व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आपण द्वेषाचं चक्र कसं थांबवू शकतो?

४ | देवाच्या मदतीने द्वेषावर विजय मिळवा

४ | देवाच्या मदतीने द्वेषावर विजय मिळवा

बायबलची शिकवण:

“पवित्र शक्‍तीचं फळ म्हणजे प्रेम, आनंद, शांती, सहनशीलता, दयाळूपणा, चांगुलपणा, विश्‍वास, सौम्यता, आत्मसंयम.”​गलतीकर ५:२२, २३.

याचा काय अर्थ होतो:

देवाच्या मदतीनेच आपल्याला द्वेषाचं चक्र मोडणं शक्य आहे. त्याच्या पवित्र शक्‍तीमुळे आपण स्वतःमध्ये चांगले गुण वाढवू शकतो. हे गुण आपल्याला स्वतःहून कधीच वाढवता येणार नाहीत. म्हणूनच द्वेषावर मात करण्यासाठी आपण स्वतःवर नाही, तर देव जी मदत पुरवतो त्यावर अवलंबून राहिलं पाहिजे. आपण असं केलं, तर येशूचा शिष्य पौल याच्यासारखा आपल्यालाही अनुभव येईल. तो म्हणाला: “जो मला सामर्थ्य देतो त्याच्याद्वारे सगळ्या गोष्टी करण्याची मला शक्‍ती मिळते.” (फिलिप्पैकर ४:१३) त्यामुळे मग आपल्यालाही असं म्हणता येईल: ‘यहोवाकडून मला साहाय्य मिळतं.’​—स्तोत्र १२१:२.

तुम्ही काय करू शकता:

“यहोवाने मला हिंसा सोडून द्यायला आणि शांतीप्रिय व्यक्‍ती बनायला मदत केली.”​—वॉल्डो

तुम्ही मदतीसाठी यहोवा देवाकडे मनापासून प्रार्थना करू शकता आणि त्याच्याकडे त्याची पवित्र शक्‍ती मागू शकता. (लूक ११:१३) तुम्हाला चांगले गुण वाढवता यावेत म्हणून त्याला विनंती करा. मनातून द्वेष काढून टाकण्यासाठी ज्या चांगल्या गुणांमुळे मदत होते त्या गुणांबद्दल बायबलमधून शिका. ते गुण म्हणजे प्रेम, आनंद, शांती, सहनशीलता आणि आत्मसंयम. यासोबतच ते गुण आपल्या वागण्या-बोलण्यातून दाखवण्याचा प्रयत्न करा. तसंच, जे लोक असे गुण वाढवायचा प्रयत्न करतात अशा लोकांसोबत मैत्री करा. ते तुम्हाला “प्रेम आणि चांगली कार्यं करण्यासाठी” उत्तेजन देतील.​—इब्री लोकांना १०:२४.