व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अंताच्या समयी लढणारे दोन राजे

अंताच्या समयी लढणारे दोन राजे

या तक्त्यात दिलेल्या काही भविष्यवाण्यांमधल्या घटना एकाच वेळी पूर्ण झाल्या आहेत. या सर्व भविष्यवाण्यांवरून आपल्याला खातरी पटते की आपण ‘अंताच्या समयी’ जगत आहोत.—दानी. १२:४.

  • वचनं प्रकटी. ११:७; १२:१३, १७; १३:१-८, १२

    भविष्यवाणी ‘जंगली पशूने’ अनेक शतकं पृथ्वीवर राज्य केलं आहे. अंताच्या समयी त्याच्या सातव्या डोक्याला जखम होते. पण नंतर ती जखम बरी होते आणि “सगळे जग” त्या जंगली पशूमागे जाते. “जे उरले आहेत . . . त्यांच्यासोबत युद्ध करायला” सैतान या पशूचा वापर करतो.

    पूर्णता जलप्रलयानंतर यहोवाच्या विरोधात असलेल्या सरकारांनी लोकांवर राज्य केलं आहे. अनेक शतकानंतर, या सरकारांपैकी एक असलेलं ब्रिटन सरकार पहिल्या महायुद्धादरम्यान कमजोर झालं. पुढे अमेरिकेसोबत मैत्री केल्यानंतर ब्रिटन पुन्हा ताकदवान बनलं. खासकरून अंताच्या समयी देवाच्या सेवकांचा छळ करण्यासाठी सैतान पृथ्वीवरच्या सर्व सरकारांचा वापर करत आहे.

  • वचनं दानी. ११:२५-४५

    भविष्यवाणी अंताच्या समयी एकमेकांपेक्षा वरचढ होण्यासाठी उत्तरेचा राजा आणि दक्षिणेचा राजा हे आपसात लढतात.

    पूर्णता जर्मनीने ब्रिटन आणि अमेरिकेसोबत युद्ध लढलं. १९४५ मध्ये सोव्हियत संघ आणि त्याचे मित्र राष्ट्रं हे उत्तरेचा राजा बनले. मग १९९१ मध्ये सोव्हियत संघ कोसळला. त्यानंतर रशिया व त्याचे मित्र राष्ट्रं हे उत्तरेचा राजा बनले.

  • वचनं यश. ६१:१; मला. ३:१; लूक ४:१८

    भविष्यवाणी मसीही राज्य स्थापित होण्याआधी यहोवा “मार्ग तयार करण्यासाठी” त्याचा “निरोप्या” पाठवतो. हा निरोप्या किंवा गट “दीनांस शुभवृत्त” सांगायला सुरुवात करतो.

    पूर्णता १८७० पासून बंधू रस्सल आणि त्यांच्या सोबत्यांनी बायबलचा खोलवर अभ्यास करायला सुरुवात केली. बायबल नेमकं काय शिकवतं हे त्यांना माहीत करून घ्यायचं होतं. मग १८८१ मध्ये त्यांना जाणीव झाली की देवाच्या सेवकांनी प्रचार करणं खूप महत्त्वाचं आहे. यासाठी त्यांनी ‘१,००० प्रचारक हवेत’ आणि ‘प्रचार करण्यासाठी अभिषिक्‍त’ असे लेख प्रकाशित केले.

  • वचनं मत्त. १३:२४-३०, ३६-४३

    भविष्यवाणी एक शत्रू गव्हाच्या शेतात जंगली गवताचं बी पेरतो. दोघांना सोबत वाढू दिलं जातं. जंगली गवतामुळे गहू कमी दिसू लागतात. पण नंतर कापणीच्या वेळी जंगली गवताला गव्हापासून वेगळं करण्यात येतं.

    पूर्णता खरे ख्रिस्ती आणि खोटे ख्रिस्ती यांमधला फरक १८७० पासून स्पष्ट होऊ लागला. अंताच्या समयी खऱ्‍या ख्रिश्‍चनांना खोट्या ख्रिश्‍चनांपासून वेगळं करण्यात येईल आणि खऱ्‍या ख्रिश्‍चनांना मंडळीत आणलं जाईल.

  • वचनं दानी. २:३१-३३, ४१-४३

    भविष्यवाणी वेगवेगळ्या धातूंनी बनलेल्या पुतळ्याची पावलं लोखंडाची आणि मातीची बनली आहेत.

    पूर्णता माती ही ब्रिटन-अमेरिका महासत्ता राज्य करत असलेल्या सामान्य जनतेला सूचित करते. हे लोक सरकाराच्या विरोधात बंड करतात. या लोकांमुळे लोखंडाची ताकद कमी होते, म्हणजेच ब्रिटन-अमेरिका महासत्ता आपली ताकद पूर्णपणे वापरू शकत नाही.

  • वचनं मत्त. १३:३०; २४:१४, ४५; २८:१९, २०

    भविष्यवाणी “गहू” “कोठारांत जमा” केलं जातं. “विश्‍वासू आणि बुद्धिमान दास” यांना ‘सेवकांवर’ नेमलं जातं. ‘राज्याचा आनंदाचा संदेश’ “सर्व जगात घोषित” करायला सुरुवात होते.

