व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

एकाकीपणा—अज्ञात कळ

एकाकीपणा—अज्ञात कळ

एकाकीपणा—अज्ञात कळ

लोकांच्या समूहातून तुम्ही त्यांना ओळखू शकाल का? एकाकीपणा त्यांच्या चेहऱ्‍यावर दिसतो का? तुमचे स्वागत करत असताना, त्यांचे हास्य एकाकीपणाला लपवू शकेल का? त्यांचे चालणे, त्यांच्या शरीराची ठेवण यावरून तुम्ही ते सांगू शकाल का? बागेतील बाकावर बसलेले ते वृद्ध गृहस्थ, किंवा कला संग्रहालयात एकटीच फिरणारी ती तरूणी पाहा, त्यांना एकाकीपणाची कळ वाटते का? हमरस्त्यावर फिरणाऱ्‍या आई, मुलगी आणि नात यांना चित्रित करणाऱ्‍या तीन पीढींचे निरीक्षण करा. ते तर अगदी आनंदी दिसत आहेत, परंतु याची तुम्हाला खात्री आहे का? तुमच्या कामगार सहकाऱ्‍यांचा विचार करा. आरामशीर जगण्यासाठी त्यांची पुरेशी आर्थिक परिस्थिती आहे, त्यांचे काळजी घेणारे कुटुंब आहे हे तुम्हाला माहीत असेल. तरीही, त्यांच्यातील कोणी खरेपणाने, “मी एकटा आहे” असे म्हणणाऱ्‍यांपैकीचा असू शकेल का? त्या आनंदी, उत्साही नवयुवकाला एकाकी होणे का संभवनीय आहे? ह्‍या प्रश्‍नांची उत्तरे तुम्हाला आश्‍चर्यचकित करतील.

वेबस्टर्स्‌ नाईन्थ न्यू कॉलेजाईट डिक्शनरी “एकाकीपणा” याची व्याखा, “निरूत्साहजनक किंवा उदासीनतेची भावना उत्पन्‍न करणे” अशी करते. काहीतरी उणीव असल्याची, आंतरिक पोकळतेची ती भावना असते, व ती एखाद्याच्या बाह्‍यस्वरूपावरून नेहमीच सूक्ष्मपणे पाहता येण्यासारखी नसते. एक संशोधिका म्हणते: “आमच्या समाजात, आम्ही एकटे आहोत असे काही वेळा आम्ही मुळीच कबूल करत नाही—आम्ही एकाकीपणा प्रगट करत नाही. एकाकीपणा सोबत एक खूण जोडलेली असते. सामान्यपणे अशी कल्पना आहे की, जर तुम्ही एकटे आहात, तर ती तुमची स्वतःची चूक असेल. नाहीतर, तुम्हाला निश्‍चितच अनेक मित्र असते, हो ना?” काही वेळा, विशेषकरून जेव्हा आपण इतरांकडून अवाजवीपणे अधिक अपेक्षा किंवा मागणी करतो तेव्हा ही गोष्ट खरी होऊ शकते.

एकाकी स्त्रिया

सर्व वयोगटातील स्त्रिया—विशेषकरून विवाहीत स्त्रिया—जीवनातील गोष्टींची अपेक्षा पुरूषांपेक्षा अधिक करतात, हे तज्ज्ञ मान्य करतात असे दिसते. विधवा, घटस्फोटित स्त्रिया, व वृद्ध अविवाहीत स्त्रिया अनेक वेळा एकट्या असतात हे समजण्याजोगे आहे. परंतु कुटुंबवत्सल, आनंदी वाटणाऱ्‍या विवाहीत स्त्रियांबद्दल काय? उदाहरणार्थ, ह्‍या ४० वर्षीय शिक्षिकेने, शोकाने जे म्हटले ते विचारात घ्या: “माझ्याकडे मित्रमैत्रिणींसाठी वेळ नाही; ते मला अत्यंत निराशजनकपणे चुकल्यासारखे वाटते. परंतु असे म्हणताना देखील मला अस्वस्थ वाटते. एकाकीपणाविषयी मी तक्रार कशी करू शकते? कारण माझ्या संपूर्ण परिस्थितीकडे पाहिले तर, माझा सुरेख विवाह आहे, चांगली मुले आहेत, एक सुंदर घर आहे, व माझी आवडती नोकरी आहे. मी जे काही साध्य केले आहे त्याबद्दल मला गर्व आहे. परंतु तरीही काहीतरी चुकल्यासारखे वाटते.”

