व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कधीही राहणार नाही अशी वेदना

कधीही राहणार नाही अशी वेदना

कधीही राहणार नाही अशी वेदना

पहिल्या मनुष्याच्या अपूर्णतेमुळे जी वेदना अनुभवली जाते, ती पवित्र शास्त्र अभिवचनाच्या पूर्णतेत काढून टाकली जाईल. या वेदनेमध्ये जिला कायमची वेदना असे वर्णिले जाते तिचा समावेश होतो.

रोग किंवा इजेबद्दल इशारा देणारी रचना असण्याऐवजी, कायमची वेदना एक “खोटा गजर” आहे जी कधी बंदच होत नाही. याच वेदनेमुळे पीडित जण सुटकेच्या शोधार्थ वर्षाला कोटी डॉलर्स खर्च करतात. ती लाखोंचे जीवन उद्‌ध्वस्त करते.

वेदना तज्ज्ञ, डॉ. रिचर्ड ए. स्टर्नबॉक यांनी लिहिले: “तीव्र वेदनेप्रमाणे कायमची वेदना हे लक्षण नाही; कायमची वेदना हे इशाऱ्‍याचे चिन्ह नाही.” तात्कालिक औषध (इंग्रजी) जोर देऊन म्हणते: “कायमच्या वेदनेचा काही उद्देशच नाही.”

यास्तव, अलिकडील वर्षात पुष्कळ डॉक्टर अशा वेदनेला ती स्वतःच खरोखर पीडा असण्याच्या दृष्टिकोनातून पाहतात. वेदनांवरील आजचे उत्तम पाठ्यपुस्तक, वेदनांची व्यवस्था (इंग्रजी) यात डॉ. जॉन जे. बॉनीका समजावून सांगतात की, “तीव्र वेदनांमधील वेदना, रोग किंवा इजेचे एक चिन्ह असते. कायमच्या वेदनेमध्ये ती वेदनाच एक रोग आहे.”

वेदना समजून घेण्याचे प्रयत्न

वेदना काय आहे हे अजूनही पूर्णपणे समजलेले नाही. अमेरिकन आरोग्य (इंग्रजी) या नियतकालिकाने म्हटले, “वेदना काय आहे हे समजण्याच्या अनंत आकर्षणामुळे वैज्ञानिक त्यावर खूप प्रयत्न करत आहेत.” काही शतकांआधी, त्यांनी असे गृहीत धरले की, वेदना ही, विशेष चेता-अंतिमांद्वारे जाणवल्या जाणाऱ्‍या दृष्टी, श्रवणशक्‍ती व स्पर्श या संवेदनांसारखीच, विशिष्ट चेतातंतूंमार्फत वाहिली जाणारी संवेदना आहे. परंतु, वेदनेची ही वरकरणी साधेपणाची कल्पना खोटी ठरली आहे. कशी बरे?

एका घटनेने याविषयी नवीन समज प्राप्त करण्याकडे निरवले. ती एका तरुण स्त्रीच्या परीक्षणाबद्दल होती. तिला वेदनेची संवेदना होत नव्हती. १९५५ मध्ये तिच्या मृत्युनंतर तिच्या मेंदू व चेता संस्थेचे जे परीक्षण केले गेले त्यावरून, वेदनेच्या कारणाची एक संपूर्ण नवीन कल्पना निर्माण झाली. जुलै ३०, १९६० च्या तारिका सप्ताहाचे नियतकालिक (इंग्रजी), याने म्हटले की डॉक्टर “चेता-अंतिमांसाठी शोधत होते. [तिला] त्या नसत्या तर, त्यामुळे ती मुलगी चेतनाहीन झाली असती. परंतु, त्या उपस्थित होत्या व स्पष्टपणे अगदी ठणठणीत होत्या.

“नंतर, डॉक्टरांनी चेतातंतूंचे ज्यांच्यामार्फत चेता-अंतिमे मेंदूला जोडली जातात असे समजले जाते त्यांचे परीक्षण केले. येथेच नक्की काहीतरी दोष दिसण्याची संभावना होती. परंतु तसे नव्हते. जितके दिसत होते त्याप्रमाणे, जखमेमुळे बिघडलेल्या तंतूंशिवाय इतर सर्व तंतू निर्दोष होते.

