संशोधनासाठी एक टीप
मुलांना शिकवण्याची साधनं
आपल्या मुलांना यहोवाबद्दल शिकवण्याची मोठी जबाबदारी आईवडिलांवर आहे. (इफिस. ६:४) म्हणून त्यांना मदत करण्यासाठी यहोवाच्या संघटनेने वेगवेगळ्या प्रकारची साधनं तयार केली आहेत. आपल्या मुलांना शिकवण्यासाठी तुम्ही त्यांचा वापर कसा करू शकता?
JW.ORG वर शोधा. या वेबसाईटवर मुलांसाठी आणि तरुणांसाठी बरेच व्हिडिओ आणि साहित्यं उपलब्ध आहेत. या साहित्यांवर ते लिहू शकतात किंवा चित्र काढू शकतात. a यासाठी सर्च बॉक्समध्ये तुम्ही “चिमुकल्यांसाठी” किंवा “तरुणांसाठी” असं टाईप करून शोधू शकता.
तुमच्या मुलांसाठी कोणती माहिती योग्य ठरेल त्यानुसार शोधा. “चिमुकल्यांसाठी” या विभागामधून व्हिडिओ, गाणी किंवा तुमच्या मुलांना उपयोगी ठरेल अशी माहिती तुम्ही निवडू शकता.
मुलांना वेळ द्या. मुलांना फक्त व्यस्त ठेवण्यासाठी तुम्ही ही माहिती किंवा व्हिडिओ त्यांना दाखवू नका. उलट, त्यांच्यासोबत यावर चर्चा करा आणि यहोवासोबत मैत्री करण्यासाठी त्यांना मदत करा.
a JW लायब्ररी ॲपवर मुलांसाठी आणि तरुणांसाठी सध्या काही प्रमाणातच व्हिडिओ आणि इतर साहित्य मराठी भाषेत उपलब्ध आहे.