व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ४१

पेत्रच्या दोन पत्रांमधून शिकायला मिळणारे धडे

पेत्रच्या दोन पत्रांमधून शिकायला मिळणारे धडे

“मी तुम्हाला सतत या गोष्टींची आठवण करून देईन.”—२ पेत्र १:१२.

गीत १२२ निर्भय व निश्‍चयी राहा!

सारांश a

१. प्रेषित पेत्रला त्याचा मृत्यू होण्याआधी काय करायची प्रेरणा मिळाली?

 प्रेषित पेत्रला आता आपला मृत्यू जवळ आहे हे माहीत होतं. त्याने कित्येक दशकं विश्‍वासूपणे सेवा केली होती. आपल्या आयुष्यातला काही काळ त्याने येशूसोबत घालवला होता. तसंच यहुदी नसलेल्या लोकांना प्रचार करून त्याने प्रचारकार्याचं नवीन क्षेत्र उघडलं होतं. आणि पुढे नियमन मंडळाचा सदस्य म्हणूनही काम केलं होतं. पण त्याची सेवा इथेच संपणार नव्हती. कारण यहोवाने त्याला आता आणखी एक जबाबदारी दिली. इ.स. ६२ ते ६४ च्या दरम्यान यहोवाने त्याला दोन पत्रं लिहायला प्रेरित केलं. ती पत्रं म्हणजे बायबलमधली ‘पहिलं पेत्र’ आणि ‘दुसरं पेत्र’ ही पुस्तकं. पेत्रला अशी आशा होती की या दोन पत्रांमुळे त्याच्या मृत्यूनंतरही ख्रिश्‍चनांना फायदा होईल.—२ पेत्र १:१२-१५.

२. पेत्रने लिहिलेली पत्रं अगदी योग्य वेळी लिहिली होती असं का म्हणता येईल?

पेत्रने देवाच्या प्रेरणेने ही पत्रं अशा काळात लिहिली जेव्हा त्याच्यासोबतचे भाऊबहीण ‘वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षांमुळे दुःख सहन करत होते.’ (१ पेत्र १:६) तसंच काही दुष्ट माणसं मंडळीत खोट्या शिकवणी पसरवण्याचा प्रयत्न करत होती आणि मंडळीतल्या भाऊबहिणींना अशुद्ध वर्तनाच्या मोहात पाडायचा प्रयत्न करत होती. (२ पेत्र २:१, २, १४) यरुशलेममध्ये राहणाऱ्‍या ख्रिश्‍चनांसाठी आता “सर्व गोष्टींचा शेवट” जवळ आला होता. म्हणजेच रोमी सैनिकांकडून त्या शहराचा आणि यहुदी व्यवस्थेचा शेवट जवळ आला होता. (१ पेत्र ४:७) त्यामुळे साहजिकच, त्या भाऊबहिणींना परीक्षांमध्ये टिकून राहायला आणि पुढे येणाऱ्‍या परीक्षांचा सामना कसा करता येईल, हे समजून घ्यायला या पत्रांमुळे नक्कीच मदत झाली असेल. b

३. पेत्रने आपल्या पत्रांमध्ये देवाच्या प्रेरणेने लिहिलेल्या गोष्टींकडे आपणही का लक्ष दिलं पाहिजे?

पेत्रने ही पत्रं पहिल्या शतकातल्या ख्रिश्‍चनांसाठी जरी लिहिली असली, तरी यहोवाने या पत्रांचा समावेश त्याच्या वचनात केलाय. त्यामुळे आज आपल्यालाही या पत्रांमुळे फायदा होऊ शकतो. (रोम. १५:४) आज आपण अशा जगात राहत आहोत जिथे अशुद्ध जीवन जगण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातंय. त्यामुळे यहोवाची सेवा करत असताना आपल्यालाही बऱ्‍याच संकटांचा सामना करावा लागतोय. तसंच, ज्या संकटामुळे यहुदी व्यवस्थेचा नाश झाला, त्याहीपेक्षा कितीतरी पटीने मोठ्या संकटाचा आपण लवकरच सामना करणार आहोत. पण पेत्रच्या या पत्रांमध्ये आपल्याला काही महत्त्वाच्या सूचना मिळतात. त्यामुळे यहोवाच्या दिवसाची वाट पाहत राहायला, माणसाच्या भीतीवर मात करायला आणि एकमेकांवर जिवापाड प्रेम करायला आपल्याला मदत होईल. तसंच या पत्रांमध्ये असलेल्या काही सल्ल्यांमुळे वडिलांना आपल्या कळपाची चांगल्या प्रकारे काळजी घ्यायलासुद्धा मदत होऊ शकते.

