एड्सचा संसर्ग होण्यापासून मी स्वतःला सुरक्षित कसे ठेवू शकतो?
तरुण लोक विचारतात. . . .
एड्सचा संसर्ग होण्यापासून मी स्वतःला सुरक्षित कसे ठेवू शकतो?
के म्हणते, “असे होऊ दिल्यामुळे, ते मला क्रोधित करते, ज्या मार्गाची निवड मी केली त्यामुळे, भवितव्यामध्ये जी निवड मला करता आली असती, ती संधी मी गमावली.” (न्यूजवीक मासिक, ऑगस्ट ३, १९९२) वयाच्या १८ व्या वर्षी, के हिला एडस्चा विषाणू जडला.
अमेरिकेत, एच आय व्ही विषाणू जडलेल्या, दहा लाख लोकांमधील, एक के आहे, डॉक्टर म्हणतात की, एडस् ह्या भयानक रोगाला हा विषाणू कारणीभूत आहे. * किती युवकांना याची लागण झाली आहे हे कोणालाच नक्की माहीत नाही, परंतु युवकांना याची काळजी आहे हे स्पष्ट आहे. एका अभ्यासाने असे दाखवले की, ब्रिटीश युवकांमध्ये, एड्स ही सर्वात मोठी चिंतेची बाब आहे. अशी काळजी असतानाही, यु.एस. सेंटर्स फॉर डिजीस कंट्रोल म्हणते: “अनेक कुमार अवस्थेतील तरूण एच आय व्हीची लागण होणाऱ्या कार्यात भाग घेतात.”
एड्स हा नेहमी प्राणघातक आहे, व तो साथींच्या प्रमाणात, संपूर्ण जगभरात फैलावत आहे. तुम्ही स्वतःचे संरक्षण कसे करू शकाल?
एड्स—दंतकथेला वस्तुस्थितीतून वेगळे करणे
यु.एस. सेंटर्स फॉर डिजीस कंट्रोलने तयार केलेली एक पुस्तिका स्पष्टीकरण देते: “एच आय व्हीचा संसर्ग ‘असाच होत’ नाही. फ्लू किंवा सर्दी प्रमाणे तो तुम्हाला ‘होत’ नाही.” यास्तव, अनपेक्षित, एड्सच्या रोग्यांसोबत दररोजचा संपर्क धोकादायक नाही. वर्गामध्ये, एड्स असलेल्या एखाद्या मुलाजवळ किंवा मुली जवळ बसल्याने तुम्हाला त्याची लागण होण्याची काळजी करण्याचे काही कारण नाही. एच आय व्ही विषाणू हवेतून पसणारा नसल्यामुळे, एड्स असलेला एखादा रोगी जर खोकला किंवा शिंकला तर तुम्हाला काळजी करण्याचे काही कारण नाही. वास्तविक पाहता, एड्सची बाधा असणाऱ्या रोग्याच्या घरात त्याच्या बाधित नसणाऱ्या इतर कौटुंबिक सदस्यांनी, टॉवेल, खाण्याची भांडी आणि टूथब्रश यांची एकत्र सहभागिता केली. *
याचे कारण असे की, हा भयानक विषाणू एखाद्याच्या रक्तात, वीर्यात किंवा योनीद्रव्यात असतो. अनेक बाबतीत, मग, एड्सची लागण समलिंगी संभोग किंवा विषमलिंगी संभोगाद्वारे होते. * अनेक बळी पडलेल्यांना हा रोग तेव्हा जडला जेव्हा त्यांनी, एच आय व्ही विषाणू असलेल्या व्यक्तींनी वापरलेल्या सुया किंवा सिरिंजेस वापरले. * आणि जरी डॉक्टरांचे असे म्हणणे आहे की, सक्रिय चाळणीद्वारे हा धोका “बहुतांशी काढून टाकला गेला आहे” तरीही रक्त संक्रमणाद्वारे एड्सची लागण होऊ शकते.
