द्वेषाला बळी पडलेले लोक सगळीकडे आहेत
आज जगात सगळीकडे द्वेष एखाद्या महामारीसारखा पसरलाय.
आजकाल बातम्यांमध्ये आपल्याला लोक द्वेष पसरवत असल्याचंच ऐकायला मिळतं. ते इंटरनेटचा, सोशल मिडियाचा वापर करून द्वेष पसरवतात, किंवा एखाद्या वंशाबद्दल किंवा देशातल्या लोकांबद्दल त्यांना किती तिरस्कार वाटतो ते व्यक्त करतात. तसंच, इतर समाजातल्या लोकांबद्दल असलेला गैरसमज, त्यांचा अपमान किंवा निंदा यांमुळेही किती भयानक गोष्टी घडतात याचा विचार करा. यामुळे आज आपल्याला सगळीकडे द्वेषच पाहायला मिळतो.
द्वेषाचं हे चक्र आपण कसं मोडू शकतो याबद्दल या माहितीपत्रकात सांगितलं आहे. समाजातून द्वेष कायमचा मिटवून टाकणं ही फक्त एक कल्पना नाही, तर हे खरोखर शक्य आहे. आज जगभरातल्या अनेक लोकांनी द्वेषावर मात केली आहे.