व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

एकाकीपणा—त्याविरूद्ध लढून विजय मिळवण्याचा तुमचा निश्‍चय आहे का?

एकाकीपणा—त्याविरूद्ध लढून विजय मिळवण्याचा तुमचा निश्‍चय आहे का?

एकाकीपणा—त्याविरूद्ध लढून विजय मिळवण्याचा तुमचा निश्‍चय आहे का?

तुम्ही एकटे आहात का? तुम्ही विवाहित असला किंवा सडे असला, तुम्ही पुरूष असला किंवा स्त्री असला, तुम्ही वृद्ध असला किंवा तरूण असला तरी, जीवनामध्ये काही असे प्रसंग जरूर असतात जेव्हा तुम्हाला एकाकीपणा भासतो व हे स्वाभाविक आहे. हे ही लक्षात घ्या की एकटे असल्यामुळेच एकाकीपणा भासतो असे नाही. एखादा विद्वान, त्याच्या संशोधनात पूर्णपणे गर्क झाल्यावर त्याला एकाकीपणा भासत नाही. एखादा चित्रकार चित्र रंगवण्यात मग्न झाल्यावर त्याला एकटे वाटत नाही. त्यांना अशा प्रकारचा एकांत क्षण फार आवडतो, आणि मग एकाकीपणा त्यांचा खास मित्र बनतो.

खऱ्‍या एकाकीपणाची भावना, बाहेरून येण्यापेक्षा आमच्या आंतरिक मनातून वाढत असते. एखादी दुःखद घटना जसे की, मृत्यू, घटस्फोट, बेकारी, कोणतीतरी शोकांतिका या सर्व गोष्टी एकाकीपणाला कारणीभूत असू शकतात. आम्ही स्वतःला चैतन्यभरीत करतो तेव्हा, तो एकाकीपणा विरतो व काही वेळातच नाहीसा होतो, आणि आम्हामध्ये निर्माण झालेली पोकळी भरून निघते.

विचारांतून भावना उत्पन्‍न होतात. एखाद्या हानीचे दुःख विरल्यानंतर व त्यामुळे ज्या भावना निर्माण झाल्या होत्या त्या मागे टाकल्यानंतर, उभारणीकारक विचारांना प्राधान्य देण्याची ती वेळ आहे, जी तुम्हाला, एक सक्रिय जीवन जगण्यासाठी मुभा देईल.

स्वतःला कार्यप्रवृत्त करा. स्वतःवर नियंत्रण ठेवा. करता येण्यासारख्या सकारात्मक गोष्टी आहेत. यास्तव व्यग्र राहा. कोणास तरी फोन करा. एखादे पत्र लिहा. एखादे पुस्तक वाचा. तुमच्या घरी लोकांना आमंत्रण द्या. कल्पनांची देवाणघेवण करा. मित्र हवे असल्यास, तुम्ही स्वतः मित्रत्त्व प्रदर्शित करा. आंतरिक परीक्षण करा जेणेकडून, तुम्ही इतरांना मैत्रीचा हात देऊ शकता. दयाळूपणाची छोटीशी कृत्ये करा. दुसऱ्‍यांबरोबर काही सांत्वनदायक आध्यात्मिक निवडक गोष्टींची सहभागिता करा. तुम्हाला येशूचे शब्द खरे वाटतील की: “घेण्यापेक्षा देणे ह्‍यात जास्त धन्यता आहे.” तुम्ही आणखी एक प्रसिद्ध सत्य ओळखू शकाल: “जो इतरांना मुक्‍तपणे पाणी पाजतो त्याला स्वतःला मुक्‍तपणे ते पाजण्यात येईल.”—प्रे. कृत्ये २०:३५; नीतीसूत्रे ११:२५.

