व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आज लोक जीवनाचा आदर का करत नाहीत?

आज लोक जीवनाचा आदर का करत नाहीत?

जीवनाचा आदर करणं का महत्त्वाचं आहे?

जेव्हा तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी वाईट असतील आणि इतरांचं जीवन धोक्यात येईल अशा गोष्टी करता, तेव्हा त्यावरून हे दिसतं की तुम्हाला स्वत:च्या आणि इतरांच्या जीवनाची कदर नाही.

  • सिगारेट ओढल्यामुळे कॅन्सर तर होतोच, पण त्यामुळे कॅन्सरशी लढण्याची तुमची क्षमताही कमी होते. लंग-कॅन्सरमुळे (फुफ्फुसांचा कॅन्सर) होणाऱ्‍या बहुतेक मृत्यूंचं कारण म्हणजे, एकतर त्या व्यक्‍ती सिगारेट ओढायच्या किंवा त्यांच्या आसपास कोणीतरी सिगारेट ओढायचं.

  • जनसत्ता या हिंदी वर्तमानपत्राप्रमाणे, आज शाळेतल्या मुलांमध्ये हिंसेचं प्रमाण वाढत आहे. आणि याचा घातक परिणाम शाळांवर आणि समाजावर होतोय. काही देशांमध्ये, लोकांच्या जमावावर होणाऱ्‍या गोळीबारांच्या घटना सर्रास घडतात. एका संशोधनातून असं दिसून आलं, की जे लोक अशा हल्ल्यांमधून वाचतात, त्यांना ज्या भावनिक आणि मानसिक समस्या होतात, त्यांचा सामना त्यांना पुढे अनेक वर्षं करावा लागतो.

  • लोक जेव्हा दारू पिऊन आणि ड्रग्स घेऊन गाडी चालवतात, तेव्हा ते रस्त्यावरच्या आणि फूटपाथवरच्या लोकांचा जीवही धोक्यात टाकतात. लोक जीवनाची पर्वा करत नाहीत, तेव्हा निर्दोष लोकांना दुखापत होऊ शकते.

तुम्ही जीवनाचा आदर कसा करू शकता?

आरोग्याची काळजी घ्या. सिगारेट किंवा ई-सिगारेट ओढणं, जास्त प्रमाणात दारू पिणं किंवा मजेसाठी ड्रग्स घेणं, अशा सवयी सोडायला आता खूप उशीर झालाय असा विचार करू नका. अशा सवयींमुळे तुमच्या जिवाला धोका होऊ शकतो. इतकचं नाही, तर असं केल्यामुळे तुम्हाला तुमच्या आसपासच्या आणि तुमच्या घरच्या लोकांच्या जीवनाबद्दल आदर नाही हे दिसून येऊ शकतं.

“आपण शरीराला आणि मनाला दूषित करणाऱ्‍या सगळ्या गोष्टींपासून स्वतःला शुद्ध करू या.”—२ करिंथकर ७:१.

स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षिततेचा विचार करा. अपघात होऊ नये म्हणून आपल्या घराची डागडुजी करा आणि घर चांगल्या स्थितीत ठेवा. आपली गाडी सुरक्षितपणे चालवा. तसंच गाडीला चांगल्या स्थितीत ठेवा. इतरांना गंभीर दुखापत होईल किंवा त्यांचा मृत्यू होईल अशी एखादी धोकादायक गोष्ट तुम्हाला कोणी करायला सांगत असेल, तर त्यांच्या दबावाला बळी पडू नका.

“तुम्ही नवीन घर बांधाल तेव्हा छताला कठडाही बनवा, नाहीतर कोणी छतावरून पडलं तर त्याचा रक्‌तदोष तुमच्या घरावर येईल.”—अनुवाद २२:८. a

इतरांशी दयाळूपणे वागा. जीवनाचा आदर करणं म्हणजे आपण सगळ्या प्रकारच्या लोकांशी दयाळूपणे वागणं; मग ते कुठल्याही देशाचे किंवा वंशाचे असो, गरीब किंवा श्रीमंत असो, शिकलेले किंवा न शिकलेले असो. कारण खरंतर, द्वेष आणि भेदभाव ही जगात होणाऱ्‍या हिंसेमागची आणि युद्धांमागची मुख्य कारणं आहेत.

