व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाचं अनुकरण करून इतरांचा विचार करा आणि दयाळू बना

यहोवाचं अनुकरण करून इतरांचा विचार करा आणि दयाळू बना

“जो दीनांची चिंता वाहतो तो धन्य!”—स्तो. ४१:१.

गीत क्रमांक: ३५, ५०

१. यहोवाच्या उपासकांचं एकमेकांवर प्रेम असल्याचं कसं दिसून येतं?

जगभरातले यहोवाचे उपासक एका कुटुंबाचे भाग आहेत. ते एकमेकांवर प्रेम करणारे बंधुभगिनी आहेत. (१ योहा. ४:१६, २१) कधीकधी ते आपल्या बंधुभगिनींसाठी मोठे त्याग करतात. पण अनेकदा बऱ्‍याच लहानसहान गोष्टी करण्याद्वारे ते आपलं प्रेम व्यक्‍त करतात. जसं की, बांधवांना काहीतरी चांगलं बोलून किंवा त्यांच्याशी दयाळूपणे वागून ते आपलं प्रेम दाखवतात. आपण जेव्हा इतरांचा विचार करतो तेव्हा आपण आपल्या स्वर्गात राहणाऱ्‍या पित्याचं अनुकरण करत असतो.—इफिस. ५:१.

२. येशूने यहोवासारखं प्रेम कसं दाखवलं?

येशूने आपल्या पित्याचं अगदी हुबेहूब अनुकरण केलं. तो इतरांशी नेहमी दयाळूपणे वागला. त्याने म्हटलं: “अहो कष्ट करणाऱ्‍या व ओझ्याने दबलेल्या सर्व लोकांनो, माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विश्रांती देईन.” (मत्त. ११:२८, २९) जेव्हा आपण येशूचं अनुकरण करतो आणि “दीनांची चिंता वाहतो” किंवा त्यांचा विचार करतो तेव्हा आपण यहोवाचं मन आनंदित करत असतो. असं केल्यामुळे आपल्यालाही आनंद होतो. (स्तो. ४१:१) या लेखात आपण पाहणार आहोत की आपण आपल्या कुटुंबातल्या सदस्यांशी, आपल्या बंधुभगिनींशी आणि सेवाकार्यात भेटणाऱ्‍या लोकांशी वागताना विचारशील वृत्ती कशी दाखवू शकतो.

कुटुंबातल्या सदस्यांचा विचार करा

३. पती आपल्या पत्नीशी विचारशीलपणे कसा वागू शकतो? (लेखाच्या सुरुवातीला दिलेलं चित्र पाहा.)

कुटुंबात इतरांचा विचार करण्याच्या आणि इतरांची काळजी घेण्याच्या बाबतीत पतींनी एक चांगलं उदाहरण मांडलं पाहिजे. (इफिस. ५:२५; ६:४) बायबल म्हणतं की पतीने आपल्या पत्नीचा विचार करणं आणि तिला समजून घेणं खूप गरजेचं आहे. (१ पेत्र ३:७; तळटीप) एका समजूतदार पतीला जाणीव असते की तो आपल्या पत्नीपेक्षा जरी बऱ्‍याच बाबतीत वेगळा असला, तरी तो तिच्यापेक्षा श्रेष्ठ नाही. (उत्प. २:१८) तो तिच्या भावनांचा विचार करतो आणि तिला आदराने वागवतो. कॅनडामध्ये राहणारी एक पत्नी आपल्या पतीबद्दल म्हणते: “माझ्या भावना अगदी क्षुल्लक आहेत किंवा ‘तू असा-कसा विचार करतेस’ असं माझे पती मला कधीच बोलत नाही. ते माझं म्हणणं नीट ऐकून घेतात. एखाद्या विषयाबद्दल माझा दृष्टिकोन अयोग्य असला आणि त्यात फेरबद्दल करण्याची गरज पडली तेव्हा ते प्रेमळपणे मला मदत करतात.”