“शेवटी, त्या मुलीच्या मेंदूची तपासणी केली गेली. परंतु, पुन्हा कोणत्याच प्रकारचा दोष सिद्ध झाला नाही. सर्व उपलब्ध माहिती व कल्पनेप्रमाणे या मुलीला वेदना जाणवावयास हव्या होत्या. परंतु तिला गुदगुल्या देखील जाणवत नव्हत्या.” तथापि, त्वचेवर दाब दिल्यावर तिला संवेदना होत होती. तिला टाचणी टोचल्याने दुखत नसले तरी, ती टाचणीच्या डोक्याच्या व टोकाच्या स्पर्शातील फरक सांगू शकत होती.

रॉनल्ड मेलजॅक यांनी १९६० च्या दशकात वेदनांचे स्पष्टीकरण देण्यासाठी एका नवीन प्रचलित तत्त्वाला सह-संपादित केले. ते तिच्या गुंतागुंतीचे आणखी एक उदाहरण देतात. त्यांनी असे सांगितले: “मिसेस. हल्ल तिच्या अस्तित्वात नसलेल्या पायाकडे [तो कापून काढून टाकला होता] नेहमी बोट दाखवीत असे. तिच्या पायांच्या बोटांमधून लाल गरम लोखंडी सळी घातल्यासारख्या आगीसारख्या तप्त वाटणाऱ्‍या वेदनांबद्दल ती सांगत असे.” मेलजॅकने १९८९ मध्ये मॅक्लीन्स्‌ नियतकालिकाला सांगितले की, ते “ज्यास ‘अभासमय’ वेदना म्हणतात त्याच्या स्पष्टीकरणाच्या शोधात ते तेव्हादेखील” होते. त्याशिवाय, उल्लेखित वेदना ज्याला म्हणतात ती देखील आहे. यामध्ये, एखाद्या व्यक्‍तीला शरीराच्या एका भागात काही दोष असतो परंतु वेदना मात्र दुसऱ्‍या भागात जाणवतात.

मन व शरीर दोन्ही गोवलेले आहेत

“मन व शरीरातील फारच गुंतागुंतीची परस्पर क्रिया,” अशाप्रकारे आता वेदनेला ओळखले जाते. मेरी एस. शेरीडन १९९२ च्या अमेरिकेतील वेदना (इंग्रजी) या त्यांच्या पुस्तकात म्हणतात की, “वेदनेचा अनुभव इतका मानसिक आहे की, कधीकधी मन त्याचे अस्तित्व नाकारू शकते व एखादी तीव्र जखम नाहीशी झाल्यावर बऱ्‍याच कालावधीनंतर ते तिला निर्माण करू शकते व टिकवू शकते.”

एखादा, वेदनेला कसा प्रतिसाद देतो यामध्ये एखाद्याची मनःस्थिती, एकाग्रता, व्यक्‍तिमत्व, सूचनेला दाखवली जाणारी संवेदनशीलता तसेच इतर सर्व घटक महत्त्वपूर्ण आहेत. वेदना अधिकारी, डॉ. बॉनीका यांनी लिहिले, “भय व चिंतेमुळे प्रतिसादांची अतिशयोक्‍ती होते.” अशाप्रकारे एखादा, वेदना जाणण्यास शिकतो. मानसशास्त्राचे प्राध्यापक, डॉ. वील्बर्ट फोरडाईस जे वेदनांच्या समस्यांचे तज्ज्ञ आहे ते असे म्हणतात:

“ती वेदना खरी आहे का, हा प्रश्‍न नाही. निश्‍चितच ती खरी आहे. परंतु, प्रश्‍न हा आहे की, तिला प्रभावीत करणारी महत्त्वपूर्ण कारणे कोणती आहेत. जेवणाआधी मी तुमच्याशी हॅम सॅन्डवीचबद्दल बोललो तर, तुमच्या तोंडाला पाणी सुटते. ते अगदीच खरे आहे. परंतु, तशी परिस्थिती निर्माण झाल्याने तसे होते. तेथे कोणतेही हॅम सॅन्डवीच नाही. मानवजात परिस्थिती निर्माण करणाऱ्‍या गोष्टीला अतिशय संवेदनाक्षम आहे. ते सामाजिक वागणूक, तोंडाला पाणी सुटणे, रक्‍त दाब, अन्‍न पचनाची गती, वेदना व सर्व प्रकारच्या गोष्टींना प्रभावीत करते.”