ते तुम्हावर आहे

असे करण्यास अवघड वाटते का? करण्यापेक्षा बोलणे सोपे असे तुम्हाला वाटते का? सर्व काही योग्य गोष्टी करण्यापेक्षा, बोलायला सोप्या वाटतात हेच तर तुमच्या कृतीचे तुम्हाला समाधान मिळवून देते. आणि तसे केल्यानेच तुम्हाला समाधानकारक वाटते. तुम्ही खास प्रयत्न केले पाहिजेत. तुमचा काही वाटा देण्यात जातो, व तुमच्यातील समाधान आणि आनंद अधिक प्रज्वलित होत राहते. तुमच्यावर सत्ता गाजवू पाहणाऱ्‍या एकाकीपणाचा पूर्णपणे पराभव करण्यासाठी ज्या प्रयत्नाची गरज आहे, ते तुम्हावर आहे. आधुनिक प्रौढत्त्व [इंग्रजी] ह्‍या मासिकातील एका लेखकाने म्हटले: “तुमच्या एकाकीपणाबद्दल कोणी दुसरे जबाबदार नाहीत, परंतु त्याबद्दल तुम्ही काही तरी करू शकता. एखाद्या मित्रत्त्वाने तुम्ही तुमचे जीवन खुलवू शकता. तुम्हाला ज्याने इजा पोचवली आहे असे तुम्हाला वाटते, त्याला तुम्ही क्षमा करू शकता. तुम्ही एखादे पत्र लिहू शकता. एखादा फोन करू शकता. तुम्हीच केवळ तुमचे जीवन बदलू शकता. तुमच्यासाठी कोणी इतर मानव ते करू शकणार नाही.” त्याला मिळालेल्या एका पत्राचा संदर्भ त्याने घेतला “जे अगदी अचूकपणे ह्‍या मुद्याला स्पष्ट करते: ‘मी लोकांना सांगतो की त्यांचे जीवन एकाकी होण्यापासून किंवा अतृप्त राहण्यापासून दूर ठेवणे हे त्यांचे स्वतःचे काम आहे. जागृत बना, काहीतरी करा!’”

तुमचे साहाय्यकारी मित्र केवळ मनुष्यापर्यंतच मर्यादित असले पाहिजेत असे नाही. पशू रोगासंबंधीच्या औषधांचे एक डॉक्टर म्हणतात: “वृद्ध ज्या मोठ्या समस्यांचा सामना करत आहेत ते शारीरिक दुःखणे नव्हे, तर ते अनुभवत असलेले एकाकीपण व झिडकार आहे. सोबती दिल्याने, वयोवृद्ध जेव्हा समाजापासून फारकतीत असतात त्या वेळेला पाळीव प्राणी (यामध्ये कुत्र्यांचा देखील समावेश आहे) त्यांच्या समोर काही तरी उद्देश ठेवतात.” उत्तम घर व बगीचे [इंग्रजी] या मासिकाने म्हटले: “मानसिकरित्या अस्वस्थ असलेल्यांवर उपचार करण्यासाठी पाळीव प्राणी मदत करतात; शारीरिकरित्या आजाऱ्‍यांना, अपंगांना, व निर्बलांना उत्तेजन देतात, व जे एकटे व वृद्ध आहेत अशांमध्ये ते पुन्हा नवचैतन्य उत्पन्‍न करतात.” आणखी एका मासिकातील लेखाने, प्राण्यांमध्ये आस्था वाढविणाऱ्‍या लोकांबद्दल म्हटले: “रुग्णाच्या चिंता कमी झाल्या व ते त्यांच्या पाळीव प्राण्यांवर झिडकारण्याच्या भीतीविना प्रेम व्यक्‍त करू शकले. नंतर ते, त्यांच्या प्राण्यांची काळजी घेण्याविषयी बोलून, लोकांबरोबर दळणवळण करू लागले. त्यांच्यावर काहीतरी जबाबदारी आहे असे त्यांना वाटू लागले. त्यांची गरज असल्याचे व, त्यांच्यावर कोणीतरी अवलंबून आहे, असे त्यांना वाटू लागले.”

