व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

क्रूर शत्रूपेक्षाही अधिक

क्रूर शत्रूपेक्षाही अधिक

क्रूर शत्रूपेक्षाही अधिक

सतत तीव्र वेदना, लोकांचे जीवन उद्‌ध्वस्त करू शकते. ती त्यांची शांती, आनंद व उपजीविका लुबाडते. त्यामुळे जीवन इतके कष्टमय होते की, काहीजण आत्महत्येद्वारे मुक्‍ती मिळवतात. अल्बर्ट स्वीट्‌झर या वैद्यकीय मिशनऱ्‍याने असा निष्कर्ष काढला: “मानवजातीवर, वेदना मृत्युपेक्षाही दुष्ट राजा आहे.”

प्रत्यक्षात, लाखो लोक वाईटरितीने पीडित आहेत. एका फ्रेंच शस्त्रवैद्याने म्हटले, ‘आम्हाला, परिभ्रमण करणाऱ्‍या पृथ्वीचे आवाज ऐकू येतील अशा विवरावरील असीम अंतराळात लोंबत ठेवणे शक्य असते तर, पीडित मानवजातीची एकाच आवाजातील वेदनांची नैसर्गिक आरोळी ऐकू आली असती.’

निश्‍चितच, ख्रिस्ती प्रेषित पौलाने १,९०० वर्षांआधी जे लिहिले त्याला आज अधिक महत्त्व आहे: “सबंध सृष्टि आजपर्यंत कण्हत आहे व वेदना भोगीत आहे.”—रोमकर ८:२२.

आरोग्याची मोठी समस्या

आठपैकी एक अमेरिकन व्यक्‍ती, ओस्टीयोआरथ्रिटीस या सर्वसामान्य सांधेदुखीच्या प्रकाराची भयंकर पीडा अनुभवते. पुष्कळ लोकांना यातनादायक पाठ दुखी असते. इतरांना कर्करोग व हृदयविकाराच्या दुःखदायक परिणामांना सहन करावे लागते.

आणखी लाखोजण अतियातनाकारक डोकेदुखी, दातदुखी, कानदुखी, मूळव्याध व इतर पुष्कळ रोग व जखमांनी पीडित आहेत. अलिकडील वर्षात, अमेरिकन लोकांनी केवळ शिफारस न केलेल्या वेदना निवारक औषधांवर २१० कोटी डॉलर्स खर्च केले, तेव्हा वेदनेला, “अमेरिकेची गुप्त साथ” असे म्हटले गेले आहे यात काही आश्‍चर्य नाही.

जॉन जे. बॉनीका, कदाचित वेदनांचे प्रमुख अधिकारी, यांनी असे म्हटले: “डॉलर्स व सेंटस्‌च्या तसेच मानवी पीडेच्या दृष्टिकोनातून पाहिले तर, वास्तविकतेतील सर्व आरोग्याच्या एकत्रित केलेल्या समस्यांपैकी कायमची वेदना ही सर्वात महत्त्वपूर्ण आहे.”

वेदनारहित जीवन?

या कठोर वास्तविकतेसमोर, वेदनारहित जगाची शक्यता असल्याबद्दल सांगणे अविचारीपणाचे वाटेल. यास्तव, “[देव] त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकील . . . शोक, रडणे व ष्ट [वेदना] ही नाहीत,” असे जे पवित्र शास्त्र म्हणते ते देखील असंभवनीय वाटेल.—प्रकटीकरण २१:४.

तरीसुद्धा, वेदनारहित जगाची शक्यता असंभवनीय नाही. परंतु क्षणभर विचार करा. त्या शास्त्रवचनाचा खरोखर काय अर्थ होतो? आज जगात असे पुष्कळ लोक आहेत ज्यांना वेदनांची जाणीव नाही. ते त्यांच्याविना जन्मलेले आहेत. मग त्यांचा हेवा वाटू द्यावा का? ॲलन बॉसबॉम या शरीरशास्त्रज्ञांनी म्हटले: “वेदना मुळीच नसणे म्हणजे अनर्थ आहे.”

तुम्हाला वेदनांची जाणीव नसती तर, एखाद्या फोडाचे रुपांतर क्षते झालेल्या जखमेत होईपर्यंत तुमच्या लक्षात ते आलेच नसते. एका वृत्तपत्राच्या अहवालाप्रमाणे, वेदनांची जाणीव होत नसलेल्या एका मुलीच्या पालकांना “कधीकधी जळत असलेल्या मांसाचा वास यायचा व ती, जणू बेफिकिरपणे, शेगडीला चिकटून असलेली आढळत असे.” अशाप्रकारे, वेदना ही क्रूर शत्रूपेक्षाही अधिक आहे. ती आशीर्वाद देखील असू शकते.

मग, पवित्र शास्त्राच्या, “कष्ट [वेदना] ही नाहीत” या अभिवचनाबद्दल काय? या अभिवचनाची खरोखर पूर्णता व्हावी असे आम्हाला वाटावे का?

अश्रूंरहित जीवन?

याकडे लक्ष द्या की, या शास्त्रवचनाचा संदर्भ देखील असे म्हणतो: “[देव] त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकील.” (प्रकटीकरण २१:४) हे महत्त्वाचे आहे, कारण अश्रू अत्यंत आवश्‍यक आहेत. वेदनांची जाणीव आम्हाला संरक्षण देते त्याचप्रमाणे ते देखील आम्हाला संरक्षण देते.

अश्रूंमुळे आपले डोळे ओलसर राहतात तसेच डोळे व पापणीचे घर्षण होण्यापासून संरक्षण मिळते. ते आपल्या डोळ्यांतील बाह्‍य पदार्थांना देखील धुऊन टाकते. त्याशिवाय, त्यात लायसोझाईम नावाचे जंतुनाशक असते. ते डोळ्यांचे निर्जंतुकीकरण करते व संसर्गदूषण टाळते. यासाठी, वेदनांची जाणीव आहे त्याचप्रमाणे अश्रू गाळणे हे आमच्या अद्‌भुतरितीने बनवलेल्या शरीराचे एक उल्लेखनीय वैशिष्ट्य आहे.—स्तोत्र १३९:१४.

तथापि शोक, दुःख व मनःस्तापाशी अश्रूंचा जवळचा संबंध आहे. पवित्र शास्त्रीय काळातील राजा दाविदाने शोक करून म्हटले की, “रोज रात्री मी आपले अंथरुण आसवांत पोहवितो. मी आपला पलंग अश्रूंनी विरघळवितो.” (स्तोत्र ६:६) येशूचा प्रिय मित्र मेल्यावर, त्याने “अश्रूंना वाट करून दिली.” (योहान ११:३५, NW) लोकांनी शोकामुळे असे अश्रू गाळावेत असे देवाने मूलतः उद्देशिले नव्हते. पहिला मनुष्य आदाम, याचे पाप आमच्या अपरिपूर्ण व मानवी कुटुंबाच्या मर्त्य स्थितीसाठी जबाबदार आहे. (रोमकर ५:१२) यास्तव, आपल्या अपरिपूर्ण, मर्त्य स्थितीमुळे जे अश्रू येतात ते राहणार नाहीत.

पवित्र शास्त्रात एका विशिष्ट प्रकारचे अश्रू राहणार नाहीत असे सांगितले आहे. तर मग, वेदना राहणार नाही हे अभिवचन कसे पूर्ण केले जाईल? लोकांना कधीतरी, शोक व रडण्यास कारणीभूत असणारी वेदना होणार नाही का? (g94 6/22)