सावध राहा! क्र. १ २०२१ | आनंदी जीवनासाठी मोलाचा सल्ला
जीवन आनंदी आणि समाधानी असावं असं आपल्या सगळ्यांनाच वाटतं. तर मग, आनंदाने जीवन जगण्यासाठी आपल्याला मोलाचा सल्ला कुठे सापडेल ते या मासिकात सांगितलं आहे.
आनंदी जीवनासाठी मोलाचा सल्ला
सर्वशक्तिशाली देव आपल्याला आत्ता आणि भविष्यातही आनंदी जीवन जगण्यासाठी मोलाचा सल्ला देतो.
आनंदी कुटुंबासाठी देवाकडून सल्ला
कुटुंबातला आनंद टिकवून ठेवण्यासाठी पती, पत्नी, आईवडील आणि मुलं काय करू शकतात?
इतरांसोबतचं आपलं नातं कसं जपायचं
इतरांसोबतची नाती जपायला कोणते गुण आपल्याला मदत करू शकतात?
समाधानी जीवन कसं जगायचं?
आनंदी आणि समाधानी जीवन जगण्यासाठी कोणत्या गोष्टींची गरज आहे?
आपल्यावर दुःख का येतं? आपण का म्हातारे होतो आणि मरतो?
म्हातारपण आणि मृत्यूची चार मुख्य कारणं कोणती आहेत ते समजून घ्या.
देवाने दिलेलं सुंदर जीवनाचं वचन
भविष्याबद्दल आशा देणारे कोणते सुंदर बदल देव या पृथ्वीवर घडवून आणणार आहे, त्याबद्दल जाणून घ्या.
देवाशी जवळची मैत्री करण्यासाठी त्याला ओळखा
बायबलमध्ये देवाबद्दल अशा कोणत्या गाष्टी सांगितल्या आहेत, ज्यांमुळे तुम्हाला त्याच्याबद्दल आणखी जाणून घ्यावसं आणि त्याच्याशी मैत्री करावीशी वाटेल?
देवाने दिलेल्या सल्ल्यांचा तुम्हालाही फायदा होऊ शकतो
देवाने दिलेल्या सल्ल्यांचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. तुम्ही त्यांचा फायदा घ्यावा असं देवाला वाटतं. मग तुम्ही त्या सल्ल्यांचा फायदा घ्याल का?
तुम्हाला आणखी माहिती हवी का?
असेल तर असे अनेक व्हिडिओ, कार्टून व्हिडिओ, मुलाखती, अनुभव आणि लेख आहेत ज्यांमुळे तुम्हाला जीवनात योग्य निर्णय घ्यायला आणि आनंदी राहायला मदत होईल.