एकाकीपणा सहन करणारा, नको तितक्यांदा स्वतःला त्याच्या घोर निराशेतून बाहेर येण्यासाठी, स्वतःला पुरेपूर मदत करण्यासाठी, स्वतःचा उपहास करणार नाही. त्या मर्यादेपर्यंत जाण्यास स्वतः परिश्रम घेण्यासाठी, त्याच्यामध्ये केवळ सुस्ती असते, नाराजी असते परंतु त्याला त्याच्या एकाकीपणाचे कारण समजावून घ्यायचे आहे तर त्याने ते शोधलेच पाहिजे. लोकांना जो सल्ला दिला जातो त्याचा प्रतिकार ते करतात हे कबूल करण्यासाठी त्यांना ते किती कठीण जाते याविषयी डॉ जेम्स लिंचने लिहिले: “मानवी अवस्था अशी असते की, जी माहिती आम्हाला आवडत नाही ती, आपण बहुधा ऐकण्यास, किंबहुना आमच्या वागणूकीत तिला समाविष्ट करण्यास टाळतो.” एखाद्या व्यक्‍तीला त्याच्या एकाकीपणातून मुक्‍त व्हावयाचे असेल, परंतु त्या सुटकेच्या परिणामाला लागणाऱ्‍या इच्छाशक्‍तीला गोळा करण्याची त्याची कदाचित इच्छा नसेल.

तुम्हास जसे करावेसे वाटते तसेच कार्य करा

तीव्र खिन्‍नतेवर मात करण्यासाठी, एखाद्याला खरा उत्साह व दयाळूपणाचा पाठलाग करण्याचे चालू ठेवले पाहिजे. (पडताळा प्रे. कृत्ये २०:३५.) यासाठी, त्या भयानक सुस्तीच्या अगदी विरूद्ध कार्य करून, एकाकीपणाच्या दृढ मनःस्थितीवर बांध घातला पाहिजे. आनंदी राहा, आनंदाने बागडा, एखादे आनंदाचे गाणे म्हणा. आनंदाला प्रतिबिंबित करणारे काहीही काम करा. त्याला फुगवून सांगा, वारंवार तसे करा, खिन्‍न मनःस्थितीला आनंदी विचारांनी भरून टाका. कोणते आनंदी विचार?

फिलिप्पैकरांस ४:८ मध्ये सांगितल्यानुसार: “बंधूंनो, शेवटी इतके सांगतो की, जे काही सत्य, जे काही आदरणीय, जे काही न्याय्य, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्‌गुण, जी काही स्तुती, त्याचे मनन करा.”

तुमच्या जीवनामध्ये काही अर्थ भरण्याची गरज आहे. तुमच्या जीवनाला काही अर्थ आहे असे तुम्हाला वाटत असल्यास, त्याला प्रतिसाद देण्याचा व ते पूर्ण करण्याचा उत्साह, तुमच्यामध्ये निर्माण होईल. निराशजनक एकाकीपणाच्या भावनेच्या भोवऱ्‍यात तुम्ही पडणार नाही. याबद्दल विक्टर फ्रँक्लस यांच्या अर्थबोधासाठी मानवाचा शोध [इंग्रजी] या पुस्तकात अतिशय चित्तवेधकपणे दाखवले आहे. हिटलरच्या छळ छावण्यातील कैद्यांच्या संबंधाविषयी ते चर्चा करतात. ज्या कैद्यांच्या जीवनामध्ये काहीच अर्थ नव्हता ते एकाकीपणाला बळी पडले व त्यांनी जगण्याची इच्छाच गमावली. परंतु “एखाद्याच्या आंतरिक मूल्याचे देहभान उच्च, अधिक आध्यात्मिक गोष्टींवर स्थिर असते, व छळ छावण्यांतील जीवनाने ते डळमळू शकणार नाही.” त्यांनी पुढे असे म्हटले: “जीवनाला आत्ता बलिदानाच्या अर्थासारखा अर्थ मिळाला तर कोणत्याही मार्गाने दुःख हे दुःख राहत नाही. . . . आनंद उपभोगायचा किंवा दुःख टाळण्याचा मानवाचा मुख्य उद्देश नाही, तर त्याच्या जीवनामध्ये अर्थ पाहणे हा आहे. यास्तव, त्याच्या दुःखाला काही तरी अर्थ आहे या अटीमुळेच, मनुष्य सहन करावयास देखील तयार असतो.”

