आज लोक इतरांचा आदर का करत नाहीत?
इतरांचा आदर करणं महत्त्वाचं का आहे?
इतरांचा आदर केल्यामुळे एकमेकांमधला ताण कमी होतो आणि वाईट परिस्थिती सुधारते.
-
बायबलमध्ये एक अशी म्हण आहे: “सौम्यपणे दिलेल्या उत्तरामुळे राग शांत होतो, पण कठोर शब्दामुळे क्रोध भडकतो.” (नीतिवचनं १५:१) वागण्या-बोलण्यात आदर नसला तर ते जणू आगीत तेल ओतल्यासारखं आहे आणि त्याचे खूप वाईट परिणाम होतात.
-
येशूने म्हटलं: “कारण अंतःकरणात जे भरलेलं असतं तेच तोंडातून बाहेर पडतं.” (मत्तय १२:३४) आज लोक बोलण्यातून इतरांचा अनादर करतात. यामागचं एक मोठं कारण म्हणजे, दुसऱ्या वंशाच्या, राष्ट्रांच्या आणि वेगळी सामाजिक परिस्थिती असलेल्या लोकांबद्दल त्यांच्या मनात असलेला भेदभाव.
अलिकडेच, २८ देशांमधल्या ३२,००० पेक्षा जास्त लोकांचा सर्व्हे घेण्यात आला. त्यातल्या ६५ टक्के लोकांनी असं म्हटलं, आज कधी नव्हे इतका लोकांमध्ये अनादर वाढलाय.
आपण इतरांना आदर कसा दाखवू शकतो?
तुम्ही शाळेत असाल किंवा कामावर सगळ्यांचा आदर करा, जरी तुम्हाला त्यांची मतं पटत नसली तरीही. अशा गोष्टींचा विचार करा ज्यावर तुमचं एकमत असेल. असं केल्यामुळे तुम्ही एकमेकांची टीका करणार नाही आणि त्यांच्याबद्दल चुकीची मतं बनवणार नाही.
इतरांनी तुमच्याशी जसं वागावं अशी तुमची इच्छा आहे तसंच तुम्हीही त्यांच्याशी वागा. जर तुम्ही इतरांशी दयाळूपणे आणि भेदभाव न करता वागलात, तर तेही तुमच्याशी तसंच वागतील.
क्षमा करा. इतरांच्या हेतूंवर शंका घेऊ नका. ते काही चुकीचं बोलले किंवा वागले तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करा.
इतरांना आदर दाखवण्याच्या बाबतीत यहोवाचे साक्षीदार काय करत आहेत
यहोवाचे साक्षीदार ज्या लोकांमध्ये राहतात आणि काम करतात तिथे ते इतरांचा आदर करतात.
मोफत बायबल अभ्यास. आम्ही सगळ्या लोकांसोबत मोफत बायबल अभ्यास करतो. असं असलं, तरीही आम्ही आमची मतं किंवा विश्वास इतरांवर लादत नाही. याउलट, आम्ही बायबलचा सल्ला लागू करून इतरांना आमचा संदेश “सौम्यतेने आणि आदराने सांगतो.”—१ पेत्र ३:१५; २ तीमथ्य २:२४.
आम्ही भेदभाव करत नाही. आम्ही अशा सगळ्या संस्कृतींतल्या लोकांचं आमच्या सभांमध्ये स्वागत करतो, ज्यांना बायबलबद्दल शिकायची इच्छा आहे. आम्ही सगळ्यांशी सहनशीलतेने आणि “आदराने” वागतो. —१ पेत्र २:१७.
आम्ही सरकारच्या अधिकाराचा आदर करतो. आम्ही ज्या देशांमध्ये राहतो तिथल्या सरकारचा आदर करतो, कायद्यांचं पालन करतो आणि वेळेवर कर भरतो. (रोमकर १३:१) आम्ही राजकारणात भाग घेत नसलो, तरीही राजकीय मुद्द्यांबद्दल निर्णय घेण्याच्या इतरांच्या अधिकाराचा आदर करतो.