टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) मे २०२०

या अंकात ६ जुलै–२ ऑगस्ट २०२० पर्यंत अभ्यासले जाणारे लेख दिले आहेत.

अंताच्या समयी “उत्तरेचा राजा”

अभ्यास लेख १९: ६-१२ जुलै, २०२०. “उत्तरेचा राजा” आणि “दक्षिणेचा राजा” यांच्याबद्दल दानीएलने केलेली भविष्यवाणी पूर्ण होत असल्याचे पुरावे आपण पाहत आहोत. आपण हे इतकं खातरीने का म्हणू शकतो? आणि या भविष्यवाणीतले तपशील समजून घेणं का गरजेचं आहे?

अंताच्या समयी लढणारे दोन राजे

“उत्तरेच्या राजाची” आणि “दक्षिणेच्या राजाची” भविष्यवाणी इतर भविष्यवाण्यांच्या आसपास पूर्ण होते. या भविष्यवाण्यांवरून कसं दिसून येतं की या जगाच्या व्यवस्थेचा अंत लवकरच होणार आहे?

आज “उत्तरेचा राजा” कोण आहे?

अभ्यास लेख २०: १३-१९ जुलै, २०२०. आज “उत्तरेचा राजा” कोण आहे आणि त्याचा नाश कसा होईल? या प्रश्‍नाचं उत्तर जाणून घेतल्यामुळे आपला विश्‍वास मजबूत होईल. आणि लवकरच ज्या परीक्षांचा आपल्याला सामना करावा लागणार आहे त्यासाठी आपण तयार होऊ.

देवाने दिलेल्या चांगल्या गोष्टींची तुम्ही कदर करता का?

अभ्यास लेख २१: २०-२६ जुलै, २०२०. या लेखामुळे आपल्याला यहोवाबद्दल आणि त्याने दिलेल्या तीन गोष्टींबद्दल कदर वाढवायला मदत होईल. तसंच, ज्या लोकांना देवाच्या अस्तित्वाबद्दल शंका आहे त्यांच्यासोबत तर्क करायलाही आपल्याला या लेखामुळे मदत होईल.

न दिसणाऱ्‍या संपत्तीबद्दल कदर बाळगा

अभ्यास लेख २२: २७ जुलै–२ ऑगस्ट, २०२०. आधीच्या लेखात आपण देवाकडून मिळालेल्या अशा अनेक देणग्यांवर चर्चा केली ज्या आपण पाहू शकतो. या लेखात आपण अशा संपत्तीवर चर्चा करू या जी आपण पाहू शकत नाही. या संपत्तीबद्दल कदर असल्याचं आपण कसं दाखवू शकतो हेही आपण पाहणार आहोत. तसंच, या लेखामुळे आपली यहोवा देवाबद्दल कदरही वाढेल कारण त्यानेच आपल्याला ही संपत्ती दिली आहे.