तुम्हाला आवश्‍यक असणारा अंतिम संबंध

खरोखरचा आध्यात्मिक दृष्टिकोन साध्य करण्याचा मार्ग म्हणजे देव आणि त्याचे वचन, पवित्र शास्त्र याच्याबरोबर पूर्णपणे बध्द होणे. देवावरील विश्‍वास व त्याला केलेली कळकळीची प्रार्थना आमच्या जीवनाला अर्थ देते. आणि, मानवी नातेसंबंधाचा चुराडा झाला तरी, आम्ही एकटे, एकाकीपणाला टाकून दिलेले नाही. फ्रँक्ल यांनी म्हटल्याप्रमाणे, अर्थपूर्ण असलेले दुःख सहन करता येण्याजोगे आहे, व आनंदाचाही स्रोत आहे. मानव स्वभावाचे निरीक्षण करणाऱ्‍या एकाने म्हटले: “सुळावर मरणाऱ्‍या हुतात्म्याला जो आनंद असतो त्याचा, सिंहासनावर बसलेल्या राजालाही हेवा वाटू शकतो.”

ख्रिस्ताच्या शिष्यांना, लोकांकडून छळ होत असताना, यहोवाकडून येणाऱ्‍या आनंदामुळे धन्य वाटले; अशा प्रकारचा छळ त्यांच्यासाठी खूप मोठा अर्थ राखून होता. “नीतीमत्त्वाकरिता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुमच्याविरूद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील तेव्हा तुम्ही धन्य. आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे; कारण तुमच्यापूर्वी जे संदेष्टे होऊन गेले त्यांचा त्यांनी तसाच छळ केला.” (मत्तय ५:१०-१२) अशाच प्रकारचा प्रतिसाद प्रे. कृत्ये ५:४०, ४१ मध्ये लिखीत आहे: “त्यांनी प्रेषितांना बोलवून त्यांना मारहाण केली आणि येशूच्या नावाने बोलू नका अशी ताकीद देऊन त्यांना सोडून दिले. ते तर त्या नावासाठी आपण अपमानास पात्र ठरविण्यात आलो म्हणून आनंद करीत न्यायसभेपुढून निघून गेले.”

जेथे तुम्ही गुलाब वाढवता, तेथे काटेरी रोप वाढू शकणार नाही

तुमच्या मनाची जमीन, सुंदरतेच्या व सकारात्मक उद्देशाच्या बीजांनी भरून टाका; नकारात्मक निराशेच्या व निरूत्साहजनक एकाकीपणाच्या बीजांना मुळीच स्थान देऊ नका. (पडताळा कलस्सैकर ३:२; ४:२.) असे करण्यास कठीण वाटते का? काही विशिष्ट परिस्थितींमध्ये, ते कदाचित अशक्य असू शकते. एका कवयित्रीने अशी नोंद केली: “जेथे गुलाब वाढवता, तेथे काटेरी रोप वाढू शकत नाही,” ज्यामध्ये पुन्हा सकारात्मक प्रयत्नांची व इच्छाशक्‍तीचा वापर करण्याच्या निश्‍चयाची गरज आहे. पण असे केले जाऊ शकते, केले जात आहे.

लॉरल निसबेटचे उदाहरण विचारात घ्या. तिला पोलियो झाला व वयाच्या ३६ व्या वर्षात कृत्रिम श्‍वासोच्छ्‌वासाच्या उपकरणात ठेवले जेथे ती ३७ वर्षांसाठी सपाट पाठीवरच पडून होती. मानेपासून खाली, संपूर्ण शरीराला पक्षघात झाल्यामुळे, ती केवळ तिचे डोके हलवू शकत होती. पहिल्यांदा, ती इतकी निराश होती की तिला तिचे जीवन आशाहीन वाटत होते. मग, एक दिवसानंतर स्वतःची दया आल्यावर, तिने निर्णय घेतला की, ‘आता स्वतःची ही दया पुरे!’ तिची काळजी घेण्यासाठी तिला दोन मुले व नवरा होता. तिने तिच्या जीवनाची पुर्नउभारणी करण्यास चालू केले; कृत्रिम श्‍वासोच्छ्‌वासाच्या उपकरणातून ती तिच्या घरची व्यवस्था पाहण्यास शिकली.