यहोवाच्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत राहा

४. २ पेत्र ३:३, ४ मध्ये सांगितल्याप्रमाणे कोणत्या गोष्टींमुळे आपला विश्‍वास डळमळू शकतो?

आपण सध्या अशा लोकांमध्ये राहत आहोत ज्यांचा बायबलच्या भविष्यवाण्यांवर बिलकूल विश्‍वास नाही. आपला विरोध करणारे लोक आपली चेष्टा करतात, कारण या जगाचा अंत खूप जवळ आहे असं बऱ्‍याच वर्षांपासून आपण सांगत आलो आहोत. टीका करणारे काही लोक तर असंही म्हणतात, की अंत कधीच येणार नाही.  (२ पेत्र ३:३, ४ वाचा.) प्रचारकार्यात, कामावरच्या ठिकाणी आणि कुटुंबातल्या सदस्यांकडूनही आपल्याला जेव्हा अशा प्रकारच्या गोष्टी ऐकायला मिळतात, तेव्हा कदाचित आपला विश्‍वास डळमळू शकतो. पण अशा परिस्थितीत कोणत्या गोष्टीमुळे आपल्याला मदत होईल हे पेत्र आपल्याला सांगतो.

५. या जगाच्या नाशाबद्दल योग्य दृष्टिकोन ठेवायला कोणत्या गोष्टीमुळे आपल्याला मदत होऊ शकते? (२ पेत्र ३:८, ९)

काही लोकांना तर असंही वाटेल, की या दुष्ट जगाचा नाश करण्यासाठी यहोवा खूपच वेळ लावत आहे. पण पेत्रच्या शब्दांमुळे आपल्याला या बाबतीत योग्य दृष्टिकोन बाळगायला मदत होते. त्यातून आपल्याला कळतं, की वेळेकडे पाहण्याचा यहोवाचा दृष्टिकोन आणि मानवांचा दृष्टिकोन यात खूप मोठा फरक आहे. (२ पेत्र ३:८, ९ वाचा.) यहोवासाठी एक हजार वर्षं ही एका दिवसासारखी आहेत. तसंच यहोवा नेहमी धीराने काम करतो. कोणाचाही नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही. पण जेव्हा त्याचा दिवस येईल तेव्हा मात्र तो या दुष्ट जगाचा नक्की नाश करेल. पण अंत येण्याआधी सर्व राष्ट्रांमधल्या लोकांना साक्ष देण्यासाठी आपल्याकडे असलेल्या वेळेचा उपयोग करणं, हा किती मोठा बहुमान आपल्याला मिळालाय!

६. आपण यहोवाचा दिवस ‘नेहमी आपल्या डोळ्यांपुढे’ कसा ठेवू शकतो? (२ पेत्र ३:११, १२)

पेत्र त्याच्या पत्रामध्ये, यहोवाचा दिवस ‘नेहमी डोळ्यांपुढे ठेवायची’ विनंती आपल्याला करतो. (२ पेत्र ३:११, १२ वाचा.) मग आपण हे कसं करू शकतो? त्यासाठी नवीन जगात मिळणाऱ्‍या आशीर्वादांचा आपण दररोज विचार करू शकतो. उदाहरणार्थ, अशी कल्पना करा की तुम्ही अतिशय शुद्ध वातावरणात राहत आहात. खायला-प्यायला मुबलक प्रमाणात आहे. पुनरुत्थान झालेल्या आपल्या प्रियजनांचं तुम्ही आनंदाने स्वागत करत आहात. शिवाय, कित्येक शतकांआधी मरण पावलेल्या लोकांना तुम्ही बायबलच्या भविष्यवाण्या कशा पूर्ण झाल्या आहेत, याबद्दल शिकवत आहात. आपण जर दररोज या गोष्टींचा विचार केला तर यामुळे यहोवाच्या दिवसाची आतुरतेने वाट पाहायला आणि अंत नक्की येईल या गोष्टीची खातरी बाळगायला मदत होईल. अशा प्रकारे भविष्यात होणाऱ्‍या या गोष्टींबद्दल ‘आधीपासूनच माहीत असल्यामुळे’ आपण दुष्ट लोकांच्या खोट्या शिकवणींमुळे ‘भरकटणार नाही.’—२ पेत्र ३:१७.

