व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आज लोक कुटुंबामध्ये एकमेकांचा आदर का करत नाहीत?

आज लोक कुटुंबामध्ये एकमेकांचा आदर का करत नाहीत?

कुटुंबात एकमेकांचा आदर करणं का महत्त्वाचं आहे?

कुटुंबात एकमेकांचा आदर केल्यामुळे एक चांगलं वातावरण निर्माण होतं. त्यामुळे पती, पत्नी तसंच मुलांना सुरक्षित वाटतं.

  • द सेव्हन प्रिंसिपल्स फॉर मेकिंग मॅरेज वर्क” या पुस्तकात असं म्हटलंय, की पती-पत्नी जेव्हा एकमेकांचा आदर करतात, तेव्हा “ते दिवसभरात फक्‍त मोठमोठ्या मार्गांनीच नाही, तर छोट्या-छोट्या मार्गांनीसुद्धा एकमेकांबद्दल प्रेम व्यक्‍त करतात.”

  • एका संशोधनात असं दिसून आलंय, की जी मुलं इतरांचा आदर करायला शिकतात त्यांच्यात जास्त आत्मसन्मान असतो. त्यांचं त्यांच्या आईवडिलांसोबत चांगलं नातं असतं. आणि त्यांना फार कमी मानसिक आणि भावनिक समस्यांना तोंड द्यावं लागतं.

कुटुंबात तुम्ही इतरांचा आदर कसा करू शकता?

तुमच्या कुटुंबासोबत मिळून एक प्लॅन बनवा. यासाठी पुढे दिलेल्या तीन गोष्टी करा. पहिली गोष्ट म्हणजे आदर कसा दाखवायचा यावर घरच्या लोकांसोबत चर्चा करा. दुसरी गोष्ट म्हणजे कुटुंबात कोणत्या प्रकारचं वागणं चालेल आणि कोणत्या प्रकारचं चालणार नाही हे लिहूने ठेवा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे कुटुंब मिळून त्या प्लॅनवर चर्चा करा. म्हणजे, आदर दाखवण्याच्या बाबतीत प्रत्येकांने काय केलं पाहिजे हे सगळ्यांना माहीत असेल.

“मेहनत करणाऱ्‍यांच्या योजना नक्कीच यशस्वी होतात.”—नीतिवचनं २१:५.

चांगलं उदाहरण मांडा. तुम्ही तुमच्या कुटुंबातल्या सदस्यांच्या चुका काढून त्यांची टिका करता का? त्यांच्या मतांची थट्टा करता का? ते जेव्हा तुमच्याशी बोलत असतात तेव्हा तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करता किंवा त्यांचं बोलणं मध्येच तोडता का?

टीप: तुम्ही तुमच्या पतीला/पत्नीला आणि मुलांना आदर दिलाच पाहिजे असा दृष्टिकोन ठेवा. त्यांनी तो आदर मिळवला पाहिजे असा दृष्टिकोन ठेवू नका.

“एकमेकांचा आदर करण्यात पुढाकार घ्या.”—रोमकर १२:१०.

समोरच्याचं मत पटत नाही तेव्हासुद्धा आदराने वागा. इतरांशी बोलताना “तुम्ही नेहमी असंच करता” किंवा “तुम्ही कधीच असं करत नाही” अशा प्रकारचे शब्द वापरायचं टाळा. त्यामुळे त्यांना वाईट वाटू शकतं किंवा रागही येऊ शकतो. आणि छोटासा वाद मोठ्या भांडणात बदलू शकतो.

“सौम्यपणे दिलेल्या उत्तरामुळे राग शांत होतो, पण कठोर शब्दामुळे क्रोध भडकतो.”—नीतिवचनं १५:१.

कुटुंबात आदर दाखवण्यासाठी यहोवाचे साक्षीदार लोकांना कशी मदत करत आहेत?

यहोवाचे साक्षीदार कुटुंबातल्या सदस्यांना एकमेकांशी आदराने वागायचं प्रोत्साहन देतात. या विषयाबद्दलची माहिती ते त्यांच्या लेखांमधून, पुस्तकांमधून, माहितीपत्रकांमधून आणि व्हिडिओंमधून प्रकाशित करतात. ही प्रकाशनं ते मोफत देतात.

जोडप्यांसाठी: कुटुंबासाठी मदत या लेखमालिकेमुळे पती-पत्नींना . . .

  • एकमेकांचं चांगल्या प्रकारे ऐकायला मदत होईल

  • अबोला टाळायला मदत होईल

  • वाद टाळायला मदत होईल

(jw.org वर “कुटुंबासाठी मदत” ही लेखमालिका शोधा)

आईवडिलांसाठी: कुटुंबासाठी मदत या लेखमालिकेमुळे आईवडिलांना त्यांच्या मुलांना पुढे दिलेल्या गोष्टींमध्ये प्रशिक्षण देण्यासाठी मदत मिळू शकते:

  • आज्ञाधारक बनण्यासाठी

  • घरातल्या कामात मदत करण्यासाठी

  • “प्लिज” आणि “थँक्यू” म्हणायला शिकवण्यासाठी

(jw.org वर “मुलांचं संगोपन” आणि “तरुणांना समजून घेणं” या लेखमालिका शोधा)

२०१९ च्या सावध राहा! क्र. २ मुलांना घडवणाऱ्‍या सहा गोष्टी यामधले आणि २०१८ च्या सावध राहा! क्र. २ आनंदी कुटुंबाचं गुपित काय? यातल्या पान क्र. ८-११ वरचे लेख पाहा. (हे लेख तुम्ही jw.org वर शोधू शकता.)

तरुणांसाठी: jw.org वरच्या तरुणांसाठी या भागातल्या लेखांमुळे, व्हिडिओंमुळे आणि वर्कशीट्‌समुळे तरुणांना . . .

  • आईवडिलांशी आणि भावंडांशी जुळवून घेता येईल

  • आईवडिलांनी घालून दिलेल्या नियमांबद्दल आदराने त्यांच्याशी बोलता येईल

  • आईवडिलांचा विश्‍वास मिळवता येईल

(jw.org वर “तरुणांसाठी” शोधा)

jw.org या वेबसाईटचा वापर तुम्ही विनामूल्य करू शकता. यासाठी कोणतीही फी नाही, कोणतंही सबस्क्रिप्शन नाही किंवा मेंबरशीपही नाही. तुमच्याकडून कोणतीही वैयक्‍तिक माहिती मागितली जाणार नाही.