व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

नवीन जगात राहण्यासाठी तुम्ही काय करू शकता?

नवीन जगात राहण्यासाठी तुम्ही काय करू शकता?

आधीच्या काही लेखांमध्ये आपण पाहिलं, की लवकरच देव दुष्ट लोकांचा आणि या जगातल्या समस्यांचा अंत करणार आहे. या गोष्टी नक्की घडतील असं आपण म्हणू शकतो. कारण देवाने बायबलमध्ये असं वचन दिलं आहे:

‘जग नाहीसं होण्याच्या मार्गावर आहे.’—१ योहान २:१७.

पण या जगाचा अंत होईल तेव्हा काही लोक वाचतीलसुद्धा. कारण याच वचनात पुढे असंही म्हटलं आहे:

“जो देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो तो सर्वकाळ टिकून राहतो.”

म्हणून, जर आपल्याला जगाच्या अंतातून वाचायचं असेल, तर आपण देवाच्या इच्छेप्रमाणे वागलं पाहिजे. पण देवाची इच्छा काय आहे? ती माहीत करून घेण्यासाठी आपण आधी त्याला ओळखलं पाहिजे.

अंतातून वाचण्यासाठी देवाला ओळखा

येशूने म्हटलं: ‘सर्वकाळाचं जीवन मिळवण्यासाठी त्यांनी एकाच खऱ्‍या देवाला ओळखणं गरजेचं आहे.’ (योहान १७:३) तर मग, येणाऱ्‍या अंतातून वाचण्यासाठी आणि कायम या पृथ्वीवर राहण्यासाठी आपण देवाला ओळखलं पाहिजे. आज बरेच लोक मानतात, की देव आहे आणि त्याच्याबद्दल त्यांना थोडीफार माहितीही आहे. पण देवाला ओळखण्यासाठी इतकंच पुरेसं नाही. त्यासाठी आपण त्याच्याशी मैत्री केली पाहिजे. एखाद्यासोबत आपली मैत्री वाढवण्यासाठी आपल्याला त्याच्यासोबत वेळ घालवावा लागतो. त्याचप्रमाणे देवासोबत आपली मैत्री घट्ट करण्यासाठी आपल्यालाही वेळ देणं गरजेचं आहे. म्हणून देवाला चांगल्या प्रकारे ओळखण्यासाठी आता आपण बायबलमधून काही महत्त्वाच्या गोष्टी पाहू.

बायबलचं रोज वाचन करा

मदतीसाठी आपण देवाला प्रार्थना केली आणि त्याच्या इच्छेप्रमाणे वागलो तर आपण या जगाच्या अंतापासून वाचू शकतो

जगण्यासाठी आपल्याला रोज जेवावं लागतं. पण येशूने म्हटलं: “माणसाने फक्‍त भाकरीनेच नाही, तर यहोवाच्या तोंडातून निघणाऱ्‍या प्रत्येक वचनाने जगलं पाहिजे.”—मत्तय ४:४.

यहोवा देवाची वचनं, म्हणजेच त्याचे शब्द आज आपल्याला बायबलमध्ये वाचायला मिळतात. त्यामुळे बायबलचा अभ्यास केल्यामुळे तुम्हाला अनेक महत्त्वाच्या गोष्टी समजतील. जसं की, देवाने मानवांसाठी आधी काय केलं, आता तो काय करत आहे आणि भविष्यात तो काय करणार आहे.

देवाकडे मदत मागा

देवाच्या आज्ञांचं पालन करायची तुमची मनापासून इच्छा असेल. पण त्याला आवडत नाही अशी एखादी गोष्ट सोडायला तुम्हाला कठीण जात असेल तर काय? तर देवाला चांगल्या प्रकारे जाणून घ्यायचा प्रयत्न करा. त्यामुळे ती सोडून द्यायला तुम्हाला नक्कीच खूप मदत होईल.

समीरासोबत काय झालं त्याकडे लक्ष द्या. ती एक अनैतिक जीवन जगत होती. पण ती बायबलचा अभ्यास करू लागली तेव्हा तिला समजलं, की आपण “अनैतिक लैंगिक कृत्यांपासून” दूर राहिलं पाहिजे अशी देवाची आज्ञा आहे. (१ करिंथकर ६:१८) म्हणून तिने देवाला प्रार्थना केली, की तिला असं जीवन सोडायचं आहे आणि देवाच्या मदतीमुळे ती ते सोडूही शकली. पण आजसुद्धा तिला त्या इच्छांशी लढावं लागतं. ती म्हणते: “माझ्या मनात चुकीचे विचार येतात तेव्हा मी यहोवाला प्रार्थना करते आणि मला नेमकं कसं वाटतंय हे त्याला सांगते. कारण मला माहितीए, की त्याच्या मदतीशिवाय मी या चुकीच्या इच्छांशी लढू शकत नाही. प्रार्थना केल्यामुळे मी यहोवा देवाला आणखी चांगल्या प्रकारे ओळखू शकले.” समीरासारखे लाखो लोक आज देवाला ओळखण्याचा प्रयत्न करत आहेत. तसंच, तोसुद्धा त्यांना आपल्या जीवनात बदल करायला आणि त्याच्या इच्छेप्रमाणे वागायला मदत करतो.—फिलिप्पैकर ४:१३.

जितकं जास्त तुम्ही देवाला ओळखाल, तितकं जास्त तोही तुम्हाला ओळखेल. आणि तुमच्यातली मैत्री घट्ट होईल. (गलतीकर ४:९; स्तोत्र २५:१४) यामुळे तुम्हाला नवीन जगात राहायला मिळेल. पण ते नवीन जग नेमकं कसं असेल? याबद्दल आपण पुढच्या लेखात पाहू या.

a बायबलमध्ये देवाचं नाव यहोवा असं दिलं आहे.