    पूर्णता १९१९ मध्ये विश्‍वासू आणि बुद्धिमान दासाला देवाच्या लोकांवर नेमण्यात येतं. तेव्हापासून, बायबल विद्यार्थी जास्तीत जास्त प्रचार करायला सुरू करतात. आज यहोवाचे साक्षीदार २०० पेक्षा जास्त देशांमध्ये प्रचार करत आहेत आणि १,००० पेक्षा जास्त भाषेत बायबलवर आधारित साहित्यं प्रकाशित करत आहेत.

  • वचनं दानी. १२:११; प्रकटी. १३:११, १४, १५

    भविष्यवाणी दोन शिंगं असलेला जंगली पशू पृथ्वीवरच्या लोकांना, सात डोकी असलेल्या “जंगली पशूची मूर्ती” बनवायला सांगतो आणि त्या मूर्तीमध्ये “श्‍वास” फुंकतो.

    पूर्णता ब्रिटन-अमेरिका महासत्ता पुढाकार घेऊन लीग ऑफ नेशन्स म्हणजे राष्ट्र संघ बनवते. पुढे दुसरी राष्ट्रंही या संघाला पाठिंबा देतात. मग कालांतराने उत्तरेचा राजा हासुद्धा या संघाला पाठिंबा देतो, पण ते फक्‍त १९२६ पासून ते १९३३ पर्यंतच. लोकांना वाटत होतं की राष्ट्रं संघ जगात शांती आणेल, पण हे फक्‍त देवाचं राज्यच आणू शकतं. आज संयुक्‍त राष्ट्र संघाबद्दलही लोक असाच विचार करतात.

  • वचनं दानी. ८:२३, २४

    भविष्यवाणी एक क्रूर राजा “विलक्षण नाश” आणतो.

    पूर्णता ब्रिटन-अमेरिका महासत्ता हिने खूप लोकांना मारून टाकलं आणि भरपूर नुकसान केलं. उदाहरणार्थ, दुसऱ्‍या महायुद्धात अमेरिकेने त्याच्या व ब्रिटनच्या शत्रूवर दोन अणूबॉम्ब टाकले. यामुळे कधी नव्हे इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकांचा जीव गेला आणि नुकसानही झालं.

  • वचनं दानी. ११:३१; प्रकटी. १७:३, ७-११

    भविष्यवाणी दहा शिंग असलेला “गडद लाल” रंगाचा एक जंगली पशू अथांग डोहातून बाहेर येतो. तो आठवा राजा आहे. दानीएलच्या पुस्तकात या राजाला “विध्वंसमूलक अमंगलाची” म्हणजेच उद्ध्‌वस्त करणारी घृणास्पद गोष्ट म्हटलं आहे.

    पूर्णता दुसऱ्‍या महायुद्धादरम्यान राष्ट्र संघ निष्क्रिय झाला. मग युद्धानंतर संयुक्‍त राष्ट्र संघाची “स्थापना” झाली. राष्ट्र संघासारखं संयुक्‍त राष्ट्र संघही जगभरात शांती आणेल असं लोकांना वाटलं, पण खरंतर देवाचं राज्यच जगभरात शांती आणू शकतं. संयुक्‍त राष्ट्र संघ धर्मांवर हल्ला करेल.

  • वचनं १ थेस्सलनी. ५:३; प्रकटी. १७:१६

    भविष्यवाणी “शांती आहे, सुरक्षा आहे!” अशी राष्ट्रं घोषणा करतील आणि “दहा शिंगे” व “जंगली पशू” सोबत मिळून ‘वेश्‍येवर’ हल्ला करतील. त्यानंतर राष्ट्रांचा नाश करण्यात येईल.

    पूर्णता राष्ट्रं दावा करतील की त्यांना जगभरात शांती आणि सुरक्षा आणण्यात यश मिळालं आहे. संयुक्‍त राष्ट्र संघाचा भाग असलेले राष्ट्रं खोट्या धार्मिक संघटनांचा नाश करतील. ही मोठ्या संकटाची सुरुवात असेल. आणि मोठ्या संकटाच्या शेवटी येशू सैतानाच्या जगाचा हर्मगिदोनच्या युद्धात नाश करेल.

  • वचनं यहे. ३८:११, १४-१७; मत्त. २४:३१

    भविष्यवाणी गोग देवाच्या लोकांवर हल्ला करेल. मग स्वर्गदूत “निवडलेल्या लोकांना” गोळा करतील.

    पूर्णता उत्तरेचा राजा इतर सरकारांसोबत मिळून देवाच्या लोकांवर हल्ला करेल. हल्ला झाल्याच्या काही काळानंतर उरलेल्या अभिषिक्‍त जनांना स्वर्गात घेतलं जाईल.

  • वचनं यहे. ३८:१८-२३; दानी. २:३४, ३५, ४४, ४५; प्रकटी. ६:२; १६:१४, १६; १७:१४; १९:२०

    भविष्यवाणी “पांढरा घोडा” यावर बसलेला स्वार गोग आणि त्याच्या सैन्याचा विनाश करून “विजय पूर्ण” करतो. जंगली पशूला “गंधकाने जळणाऱ्‍या अग्नीच्या सरोवरात” टाकण्यात येतं आणि पर्वतातून निघालेला दगड पुतळ्याचा चुराडा करतो.

    पूर्णता देवाच्या राज्याचा राजा म्हणजे येशू देवाच्या लोकांचा बचाव करेल. येशू, त्याचे १,४४,००० सहराजे आणि स्वर्गदूत देवाच्या लोकांवर हल्ला करणाऱ्‍या सर्व राष्ट्रांचा नाश करतील. यामुळे सैतानाच्या जगाचा नाश होईल.