व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

उपदेशक ५:८ या वचनात कोणाबद्दल सांगितलं आहे, मानवी अधिकाऱ्‍यांबद्दल की यहोवाबद्दल?

या वचनात असं म्हटलं आहे: “एखाद्या प्रांतात दुर्बलांवर जुलूम होत आहे, न्याय व धर्म यांची पायमल्ली होत आहे, असे तू पाहिले तर त्यामुळे चकित होऊ नको; कारण वरिष्ठ माणसावर त्याहूनही वरिष्ठांची नजर असते आणि त्यांच्यावरही कोणी वरिष्ठ असतो.”—उप. ५:८.

या वचनात, मानवी सरकारात जे अधिकाराच्या पदावर आहेत त्यांच्याबद्दल सांगितलं आहे. पण या वचनावर खोलवर विचार केल्यामुळे यहोवाबद्दल एक महत्त्वाची गोष्ट आपल्या लक्षात येते. आणि ती जाणून घेतल्यामुळे आपल्याला खूप सांत्वन आणि दिलासा मिळतो.

उपदेशक ५:८ या वचनामध्ये अशा एका अधिकाऱ्‍याबद्दल सांगितलं आहे, जो गरिबांवर जुलूम आणि अन्याय करतो. पण त्याने ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की त्याच्यापेक्षा मोठ्या पदावर असलेल्या अधिकाऱ्‍याची त्याच्यावर नजर आहे. आणि या मोठ्या अधिकाऱ्‍यावरही आणखी बरेच मोठे अधिकारी आहेत. पण दुःखाची गोष्ट म्हणजे मानवी सरकारात असलेले हे सगळे अधिकारी भ्रष्ट असू शकतात. आणि त्यामुळे सामान्य माणसांना खूप काही सोसावं लागू शकतं.

पण परिस्थिती कितीही वाईट वाटत असली तरी एक गोष्ट जाणून आपल्याला खूप दिलासा मिळतो. ती म्हणजे, मानवी सरकारात मोठ्या पदावर असलेल्या अधिकाऱ्‍यांवरही यहोवाची नजर असते. त्यामुळे आपण यहोवाला प्रार्थना करू शकतो आणि आपला भार त्याच्यावर टाकू शकतो. (स्तो. ५५:२२; फिलिप्पै. ४:६, ७) तसंच, आपल्याला हेसुद्धा माहीत आहे, की “परमेश्‍वराचे नेत्र अखिल पृथ्वीचे निरीक्षण करत असतात, जे कोणी सात्विक चित्ताने त्याच्याशी वर्ततात त्यांचे साहाय्य करण्यात तो आपले सामर्थ्य प्रकट करतो.”—२ इति. १६:९.

शेवटी, उपदेशक ५:८ या वचनातून आपल्याला काय कळतं? हेच, की मानवी सरकारात प्रत्येक अधिकाऱ्‍यावर नेहमी एक मोठा अधिकारी असतो. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या वचनातून यहोवाबद्दल एक मुख्य गोष्ट लक्षात येते; ती म्हणजे, यहोवा सर्वोच्च अधिकारी आहे. त्याच्यावर कोणताही मोठा अधिकारी नाही. आज तो त्याच्या मुलाद्वारे, म्हणजेच येशू ख्रिस्ताद्वारे राज्य करत आहे. यहोवा सर्वशक्‍तिशाली देव आहे आणि तो सगळं काही पाहू शकतो. त्याची नजर सगळ्यांवर आहे. तो न्यायी आहे. आणि त्याचा मुलगाही तितकाच न्यायी आहे.