माणसांच्या भीतीला बळी पडू नका

७. माणसांच्या भीतीचा आपल्यावर कसा परिणाम होऊ शकतो?

यहोवाचा दिवस नेहमी डोळ्यांपुढे ठेवल्यामुळे आपल्याला इतरांना आनंदाचा संदेश सांगायची प्रेरणा मिळते. पण कधीकधी आपल्याला इतरांशी याबद्दल बोलायला हिंमत होणार नाही. माणसांच्या भीतीमुळे कदाचित असं होऊ शकतं. पेत्रच्या बाबतीतही असं झालं होतं. येशूला पकडण्यात आलं त्या रात्री पेत्रने येशूचा शिष्य असल्याचं नाकारलं. इतकंच नाही, तर त्याला ओळखत असल्याचंही नाकारलं! (मत्त. २६:६९-७५) पण पेत्रने आपल्या भीतीवर मात केली आणि नंतर तो ठामपणे असं म्हणू शकला: “लोकांना ज्या गोष्टींची भीती वाटते त्यांची भीती तुम्ही बाळगू नका आणि अस्वस्थ होऊ नका.” (१ पेत्र ३:१४) पेत्रच्या या शब्दांवरून आपल्याला या गोष्टीची खातरी मिळते, की आपणसुद्धा माणसांच्या भीतीवर मात करू शकतो.

८. माणसांच्या भीतीवर मात करायला कोणती गोष्ट आपल्याला मदत करू शकते? (१ पेत्र ३:१५)

तर मग माणसांच्या भीतीवर मात करण्यासाठी कोणती गोष्ट आपल्याला मदत करू शकते? पेत्रने म्हटलं: “ख्रिस्ताला आपल्या मनात प्रभू म्हणून पवित्र माना.” (१ पेत्र ३:१५ वाचा.) यासाठी आपण स्वतःला याची आठवण करून दिली पाहिजे, की ख्रिस्त येशू आपला राजा आहे आणि तो अतिशय सामर्थ्यशाली आहे. मग आनंदाचा संदेश इतरांना सांगताना आपल्या संकोच वाटत असेल किंवा भीती वाटत असेल, तर आपल्या राजाचा विचार करा. येशू स्वर्गात राज्य करत आहे आणि त्याच्या सभोवती असंख्य स्वर्गदूत आहेत, याचा आपण विचार करू शकतो. लक्षात असू द्या की ‘स्वर्गात आणि पृथ्वीवर सगळा अधिकार त्याला देण्यात आलाय’ आणि तो “जगाच्या व्यवस्थेच्या समाप्तीपर्यंत” नेहमी आपल्यासोबत असेल. (मत्त. २८:१८-२०) म्हणून आपल्या विश्‍वासाबद्दल बोलण्यासाठी आपण “नेहमी तयार” असलं पाहिजे असं पेत्रने सांगितलं आहे. मग तुम्हीसुद्धा आपल्या कामाच्या ठिकाणी, शाळा-कॉलेजमध्ये किंवा संधी मिळते तेव्हा साक्ष द्यायला तयार आहात का? यासाठी एखाद्यासोबत कधी बोलता येईल याचा आधीच विचार करून ठेवा. आणि संधी मिळाल्यावर तुम्ही काय बोलणार हे आधीच ठरवा. धैर्य दाखवता यावं म्हणून प्रार्थना करा. आणि माणसांच्या भीतीवर मात करायला यहोवा तुम्हाला नक्की मदत करेल अशी खातरी असू द्या.—प्रे. कार्यं ४:२९.

