अभ्यासासाठी विषय
अन्यायाचा सामना कसा करायचा?
उत्पत्ती ३७:२३-२८; ३९:१७-२३ वाचा आणि योसेफने अन्याय कसा सोसला हे जाणून घ्या.
संदर्भ लक्षात घ्या. योसेफवर अन्याय का होत होता? (उत्प. ३७:३-११; ३९:१, ६-१०) त्याला किती काळ हा अन्याय सोसावा लागला? (उत्प. ३७:२; ४१:४६) त्या काळात यहोवाने योसेफसाठी काय केलं आणि काय नाही केलं?—उत्प. ३९:२, २१; टेहळणी बुरूज २३.०१ १७ ¶१३.
सखोल संशोधन करा. पोटीफरच्या बायकोने लावलेल्या आरोपाबद्दल योसेफने स्वतःला निर्दोष ठरवायचा प्रयत्न केला असं बायबलमध्ये कुठेच सांगितलेलं नाही. योसेफ का गप्प बसला असेल किंवा बायबलमध्ये याबद्दल जास्त माहिती का दिलेली नाही, या गोष्टींवर विचार करायला पुढे दिलेल्या वचनांमुळे आपल्याला कशी मदत होते? (नीति. २०:२; योहा. २१:२५; प्रे. कार्यं २१:३७) अन्याय सहन करायला कोणत्या गुणांमुळे योसेफला मदत झाली असेल?—मीखा ७:७; लूक १४:११; याको. १:२, ३.
यावरून तुम्हाला काय शिकायला मिळतं? स्वतःला विचारा:
-
‘येशूचा शिष्य असल्यामुळे मी कोणत्या अन्यायाची अपेक्षा करू शकतो?’ (लूक २१:१२, १६, १७; इब्री १०:३३, ३४)
-
‘अन्यायाचा यशस्वीपणे सामना करण्यासाठी मी आत्तापासूनच कशी तयारी करू शकतो?’ (स्तो. ६२:७, ८; १०५:१७-१९; टेहळणी बुरूज १९.०७ २-७)