व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आज लोक स्वतःचा आदर का करत नाहीत?

आज लोक स्वतःचा आदर का करत नाहीत?

स्वतःचा आदर करणं किंवा आत्मसन्मान असणं महत्त्वाचं का आहे?

ज्या लोकांमध्ये आत्मसन्मान असतो, ते जीवनातल्या समस्यांचा आत्मविश्‍वासाने सामना करू शकतात. ते सहजासहजी हार मानत नाहीत.

  • संशोधनातून असं दिसून आलंय की ज्यांच्यात आत्मसन्मान कमी असतो, सहसा त्यांना चिंतेचा आणि नैराश्‍याचा सामना करावा लागतो. त्यांच्या खाण्या-पिण्याच्या सवयींवर परिणाम होऊ शकतो. तसंच, बरेच जण जास्त प्रमाणात दारू पिऊ लागतात आणि ड्रग्स घेऊ लागतात.

  • जे लोक स्वतःचा आदर करतात, ते स्वतःची तुलना इतरांशी करत नाहीत. त्यामुळे त्यांना लोकांशी सहज जुळवून घेता येतं आणि चांगली मैत्री करता येते. दुसरीकडे, जे स्वतःचा आदर करत नाहीत किंवा ज्यांच्यात कमी आत्मसन्मान असतो ते दुसऱ्‍यांची टीका करायला लागू शकतात. आणि यामुळे त्यांची इतरांसोबतची नाती बिघडू शकतात.

  • ज्या लोकांमध्ये आत्मसन्मान असतो, त्यांच्यासमोर समस्या आल्या तरी ते खंबीर उभे राहतात. त्यांच्यापुढे अडथळे आले तरी ते आपली ध्येयं गाठायचा प्रयत्न करतात. याउलट, ज्यांच्यात कमी आत्मसन्मान असतो, त्यांच्यासमोर छोट्या-छोट्या समस्या आल्या, तरी त्यांना त्या फार मोठ्या वाटू शकतात. आणि त्यामुळे ते लगेच हार मानू शकतात.

तुम्ही स्वतःचा आदर कसा करू शकता?

प्रोत्साहन देणारे मित्र निवडा. अशा लोकांसोबत मैत्री करा जे आदराने वागतात-बोलतात, ज्यांना तुमच्या भल्याची चिंता आहे आणि जे तुम्हाला प्रोत्साहन देतात.

“खरा मित्र नेहमी प्रेम करतो; दुःखाच्या प्रसंगी तो भावासारखा होतो.”—नीतिवचनं १७:१७.

इतरांची मदत करा. जेव्हा तुम्ही दयाळूपणे वागता आणि जे लोक तुम्हाला काहीच परत देऊ शकत नाहीत त्यांचीसुद्धा मदत करता, तेव्हा तुम्हाला खरा आनंद मिळतो. असा आनंद फक्‍त देण्यातूनच मिळू शकतो. इतरांनी तुमच्या कामाकडे लक्ष दिलं नाही, तरीही तुम्हाला आनंद मिळू शकतो.

“घेण्यापेक्षा देण्यात जास्त आनंद आहे.”—प्रेषितांची कार्यं २०:३५.

तुमच्या मुलांना स्वतःचा आदर करायला शिकवा. याचा एक मार्ग म्हणजे, त्यांना शक्य असेल तेव्हा त्यांच्या समस्या त्यांना स्वतःला सोडवू द्या. असं केल्यामुळे त्यांना त्यांच्या समस्यांना तोंड देता येईल आणि त्या कशा सोडवायच्या हेही शिकायला मिळेल. हे शिकल्यामुळे, त्यांच्यात आत्मसन्मान वाढेल आणि ते मोठे झाल्यावरही तो टिकून राहील.

“मुलाला योग्य मार्गाने शिक्षण दे, म्हणजे म्हातारपणीही तो त्यापासून वळणार नाही.”—नीतिवचनं २२:६.

इतरांमध्ये आत्मसन्मान वाढावा म्हणून यहोवाचे साक्षीदार काय करत आहेत?

यहोवाचे साक्षीदार चालवत असलेल्या सभांमुळे आणि बायबल शिक्षणाच्या कार्यक्रमामुळे लोकांचं जीवन सुधारतं. आणि त्यामुळे लोकांचा आत्मसन्मानसुद्धा वाढतो.

आमच्या आठवड्याच्या सभा

आमच्या आठवड्याच्या सभांमध्ये आम्हाला बायबल आधारित भाषणं ऐकायला आवडतात. यांमध्ये बऱ्‍याचदा आत्मसन्मान कसा वाढवायचा याबद्दल सल्ला दिला जातो. आमच्या सभा विनामूल्य आहेत. त्यात सगळे लोक येऊ शकतात. आमच्या सभांमध्ये तुम्हाला पुढे दिलेल्या गोष्टी शिकायला मिळतील . . .

  • तुम्ही देवासाठी का महत्त्वाचे आहात?

  • जीवनाचा खरा उद्देश कसा शोधायचा?

  • इतरांसोबत चांगली आणि कायम टिकणारी मैत्री कशी करायची?

“एकमेकांची काळजी” करणारे खरे मित्र तुम्हाला इथे सापडतील.—१ करिंथकर १२:२५, २६.

आमच्या सभांबद्दल आणखी जाणून घेण्यासाठी jw.org वर यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य सभागृहात कोणत्या सभा भरतात? हा छोटा व्हिडिओ पाहा.

आमचा मोफत बायबल अभ्यास कार्यक्रम

आम्ही कायम जीवनाचा आनंद घ्या! या पुस्तकातून मोफत बायबल अभ्यास घेतो. या पुस्तकातून अभ्यास करताना तुम्हाला महत्त्वाची वचनं, स्पष्ट तर्क, प्रभावी प्रश्‍न, मनाला भिडणारे व्हिडिओ आणि सुंदर चित्रं पाहायला मिळतील. या बायबल अभ्यासामुळे लोकांना त्यांचा आत्मसन्मान मिळवता येतो आणि त्यांचं जीवन सुधारतं.

यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबलचा अभ्यास केल्यामुळे तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो हे जाणून घेण्यासाठी jw.org वर बायबलचा अभ्यास का करावा? हा छोटा व्हिडिओ पाहा.