४. एक पती इतर स्त्रियांशी जसं वागतो त्यावरून तो कसं दाखवून देऊ शकतो की तो आपल्या पत्नीच्या भावनांचा विचार करतो?

एक विचारशील पती आपल्या पत्नीच्या भावनांचा विचार करतो. तो कधीच इतर स्त्रियांशी इश्‍कबाजी करणार नाही किंवा त्यांच्यात अयोग्य आवड दाखवणार नाही. (ईयो. ३१:१) तसंच, तो सोशल मिडियाचा वापर करून त्यांच्याशी जवळीक साधणार नाही अथवा इंटरनेटवर ख्रिश्‍चनांसाठी अयोग्य असणाऱ्‍या वेबसाईट पाहणार नाही. आपल्या पत्नीवर प्रेम असल्यामुळेच नाही, तर यहोवावर प्रेम असल्यामुळे आणि वाइटाबद्दल द्वेष असल्यामुळे तो तिला नेहमी विश्‍वासू राहील.—स्तोत्र १९:१४; ९७:१० वाचा.

५. एक पत्नी आपल्या पतीचा विचार करते हे ती कसं दाखवू शकते?

जेव्हा एक पती त्याचा मस्तक असणाऱ्‍या प्रेमळ येशू ख्रिस्ताचं अनुकरण करतो तेव्हा त्याच्या पत्नीला त्याचा “मनापासून आदर” करायला सोपं जातं. (इफिस. ५:२२-२५, ३३) आणि जेव्हा ती त्याला आदर देते तेव्हा ती त्याच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करते. तसंच, जेव्हा तो मंडळीच्या कामांत व्यस्त असतो किंवा त्याला काही समस्यांचा सामना करावा लागतो तेव्हा ती त्याच्याशी दयाळूपणे वागते. ब्रिटेनमध्ये राहणारा एक पती म्हणतो: “कधीकधी माझ्या वागण्यातला फरक ओळखून माझ्या पत्नीला कळतं, की मला कोणती तरी गोष्ट सतावत आहे. मग ती नीतिसूत्रे २०:५ मध्ये दिलेलं तत्त्वं लागू करून माझ्या मनातले विचार ‘बाहेर काढण्यासाठी’ योग्य वेळ निवडते. अर्थात, ती गोष्ट तिच्यासोबत चर्चा करण्यासारखी असली तरच.”

६. मुलांनी इतरांचा विचार करावा आणि दया दाखवावी यासाठी सर्व जण कसं त्यांना प्रोत्साहन देऊ शकतात? याचा मुलांना कसा फायदा होतो?

पालक जेव्हा एकमेकांचा विचार करतात तेव्हा ते आपल्या मुलांसमोर एक चांगलं उदाहरण मांडत असतात. आपण इतरांचा विचार करावा आणि दया दाखवावी हेही त्यांनी आपल्या मुलांना शिकवणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ, पालक आपल्या मुलांना शिकवू शकतात की त्यांनी राज्य सभागृहात इथे तिथे पळू नये. किंवा जेव्हा बंधुभगिनी इतर वेळी एकत्र जमतात तेव्हा मुलांनी वृद्ध बांधवांना आधी जेवण घेऊ द्यावं असं पालक त्यांना शिकवू शकतात. तसंच, मंडळीतले इतर जणही पालकांना साहाय्य करू शकतात. जेव्हा एखादं मूल काहीतरी चांगलं करतं तेव्हा आपण त्याची प्रशंसा केली पाहिजे. जसं की, तुमच्यासाठी त्याने दार उघडलं तर त्याचं कौतुक करा. असं केल्यामुळे मुलाला चांगलं वाटेल आणि “घेण्यापेक्षा देण्यात जास्त आनंद आहे” हे त्याला शिकायला मदत होईल.—प्रे. कार्ये २०:३५.

