’ असे प्रश्‍न आपण स्वतःला विचारू शकतो.

१५-१६. मोहाचा प्रतिकार करण्याबद्दल एका भावाच्या उदाहरणातून तुम्हाला काय शिकायला मिळालं?

१५ आपल्या कमतरता काय आहेत याचं प्रामाणिकपणे परीक्षण करणंही खूप गरजेचं आहे. रॉबर्ट नावाच्या एका भावाच्या उदाहरणातून हे इतकं महत्त्वाचं का आहे ते समजतं. तो म्हणतो: “मी २० वर्षांचा होतो, तेव्हा एक पार्ट-टाईम नोकरी करायचो. एके दिवशी कामावरच्या एका मुलीने मला तिच्या घरी यायला सांगितलं. ती म्हणाली, की घरी दुसरं कोणीच नसल्यामुळे ‘मज्जा येईल.’ पहिल्यांदा मी काहीतरी कारणं सांगून तिला टाळायचा प्रयत्न केला. पण नंतर मी तिला स्पष्टपणे ‘नाही’ म्हटलं आणि त्याचं कारणही सांगितलं.” रॉबर्टने त्या मोहाचा प्रतिकार केला आणि ते खरंच कौतुक करण्यासारखं आहे. पण नंतर जेव्हा त्याने यावर विचार केला तेव्हा त्याला जाणवलं, की ही परिस्थिती तो आणखी चांगल्या प्रकारे हाताळू शकला असता. त्याने म्हटलं: “योसेफने पोटीफरच्या बायकोला जसा ठामपणे किंवा लगेच नकार दिला, तसा मला देता आला नाही. (उत्प. ३९:७-९) उलट, त्या वेळी ‘नाही’ म्हणणं मला किती अवघड गेलं याचंच मला आश्‍चर्य वाटत होतं. यावरून मला हे समजलं, की यहोवासोबतचं माझं नातं मला आणखी मजबूत करायची गरज होती.”

१६ स्वतःचं परीक्षण केल्यामुळे रॉबर्टला जशी मदत झाली तशी तुम्हालाही होऊ शकते. तुम्ही एखाद्या मोहाचा जरी यशस्वीपणे सामना केला असला तरी स्वतःला विचारा, की ‘मला नाही म्हणायला किती वेळ लागला?’ आणि जर असं जाणवलं, की तुम्हाला सुधारणा करण्याची गरज आहे, तर निराश होऊ नका. कारण तुम्हाला तुमच्या कमतरतेबद्दल आता समजलंय. तेव्हा त्याबद्दल प्रार्थना करा आणि यहोवाच्या नैतिक स्तरांप्रमाणे जगायचा तुमचा निर्धार आणखी पक्का करण्यासाठी पावलं उचला.​—स्तो. १३९:२३, २४.

१७. रॉबर्टच्या अनुभवात यहोवाचं नाव कसं गोवलं होतं?

१७ पण रॉबर्टचा अनुभव इथेच संपत नाही. तो पुढे म्हणतो: “माझ्यासोबत काम करणाऱ्‍या त्या मुलीला मी नाही म्हटल्यावर, ती म्हणाली, ‘तू परिक्षेत पास झालास!’ मी तिला म्हटलं ‘म्हणजे?’ तेव्हा तिने मला सांगितलं, की पूर्वी साक्षीदार असणाऱ्‍या तिच्या एका मित्राने तिला म्हटलं होतं, की सगळेच तरुण साक्षीदार दुहेरी जीवन जगतात. त्यांना जर संधी मिळाली तर आपल्या तत्त्वांशी तडजोड करायला ते लगेच तयार होतील. म्हणून खरंच तसं आहे का हे बघायला ती माझी परीक्षा घेईल असं तिने तिच्या मित्राला सांगितलं होतं. हे ऐकून मला खरंच खूप बरं वाटलं, कारण मी यहोवाच्या नावाचा गौरव केला होता.”

१८. बाप्तिस्म्यानंतर तुम्ही काय करायचा निश्‍चय केलाय? (“ तुम्हाला वाचायला आवडतील असे दोन लेख” ही चौकटसुद्धा पाहा.)

१८ तुम्ही समर्पण करून जेव्हा बाप्तिस्मा घेता तेव्हा तुम्ही हे दाखवून देता, की काहीही झालं तरी तुम्हाला यहोवाचं नाव पवित्र करायचं आहे. तुम्हाला कोणत्या मोहांचा आणि परीक्षांचा सामना करावा लागतोय, हे यहोवाला माहीत आहे याची खातरी बाळगा. त्याला विश्‍वासू राहण्यासाठी तुम्ही जी मेहनत घेत आहात त्यावर तो नक्की आशीर्वाद देईल! आणि त्यासाठी तो तुम्हाला त्याची पवित्र शक्‍ती देईल असा भरवसा बाळगा. (लूक ११:११-१३) यहोवाच्या मदतीने तुम्ही बाप्तिस्म्यानंतरही येशूच्या मागे चालत राहू शकता!

तुमचं उत्तर काय असेल?

  • कोणत्या अर्थाने आपण “दररोज आपला वधस्तंभ” उचलतो?

  • बाप्तिस्म्यानंतरही येशूच्या ‘मागे चालत राहण्यासाठी’ तुम्ही काय करू शकता?

  • समर्पणाच्या प्रार्थनेवर विचार केल्यामुळे तुम्हाला विश्‍वासू राहायला कशी मदत होऊ शकते?

गीत ८९ ऐका, पालन करा आणि आशीर्वाद मिळवा!