आम्हाला वास्तविकतेत याजकांची गरज आहे का?
पवित्र शास्त्राचा दृष्टिकोन
आम्हाला वास्तविकतेत याजकांची गरज आहे का?
“याजकत्वाच्या देणगीबद्दल आभार माना,” असे जॉन पॉल दुसरे यांनी, १९९२ च्या “पवित्र गुरुवारी” पाळकांना पाठवलेल्या त्यांच्या वार्षिक पत्रात म्हटले. कॅथोलिकच नव्हे तर इतरही, त्यांच्या स्वतःच्या चुकांविषयी अधिक जागृत झाले आहेत. देवाची इच्छा त्यांना सांगणारा, त्यांच्यासाठी देवाला यज्ञार्पणे वाहणारा आणि देवाकडे मध्यस्थी करणारा, देवाला स्वीकृत अशा कोणा एकाची त्यांना गरज भासली. अशा व्यक्तीला याजक म्हटले आहे. देवाकडून क्षमा प्राप्त करण्यासाठी आम्हाला खरोखरच एका याजकाची गरज आहे का?
याजक आणि बलिदानांच्या कल्पनेचा उगम, मानवांकडून नव्हे तर देवाकडून आहे. देवाविरूद्ध पापे नसती तर, याजकांची काहीच गरज नसती. एदेन बागेत, आदामाला याजकाची गरज नव्हती. त्याला पापरहित असे निर्माण केले होते.—उत्पत्ती २:७, ८; उपदेशक ७:२९.
पहिले याजक कोण होते?
आज आम्हा सर्वांना, वारशाने पाप मिळाले आहे कारण, आदामाने जाणूनबुजून पाप केले आणि आम्ही त्याची संतती आहोत. (रोमकरांस ३:२३) पहिला मानव आदाम याचा पुत्र, हाबेल याने हे ओळखले. पवित्र शास्त्र त्याच्याविषयी म्हणते: “विश्वासाने हाबेलाने देवाला यज्ञ केला.” (इब्रीकरांस ११:४) हाबेल आणि इतर प्राचीन पुरूष जसे की, नोहा, अब्राहाम, व ईयोब यांना जरी याजक म्हटलेले नाही तरी, त्यांनी स्वतःच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या वतीने देवाला यज्ञार्पणे वाहिली. उदाहरणार्थ, पवित्र शास्त्र ईयोब आणि त्याच्या पुत्रांविषयी म्हणते: “तो [ईयोब] प्रात:काळी उठून त्या सर्वांच्या संख्येइतक्या बलीचे हवन करी; कारण तो म्हणे की, ‘न जाणो माझ्या पुत्रांनी पाप केले असेल.’” (ईयोब १:५) तरीही, याजक आणि बलिदान इतक्या संस्कृतींमध्ये सामान्य कसे झाले?
प्राचीन कुलपिता नोहाच्या सभोवतालच्या घटनांचा विचार करा. नोहा आणि त्याचे कुटुंब, एवढेच मानव जगव्याप्त प्रलयातून वाचलेले होते. शुद्ध केलेल्या पृथ्वीवर पाऊल टाकल्यानंतर, नोहाने एक वेदी बांधली आणि यहोवाची करूणा व संरक्षक सांभाळ केल्याबद्दल, कृज्ञतापूर्वक बलिदान चढविले. सर्व रा नोहाचे वंशज असल्यामुळे, त्यांनी त्याचे अनुकरण केले व मध्यस्थ तसेच पापांसाठी बलिदानांसंबंधी, योग्य वेळी विविध संस्कृती वाढविल्या, यात काही संशय नाही.—उत्पत्ती १०:३२.