मंडळीत “एकमेकांबद्दल विचारशील” असा

७. येशू बहिऱ्‍या माणसाबद्दल विचारशील होता हे त्याने कसं दाखवलं आणि आपण त्याच्या उदाहरणावरून काय शिकू शकतो?

एके दिवशी जेव्हा येशू दकापलीस या क्षेत्रात होता तेव्हा “लोकांनी एका बहिऱ्‍या माणसाला त्याच्याकडे आणले.” (मार्क ७:३१-३५) येशूने त्याला सर्वांसमोर बरं केलं नाही. असं का? कारण बहिरा असल्यामुळे कदाचित त्याला मोठ्या जमावामध्ये अवघडल्यासारखं वाटत असावं. येशूने त्याच्या भावना समजून घेतल्या आणि “त्याला एका बाजूला, गर्दीपासून दूर नेले” व बरं केलं. ही गोष्ट खरी आहे, की आपण असे चमत्कार करू शकत नाही. पण आपण आपल्या बंधुभगिनींच्या भावनांचा, गरजांचा नक्कीच विचार करू शकतो आणि त्यांना दया दाखवू शकतो. प्रेषित पौलने लिहिलं: “एकमेकांबद्दल विचारशील राहून आपण प्रेम आणि चांगली कार्ये करण्यासाठी एकमेकांना उत्तेजन देऊ या.” (इब्री १०:२४) त्या बहिऱ्‍या माणसाच्या भावना येशूने ओळखल्या आणि तो त्याच्याशी दयाळूपणे वागला. खरंच, येशूने आपल्यासाठी किती उत्तम उदाहरण मांडलं!

८, ९. वयस्क आणि शारीरिक विकलांगता असलेल्यांशी वागताना आपण विचारशील कसे असू शकतो? (उदाहरण द्या.)

वयस्क आणि शारीरिक विकलांगता असलेल्यांबद्दल विचारशील असा. ख्रिस्ती मंडळीची सर्वात महत्त्वाची गोष्ट, निपुणता नसून प्रेम आहे. (योहा. १३:३४, ३५) आपण प्रेमामुळेच शारीरिक विकलांगता असलेल्यांना सभेला आणि प्रचाराला नेण्यासाठी आपल्या परीने जितकं होऊ शकतं तितकं करण्याचं प्रयत्न करतो. आपल्याला सोईस्कर नसलं किंवा ते जास्त करू शकत नसले तरी आपण त्यांना मदत करतो. (मत्त. १३:२३) मायकल नावाच्या बांधवाचं उदाहरण लक्षात घ्या. तो व्हिलचेयरवर असल्यामुळे त्याचं कुटुंब आणि मंडळीतले बांधव त्याला मदत करतात. आणि यासाठी तो त्यांचा खूप आभारी आहे. तो म्हणतो: “त्यांच्या मदतीमुळे खरंतर मी बऱ्‍याचदा सभांना जाऊ शकतो आणि नियमितपणे सेवाकार्य करू शकतो. मला खासकरून सार्वजनिक साक्षकार्य करायला आवडतं.”

