मुख्य विषय | तुम्हाला सांत्वन कुठून मिळू शकतं?
देव आपलं सांत्वन कसं करतो?
बायबलचा एक लेखक पौल याने यहोवाविषयी * असं म्हटलं की तो “सर्व सांत्वनदाता देव . . . आमच्यावरील सर्व संकटांत आमचे सांत्वन करतो.” (२ करिंथकर १:३, ४) त्यामुळे देवाकडून सर्वांनाच मदत मिळू शकते अशी खातरी आपल्याला बायबलमधून मिळते. आपला स्वर्गीय पिता यहोवा, जीवनातील कोणत्याही कठीण प्रसंगात आपलं सांत्वन करू शकतो.
पण हेही तितकंच खरं आहे की, देवाकडून सांत्वन मिळण्यासाठी आपल्यालाही काही पावलं उचलावी लागतील. समजा, आपण जर आजारी पडलो आणि डॉक्टरांना जाऊन भेटलोच नाही तर ते आपली मदत करू शकतील का? त्याचप्रमाणे शास्त्रवचनात म्हटलं आहे की तुम्ही “देवाजवळ या म्हणजे तो तुम्हांजवळ येईल.”—याकोब ४:८.
देव आपल्या जवळ येईल हे आपण खातरीने का म्हणू शकतो? कारण तो आपल्याला मदत करू इच्छितो असं त्याने अनेकदा सांगितलं आहे. ( सोबतची चौकट पाहा.) तसंच आपल्याकडे आजच्या आणि बायबल काळातील अशा लोकांची भरवशालायक उदाहरणं आहेत, ज्यांना देवाकडून सांत्वन मिळालं आहे.
आजच्या काळातील अनेक लोकांप्रमाणे राजा दाविदालाही अनेक दुःखद प्रसंगांना सामोरं जावं लागलं. “मी तुला साद घालीन त्यावेळी माझे ऐक.” असं म्हणत त्याने यहोवाला मदतीसाठी हाक मारली. देवाने त्याची विनवणी ऐकली का? हो. कारण पुढे दावीद असं म्हणतो, “त्याने मला मदत केली. मी खूप आनंदी आहे.”—स्तोत्र २८:२, ७, ईझी-टू-रीड व्हर्शन.
शोक करणाऱ्यांचं सांत्वन करण्यात येशूची भूमिका
सांत्वन देण्यात येशूची महत्त्वाची भूमिका असावी अशी देवाची इच्छा होती. देवाने त्याला इतर कार्यांसोबत सांत्वन करण्याचंही काम सोपवलं होतं. येशूला “भग्न हृदयी जनास पट्टी” बांधायची होती आणि “सर्व शोकग्रस्तांचे सांत्वन” करायचं होतं. (यशया ६१:१, २) भविष्यवाणीत म्हटल्याप्रमाणे, येशूने “थकलेले आणि ओझ्याने लादलेले” अशा लोकांवर खास लक्ष दिलं.—मत्तय ११:२८-३०, ईझी-टू-रीड व्हर्शन.
येशूने योग्य सल्ला देऊन, दया दाखवून इतकंच नव्हे तर काही वेळा लोकांचे आजार बरे करून त्यांचं सांत्वन केलं. एकदा कुष्ठरोग झालेल्या एका व्यक्तीने येशूकडे अशी विनंती केली: “आपली इच्छा असली तर मला शुद्ध करावयास आपण समर्थ आहा.” येशूला त्याची दया आली. त्याने म्हटलं, “माझी इच्छा आहे, शुद्ध हो.” (मार्क १:४०, ४१) आणि त्याचा रोग लगेच बरा झाला.
२ करिंथकर १:३) देव कोणत्या चार मुख्य मार्गांनी लोकांचं सांत्वन करतो ते पाहू या.
आपलं व्यक्तिगत रीतीने सांत्वन करायला आज देवाचा पुत्र या पृथ्वीवर नाही. असं असलं तरी त्याचा पिता यहोवा हा “सर्व सांत्वनदाता देव,” दुःखी लोकांचं आजही सांत्वन करतो. (-
बायबल. “धीराच्या व शास्त्रापासून मिळणाऱ्या उत्तेजनाच्या योगे आपण आशा धरावी म्हणून जे काही शास्त्रात पूर्वी लिहिले ते सर्व आपल्या शिक्षणाकरता लिहिले.”—रोमकर १५:४.
-
देवाचा पवित्र आत्मा. येशूच्या मृत्यूनंतर संपूर्ण ख्रिस्ती मंडळीला सांत्वनाची गरज होती. बायबलमध्ये म्हटलं आहे की देवाने आपल्या पवित्र आत्म्याद्वारे त्यांना सांत्वन दिलं. (प्रेषितांची कृत्ये ९:३१) पवित्र आत्मा म्हणजे देवाची सक्रिय शक्ती. तिच्यात खूप ताकद आहे. एका व्यक्तीची परिस्थिती कितीही वाईट असली तरी देव तिला सांत्वन देण्यासाठी पवित्र आत्म्याचा वापर करू शकतो.
-
प्रार्थना. “कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका,” असा सल्ला बायबलमध्ये दिला आहे. तसंच, “आपली मागणी देवाला कळवा; म्हणजे सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार” सुरक्षित ठेवेल असंही बायबलमध्ये म्हटलं आहे.—फिलिप्पैकर ४:६, ७.
-
ख्रिस्ती बांधव. अगदी खऱ्या मित्रांप्रमाणेच, ते आपल्याला दुःखाच्या प्रसंगात सांत्वन देऊ शकतात. पौलाने आपल्या सोबत्यांविषयी असं म्हटलं की, “अडचणीत व संकटात” त्यांच्यामुळे त्याला “सांत्वन” मिळालं.—१ थेस्सलनीकाकर ३:७; कलस्सैकर ४:११.
पण तुम्ही विचार कराल, जीवनात खरंच या गोष्टींमुळे फायदा होतो का? आधीच्या लेखात उल्लेख केलेल्या लोकांनी आपल्या जीवनात समस्यांचा सामना कसा केला, याचं आपण जवळून परीक्षण करू या. असं केल्याने तुम्हालाही जाणवेल की, “जशी एखाद्याची आई त्याचे सांत्वन करते तसे मी तुमचे सांत्वन करीन,” हे देवाने दिलेलं अभिवचन तो आजही पूर्ण करतो.—यशया ६६:१३. (wp16-E No. 5)
^ परि. 3 यहोवा हे देवाचं नाव आहे, असं बायबलमध्ये सांगितलं आहे.