“एकमेकांवर जिवापाड प्रेम करा”

पौलने चूक दाखवून दिली तेव्हा पेत्रने ती मान्य केली. पेत्रने लिहिलेल्या दोन पत्रांमधून आपल्याला शिकायला मिळतं, की आपण आपल्या भाऊबहिणींवर प्रेम केलं पाहिजे (परिच्छेद ९ पाहा)

९. एकदा पेत्र आपल्या भाऊबहिणींवर प्रेम दाखवण्यात कसा कमी पडला? (चित्रसुद्धा पाहा.)

आपल्या भाऊबहिणींवर मनापासून प्रेम कसं करायचं हे पेत्रला शिकायला मिळालं. येशूने म्हटलं होतं: “मी तुम्हाला एक नवीन आज्ञा देतो, की एकमेकांवर प्रेम करा. जसं मी तुमच्यावर प्रेम केलं, तसंच तुम्हीही एकमेकांवर प्रेम करा.” (योहा. १३:३४) येशूने हे सांगितलं तेव्हा पेत्रही तिथे होता. तरीसुद्धा माणसांच्या भीतीला बळी पडून पेत्रने यहुदी नसलेल्या भाऊबहिणींसोबत जेवायचं टाळलं. प्रेषित पौलने पेत्रचं हे वागणं “ढोंगीपणा” आहे असं म्हटलं. (गलती. २:११-१४) पण पौलने जेव्हा पेत्रला त्याची चूक दाखवून दिली, तेव्हा पेत्रने ती मान्य केलं आणि आपली चूक सुधारली. पुढे पेत्रने आपल्या दोन्ही पत्रांमध्ये या गोष्टीवर जोर दिला, की आपल्याला आपल्या भाऊबहिणींबद्दल फक्‍त प्रेम वाटलं  नाही पाहिजे, तर आपण ते दाखवलंसुद्धा  पाहिजे.

१०. आपल्या भाऊबहिणींवर “निष्कपट मनाने बंधुप्रेम” करायला कोणती गोष्ट आपल्याला मदत करू शकते? स्पष्ट करा. (१ पेत्र १:२२)

१० पेत्रने म्हटलं की आपण आपल्या भाऊबहिणींना “निष्कपट मनाने बंधुप्रेम” दाखवलं पाहिजे. (१ पेत्र १:२२ वाचा.) आणि अशा प्रकारचं प्रेम हे ‘सत्याचं पालन करण्याद्वारेच’ निर्माण होऊ शकतं. या सत्यामध्ये या शिकवणीचाही समावेश होतो, की “देव लोकांमध्ये भेदभाव करत नाही.” (प्रे. कार्यं १०:३४, ३५) जर आपण मंडळीतल्या सगळ्या भाऊबहिणींपैकी फक्‍त ठरावीक भाऊबहिणींवरच प्रेम दाखवत असू तर प्रेमाबद्दल येशूने दिलेल्या आज्ञेचं आपल्याला पालन करता येणार नाही. हे खरंय, की काही भाऊबहीण आपल्याला जास्त जवळचे वाटू शकतात. येशूलाही काही जणांच्या बाबतीत तसं वाटत होतं. (योहा. १३:२३; २०:२) पण पेत्रने आपल्याला या गोष्टीची आठवण करून दिली, की आपल्या सगळ्या भाऊबहिणींबद्दल आपल्या मनात “बंधुप्रेम” असलं पाहिजे. एक असं प्रेम जे कुटुंबातल्या सदस्यांमध्ये पाहायला मिळतं.—१ पेत्र २:१७.

११. “एकमेकांवर शुद्ध मनाने जिवापाड प्रेम” करण्याचा काय अर्थ होतो?

११ पेत्रने म्हटलं, “एकमेकांवर शुद्ध मनाने जिवापाड प्रेम करत राहा.” या ठिकाणी “जिवापाड” प्रेम करण्याचा अर्थ, एखाद्यावर प्रेम करायला कठीण जात असतानाही त्याच्यावर प्रेम करत राहणं असा होतो. उदाहरणार्थ, एखाद्याने आपलं मन दुखावलं तर आपण त्याच्याशी कसं वागू? कदाचित त्याच्यावर प्रेम करण्याऐवजी तो जसं वागला तसंच वागण्याचा आपण प्रयत्न करू. अशा प्रकारचं वागणं देवाला आवडत नाही हे पेत्र येशूकडून शिकला होता. (योहा. १८:१०, ११) पेत्रने म्हटलं: “कोणी तुमचं नुकसान केलं, तर त्याचं नुकसान करू नका किंवा कोणी तुमचा अपमान केला, तर त्याचा अपमान करू नका. उलट, आशीर्वाद देऊन त्याची परतफेड करा.” (१ पेत्र ३:९) तेव्हा इतरांवर असलेल्या जिवापाड प्रेमामुळे प्रवृत्त होऊन आपण इतरांना दया दाखवत राहू या आणि त्यांना समजून घेऊ या; अगदी अशांनाही ज्यांनी आपलं मन दुखावलंय.