बऱ्‍याच बेथेलगृहात वयस्क किंवा शारीरिक विकलांगता असलेले विश्‍वासू बंधुभगिनी आहेत. त्यांनी प्रचारकार्यात सहभाग घ्यावा म्हणून प्रेमळ पर्यवेक्षक त्यांच्यासाठी पत्रांद्वारे आणि फोनद्वारे साक्षकार्य करण्याची व्यवस्था करतात. ८६ वयाचे बांधव बिल हे दूरवर राहणाऱ्‍या लोकांसाठी पत्र लिहितात. ते म्हणतात: “पत्र लिहिण्याची सुसंधी मिळाल्याबद्दल आम्हाला कदर वाटते.” ९० वयाच्या नॅन्सी नावाच्या बहीण म्हणतात: “मला वाटतं पत्र लिहिणं म्हणजे नुसतं पत्रांची पाकीटं भरणं नाही, तर हे सेवाकार्य आहे. लोकांपर्यंत सत्य पोहोचलंच पाहिजे!” इथेल नावाच्या बहिणीचा जन्म १९२१ मधला आहे. त्या म्हणतात: “दुखणी माझ्या आयुष्याचा एक भाग आहेत. कधीकधी तर मला तयार होतानाही खूप त्रास होतो.” असं असलं तरी, त्या फोनवरून साक्षकार्य करतात आणि त्यांना काही चांगल्या पुनर्भेटीही मिळाल्या आहेत. ८५ वर्षांच्या बहीण बारबरा म्हणतात: “माझ्या खालावलेल्या तब्येतीमुळे मला नियमितपणे प्रचाराला जायला कठीण जातं. पण फोनवरून साक्षकार्य केल्यामुळे मला इतरांशी बोलायला संधी मिळते. यासाठी यहोवा तुझे खूप आभार!” एका बेथेलमधल्या काही वयस्क जणांनी एका वर्षापेक्षा कमी वेळात १,२२८ तास सेवाकार्य केलं, ६,२६५ पत्रं लिहिली, २,००० पेक्षा जास्त फोन कॉल केले आणि ६,३१५ प्रकाशनं दिली! आम्हाला पक्की खातरी आहे की या मौल्यवान जणांचे प्रयत्न पाहून यहोवा नक्कीच आनंदित झाला असेल!—नीति. २७:११.

१०. आपल्या बंधुभगिनींना सभांमधून पुरेपूर फायदा मिळावा यासाठी आपण कशी मदत करू शकतो?

१० ख्रिस्ती संभांमध्ये विचारशील असा. जेव्हा आपण इतरांचा विचार करतो तेव्हा आपल्या बंधुभगिनींना सभांमधून पुरेपूर फायदा मिळावा यासाठी आपण मदत करत असतो. हे आपण कसं करू शकतो? एक मार्ग म्हणजे वेळेवर येणे. यामुळे बाकीच्यांचं लक्ष विचलित होत नाही. हे खरं आहे, की कधीकधी काही कारणांमुळे आपल्याला उशीर होऊ शकतो. पण आपण बऱ्‍याचदा उशीरा येत असू तर याचा इतर बांधवांवर काय परिणाम होऊ शकतो याचा विचार करा. तसंच, यात आपण कोणते फेरबदल करू शकतो याचाही विचार करा. असं केल्याने आपण त्यांची काळजी करतो हे दिसून येईल. लक्षात असू द्या, की यहोवा आणि येशू आपल्याला सभेला येण्याचं आमंत्रण देतात. (मत्त. १८:२०) आपण वेळेवर पोहोचण्याद्वारे दाखवू शकतो की आपण त्यांचा आदर करतो!

११. ज्या बांधवांचा सभेत भाग असतो त्यांनी १ करिंथकर १४:४० मध्ये दिलेला सल्ला का लागू केला पाहिजे?

११ जर आपण आपल्या बांधवांबद्दल विचारशील असू तर आपण बायबलमध्ये दिलेल्या या सल्ल्याचं पालन करू: “सर्व गोष्टी योग्य पद्धतीने व सुव्यवस्थितपणे होऊ द्या.” (१ करिंथ. १४:४०) ज्या बांधवांचा सभेमध्ये भाग असतो ते वेळेवर आपला भाग संपवण्याद्वारे या सल्ल्याचं पालन करत असतात. यामुळे ते त्यांच्यानंतर भाग असलेल्या बांधवाचाच नाही, तर पूर्ण मंडळीचा विचार करतात. जर सभा उशीरा संपली तर याचा काय परिणाम होऊ शकतो याचा विचार करा. काही बंधुभगिनींना घरी पोहोचण्यासाठी दूरचा प्रवास करावा लागतो. तसंच, इतर काहींना ट्रेन किंवा बस पकडावी लागते. किंवा इतर असेही असतात ज्यांचे विवाहसोबती सत्यात नाहीत आणि त्यांना विशिष्ट वेळेच्या आत घरी पोहोचणं गरजेचं असतं.