लॉरल फार कमी वेळ झोपत असे. ते लांब रात्रीचे तास ती कशी घालवत होती? एकाकीपणाला शरण जाऊन? नाही. तिच्या स्वर्गीय पिता यहोवाला ती प्रार्थना करत असे. स्वतःला बळ मिळण्यासाठी, तिच्या ख्रिश्‍चन बंधू आणि भगिणींसाठी, व देवाच्या राज्याची साक्ष देण्यासाठी संधी मिळावी याबद्दल तिने प्रार्थना केली. प्रचार करण्यासाठी तिने अनेक मार्ग योजिले व यहोवाच्या नावासाठी साक्ष देऊन अनेकांना प्रभावीत केले. तिने एकाकीपणाचे काटेरी रोप मुळीच वाढू दिले नाही; गुलाब वाढवण्यात ती मग्न होती.

हेरॉल्ड किंग नावाच्या एका वॉचटावर मिशनऱ्‍याची देखील अशीच गोष्ट होती. एका चिनी कैदखान्यात, पाच वर्षांसाठी, एकांत कोठडीतील तुरुंगवासाची शिक्षा फर्मावली असताना, एकाकीपणाचा अनुभव घेणारे ते जणू निष्णात व्यक्‍ती होते. तथापि, त्यांनी त्या नकारात्मक दृष्टिकोनाला नाकारले व इच्छाशक्‍तीच्या बुद्धिपुरःसर कार्याने त्यांनी एका वेगळ्या उपक्रमाला सुरवात केली. नंतर त्यांनी खालीलप्रमाणे त्याचे वर्णन दिले:

“‘प्रचार’ कार्याच्या कार्यक्रमाची मी व्यवस्था केली. परंतु एकांतवासाची शिक्षा भोगत असताना एखादी व्यक्‍ती कोणाला प्रचार करू शकते? मी असा विचार केला की, ज्या गोष्टी मी शिकलो होतो त्यांची आठवण करून, काही योग्य पवित्र शास्त्र प्रवचन तयार करीन व काल्पनिक पात्रांना प्रचार करीन. आणि मग मी हे काम चालू केले, जणू काय, काल्पनिक दरवाजा खटकावणे, व एका काल्पनिक घरमालकाला साक्ष देणे, सकाळच्या वेळी अशा कित्येक घरी भेटी दिल्या. अशाच एके प्रसंगी मी एका काल्पनिक सौ. कारटर यांना भेटलो, ज्यांनी थोडीशी आस्था दाखवली, आणि अनेक अशा पुनर्भेटीनंतर आम्ही एका पवित्र शास्त्र अभ्यासाची व्यवस्था केली. ह्‍या अभ्यासाच्या दरम्यान, ‘देव सत्य होवो’ ह्‍या पुस्तकातून मला जितके आठवत होते तितक्या मूलभूत विषयांची चर्चा आम्ही केली. हे सर्व मी मोठमोठ्याने बोलून केले, जेणेकडून या गोष्टींच्या आवाजामुळे माझ्या मनावर प्रभाव होऊ शकेल.”

हिटलरच्या छळछावण्यांमधील हजारो यहोवाच्या साक्षीदारांनी जर त्यांचा विश्‍वास नाकारला असता, तर त्यांनी त्यांचे स्वातंत्र्य पुन्हा प्राप्त केले असते. फार कमी लोकांनी असे केले. हजारो जण विश्‍वासात मरण पावले, काही जण देहदंडामुळे, तर काही जण आजारपण व उपासमारीमुळे मरण पावले. योसेफ नावाच्या एका तुरुंगवासातील साक्षीदाराचे, दुसऱ्‍या छावण्यांमध्ये, दोन थोरले बंधू होते. एकाला उताणे झोपण्यास सांगितले ज्यामुळे तो त्याचे शिरच्छेद करणाऱ्‍या, धारदार चाकूला खाली येताना पाहू शकेल. योसेफ यांनी स्पष्टीकरण दिले की: “छावण्यांमधील इतरांनी जेव्हा हे ऐकले तेव्हा त्यांनी माझे अभिनंदन केले. त्यांच्या सकारात्मक मनोवृत्तीचा माझ्यावर खोल परिणाम झाला. निष्ठावंत राहणे हे, बचावापेक्षा आमच्यासाठी अधिक होते.”