१२. (क) इतरांवर मनापासून प्रेम असल्यामुळे आपल्याला आणखी काय करायला मदत होईल? (ख) एकतेची अनमोल भेट जपून ठेवा  या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही काय करायचं ठरवलं आहे?

१२ पेत्रने आपल्या पहिल्या पत्रात याच अर्थाचा आणखी एक शब्द वापरला. त्याने म्हटलं, अगदी “मनापासून प्रेम” करा. अशा प्रकारचं प्रेम इतरांच्या फक्‍त काही पापांनाच नाही तर “पुष्कळ पापांना” झाकून टाकतं. (१ पेत्र ४:८) काही वर्षांआधी येशूने क्षमा करण्याच्या बाबतीत पेत्रला जो धडा दिला होता, त्याची कदाचित पेत्रला आठवण झाली असेल. त्या वेळी पेत्र येशूला म्हणाला होता, की आपण आपल्या भावाला “सात वेळा” क्षमा केली पाहिजे. पेत्रला कदाचित आपण क्षमा करण्याच्या बाबतीत खूप उदार आहोत असं वाटलं असेल. पण येशूने त्याला आणि आपल्यालाही सांगितलं, की आपण “७७ वेळा” क्षमा केली पाहिजे, म्हणजेच क्षमा करायला कोणतीच मर्यादा नसली पाहिजे. (मत्त. १८:२१, २२) तुम्हाला जर येशूने दिलेल्या या सल्ल्याप्रमाणे वागणं कठीण जात असेल तर निराश होऊ नका. यहोवाच्या सगळ्याच अपरिपूर्ण सेवकांना कधी न्‌ कधी क्षमा करायला कठीण गेलं आहे. पण महत्त्वाची गोष्ट ही आहे, की आपण आपल्या भाऊबहिणींना क्षमा करण्यासाठी योग्य ती पावलं उचलली पाहिजेत आणि त्यांच्यासोबत शांतीचे संबंध जोडले पाहिजेत. c

वडिलांनो, कळपाची काळजी घ्या

१३. मेंढपाळ म्हणून आपल्या भाऊबहिणींची काळजी घ्यायला वडिलांना कठीण का जाऊ शकतं?

१३ पुनरुत्थान झाल्यानंतर येशूने पेत्रला जे सांगितलं ते तो कधीच विसरला नसेल. येशूने म्हटलं: “माझ्या लहान मेढरांची काळजी घे.” (योहा. २१:१६) तुम्हीसुद्धा वडील म्हणून सेवा करत असाल तर हे शब्द तुम्हालाही लागू होतात हे तुम्हाला माहीत आहे. पण वडील म्हणून सेवा करत असताना महत्त्वाच्या जबाबदाऱ्‍या पार पाडण्यासाठी वेळ काढणं तुम्हाला कधीकधी कठीण जाऊ शकतं. वडिलांना सर्वातआधी आपल्या कुटुंबाच्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक गरजा पूर्ण कराव्या लागतात. यासोबतच ते प्रचारकार्यात पुढाकार घेतात. तसंच सभांमध्ये, संमेलनांमध्ये आणि अधिवेशनांमध्ये भाग सादर करण्यासाठी त्यांना तयारीसुद्धा करावी लागते. यासोबतच काही वडिलांना हॉस्पिटल संपर्क समितीचे सदस्य म्हणूनसुद्धा काही जबाबदाऱ्‍या सांभाळाव्या लागतात. तर काही जणांना स्थानिक डिझाईन आणि बांधकाम विभागाकडून मिळणारं काम पूर्ण करावं लागतं. खरंच, मंडळीतले वडील यहोवाच्या सेवेत खूप व्यस्त असतात!