१२. वडील आपल्याकडून आदर व प्रेम मिळवण्याच्या पात्रतेचे का आहेत? (“ पुढाकार घेणाऱ्‍यांबद्दल विचारशील असा” ही चौकट पाहा.)

१२ मंडळीतले वडील मंडळीत आणि सेवाकार्यात भरपूर मेहनत घेतात. यामुळे ते आदर आणि प्रेम मिळवण्याच्या पात्रतेचे आहेत. (१ थेस्सलनीकाकर ५:१२, १३ वाचा.) ते तुमच्यासाठी जी काही मेहनत घेतात याबद्दल तुम्ही नक्कीच कृतज्ञ असाल! तुम्ही हे स्वेच्छेने त्यांचं ऐकण्याद्वारे आणि त्यांना साहाय्य करण्याद्वारे दाखवू शकता. “कारण आपल्याला हिशोब द्यायचा आहे हे ओळखून ते तुमचे रक्षण करत आहेत.”—इब्री १३:७, १७.

सेवाकार्यात विचारशील असा

१३. येशू जसा लोकांशी वागला त्यावरून आपण कोणते धडे घेऊ शकतो?

१३ येशूबद्दल एका भविष्यवाणीत यशयाने म्हटलं: “चेपलेला बोरू [गवताची काडी, NW] तो मोडणार नाही मिणमिणती वात तो विझवणार नाही.” (यश. ४२:३) लोकांवर प्रेम असल्यामुळे तो त्यांच्या भावना नीट समजू शकला. जे चेपलेल्या गवताच्या काडीसारखे किंवा मिणमिणत्या वातीसारखे निराश आणि कमजोर होते त्यांच्या काय भावना होत्या हे तो समजू शकला. म्हणूनच तो त्यांच्याशी खूप दयेने आणि धीराने वागला. लहान मुलांनाही येशूकडे यायला आवडायचं. (मार्क १०:१४) हे खरं आहे, की आपण येशूसारखं लोकांच्या भावना समजू शकत नाही किंवा त्याच्यासारखं लोकांना शिकवू शकत नाही. पण आपल्या क्षेत्रातल्या लोकांशी कसं, कधी व किती वेळ बोलावं याबद्दल आपण नक्कीच विचारशील असू शकतो.

१४. लोकांशी कसं बोलावं याबद्दल आपण का विचार केला पाहिजे?

१४ आपण लोकांशी कसं बोलावं? या जगातले भ्रष्ट आणि जुलुमी व्यापार, राजनैतिक आणि धार्मिक पुढारी यांमुळे आज लाखो लोक “जखमी झालेले व भरकटलेले” आहेत. (मत्त. ९:३६) यामुळे पुष्कळ लोकांचा कोणावरच विश्‍वास राहिलेला नाही आणि त्यांच्याकडे कोणतीच आशाही नाही. म्हणूनच, आपल्या शब्दांतून आणि बोलण्याच्या पद्धतीवरून इतरांना आपण दयाळू असल्याचं आणि लोकांबद्दल काळजी असल्याचं दिसून यायला हवं. बऱ्‍याच लोकांना आपल्या संदेशात आवड फक्‍त यासाठी नसते की आपल्याला बायबलबद्दल खूपकाही माहीत आहे, तर यासाठीही असते की आपण मनापासून त्यांच्यात आस्था दाखवतो आणि त्यांना आदर देतो.

१५. आपल्या क्षेत्रातल्या लोकांच्या बाबतीत विचारशील असण्याचे कोणते मार्ग आहेत?