त्यांच्या दुसऱ्‍या बंधूला, गोळीबार करणाऱ्‍या एका तुकडीसमोर उभे असताना विचारले गेले की त्यांना काही बोलायची इच्छा आहे का. त्यांनी प्रार्थना करण्याची परवानगी मागितली, आणि त्यांना अनुमती दिली गेली. ती प्रार्थना, इतकी हृदयस्पर्शी करूणारसाने आणि आनंदाने भरली होती की जेव्हा गोळीबार करण्याची आज्ञा दिली गेली तेव्हा तुकडीतील एकाही सैनिकाने ती आज्ञा मानली नाही. पुन्हा आज्ञा दिल्यावर एकानेच गोळीबार केला, ज्यामुळे त्या बंधूच्या शरीराला थोडीशी इजा झाली. याकडे पाहून बेफाम चिडलेल्या, अधिकाऱ्‍याने स्वतःची पिस्तुल बाहेर काढली, व न्यायदंड बजावून मोकळा झाला.

जीवनाला खरे अर्थपूर्ण काय बनवू शकेल

ह्‍या सर्व बाबींमध्ये देवावर विश्‍वास गोवलेला होता. जेव्हा सर्व गोष्टी करून पाहिल्या व अपयशी ठरल्या जातात, तेव्हा एकाकीपणावर विजय मिळवता येतो आणि एकेकाळी शून्य असलेले जीवन अर्थपूर्ण होते. जीवन अर्थपूर्ण आहे असा जगिक मार्गाने विचार करणे वास्तविकतेत शून्य असते. हे असे का बरे? कारण त्यांचा शेवट मृत्यू आहे, सर्वसामान्यपणे, त्यांच्या जीवनक्रमाने मानवजातीवर कोणताच अर्थपूर्ण आघात मागे सोडला नाही. ते उपदेशक ९:५ मध्ये म्हटल्यानुसार आहे: “आपणास मरावयाचे आहे हे जिवंताला निदान कळत असते; पण मृतास तर काहीच कळत नाही; त्यास आणखी काही फलप्राप्ती व्हावयाची नसते; त्यांचे स्मरण कोणास राहात नाही.” यहोवाच्या उद्देशांव्यतिरिक्‍त जगलेल्या जीवनाचा अर्थ शून्य, व्यर्थता आहे.

तारकांमय आकाशाकडे पाहा, डोक्यावरील ह्‍या विस्तृत गडद घुमटाकाराच्या जाणीवेमुळे, तुम्हाला क्षुद्र असे वाटू लागते. स्तोत्रकर्त्या दाविदाने लिहिलेल्या भावना तुम्हाला कळू शकतील: “आकाश जे तुझे अंगुली कार्य, व त्यात तू नेमलेले चंद्र व तारे ह्‍यांच्याकडे पहावे तर—मर्त्य मनुष्य तो काय की तू त्याची आठवण करावी? मानव तो काय की तू त्याला दर्शन द्यावे?” दाविदाचा पुत्र शलमोन ह्‍याने मानवाच्या कार्याला असे म्हणून पूर्णपणे खोडून टाकले की: “सर्व काही व्यर्थ आहे,” आणि अशी समाप्ती केली की: “आता सर्व काही तुम्ही ऐकले; सर्वांचे सार हे की देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ; मनुष्यकर्तव्य काय ते एवढेच आहे.”—स्तोत्रसंहिता ८:३, ४; उपदेशक १२:८, १३.