“सर्व प्रकारचा द्वेष, राग, क्रोध, आरडाओरडा, शिवीगाळ, तसंच सगळा दुष्टपणा आपल्यामधून काढून टाका. त्याऐवजी एकमेकांशी प्रेमाने वागा आणि कोमलतेने सहानुभूती दाखवा.”—इफिसकर ४:३१, ३२.

जीवनाचा आदर करण्यासाठी यहोवाचे साक्षीदार काय करत आहेत?

निरोगी आणि चांगलं जीवन कसं जगायचं, हे यहोवाचे साक्षीदार इतरांना शिकवतात. आम्ही जो बायबल शिक्षणाचा कार्यक्रम चालवतो, त्यामुळे बऱ्‍याच लोकांना व्यसनं सोडायला आणि वाईट सवयींवर मात करायला मदत झाली आहे.

आमच्या बांधकाम प्रकल्पांवर आम्ही सुरक्षेचे नियम काटेकोरपणे पाळतो. बायबलच्या शैक्षणिक कामासाठी आमच्या इथे सभागृहं आणि इतर इमारती बांधल्या जातात. या बांधकाम प्रकल्पांवर काम करणाऱ्‍या स्वयंसेवकांना अपघात टाळण्यासाठी प्रशिक्षण दिलं जातं. आमच्या इमारतींचं वेळोवेळी परीक्षण केलं जातं. आणि स्थानिक सुरक्षा नियमांप्रमाणे त्या योग्य आहेत की नाही याची पाहणी केली जाते.

विपत्तीग्रस्त लोकांना आम्ही मदत पुरवतो. गेल्या वर्षी जगभरात आलेल्या जवळपास २०० विपत्तींमध्ये आम्ही लोकांना मदत पुरवली. यासाठी आम्ही १०० करोडपेक्षा जास्त रूपये खर्च केले.

जेव्हा इबोला या रोगाच्या साथीचा उद्रेक झाला तेव्हा पश्‍चिम आफ्रिकेतले (२०१४) आणि काँगो प्रजासत्ताक मधले (२०१८) बरेच लोक मरू लागले. त्यावेळी या भयानक रोगाचा प्रसार कसा थांबवायचा याबद्दल आम्ही लोकांना प्रशिक्षण दिलं. “आज्ञाधारक राहिल्यामुळे जीव वाचतो” या विषयावर बोलण्यासाठी आम्ही आमच्या लोकांना तिथे पाठवलं. आमच्या प्रत्येक सभागृहाबाहेर आम्ही हात धुण्याची व्यवस्था केली. तसंच हात धुतल्यामुळे आणि इतर काही व्यावहारिक गोष्टी केल्यामुळे ते या रोगाचा प्रसार कसा थांबवू शकतात हेही त्यांना सांगितलं.

सिएरा लिऑनमध्ये रेडिओवरच्या एका घोषणेत यहोवाच्या साक्षीदारांची प्रशंसा करण्यात आली. कारण त्यांनी साक्षीदारांना आणि इतरांना इबोलापासून वाचायला मदत केली.

२०१४ मध्ये लायबेरियात इबोलाचा उद्रेक झाला तेव्हा यहोवाच्या साक्षीदारांच्या सभागृहाबाहेर हात धुण्याची सोय करण्यात आली

a जुन्या काळात, मध्यपूर्वेत हा नियम बनवण्यात आला होता. या सुज्ञ नियमामुळे कुटुंबातल्या आणि इतर लोकांच्या सुरक्षेची काळजी दिसून यायची.