व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आपण द्वेषावर विजय मिळवू शकतो!

आपण द्वेषावर विजय मिळवू शकतो!

तुमचा कधी द्वेष करण्यात आला आहे का?

कदाचित नसेल. पण तुम्ही इतरांना कोणत्या न्‌ कोणत्या मार्गाने द्वेष व्यक्‍त करताना पाहिलं असेल. कारण सहसा बातम्यांमध्ये आपल्याला हेच पाहायला आणि ऐकायला मिळतं, की वेगळ्या देशातून असल्यामुळे, वेगळ्या वर्णाचे असल्यामुळे, समलैंगिक असल्यामुळे किंवा वेगळ्या जातीचे असल्यामुळे लोकांचा द्वेष केला जातो. आणि म्हणूनच, बऱ्‍याच देशातली सरकारंसुद्धा आज याबाबतीत बरेच कायदे लागू करायचा प्रयत्न करत आहेत.

खरंतर, द्वेषामुळे द्वेष वाढतो. द्वेषाला बळी पडलेले लोक सहसा इतरांचा बदला घ्यायचा प्रयत्न करतात आणि अशाप्रकारे हे चक्र चालूच राहतं.

तुम्ही कदाचित काही गोष्टी अनुभवल्या असतील. कदाचित तुमच्याबद्दल गैरसमज झाला असेल, तुमचा अपमान, थट्टा किंवा निंदा करण्यात आली असेल किंवा मग तुम्हाला धमक्याही देण्यात आल्या असतील. पण द्वेषामुळे यापेक्षाही जास्त भयानक गोष्टी घडतात. जसं की, आक्रमक होऊन केलेली क्रूर कृत्यं, गुंडगिरी, दंगली, छळ, बलात्कार, खून आणि इतकचं नाही तर कधीकधी जातिसंहारही केला जातो.

या मासिकात आपल्याला पुढे दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं मिळतील आणि त्यामुळे आपल्याला समजेल, की आपण द्वेषावर विजय कसा मिळवू शकतो.

  • लोक एकमेकांचा द्वेष का करतात?

  • द्वेषाचं चक्र आपण कसं थांबवू शकतो?

  • लोक एकमेकांचा द्वेष करणार नाहीत अशी वेळ कधी येईल का?