तुमच्या भावना व मनःस्थिती या वेदनेला तीव्र करू शकतात त्याचप्रमाणे, त्या तिला दाबू शकतात किंवा मंद करू शकतात. एका उदाहरणाचा विचार करा: एका मज्जातंतू शल्यचिकित्सकाने सांगितले की, युवक असताना तो एका मुलीमुळे इतका मोहित झाला होता की, तिच्यासोबत एका अतिथंड भिंतीवर बसलेला असताना त्याला तीव्र थंडीची किंवा वेदनेची कोणतीच संवेदना जाणवली नाही. तो म्हणतो, “मला जवळजवळ हिमबाधाच झाली होती. आम्ही तेथे ४५ मिनिटांसाठी बसलो होतो परंतु, मला काहीच जाणवले नाही.”

अशी उदाहरणे पुष्कळ आहेत. खेळात अगदीच गुंग झालेले फुटबॉल खेळाडू किंवा युद्धात तल्लीन झालेल्या सैनिकांना वाईटरितीने जखमा झाल्या असतील परंतु, त्या वेळी त्यांना थोडी किंवा काहीच वेदना जाणवत नाहीत. डेवीड लिवींगस्टोन या प्रसिद्ध आफ्रिकेच्या शोधक प्रवाशाने त्याच्यावर सिंहाने हल्ला केल्याबद्दल सांगितले. “भयानक कुत्र्याने उंदराला हलवावे” असे त्याने त्यास हलवले. “त्या हादऱ्‍यामुळे . . . स्वप्नात असल्यासारखे वाटले ज्यामध्ये वेदनेची संवेदना नव्हती.”

यहोवा देवाचे सेवक, जे त्याच्याकडे संपूर्ण आत्मविश्‍वास व निर्भरतेने पाहतात त्यांना देखील काही प्रसंगी त्यांची वेदना दाबून टाकल्याचा अनुभव होतो हे लक्ष घेण्याजोगे आहे. एका मार खाल्लेल्या ख्रिश्‍चनाने असे म्हटले, “फारच आश्‍चर्याचे आहे की, पहिल्या काही तडाख्यांनंतर मला नंतरचे तडाखे जाणवलेच नाहीत. त्याऐवजी, ते दूर कोठेतरी ढोल वाजवण्याच्या आवाजाप्रमाणे मला केवळ ऐकू येत असल्यासारखे वाटले.”—फेब्रुवारी २२, १९९४, अवेक!, पृष्ठ २१.

वेदनांच्या संवेदनांची तीव्रता कशी कमी केली जाते

वेदनेच्या काही गोंधळविणाऱ्‍या पैलूंचे स्पष्टीकरण देण्याच्या प्रयत्नात, मानसशास्त्राचे प्राध्यापक, रॉनल्ड मेलजॅक आणि शरीर रचनाशास्त्राचे प्राध्यापक, पॅट्रीक वॉल यांनी १९६५ मध्ये सर्व मान्य वेदनांची गेट-कंट्रोल कल्पना बनवली. डॉ. बॉनीकांच्या वेदनांच्या पाठ्यपुस्तकाच्या १९९० आवृत्तीने म्हटले की हे तत्त्व, “वेदनांचे संशोधन व उपचाराच्या क्षेत्रातील सर्वात महत्त्वपूर्ण विकासांपैकी एक होते.”

या तत्त्वाप्रमाणे, पाठीच्या कण्यातील थिओरेटीकल गेटचे उघडणे व बंद होणे यामुळे, मेंदूला जाणाऱ्‍या वेदना संकेतांना अनुमती मिळते किंवा त्यांना अडवले जाते. गेटमध्ये वेदनांशिवाय इतर संवेदनांनी घोळका केला तर, मेंदूला पोहंचणाऱ्‍या वेदनांचे संकेत कमी होऊ शकतात. उदाहरणार्थ, किंचित भाजलेल्या बोटाला घासल्यामुळे किंवा हलवल्यामुळे वेदना कमी होतात कारण, वेदनांच्या संकेतांमध्ये अडथळा आणण्यासाठी वेदनांशिवाय इतर संकेतांना पाठीच्या कण्याकडे पाठवण्यात येते.