मंडळीतले प्रेमळ वडील कितीही व्यस्त असले तरी मेंढपाळ भेटी देण्यासाठी खूप मेहनत घेतात (परिच्छेद १४-१५ पाहा)

१४. कळपाची काळजी घ्यायला वडिलांना कशामुळे मदत होऊ शकते? (१ पेत्र ५:१-४)

१४ पेत्रने आपल्यासोबत सेवा करणाऱ्‍या वडिलांना, ‘देवाच्या कळपाचा सांभाळ करायचं’ प्रोत्साहन दिलं. (१ पेत्र ५:१-४ वाचा.) तुम्हीसुद्धा एक वडील असाल तर तुमचं भाऊबहिणींवर प्रेम आहे आणि मेंढपाळ म्हणून सेवा करायची तुमची इच्छा आहे हे आम्हाला माहीत आहे. पण कधीकधी खूप व्यस्त असल्यामुळे किंवा थकून गेल्यामुळे तुम्हाला असं वाटू शकतं, की आपल्याला आपली जबाबदारी पूर्ण करता येणार नाही. मग अशा वेळी तुम्ही काय करू शकता? तुम्हाला भाऊबहिणींबद्दल वाटणारी काळजी तुम्ही यहोवाला बोलून दाखवू शकता. पेत्रने म्हटलं: “जर कोणी सेवा करत असेल, तर देव पुरवत असलेल्या सामर्थ्याने सेवा करत असल्याप्रमाणे त्याने ती करावी.” (१ पेत्र ४:११) तुमच्या भाऊबहिणींना ज्या समस्यांचा सामना करावा लागत आहे त्या समस्या या सैतानाच्या जगात पूर्णपणे काढून टाकता येणार नाहीत. पण लक्षात असू द्या की तुम्ही जितकं करू शकता, त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आपला “प्रमुख मेंढपाळ” येशू ख्रिस्त करू शकतो. आणि तो हे आज आणि येणाऱ्‍या नवीन जगातही करू शकतो. म्हणून यहोवा वडिलांकडून फक्‍त इतकीच अपेक्षा करतो, की त्यांनी आपल्या मेंढरांवर प्रेम करावं, मेंढपाळ म्हणून त्यांची काळजी घ्यावी आणि ‘कळपासाठी उदाहरण बनावं.’

१५. एक वडील देवाच्या कळपाची काळजी कशी घेतात? (चित्रसुद्धा पाहा.)

१५ बऱ्‍याच काळापासून वडील म्हणून सेवा करणाऱ्‍या विल्यम यांना मेंढपाळ भेटी देण्याचं महत्त्व चांगल्या प्रकारे माहीत आहे. कोव्हिड-१९ महामारी सुरू झाल्यानंतर त्यांनी आणि त्यांच्यासोबत असलेल्या इतर वडिलांनी आपापल्या गटातल्या प्रत्येक भाऊबहिणीशी संपर्क करून त्यांची विचारपूस करण्याची एक योजना आखली. याचं कारण सांगताना ते म्हणतात: “आपले बरेच भाऊबहीण त्या वेळी घरात एकटे होते आणि त्यामुळे त्यांनी नकारात्मक विचार करण्याची शक्यता जास्त होती.” आत्तासुद्धा एखाद्या भावाला किंवा बहिणीला काही समस्या असेल तर भाऊ विल्यम त्यांचं चांगल्या प्रकारे ऐकून घेतात आणि त्यांना कशाची गरज आहे हे समजून घ्यायचा प्रयत्न करतात. आणि मग त्यांच्या समस्येशी संबंधित असणारी एखादी माहिती ते शोधतात. किंवा मग बऱ्‍याचदा ते त्यांना फायद्याचा ठरेल असा एखादा वेबसाईटवरचा व्हिडिओ बघायला सांगतात. ते म्हणतात: “मेंढपाळ भेटी देण्याची आज पूर्वीपेक्षा जास्त गरज आहे. यहोवाबद्दल शिकून घ्यायला लोकांना मदत करण्यासाठी आपण खूप परिश्रम घेतो. आणि तितकेच परिश्रम भाऊबहिणींना मेंढपाळ भेटी देण्यासाठीसुद्धा घेतले पाहिजेत. कारण यामुळे यहोवाच्या मेंढरांना सत्यात टिकून राहायला मदत होते.”