यास्तव, विवाहाआधी लैंगिक समागम करणारा, किंवा बेकायदेशीरपणे मादक पदार्थांचा प्रयोग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला एड्सची लागण होण्याचा मोठा धोका आहे. हे खरे की, संभवनीय लैंगिक जोडीदार आजारी दिसत नसेल. परंतु, एच आय व्हीविषयी सल्ला आणि परीक्षा: वस्तुस्थिती, वादविषय आणि उत्तरे [इंग्रजी] ही पुस्तिका आठवण करून देते की: “कोणाकडे पाहून तुम्ही सांगू शकत नाही की तिला किंवा त्याला एच आय व्हीची लागण झाली आहे. काही जण दिसायला निरोगी व स्वास्थ्यपूर्ण वाटत असले तरी त्यांना लागण झालेली असेल. यास्तव ज्यांना एच आय व्हीची लागण झालेली आहे अशा लोकांना स्वतःला ते माहीत नसते.”
“सुरक्षित संभोग?”
यास्तव, अनेक आरोग्य सेवक आणि शिक्षक कंडोमचा (निरोध) वापर करण्यास उत्तेजन देतात. * दूरदर्शन जाहिराती, बीलबोर्डस्, आणि शालेय व्याख्यानातून हा संदेश पसरविला जातो की संततीनियमन साधनांचा वापर, संभोग “सुरक्षित,” किंवा निदान “सुरक्षित” करतो. काही शाळांमध्ये तर, विद्यार्थांसाठी कंडोमचे वाटप केले. अशा प्रकारच्या मतप्रचारामुळे प्रोत्साहित होऊन, पूर्वी कधीही इतके नव्हते तितक्या अधिक प्रमाणात युवक त्यांचा वापर करत आहेत.
असे असूनही, “सुरक्षित संभोग” किती प्रमाणात सुरक्षित आहे? अमेरिकन रेड क्रॉसचे एक माहितीपत्रक म्हणते: “लागण न होण्याच्या शक्यतेला कंडोम्स् सुधारू शकतात.” परंतु तुम्ही, नेहमीच नाशकारक ठरलेला रोग टाळण्यासाठी ‘तुमच्या संभवनीयतेत सुधारणा’ केल्यास तुम्हाला सुरक्षित वाटेल का? यु.एस. सेंटर्स फॉर डिजीस कंट्रोल कबूल करते की: “रबरी कंडोम्स्, एच आय व्हीची लागण होण्यापासून व इतर गुप्तरोगांपासून सुरक्षा पुरवितात असे दाखवले जाते . . . परंतु ते बिनधोक वापरता येतील असे नाही.” खरेच, ते तुटू शकतात, फाटू शकतात किंवा संभोगाच्या वेळी बाहेरही येऊ शकतात. टाईम मासिकानुसार, “कंडोमच्या अपयशाचे प्रमाण १० ते १५ टक्के होऊ शकते!” तर मग, अपयशाच्या उच्च प्रमाणाच्या धोक्यात तुम्ही तुमच्या जीवनाला घालणार का? बिकट परिस्थितीत आणखी भर घालण्यासाठी, अमेरिकेतील, लैंगिकरीत्या सक्रिय युवक कंडोम वापरतात.
यास्तव, नीतीसूत्रे २२:३ मधील सूचना किती उचित आहे: “चतुर मनुष्य अरिष्ट येता पाहून लपतो; भोळे पुढे जातात आणि हानी पावतात.” एड्सची लागण होण्यापासून सावध राहण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे, अमली पदार्थ आणि अनैतिक समागमापासून पूर्णपणे दूर राहणे. करण्यापेक्षा बोलणे सोपे असे तुम्हाला वाटते का? युवक विशेषकरून, ज्या प्रचंड दबावाचा सामना करतात त्या दृष्टिकोनातून पाहिल्यावर अनेकांना असेच वाटते.
दबाव
‘तारुण्याच्या बहरात’ लैंगिक इच्छा फार तीव्र असतात. (१ करिंथकर ७:३६, न्यूव) यासोबत, दूरदर्शन आणि चित्रपट यात आणखी भर घालतात. काही अभ्यासांनुसार, तरूण प्रत्येक दिवशी, दूरदर्शन पाहण्यात पाच तास घालवतात, ज्यामध्ये बहुतेक कार्यक्रम लैंगिक गोष्टींवर असतात. परंतु दूरदर्शनच्या काल्पनिक जगात, लैंगिक गोष्टींचा काही परिणाम नसतो. एका अभ्यासाने असे प्रकट केले की अमेरिकेतील दूरदर्शनवर, “अविवाहीत विषमलिंगी जोडप्यांना, अनेकवेळा विवाहीत पुरूष किंवा स्त्रियांपेक्षा, आठ ते दहा वेळा लैंगिक समागम करताना दाखवले जाते. संततीनियमन पद्धती वापरण्यासाठी तर कधीही सांगितले जात नाही, परंतु स्त्रिया क्वचितच गर्भवती होतात; वेश्या किंवा समलिंगी यांना सोडून, पुरूष आणि स्त्रियांना फार कमी प्रमाणात गुप्तरोगांची लागण होते.”—सेंटर फॉर पॉप्युलेशन ऑप्शन्स.