जरी स्त्रिया, त्यांच्या पतींवर खरोखर प्रेम करत असल्या व त्यांच्या अधीन असल्या, आणि अशाच प्रकारचा प्रतिसाद त्यांच्या सोबत्याकडून येत असला तरी अशा प्रकारची प्रीती, सहचर्याच्या त्यांच्या गरजा हव्या तितक्या पूर्ण करत नाही. वर उल्लेखलेली शिक्षिका असे स्पष्टीकरण देते: “माझे पती माझे सर्वात चांगले मित्र असले तरी, चांगल्या मैत्रिणींची उणीव ते भरून काढू शकत नाहीत. पुरूष ऐकू शकतात, परंतु स्त्रिया लक्षपूर्वक ऐकतात. मी किती अस्वस्थ आहे हे माझे पती जाणू इच्छित नाहीत. ते लगेचच कार्य करून, समस्या सोडवू पाहतात. परंतु माझ्या मैत्रिणी मला बोलण्याची संधी देतात. आणि खरं तर काही वेळा माझी केवळ बोलायची इच्छा असते.”

जेव्हा एखादी स्त्री तिच्या प्रिय जनास मृत्यू किंवा घटस्फोटाद्वारे गमावते तेव्हा, तिचा मानसिक बिघाड गहन असू शकतो. अशा वेळी एकाकीपणा जाणवू लागतो. त्या दुःखित विधवेने किंवा घटस्फोटित स्त्रीने तिच्या कुटुंबाकडे व मित्रांकडे आधारासाठी वळावे इतकेच नव्हे तर, नव्या वास्तविकतेसोबत जुळवून घेण्यासाठी तिने तिच्या स्वतःच्या आंतरिक शक्‍तीकडे देखील वळावे. ती हानी नेहमी तिच्या जीवनाचा एक भाग झाली असली तरी, तिच्या संपूर्ण जीवनात त्या हानीला एक अडखळण होऊ देऊ नये हे तिने जाणले पाहिजे. तज्ज्ञांना असे दिसून आले आहे की दृढ व्यक्‍तिमत्त्व असलेल्या व्यक्‍ती त्यांच्या एकाकीपणावर इतरांपेक्षा फार लवकर मात करू शकतील.

विधवा अगर विधुर झालेल्यांना अधिक दुःख आहे की, घटस्फोटित झालेल्यांना अधिक आहे यावरील मतांमध्ये फरक आहे. पन्‍नाशी (इंग्रजी) ह्‍या मासिकाने असा अहवाल दिला: “ज्या ज्या वेळेला आम्ही आमच्या विधवा किंवा विधुर झालेल्या गटांमध्ये घटस्फोटित लोकांना आमंत्रण देतो, त्या त्या वेळेला, कोणाचे दुःख अधिक आहे यावर वादविवाद होऊन चर्चा अपूर्ण राहते. विधवा किंवा विधुर झालेली व्यक्‍ती म्हणते, ‘अहो, तुमचा सोबती तरी जिवंत आहे,’ तेवढ्यात घटस्फोटित व्यक्‍ती म्हणते, ‘अहो, मला जसं नापसंत केलं, तसं तुम्हाला व्यक्‍तिगतरित्या केलेले नाही. तुमच्यात अपयशाची भावनाच मुळी नाही.’”

