आज तुम्हाला भरवशालायक मार्गदर्शन कुठून मिळू शकतं?
आज जग खूप वेगाने बदलत आहे. त्यामुळे तुम्ही केलेली निवड बरोबर आहे की नाही याची तुम्ही खातरी कशी करू शकता? आज जे बरोबर वाटतं ते उद्या चुकीचं वाटणार नाही याची तुम्ही खातरी कशी करू शकता?
बायबल तुम्हाला असे निर्णय किंवा निवड करायला मदत करेल ज्याचा तुम्हाला कधीच पस्तावा होणार नाही. हे कसं शक्य आहे? बायबल आपल्या निर्माणकर्त्याकडून आहे. त्यामुळे त्याला माहीत आहे की आपल्याला खरा आनंद आणि सुरक्षा कशामुळे मिळू शकते.
“चांगलं काय आहे हे त्याने तुला सांगितलं आहे.”—मीखा ६:८.
बायबलमध्ये दिलेल्या व्यावहारिक बुद्धीवर आपण अवलंबून राहू शकतो. कारण त्यातली माहिती “आज आणि सर्वकाळासाठी भरवशालायक” आहे.—स्तोत्र १११:८.
सतत बदल होत असणाऱ्या जगात बायबल आपल्याला कशी मदत करू शकतं हे जाणून घेऊ या का?