अशा अधिक प्रमाणाचे कार्यक्रम तुमच्या वर्तणूकीवर काही परिणाम घडवून आणतील का? होय, गलतीकरास ६:७, ८ मधील पवित्र शास्त्रीय तत्त्वांनुसार: “फसू नका; देवाचा उपहास व्हावयाचा नाही; कारण माणूस जे काही पेरितो त्याचेच त्याला पीक मिळेल. जो आपल्या देहस्वभावासाठी पेरतो त्याला देहस्वभावापासून नाशाचे पीक मिळेल.” एका ४०० युवकांच्या निरीक्षणामध्ये हे पाहण्यात आले की “लैंगिक गोष्टींनी भरलेले कार्यक्रम अधिक प्रमाणात पाहणारे लोक, कमी प्रमाणात पाहणाऱ्यांपेक्षा अधिक, लैंगिक कार्यांमध्ये सक्रिय होतात.”
आणखी एक शक्तीशाली प्रभाव म्हणजे समवस्कांकडून दबाव. “माझ्याशी सुसंगत असणाऱ्या लोकांना मी शोधत होतो, परंतु ते फार कठीण आहे, मी खरोखरच स्वतःला अनेकवेळा, रोगट परिस्थितींमध्ये घातले . . . मला एड्स असलेल्याचे निदान ठरविले गेले,” असा विलाप, डेवीड नावाचा एक तरूण करतो. अशाचप्रकारे, पवित्र शास्त्र काळी देखील युवकांना समवस्कांकडून दबावाचा सामना करावा लागत होता. त्याबद्दल पवित्र शास्त्राचा कोणता सल्ला आहे? नीतीसूत्राच्या लेखकाने म्हटले, “माझ्या मुला, पापी जन तुला भुलथाप देतील तर तिला वश होऊ नको.”—नीतीसूत्रे १:१०.
नाही म्हणणे
“सुरक्षित संभोगाला” अनुमती देणारे असा वादविवाद करतात की अलिप्तता ही अव्यवहार्य आहे. परंतु शेवटी, अनैतिकतेला वाव देण्यात ते मदत करते का? एका युवकाने कबूल केले की ते युवकांना केवळ गोंधळात टाकते व तो म्हणाला: “लोक आम्हाला सांगतात की लैंगिक समागमासाठी कोणी विचारल्यास थेटपणे नाही म्हणायचे, आणि निरोगी आणि शुद्ध राहण्यासाठी ते चांगले आहे. परंतु त्याच वेळी ते कंडोमचे वाटप देखील करतात व कोणत्याही दुष्परिणामांविना समागम कसा करावा ते सांगतात.”
अशा प्रकारच्या नैतिक उलाढालीचे शिकार होऊ नका. पवित्र शास्त्र हे जुन्या पद्धतीचे वाटत असले तरी तुम्हाला, ते एड्सची लागण होण्याच्या धोकेदायक संगतीपासून दूर राहण्यास आग्रहाने सांगते. ‘रक्त वर्ज्य करा’ या पवित्र शास्त्राच्या आज्ञेचे पालन तुम्ही केले तर, तुम्हाला एड्सची लागण रक्त संक्रमणाकरवी होणार नाही. (प्रे. कृत्ये १५:२९) “अमली पदार्थ” यांच्या विरूद्ध पवित्र शास्त्राचा सल्ला ऐका आणि शिरेतून अमली पदार्थ घेण्यासाठी असलेल्या दूषित सुयांतून तुम्हाला लागण होईल अशी भीती बाळगण्याची काही गरज नाही. (गलतीकर ५:२०; प्रकटीकरण २१:८) विशेषकरून पवित्र शास्त्राचा लैंगिक नैतिकतेसाठी असलेला नियम तुम्हाला सुरक्षित ठेवील. पवित्र शास्त्र आज्ञा देते: “जारकर्माच्या प्रसंगापासून पळ काढा, जे कोणतेही दुसरे पापकर्म मनुष्य करतो ते शरीराबाहेरून होते. परंतु जो जारकर्म करतो तो आपल्या शरीराबाबत पाप करतो.” (१ करिंथकर ६:१८) ह्या शब्दांच्या सूज्ञतेवर, एड्समुळे निर्माण होणारी आणीबाणीची परिस्थिती जोर देते.
