व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

संशोधनासाठी एक टीप

संशोधनासाठी एक टीप

वॉचटावर ऑनलाईन लायब्ररी  मधले संदर्भ

या संदर्भांचा वापर करून आपल्याला वेगवेगळ्या विषयांबद्दल माहिती घ्यायला मदत होऊ शकते. उपलब्ध असलेल्या या ऑनलाईन संदर्भांमध्ये शब्दांची सूची, इन्साइट ऑन द स्क्रिप्चर्स, यहोवाच्या साक्षीदारांसाठी संशोधन मार्गदर्शक  आणि वॉचटॉवर पब्लिकेशन्स इंडेक्स  या गोष्टींचा समावेश आहे.

वॉचटावर ऑनलाईन लायब्ररी  मध्ये देण्यात आलेल्या सर्च बॉक्सचा वापर करून तुम्ही हे सगळे संदर्भ पाहू शकता. सर्च बॉक्समध्ये टाईप करत असताना तुम्हाला या सर्च बॉक्सच्या खाली वेगवेगळे पर्याय दिसतील आणि या पर्यायांमधल्या काही शब्दांच्या समोर तुम्हाला “विषय” (इंग्रजीत “topic”) असं लिहिलेलं दिसेल.

हे करून पाहा: सर्च बॉक्समध्ये “यहोवा” हा शब्द टाईप करा (क). मग खाली दिसणाऱ्‍या पर्यायांपैकी ज्या शब्दापुढे “विषय” लिहिलं आहे तो निवडा (ख). यहोवा या शब्दाशी जुळणारे बरेच संदर्भ तुम्हाला दिसतील.