१५ आपण अनेक मार्गांनी दाखवू शकतो की आपल्या क्षेत्रातल्या लोकांबद्दल आपण विचारशील आहोत. आपण लोकांना आदराने आणि दयाळूपणे प्रश्‍न विचारले पाहिजेत. एक पायनियर अशा क्षेत्रात सेवा करत होता जिथे लोक लाजाळू स्वभावाचे होते. योग्य उत्तर माहीत नसल्यामुळे त्यांना अवघडल्यासारखं वाटेल असे प्रश्‍न तो टाळायचा. “तुम्हाला देवाचं नाव माहीत आहे का?” किंवा “देवाचं राज्य म्हणजे काय?” असं विचारण्याऐवजी तो म्हणायचा: “मला बायबलमधून कळलं आहे, की देवाचं एक वैयक्‍तिक नाव आहे. त्याचं नाव काय आहे हे मी तुम्हाला दाखवू शकतो का?” अशी पद्धत सगळीकडे लागू होईलच असं नाही. कारण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे लोक आणि संस्कृती असतात. पण आपण आपल्या क्षेत्रात नेहमी लोकांशी दयाळूपणे आणि आदराने वागलं पाहिजे. आणि असं करण्यासाठी आपण त्यांना नीट जाणून घेतलं पाहिजे.

१६, १७. आपण दया कशी दाखवू शकतो? (क) लोकांना कोणत्या वेळी भेटायचं याबाबतीत. (ख) त्यांच्याशी किती वेळ बोलायचं याबाबतीत.

१६ आपण लोकांना कधी भेटावं? घरोघरचं प्रचारकार्य करताना लोकांना माहीत नसतं की आपण त्यांना भेटणार आहोत. त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे, की आपण त्यांना अशा वेळी भेटलं पाहिजे जेव्हा ते आपल्याशी बोलायला तयार असतील. (मत्त. ७:१२) उदाहरणार्थ, तुमच्या क्षेत्रातल्या लोकांना शनिवारी-रविवारी जास्त झोपायला आवडतं का? मग तुम्ही आधी रस्त्यावरचं, सार्वजनिक साक्षकार्य करू शकता किंवा तुमच्याशी बोलायला तयार असणाऱ्‍या पुनर्भेटी करू शकता.

१७ आपण किती वेळ बोलावं? आज अनेक लोक खूप व्यस्त आहेत. त्यामुळे खासकरून सुरुवातीच्या भेटी कमी वेळाच्या असणं कदाचित योग्य राहील. जास्त वेळ थांबण्यापेक्षा आपण आपली चर्चा कमी वेळात आटपू शकतो. (१ करिंथ. ९:२०-२३) लोक व्यस्त आहेत याची आपल्याला जाणीव आहे हे जेव्हा त्यांना कळतं, तेव्हा पुढच्या वेळी त्यांना भेटल्यावर ते कदाचित आपल्याला जास्त वेळ देतील. जेव्हा आपण पवित्र आत्म्याच्या फळाचे पैलू दाखवतो तेव्हा आपण खऱ्‍या अर्थाने “देवाचे सहकारी” बनतो. कदाचित यहोवा एखाद्याला सत्य जाणून घेण्यासाठी आपला वापरही करेल.—१ करिंथ. ३:६, ७, ९.

१८. आपण जेव्हा इतरांबद्दल विचारशील असतो तेव्हा कोणते आशीर्वाद मिळण्याची आपण आशा बाळगू शकतो?

१८ आपल्या कुटुंबातल्या सदस्यांबद्दल, आपल्या बंधुभगिनींबद्दल आणि सेवाकार्यात भेटणाऱ्‍यांबद्दल विचारशील असण्यासाठी आपण पुरेपूर मेहनत करू या! असं केल्यामुळे आपल्याला आज आणि भविष्यातही अनेक आशीर्वाद मिळतील. कारण स्तोत्र ४१:१, २ मध्ये म्हटलं आहे: “जो दीनांची चिंता वाहतो तो धन्य! संकटसमयी परमेश्‍वर त्याला मुक्‍त करील. परमेश्‍वर त्याचे रक्षण करील व त्याचा प्राण वाचवील; भूतलावर तो सुखी होईल.”