आपण द्वेषाचं चक्र कसं थांबवू शकतो?
देवाच्या वचनात, म्हणजे बायबलमध्ये लोकांचे विचार बदलण्याची आणि त्यांना चांगली व्यक्ती बनवण्याची ताकद आहे. (इब्री लोकांना ४:१२) बायबलमुळे अनेकांना त्यांच्या मनातून इतरांबद्दल असलेला द्वेष काढून टाकायला मदत झाली आहे. द्वेषाचं हे चक्र थांबवण्यासाठी अनेकांना ज्या बायबल शिकवणींमुळे मदत झाली, त्यातल्या चार शिकवणी आता आपण पाहू या.