वेगवेळ्या लोकांशी मैत्री करा
समस्येचं मूळ कारण
ज्या लोकांबद्दल आपल्या मनात नकारात्मक भावना आहेत त्यांच्यापासून जर आपण दूर राहिलो, तर भेदभावाच्या भावनेला आपण आणखीनच खतपाणी घालत असू. आणि जर आपण आपल्यासारख्याच लोकांसोबत मैत्री केली, तर आपल्याला कदाचित असं वाटेल, की आपण ज्या पद्धतीने विचार करतो, काम करतो तीच बरोबर आहे.
बायबल कशी मदत करतं?
“आपली मने मोठी करा.”—२ करिंथकर ६:१३.
या शास्त्रवचनातून आपण काय शिकतो? ‘मन’ हे आपल्या भावनांना सूचित करू शकतं. त्यात प्रेमाची भावनाही आली. आपण जर फक्त आपल्यासारख्याच लोकांवर प्रेम केलं, तर आपली मनं मोठी आहेत असं म्हणता येणार नाही. आपल्या बाबतीत असं होऊ नये म्हणून आपण अशा लोकांशीही मैत्री करायला तयार असलं पाहिजे जे आपल्यापेक्षा वेगळे आहेत, हेच आपण शिकतो.
वेगवेगळ्या लोकांशी मैत्री केल्यामुळे कशी मदत होते?
आपण जेव्हा इतरांना जवळून ओळखू लागतो तेव्हा काही गोष्टी ते वेगळ्या पद्धतीने का करतात, हे आपल्याला समजायला लागतं. जसजसं त्यांच्यावरचं आपलं प्रेम वाढत जातं, तसतसं आपण हे विसरून जातो की ते एका वेगळ्या गटातले आहेत. आणि त्यांच्यासोबतची आपली मैत्री आणखी घट्ट होते. त्यामुळे जेव्हा त्यांना आनंद होतो, तेव्हा आपल्यालाही आनंद होतो; आणि त्यांना दुःख होतं, तेव्हा आपल्यालाही दुःख होतं.
नाझरी नावाच्या मुलीचा विचार करा. इतर देशांतून आलेल्या लोकांबद्दल तिला बरेच गैरसमज होते. पण तिचे हे गैरसमज कसे दूर झाले, त्याबद्दल ती असं सांगते: “मी त्यांच्यासोबत वेळ घालवला आणि काम केलं. तेव्हा मला जाणवलं, की त्यांच्याबद्दल बाकीचे लोक जे काही म्हणायचे ते चुकीचं आहे.
त्यामुळे आपण जेव्हा एका वेगळ्या संस्कृतीच्या लोकांशी मैत्री करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं, की त्यातले सगळेच लोक एकसारखे नसतात. आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल आपल्या मनात प्रेम आणि आदर वाढू लागतो.”तुम्ही काय करू शकता?
अशा लोकांशी बोलायचा प्रयत्न करा जे एका वेगळ्या देशाचे, भाषेचे किंवा जातीचे आहेत. त्यासाठी तुम्ही पुढे सांगितलेल्या गोष्टी करू शकता:
-
त्यांना स्वतःबद्दल काहीतरी बोलायला सांगा.
-
त्यांना जेवणाचं आमंत्रण द्या.
-
ते स्वतःबद्दल काही सांगतात, तेव्हा लक्ष देऊन ऐका. आणि त्यांना कोणत्या गोष्टी आवडतात त्या जाणून घ्या.
त्यांनी आयुष्यात काय-काय अनुभवलं आहे हे जर आपण जाणून घ्यायचा प्रयत्न केला, तर ते आपल्यापेक्षा वेगळे का आहेत हे आपल्याला समजेल. आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल आणि त्या गटातल्या लोकांबद्दल आपल्याला आपुलकी वाटेल.