एक शतकापेक्षा अधिक कालावधीनंतर, बाबेल शहरामध्ये देवाविरूद्ध बंडाळीचा स्फोट झाला. देवाने लोकांच्या भाषेत गोंधळ उडवून टाकला आणि ते इतरत्र पांगले. (उत्पत्ती ११:१-९) आता, ते ज्या राष्ट्रांमध्ये पांगले तेथे, काही याजकांनी विपर्यस्त व हिणकस विश्वासांना चेतविले, भयंकर संस्कार वाढविले. तरीसुद्धा, देवाने त्याच्या उपासकांना महायाजक, सहयाजक यांनी मिळून बनलेल्या एका खऱ्या याजकत्वाची तसेच त्याला स्वीकृत असणाऱ्या बलिदानाची गरज शिकवण्याची निकड आहे हे पाहिले.
देवाने याजकांना का नियुक्त केले
कालांतराने, यहोवाने इस्त्राएल राष्ट्रांस याजक दिले ज्यांनी दोन मूलभूत कार्य पार पाडले. पहिले, त्यांनी न्यायाधीश आणि देवाच्या नियमाचे शिक्षक म्हणून लोकांसमोर देवाचे प्रतिनीधीत्व केले. (अनुवाद १७:८, ९; मलाखी २:७) दुसरे, देवासमोर लोकांच्या वतीने त्याला बलिदान चढवून त्याचे प्रतिनीधीत्व केले. इब्रीकरांतील ख्रिश्चनांना पौलाने स्पष्टीकरण दिले: “प्रत्येक प्रमुख याजक मनुष्यामधून घेतलेला असून देवविषयक गोष्टींबाबत मनुष्यांकरता नेमिलेला असतो: ह्यासाठी की त्याने दाने व पापांबद्दल यज्ञ ही दोन्ही अर्पावी. . . . हा मान कोणी आपण होऊन घेत नाही, तर ज्याला देवाने . . . पाचारण केले आहे त्याला मिळतो.”—इब्रीकरास ५:१, ४.
पौल पुढे याचेही स्पष्टीकरण देतो की, इस्त्राएलच्या याजकत्त्वाचा मार्ग, देवासोबत लोकांनी समेट करण्याचा त्याचा अंतिम मार्ग नव्हता. याजकांचे कार्य उत्तम गोष्टी, “स्वर्गीय वस्तू” यांना दर्शविणारे चिन्ह होते. (इब्रीकरास ८:५) त्या स्वर्गीय वस्तू आल्यावर, त्या चिन्हांची काहीच गरज लागणार नव्हती. याचे उदाहरण द्यायचे झाले तर, तुम्हाला अत्यंत आवश्यक असलेल्या एखाद्या उत्पादनाची जाहिरात तुम्ही स्वतःपाशी बाळगून ठेवता, परंतु ते उत्पादन मिळविल्यानंतर तुम्ही ती जाहिरात लगेच काढून टाकणार नाही का?
इस्त्राएल राष्ट्र अस्तित्त्वात येण्याच्या खूप वर्षांआधी, देवाने असे एक याजकत्व उद्देशिले होते जे केवळ इस्त्राएलांच्याच नव्हे तर संपूर्ण मानवजातीसाठी आशीर्वाद असे ठरले असते. पहिल्यांदा, त्या याजकत्वाचे सदस्य होण्यासाठी देवाने इस्त्राएलांना त्या संधीचा सुहक्क दिला होता. ते राष्ट्र स्थापन झाले, तेव्हा यहोवाने इस्त्राएलास सांगितले: “तुम्ही खरोखर माझी वाणी ऐकाल तर . . . तुम्ही मला याजक राष्ट्र व्हाल.” (निर्गम १९:५, ६; पडताळा उत्पत्ती २२:१८.) दुःखाने म्हणावे लागते की, इस्त्राएल राष्ट्राने क्वचितच देवाचे ऐकले. यास्तव, येशूने याजकांना आणि परुश्यांना सांगितले: “देवाचे राज्य तुम्हापासून काढून घेतले जाईल व जी प्रजा त्याचे फळ देईल तिला ते दिले जाईल.” तर आता, मानवजातीच्या आशीर्वादासाठी याजक म्हणून कोणाला काम करावयाचे होते?—मत्तय २१:४३.
ख्रिश्चनांना कोणत्या प्रकारच्या याजकत्वाची गरज आहे?