एकाकी पुरूष

एकाकीपणाचा विषय येतो तेव्हा, दोन लिंगांमध्ये शक्‍तिमान असल्याची फुशारकी पुरूष मारू शकत नाहीत. “मानसिकरित्या गोष्टी हाताळण्याऐवजी पुरूष शारीरिकरित्या गोष्टी हाताळतात, स्त्रिया त्यांच्या मानसिक वेदनेची कहाणी सतत बोलत राहतील, परंतु पुरूष दुःखात राहण्याऐवजी पुन्हा विवाह करण्याचा प्रयत्न करतील,” असे एएआरपीच्या (अमेरिकन असोसिएशन ऑफ रिटायर्ड पर्सन्स्‌), विडोड पर्सन्स्‌ सर्व्हिससाठी, कार्यक्रम तज्ज्ञ असणाऱ्‍या ॲन स्टडनर म्हणाल्या. वियोग झालेल्या पुरूषांसोबत, मानसिक भावनांबद्दलची चर्चा करण्याआधी, पुरुष सल्लागार, त्यांच्यासोबत पुष्कळ वेळ व्यतीत करतील.

तज्ज्ञांना असे कळून आले की, स्त्रियांपेक्षा भिन्‍न, पुरूष, विश्‍वास ठेवण्यासाठी पुरूषांऐवजी, स्त्रियांचा सहवास शोधत असतात. युनिव्हर्सिटी ऑफ रोचेस्टर येथील, एकाकीपणावर अभ्यास करणारे तज्ज्ञ डॉ. लॅड व्हिलर यांनी असे उघड केले की मानसिकरित्या गाढ संबंध ठेवण्यासाठी पुरूष एकमेकांवर विश्‍वास ठेवत नाहीत. “पत्नी गमावल्याच्या मानसिक एकाकीपणाच्या अस्वस्थतेला टाळणे, व नंतर एखाद्या मैत्रिणीसोबत दळणवळण राखणे, विधुर झाल्यानंतर किंवा घटस्फोट झाल्यानंतर, स्त्रियांपेक्षा पुरूष इतक्या लवकर पुनर्विवाह का करतात या गोष्टींचे स्पष्टीकरण करण्यासाठी देखील आम्हाला मदत करील.”—पन्‍नाशी [इंग्रजी]

एकाकी तरूण

वृद्ध लोकांवर प्रभाव होणाऱ्‍या कारणासारखेच, लहान मुलं आणि तरूण प्रौढ, एकाकी का होतात यासाठी अनेक कारणे आहेत. जुन्या मित्रांना सोडून, नव्या ठिकाणी राहण्यास जाणे; नव्या शाळेतील वर्गसोबत्यांनी नापसंत करणे; धार्मिक आणि मानववंशसंबंधीची पार्श्‍वभूमी; पालकांचा घटस्फोट; पालक प्रेम करत नसल्याची भावना; विरूद्ध लिंगी सदस्यांनी नापसंत करणे, या सर्व गोष्टी एकाकीपणातील महत्त्वाची कारणे आहेत.

अगदीच लहान मुलांना, त्यांच्या खेळण्याच्या कार्यात कोणीतरी भाग घ्यावा असे वाटते. त्यांना मानसिक आधार आणि समजूतदारपणाची गरज असते. त्यांना त्यांच्या स्वतःच्या मूल्याच्या आपुलकीची व बळकटीची गरज असते. त्यांना असे कळले पाहिजे की इतर जन त्यांच्यासोबत निष्ठावंत व विश्‍वासू राहतील. त्यांच्यावर प्रेम केल्यावर, त्यांना सुरक्षितता वाटते व तेही इतरांवर प्रेम करण्याचे शिकतात. अशा प्रकारचा सामाजिक आधार, कुटुंब, समवयस्क व पाळीव प्राणी या विविध उगमातून देखील येऊ शकतो.

