व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सावध राहा! क्र. १ २०२४ | आज लोक आदर का करत नाहीत?

आज लोक सहसा इतरांचा आदर करत नाहीत. त्यामुळे एखादी व्यक्‍ती जेव्हा दुसऱ्‍याला आदर दाखवते, तेव्हा लोकांना आश्‍चर्य वाटतं.

उदाहरणार्थ, आज बरेच लोक एकमेकांचा, त्यांच्या आईवडिलांचा आणि वृद्धांचा आदर करत नाहीत. तसंच, ते पोलिसांचा, कामावरच्या अधिकाऱ्‍यांचा आणि शिक्षकांचाही आदर करत नाहीत. सोशल मिडियावरही लोक इतरांबद्दल वाईट-साईट लिहितात किंवा कमेंट करतात. एका मासिकात सांगितलंय, की “आज लोकांच्या मनात इतरांबद्दल अनादर वाढत चाललाय.” त्यात असंही म्हटलंय, की “काही काळापासून लोक या वाढत्या अनादराबद्दल बोलू लागलेत.”

 

आज लोक इतरांचा आदर का करत नाहीत?

इतरांचा आदर करणं महत्त्वाचं का आहे? तुम्ही इतरांना आदर कसा दाखवू शकता?

आज लोक जीवनाचा आदर का करत नाहीत?

आपण आपल्या आणि इतरांच्या जीवनाचा आदर कसा करू शकतो याबद्दल बायबलचा सल्ला लक्षात घ्या.

आज लोक कुटुंबामध्ये एकमेकांचा आदर का करत नाहीत?

कुटुंबामध्ये सगळे लोक एकमेकांचा आदर करतात, तेव्हा सगळे आनंदी राहू शकतात.

आज लोक स्वतःचा आदर का करत नाहीत?

बायबलमुळे लोकांना स्वतःचा आदर करायला आणि त्यांचं जीवन सुधारायला मदत होऊ शकते. यामुळे त्यांचा आत्मसन्मान वाढू शकतो.

आज लोक आदर का करत नाहीत?

इतरांचा आदर करण्याबदद्‌लचे लेख वाचा आणि यहोवाचे साक्षीदार जगभरातल्या लोकांना या बाबतीत कशी मदत करत आहेत ते पाहा.