यहोवाला तुमचं प्रशिक्षण पूर्ण करू द्या

१६. पेत्रने लिहिलेल्या पत्रातून शिकायला मिळालेल्या गोष्टी आपण कशा लागू करू शकतो?

१६ देवाच्या प्रेरणेने लिहिलेल्या पेत्रच्या या दोन पत्रांमधून आपल्याला काही महत्त्वाचे धडे शिकायला मिळाले. आणि हे करत असताना तुम्हाला कदाचित कोणत्या सुधारणा करण्याची गरज आहे हे लक्षात आलं असेल. उदाहरणार्थ, नवीन जगात मिळणाऱ्‍या आशीर्वादांवर आणखी जास्त मनन करण्याची तुम्हाला गरज आहे का? कामाच्या ठिकाणी, शाळा-कॉलेजमध्ये किंवा इतर मार्गांनी साक्ष देण्याचं तुम्ही ठरवलं आहे का? आपल्या भाऊबहिणींवर जिवापाड प्रेम असल्याचं दाखवण्यासाठी तुम्ही वेगवेगळे मार्ग शोधू शकता का? वडिलांनो, यहोवाच्या मेंढरांची मनापासून काळजी घ्यायला तुम्ही तयार आहात का? या गोष्टींच्या बाबतीत स्वतःचं परीक्षण केल्यानंतर तुम्हाला कुठे सुधारणा करण्याची गरज आहे हे लक्षात येईल. पण तरी निराश होऊ नका. कारण ‘आपला प्रभू प्रेमळ आहे’ आणि तो आपल्याला सुधारणा करण्यासाठी मदत करेल. (१ पेत्र २:३) पेत्रने आपल्याला अशी खातरी दिली आहे, की “देव स्वतः तुमचं प्रशिक्षण पूर्ण करेल. . . . तो तुम्हाला दृढ करेल, तुम्हाला बळ देईल आणि स्थिर उभं राहायला मदत करेल.”—१ पेत्र ५:१०.

१७. जर तुम्ही हार न मानता यहोवाची सेवा करत राहिला आणि त्याच्यापासून प्रशिक्षण घेत राहिला तर तुम्हाला कोणतं प्रतिफळ मिळेल?

१७ आपण देवाच्या मुलासमोर उभं राहायच्यासुद्धा लायकीचे नाही आहोत असं एकदा पेत्रला वाटलं होतं. (लूक ५:८) पण यहोवा आणि येशूने प्रेमळपणे मदत केल्यामुळे पेत्रला येशूचं अनुकरण करत राहण्यासाठी मदत झाली. आणि अशा प्रकारे पेत्र, ‘आपला प्रभू आणि तारणकर्ता येशू ख्रिस्त याच्या सर्वकाळाच्या राज्यात प्रेवश’ मिळवायला पात्र ठरला. (२ पेत्र १:११) पेत्रसाठी हे खरंच किती मोठं बक्षीस होतं! आपणसुद्धा पेत्रप्रमाणे हार न मानता प्रयत्न करत राहिलो आणि यहोवाकडून प्रशिक्षण घेत राहिलो, तर आपल्यालाही सर्वकाळाच्या जीवनाचं बक्षीस मिळेल, म्हणजेच ‘विश्‍वासामुळे आपल्याला तारणाचं प्रतिफळ मिळेल.’—१ पेत्र १:९.

गीत १०७ देवाच्या प्रीतीचा आदर्श

a या लेखात आपण हे पाहणार आहोत, की पेत्रने लिहिलेल्या पत्रांमधून आपल्याला परीक्षांचा सामना करायला कशी मदत होऊ शकते आणि वडील मेंढपाळ म्हणून आपली जबाबदारी कशी पार पाडू शकतात.

b इ.स. ६६ मध्ये यरुशलेमवर झालेल्या पहिल्या हल्ल्याआधी पॅलेस्टाईनमध्ये राहणाऱ्‍या ख्रिश्‍चनांना पेत्रने लिहिलेली दोन्ही पत्रं मिळाली असावीत.

c jw.org वर असलेला एकतेची अनमोल भेट जपून ठेवा  हा व्हिडिओ पाहा.