बालवाडीपासून कॉलेजपर्यंत, सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, बहुतेकवेळा त्यांच्या बरोबरीच्या सोबत्यांनी त्यांचा स्वीकार केला नाही यामुळे, अनेक वेळा एकाच दर्जाचा एकाकीपणा सहन करत असतात. एका माध्यमिक शाळेच्या विद्यार्थिनीने दुःखाने म्हटले, “मी एकटी असल्यामुळे मला वाईट वाटते व मी बोलत नाही, शिक्षक जे सांगतात ते मी ऐकते, माझा गृहपाठ असतो तो मी करते, तेवढेच. फावल्यावेळी मी काहीतरी चित्रवगैरे काढत राहते. सर्वजण एकमेकांसोबत बोलत असतात, परंतु माझ्यासोबत कोणी बोलत नाही . . . मला माहीत आहे की मी नेहमी दळणवळणाविना राहू शकणार नाही. परंतु सध्यातरी, मी तेवढेच करू शकते.”

तथापि, इतर लोकांचे अलिप्त राहणे, किंवा मोठेपणाचा आव, हे कारणीभूत आहे असा नेहमीच दोष देता येणार नाही. एखाद्या व्यक्‍तीची कदाचित, अतिशय लाजाळूपणा, चंचल स्वभाव, व फाजील भावनावश होणे तसेच त्याच्या किंवा तिच्या समवयस्कांसोबत न पटणे यासारखी वागणूक किंवा सामाजिक समस्या असेल. सर्व वयोमानाच्या युवकात अपंगत्व हे एकाकीपणा घडवण्यात मोठी भूमिका घेते. हे युवक दृढ व मोकळे वागणारे नसतील तर एकाकीपणा विध्वंसक परिणाम घडवतो.

स्वतःला मदत करण्याची गरज

एकाकीपणाविरूद्ध लढण्यासाठी एका व्यक्‍तीच्या प्रयत्नावर विवेचन करताना, कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटी, फुल्लर्टनच्या आरोग्य अध्यापिका डलोर्स डिल्कोमा यांनी एका महत्त्वाच्या सत्यावर बोट ठेवले: “त्याचा प्रयत्न त्याच्या आतून आला पाहिजे. शेवटी त्याने त्याची समस्या ओळखली पाहिजे, कारण इतर लोकांनी त्याला यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तरी तो स्वतःच स्वतःला अधिक बहिर्मुख होण्यास मदत करू शकतो.”

जे लोक स्वतःला फेरबदल करण्यासाठी अवघड बनवतात त्या लोकांची ओळख, डॉ वॅरन जोन्स, एकाकी प्रवृत्तीचे व्यक्‍तिमत्त्व असे करतात. “इतरांच्या जवळ जाण्याच्या भावनेला हे लोक अजाणतेत टाळतात. काहींना कसे ऐकावे ते कळत नाही, आणि मग ते संभाषणाचा मक्‍ता मिळवतात. इतरांबद्दल आणि स्वतःबद्दलची त्यांची प्रवृत्ती अगदी टिकेखोर होते, ते फार कमी प्रश्‍न विचारतात, आणि अनेक वेळा तर क्षुद्र किंवा चीड आणणाऱ्‍या गोष्टी बोलून मैत्रीचा नाश करतात.”

ज्या लोकांनी मुळातच स्वतःविषयीचे चांगले मत गमावले आहे, त्यांच्यासोबत इतर लोकही आहेत ज्यांनी, इतरांना कथन करण्यासाठी लागणारी सामाजिक कसब गमावली आहे. त्यांच्याविषयी, औषध विशारद एव्हलेन मोशट म्हणतात: “एकट्या लोकांना स्वतःबद्दलची चांगली मानसिक कल्पना नसते. अस्वीकृतीच्या अपेक्षेतून, ते त्याप्रत जाण्याची पर्वा करत नाहीत.”

तथापि, सामान्यपणे स्वीकृत असलेल्या ज्ञानाच्या उलटपक्षी, संशोधकांना असे कळले की, तरूणांपेक्षा वृद्ध स्त्री किंवा पुरुष कमी एकाकीपणा सहन करतात. असे का असावे याबद्दल त्यांना खात्री नाही. त्यांना असेही आढळून आले आहे की नात्याच्या माणसांच्या अभावापेक्षा मित्रांच्या अभावामुळे वृद्ध लोक एकाकीपणा सहन करतात. “याचा अर्थ असा होत नाही की कौटुंबिक नातेसंबंध वृद्ध लोकांना कमी महत्त्वाचा आहे. सहकार्यासाठी ते कुटुंबाकडे वळतात. परंतु सहकार्य देण्यासाठी त्यांचे पुष्कळ मोठे कुटुंब असते, व तरीही त्यांचे कोणी मित्र नसले तर त्यांना अतिशय एकटे वाटते.”