आदामाकडून आम्हाला पाप वारशाने मिळाल्यामुळे, येशूने पुरविलेल्या परिपूर्ण बलिदानाकरवीच सार्वकालिक जीवनाचा उद्धार शक्य आहे. (१ योहान २:२) इस्त्राएलच्या याजकत्वात आगाऊ सूचित केल्याप्रमाणे, येशू स्वतः आमच्यासाठी महायाजक म्हणून मध्यस्थी करत आहे. इब्रीकरास ९:२४ म्हणते: “खऱ्या गोष्टींचे प्रतिरूप म्हणजे हातांनी केलेले पवित्रस्थान ह्यात ख्रिस्त गेला नाही, तर आपल्यासाठी देवासमोर उभे राहण्यास प्रत्यक्ष स्वर्गात गेला.” यास्तव, ख्रिस्ताच्या महायाजकत्वाची अद्वितीय उत्कृष्टता, मानवी याजकांच्या मध्यस्थी करण्याच्या गरजेला लुप्त करते. तरीही, सहयाजकांच्या सेवेची अजूनही आवश्यकता आहे. ती कोणत्या मार्गाने?
याजकांना “येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाला आवडणारे आध्यात्मिक यज्ञाचे अर्पण” करायचे आहे. (१ पेत्र २:५) ते ज्या प्रकारचे बलिदान आहे त्याविषयी पौल लिहितो: “त्याचे नाव पत्करणाऱ्या ओठांचे फळ असा स्तुतीचा यज्ञ आपण त्याच्याद्वारे देवाला नित्य अर्पण करावा.” (इब्रीकरास १३:१५) यास्तव, राजकीय याजकगणाचे जे बनलेले आहेत ते, पृथ्वीवर असेपर्यंत लोकांसमोर, मध्यस्थ म्हणून नव्हे तर त्याचे साक्षीदार म्हणून देवाचे प्रतिनिधीत्व करतात. नंतर, येशू ख्रिस्तासोबत स्वर्गामध्ये, ख्रिस्ताच्या बलिदानाच्या फायद्यांची व्यवस्था पाहात व सर्व आजारपणाला बरे करत, देवासमोर ते लोकांचे प्रतिनिधीत्व करतात.—पडताळा मार्क २:९-१२.
सर्व विश्वासू जण साक्ष देत असले तरी, स्वर्गीय “याजकांच्या राज्यात,” केवळ तुलनात्मकरित्याच काही जण सेवा करतील. येशूने म्हटले: “हे लहान कळपा, भिऊ नको; कारण तुम्हास ते राज्य द्यावे हे तुमच्या पित्याला बरे वाटले आहे.” (लूक १२:३२; प्रकटीकरण १४:१) यांना स्वर्गामध्ये पुनरूत्थित केले जाईल व “ते देवाचे व ख्रिस्ताचे याजक होतील; आणि त्याच्याबरोबर एक हजार वर्षे राज्य करतील.”—प्रकटीकरण २०:६.
देवाने, ह्या स्वर्गीय याजकांसाठी, कोणताही याजकगण आज पर्यंत करू शकला नाही अशा प्रकारच्या, आध्यात्मिक तसेच शारीरिक अर्थाने काम करण्याची व्यवस्था केली आहे. लवकरच, येशूच्या खंडणी बलिदानाच्या फायद्यांना ते जसजसे लागू करतील, तसे सर्व विश्वास धरणाऱ्या मानवजातीला मानवी परिपूर्णतेप्रत नेण्यात ते सहभाग घेऊ शकतील. मग, यशया ३३:२४ ची एक आश्चर्यकारक पूर्णता होईल. ते म्हणते: “मी रोगी आहे असे एकही रहिवासी म्हणणार नाही; तेथे राहणारे पातकाची क्षमा पावतात.” (g93 10⁄8)
[१८ पानांवरील चित्राचे श्रेय]
“Benediction of the Wheat at Artois” 1857, by Jules Breton: France/Giraudon/Art Resource. N.Y.