व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ओझोन छिद्राखाली विलक्षण व भीतीदायक घटना

ओझोन छिद्राखाली विलक्षण व भीतीदायक घटना

ओझोन छिद्राखाली विलक्षण व भीतीदायक घटना

चिलीच्या अतिदक्षिणेकडील, पुनटा एरेनास शहरातील, १,२५,००० रहिवाशांनी, “जगाच्या अंतानजिक” जगत असल्याबद्दलची थट्टा केली होती. परंतु मागच्या वर्षी एक विलक्षण व भीतीदायक अपूर्व घटना त्या थट्टेला काहीसे खरोखर बनविते. काही शास्त्रतज्ञ असा विचार करू लागले आहेत की “पृथ्वीवर काही तरी नवीन” असे होत असेल. जानेवारी १२, १९९३ च्या द वॉल स्ट्रीट जर्नल मधील अहवाल, अशी सविस्तर माहिती देते.

मॉगॉयॉनेसच्या स्थानिक विश्‍वविद्यालयात, ॲटमोसफ्येरिक स्टडीज्‌ ग्रुपचे सदस्य, फेलिक्स सॉमोरॉनो असा अहवाल देतात: “ऑक्टोबरमध्ये, आतापर्यंतच्या सर्वात कमी पातळीची नोंद आम्ही केली. ओझोनचा थर तीन दिवस नेहमीपेक्षा अर्धा होऊन धोक्याच्या पातळीपेक्षा खाली गेला होता.” त्यामुळे ओझोनच्या थरातील छिद्रातून येणाऱ्‍या अल्ट्रा व्हायलेट किरणोत्सर्गाच्या वाढलेल्या मात्रेने जे परिणाम होतात त्यात, “त्वचेचा कॅन्सर, मोतीबिंदू शिवाय सागरी अन्‍नसाखळी मूळाधार तरंगणाऱ्‍या एक पेशीय वनस्पतींचा नाश या गोष्टींचा अंर्तभाव होतो” असे त्या जर्नलने म्हटले.

मागच्या वर्षी, “रॉडोवॉन विलिचीचची १,२०० गुरे नेत्रश्‍लेष्मलेच्या जळजळीमुळे पूर्णपणे आंधळी झाली व ते एकमेकांवर बंम्पर कारप्रमाणे आदळली, आणि पाच गुरांना त्यांचे अन्‍न पाहता आले नाही म्हणून उपाशी मरावे लागले.”

त्या जर्नलचा अहवाल पुढे असे म्हणतो: “होसे बॉमॉन्ड देखील अशीच कहाणी सांगतो. त्याच्या कुरणापासून १२५ किलो मीटर दूर मॉगॉयॉनेसचे अरुंद रमणीय दृश्‍य आहे, परंतु त्याची ४,३०० मेंढरे ते दृश्‍य किंवा दुसरं काहीच पाहू शकत नाहीत. त्यांच्यातील १० टक्के मेंढरांवर डोळ्यांचे उपचार केले जात आहेत, आणि मागच्या वर्षी त्याच्या कळपातील २०० मेंढरांना अंधत्त्व आले.”

त्वचा विज्ञान तज्ज्ञ हायमे ऑबॉरकॉ असा युक्‍तीवाद करतात की, “येथे जे काही घडत आहे ते जगात पूर्णपणे नवे आहे. मंगळाचे लोक पृथ्वीवर येऊन राहिल्याप्रमाणे हे विलक्षण असे आहे.” तो अनेक रुग्णांना पाहतो ज्यांना त्वचा रोग आहे, उन्हामुळे काळवंडलेल्या लोकांची संख्या वाढत चालली आहे, आणि नव्या त्वचेच्या कॅन्सरच्या प्रमाणापेक्षा मेलानोमा कॅन्सर, प्रमाणित नमुन्यापेक्षा पाच पटीने अतिघातक आहे. त्यांना व्यक्‍तिगतपणे याची खात्री पटली आहे की याचा वाढत्या अल्ट्रा व्हायोलेट किरणोत्सर्गासोबत संबंध आहे.

पुनटा एरेनासचे सामान्य लोक ही गोष्ट गांभीर्याने घेत आहेत. एका औषधालयाने उन्हापासून संरक्षण होण्यासाठीच्या पडद्याची मागच्या वर्षापेक्षा ४० टक्के अधिक विक्री केली. एक टेलिफोनची सेवा अल्ट्रा व्हायलेट किरणोत्सर्गाच्या थराची माहिती देत असते. तीन स्थानिक रेडिओ स्टेशन देखील याची माहिती देत असतात. शाळांमध्ये मुलांना टोपी, उन्हापासून संरक्षण मिळण्यासाठी वस्त्र, व गॉगल्स घालण्यासाठी सांगितले जाते. एका दुकानात, गॉगल्सचा सेल ३० टक्क्यांनी वाढला. आणि “एक स्थानिक शेतकरी त्याच्या मेंढरांसाठी गॉगल्स बनवण्याच्या प्रयत्नात आहे.”

त्या क्षेत्राचा गव्हर्नर म्हणतो: “मी वस्तुस्थितीला नाकरत नाही. तुम्ही काय करू इच्छिता? . . . आम्ही हे सर्वच क्षेत्र छताखाली आणू शकत नाही.” (g93 9⁄22)