एक युवक अनैतिकतेपासून कसा दूर “पळू” शकतो? अनेक वर्षांपासून “तरूण लोक विचारतात . . ” या लेखांनी, पुष्कळ व्यावहारिक सूचना दिल्या आहेत, जसे की लोकांचा समूह असतो तेथे भेटीगाठी करणे, धोक्यात टाकणाऱ्या परिस्थिती टाळणे (जसे की एखाद्या खोलीत किंवा घरात किंवा उभ्या गाडीत विरूद्ध लिंगी व्यक्तीसोबत एकटे राहणे), स्नेहभाव व्यक्त करताना मर्यादा ठेवणे, अमली पदार्थांचे सेवन करण्यापासून दूर राहणे (जे अनेकदा चांगल्या निर्णयशक्तीला अडथळा निर्माण करते), तसेच प्रणयराधनेची स्थिती निर्माण झाल्यावर, ठामपणे नाही म्हणणे. * कोणत्याही घटनेत, कोणालाही तुमच्या वर्तणूकीवर दबाव टाकण्यासाठी वाव देऊ नका जे शारीरिकरीत्या धोकादायक तसेच आध्यात्मिकरीत्या नाशकारक असू शकते. (नीतीसूत्रे ५:९-१४) न्यूजवीक मासिकातील एका लेखात संदर्भ घेतलेल्या एमी नावाच्या अविवाहीत तरूण स्त्रीने विचारले: “तुम्हाला तुमचे जीवन कोणा दुसऱ्याच्या हातात द्यायची इच्छा आहे का?” माध्यामिक शाळेतून पदवी मिळवण्याआधी तिला एका मुलाकडून एच आय व्हीची लागण झाली. तिने स्पष्टपणे विचारले: “जीव ओवाळून टाकावा इतक्या पात्रतेचा तो मुलगा किंवा ती मुलगी आहे का? मला त्याबद्दल संशय येतो.” (g93 9⁄8)
[तळटीपा]
^ MR gbr13-4 च्या अंकात आलेल्या “तरूण लोक विचारतात . . . एड्स—मला काही धोका आहे का?” हा लेख पाहा.
^ अमेरिकेचे माजी सर्जन जनरल डॉ. सी एवरेट कुप यांनी संशयखोरांना असे म्हणून उत्तर दिले की: “ह्या देशात, १९८१ मध्ये एड्सच्या पहिल्या घटनेचा अहवाल दिला गेला. व आता, एड्स साध्या, लैंगिक संबंधाविना फैलावत आहे हे आम्हाला कळू शकले असते.”
^ यामध्ये तोंडातून आणि गुदद्वारामार्गे संबंध देखील समाविष्ट आहे.
^ यु.एस. सेंटर्स फॉर डिजीस कंट्रोल पुढे असा इशारा देते: “तुम्हाला तुमचे कान टोचून घ्यायचे असतील . . . तर पूर्णपणे नवे किंवा निर्जंतुक साहित्य वापरणाऱ्या, योग्यता असणाऱ्या व्यक्तीकडेच तुम्ही जात आहात याची खात्री करा. प्रश्न विचारण्यास लाजू नका.”
^ अन्न, अमली पदार्थ ग्राहक मंडळ [इंग्रजी] हे मासिक असे स्पष्टीकरण देते की: “कंडोम हे अत्यंत पातळ रबरी साधन आहे जे संपूर्ण शिस्नावर चढवले जाते. वीर्य, रक्त अथवा योनीद्रव्य, एका व्यक्तीतून दुसऱ्या व्यक्तीत जाण्यापासून ते अडथळा, किंवा भींतीसारखा बांध घालते, जेणेकडून गुप्तरोगांपासून संरक्षण मिळते.”
^ उदाहरणार्थ, एप्रिल २२, १९८६; एप्रिल २२, १९८९; व एप्रिल २२, १९९२ च्या इंग्रजीतील अवेक! मासिकातील “तरूण लोक विचारतात . . ” हे लेख पाहा.
[१७ पानांवरील चित्र]
लैंगिक दबावाला शरण जाणे एड्सकडे निरवू शकते