१९७५ मध्ये असा शोध लागला की, आपले शरीर स्वतःचे एन्डॉर्फीन्स्‌ नावाचा अफूसारखा पदार्थ तयार करते. यामुळे, वेदनांच्या घोटाळविणाऱ्‍या पैलूंना समजण्याच्या संशोधनात अधिक मदत मिळाली. उदाहरणार्थ, काही लोकांमध्ये अधिक एन्डॉर्फीन्स्‌ उत्पन्‍न होत असल्यामुळे त्यांना वेदनांची कमी किंवा काहीच संवेदना होत नसेल. वेदना अक्युपंक्चरने कमी का होतात किंवा नाहीशा का होतात या गूढ गोष्टीबद्दल देखील एन्डॉर्फीन्स्‌ समजावून सांगतील. ती एक वैद्यकीय पद्धत आहे ज्यामध्ये, शरीरात केसाऐवढ्या बारीक सुया घुसवल्या जातात. प्रत्यक्ष पाहणाऱ्‍यांच्या अहवालांनुसार, वेदना निवारक म्हणून केवळ अक्युपंक्चरचा उपयोग करून रुग्ण जागा, जागृत व आरामाच्या स्थितीत असताना हृदयाची उघडी शस्त्रक्रिया केली गेली आहे! अशा वेळी, वेदना का जाणवल्या नाहीत?

काही असा विश्‍वास करतात की, सुयांमुळे एन्डॉर्फीन्स्‌चे उत्पादन उत्तेजित होते. ते काही काळापुरते वेदना शमविते. अंक्युपंक्चरने वेदना नाहीशी होण्याची ही दुसरी शक्यता अशी आहे की, त्या सुया चेतातंतूंना उद्दीपित करतात ज्या वेदनांशिवाय इतर संकेत पाठवतात. पाठीच्या कण्यातील मार्गात हे संकेत गर्दी करतात व वेदनांच्या संकेतांना त्यातून शिरून मेंदूपर्यंत, जेथे वेदना जाणवली जाते तेथे, पोंहचू देत नाहीत.

गेट कंट्रोल सिद्धांत आणि शरीर स्वतःचे वेदना निवारक पदार्थ उत्पन्‍न करते या वस्तुस्थितीवरूनही एखाद्याची मनःस्थिती, विचार व भावना यांचा वेदनेच्या प्रमाणावर परिणाम का होतो हे स्पष्ट होते. यास्तव, सिंहाच्या अचानक हल्ल्याच्या धक्क्यामुळे लिवींगस्टोनच्या शरीरातील एन्डॉर्फीन्स्‌चे उत्पादन क्रियाशील झाले असेल तसेच वेदनांच्या संकेतांशिवाय इतर संकेतांनी त्याच्या पाठीच्या कण्यामध्ये गर्दी केली असावी. परिणामास्तव, त्याच्या वेदना कमी झाल्या.

तथापि, पूर्वी सांगितल्याप्रमाणे, एखाद्याची मनःस्थिती व भावनांचा विरुद्ध परिणाम होऊ शकतो. विशिष्ट आधुनिक जीवनाच्या दररोजच्या अधिक दबावामुळे चिंता, तणाव व स्नायूंचे आकुंचन निर्माण होऊन एखाद्या व्यक्‍तीच्या वेदनांची संवेदना वाढू शकते.

तरीसुद्धा आनंदाची गोष्ट म्हणजे, वेदना सहन करणाऱ्‍यांना आशावादी असण्यासाठी कारण आहे. हे अशासाठी की, पुष्कळ रुग्णांना आता उपचाराच्या सुधारित पद्धतींचा लाभ होत आहे. या पीडेबद्दल चांगली समज प्राप्त झाल्यामुळे अशा सुधारणा झाल्या आहेत. अमेरिकन ॲकेडेमी ऑफ पेन मेडिसीन याचे अध्यक्ष डॉ. श्रीधर वासुदेवन यांनी असे सांगितले: “वेदना ही स्वतःमध्येच एक रोग आहे, या गोष्टीमुळे ८० च्या दशकात उपचारामध्ये बदल घडले.”

वेदनांच्या उपचारामध्ये बदल कसा घडवून आणला गेला? कोणते उपचार प्रभावकारी ठरत आहेत? (g94 6/22)

[७ पानांवरील चित्रं]

अक्युपंक्चरने वेदना कमी किंवा नाहीशा कशा होतात?

[चित्राचे श्रेय]

H. Armstrong Roberts