जवळच्या मित्रांची आवश्‍यकता

काही वेळा जवळचे मित्र, सर्व वयोगटातील लोकांच्या, कुटुंब आणि नातेवाईक पुरवू शकतील अशा आवश्‍यकतेपलिकडेही, गरजा पुरवितात. लोकांना मित्राची गरज आहे, एक जवळचा मित्र ज्याच्यावर ते विश्‍वास ठेवू शकतील किंवा कोणतीही इजा होण्याच्या भीतीविना ते स्वतःचे मन त्याच्याजवळ मोकळे करू शकतील. अशा मित्राविना, एकाकीपणा वाढू शकतो. तो असा मित्र असेल ज्याच्याविषयी अमेरिकी निबंधकार, राल्फ वाल्डो एमरसन यांनी लिहिले: ‘हा असा मित्र आहे की ज्याच्यापुढे मी माझे मनोगत बोलून दाखवू शकतो.’ अशा प्रकारचा व्यक्‍ती जिवलग मित्र असतो, ज्याच्याकडे तुमचे गुपित, तुमच्याविषयी तुच्छतापूर्वक बोलण्यासाठी किंवा इतरांना हशा होईल अशारीतीने वापरले जाईल याबद्दलच्या, विश्‍वासघाताची किंवा चिंतेची कसलीच भीती न बाळगता तुम्ही तुमचे सर्व मन पूर्णपणे मोकळे करू शकता. ज्यांना तुम्ही निष्ठावान सोबती समजला असाल ते तुमच्या सोबत नेहमीच विश्‍वासू राहिले नाहीत, परंतु एक असा “मित्र” जरूर आहे जो “इतरांच्या गुप्त गोष्टी बाहेर फोडत नाही,” जो “बंधूपेक्षाही आपणास धरून राहतो.”—नीतीसूत्रे १८:२४; २५:९.

काही असे देखील आहेत जे मजबूत असल्याचा आव आणतात व त्यांना कोणाचीही गरज नाही असे दाखवू इच्छितात. ते स्वतंत्र आणि स्वावलंबी असल्याचा दावा करतात. तरीसुद्धा, मजबूत म्हणविणाऱ्‍यांच्याच गटात ते एकत्र होतात. मुलांचे क्लब सोबती असतात, क्लबगृहे बनवितात, टोळ्या बनवितात; प्रौढ युवकांच्या मोटारसायकल टोळ्या असतात; अपराध्यांचे असे सवंगडी असतात जे पोलिसांना माहिती पुरविणारे खबरे होणार नाहीत; ज्यांना मद्य प्राशन करण्याची सवय असते ते अल्कोहॉलिक्स अनोनमस नामक संस्थेला जाऊन सामील होतात जी मद्यप्राशन करणाऱ्‍या लोकांना त्यांच्या ह्‍या सवयीतून मुक्‍त होण्यास मदत करते; मेदोवृद्धी मुळे धडपड करणारे लोक वेट वॉचर्स्‌ या संस्थेत जाऊन सामील होतात, जी लोकांना मेदोवृद्धि कमी करण्यास मदत करत असते. लोक समाजप्रिय आहेत; आधारासाठी ते एकत्र येतात. समस्या असतानाही, ज्यांना त्यांच्यासारख्याच समस्या आहेत त्यांच्यासोबत संगती करण्याची त्यांची इच्छा असते. आणि एकमतात ते एकाकीपणाचा द्वेष करतात. एकाकीपणा विषयी काय केले जाऊ शकते? (g93 9/22)

[५ पानांवरील संक्षिप्त आशय]

“एकट्या लोकांना स्वतःबद्दलची चांगली मानसिक कल्पना नसते”