शेवटल्या पृथक्करणात, मग, एखादी एकाकी व्यक्‍ती किंवा त्याविषयाची कोणीही, तिच्या जीवनात कसा अर्थ भरू शकते? देवाच्या आज्ञांचे पालन करून व देवाचे भय राखून जीवन जगण्याद्वारे. केवळ तेव्हाच, तो ह्‍या अफाट विश्‍वाचा निमार्णकर्ता, देवाच्या उद्देशाच्या चाकोरीत मावू शकेल, व त्या चिरकाल ईश्‍वरी व्यवस्थेचा एक भाग होऊ शकेल.

देव तुम्हाबरोबर असल्यास, तुम्ही कधीच एकटे नाही

आफ्रिकेतील यहोवाची एक विश्‍वासू साक्षीदार, भयानक छळ आणि तिटकाऱ्‍याची भावना सहन केल्यावर अशी म्हणाली की, तिचे मानवी संबंध जरी अपयशी ठरले, तरी ती एकटी नव्हती. तिने स्तोत्रसंहिता २७:१० चा संदर्भ घेतला, जेथे म्हटले आहे की: “माझ्या आईबापांनी मला सोडिले तरी परमेश्‍वर [यहोवा न्यूव] मला जवळ करील.” येशूला देखील याच प्रकारे वाटले. तो म्हणाला, “पाहा, अशी वेळ येत आहे, किंबहुना आली आहे, की तुमची दाणादाण होऊन तुम्ही सर्व आपआपल्या घरी जाल व मला एकटे सोडाल; तरी मी एकटा नाही, कारण पिता माझ्याबरोबर आहे.”—योहान १६:३२.

येशू एकटे राहण्यास भीत नव्हता. त्याने अनेकवेळा मुद्दामहून एकांतवासात राहण्यास निवडले. एकटा असताना त्याला एकाकीपणा वाटला नाही. त्याने स्वतःला, देवाच्या पवित्र आत्म्याचा अंतःप्रवेश होण्यास खुले केले व त्याच्या सृष्टीच्या आवतीभोवती असताना देवाच्या जवळ असल्याचा अनुभव घेतला. काही वेळा तर त्याने लोकांची संगती टाळली जेणेकडून तो देवाच्या सहवासात एकटाच राहू शकत होता. तो ‘देवाजवळ आला, आणि देव त्याच्या जवळ आला.’ (याकोब ४:८) निःसंशये, तो देवाचा जवळचा मित्र होता.

शास्त्रवचने वर्णन करतात त्याप्रमाणे, मित्र, ही मूल्यवान गोष्ट आहे. (नीतीसूत्रे १७:१७; १८:२४) यहोवा देवावरील त्याच्या पूर्ण विश्‍वासामुळे आणि त्याला निःसंशये आज्ञाधारकता दाखवल्यामुळे, अब्राहामाला, “‘देवाचा मित्र’ म्हणण्यात आले.” (याकोब २:२३) येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला: “मी तुम्हाला जे काही सांगतो ते तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहा. मी आतापासून तुम्हाला दास म्हणत नाही; कारण धनी काय करतो ते दासाला ठाऊक नसते. परंतु मी तुम्हाला मित्र म्हटले आहे; कारण जे काही मी आपल्या पित्यापासून ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हाला कळविले आहे.”—योहान १५:१४, १५.

यहोवा देव आणि येशू ख्रिस्तासारखे मित्र असल्यावर, विश्‍वास असणारे, एकाकीपणावर विजय मिळवण्यास अपयशी कसे ठरतील बरे? (g93 9⁄22)

[८, ९ पानांवरील चित्रं]

प्रार्थना आणि इतर कार्ये तुम्हाला एकाकीपणा टाळण्यास मदत करू शकतात

[१० पानांवरील चित्र]

हेरॉल्ड किंग आणि छळ छावण्यांमधील यहोवाचे आणखी हजारो साक्षीदार हे प्रदर्शित करतात की, सर्वात बिकट परिस्थितीत असतानाही, देवावर विश्‍वास ठेवल्याने एकाकीपणावर मात करता येऊ शकते

[चित्राचे श्रेय]

U.S. National Archives photo