व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जगावरील दृष्टिक्षेप

जगावरील दृष्टिक्षेप

जगावरील दृष्टिक्षेप

मानवाच्या हक्कांची स्थिती: “दु:खित करणारी”

“मानवांचा आदर हा मानवजातीच्या भवितव्यासाठी निर्णायक आहे,” असे इब्राहिम फॉल हे मानवी हक्कासाठी मदत करणारे खाजगी चिटणीस सेनापती यांनी मानवी हक्क या संयुक्‍त राष्ट्रसंघ जागतिक परिषदेत म्हटले. त्यांनी असे निरीक्षले की, “पुष्कळ [देशांमध्ये] मानवी हक्काचे उच्चाटन चालू राहणे हे दु:खाचे आहे.” मानवी हक्कावरील जागतिक परिषद, या एका बातमीपत्राने, खात्री दिली की, आज मानवजातीच्या हक्काच्या उल्लंघनाद्वारे जगाची अर्ध्यापेक्षा अधिक लोकसंख्या दु:ख भोगीत आहे. श्रीयुत. फॉल यांनी भर घातली: “मृत्यू, नाश, भेदभाव, शक्‍ती, छळ, बलात्कार, दास्यत्व, भूख व खुरटलेल्या किंवा दुर्बळता हे लाखो लोकांच्या जीवनाचे नित्याचे कारण राहते.” अधिक वाईट म्हणजे हा शाप पसरण्याचे कारण, “हक्काच्या समस्या बेसुमार” वाढत आहे अशी राष्ट्रसंघाने ताकीद दिली. (g94 7/8)

फळे-उचलणारा यंत्रमानव

इटालियन शेतकी औद्योगिक धंद्याचे शास्त्र येथे अलिकडील नवा उपक्रम म्हणजे, संगणकाने चालविलेला यंत्रमानवाठायी “जवळ जवळ २,५०० एवढी संत्री थेट झाडांवरुन एका तासात” उचलण्याची कार्यक्षमता आहे. ला. स्टॅम्पा यानुसार हे यंत्र आठ “अतिशय संवेदनाक्षम यांत्रिक बाहुने सुसज्ज आहे, प्रत्येक साधन हे त्याच्या आधारलेल्या गतीवर नजर ठेवते व सुसज्ज व हळुवारपणे स्पर्श केल्यावर जी पिकलेली फळे आहेत त्यांची निवड करुन जी कच्ची फळे आहेत त्यांना ओलांडून जाणे, व त्यांच्या रंगाची तीव्रता याचे आकलन करणे अशी या यंत्राची व्यवस्था केली आहे. स्वत:चा रस्ता ओळखणारा डिझेल इंजीनवर चालणारा यंत्रमानव रात्रंदिवस हवामान वाईट असले तरी काम करु शकतो व साडे तीन मीटर [११ फुट] उंच असणाऱ्‍या झाडावरची संत्री काढू शकतो. काढताना त्याचा सरासरी वेग हा आठ किलोमीटर [५ मैल] दर तासाला व प्रवास करत असताना त्याचा वेग प्रत्येक तासाला १४ किलोमिटर [प्रत्येक तासाला ९ मैल] आहे. तो ५०० किलो [१,१०० पाउन्डस] वजनाची गाडी ओढून नेऊ शकतो. (g94 7/8)

निद्रा नाशाच्या रुग्णांना मदत

संशोधकानी हार्वर्ड वैद्यकीय शाळा येथे झोपलागण्याची गंभीर समस्या असणाऱ्‍या लोकांसाठी सूचनांची मोठी यादी संगृहीत केली आहे. हार्वर्ड मानसिक आरोग्य पत्रक (इंग्रजी) यानुसार, एका रुग्णांच्या गटाला ८० मिनिटे झोप येण्यास लागत होती, त्यांनी महत्वपूर्ण सुधारणा अनुभवली. अनेक आठवडे औषधोपचाराचा प्रयत्न केल्यानंतर त्यांना फक्‍त सरासरी नऊ मिनिटे झोपी जाण्यास लागली, असे त्या पत्राने निरीक्षले. शिफारस केलेल्या पध्दतीत याचा समावेश आहे की: बिछान्यामध्ये सात तासांपेक्षा अधिक वेळ घालविण्याचे टाळा, तुमच्या झोपण्याच्या सरासरी वेळेपेक्षा तास भर बिछान्यात रेंगाळण्याचे टाळा, सप्ताहांतीही दररोजच्या वेळेप्रमाणे उठा, झोप आल्यावरच झोपावयास जा; व झोपल्यावर २० मिनिटात झोप लागली नाही तर, उठून तुम्हाला झोप येईपर्यंत आरामशीरपणे काही तरी करा. (g94 6/22)

खिडकी बाहेरील दृश्‍याचे मूल्य

मिशिगन, अमेरिका विश्‍वविद्यापीठातील, संशोधकाच्या अभ्यासानुसार, खिडकी शेजारी काम करणारे कामगार चांगले काम करतात. सर्वसामान्य विश्‍वासाच्या विपरीत, अशा प्रकारचा देखावा दिवास्वप्नाला आवश्‍यक ते उत्तेजन देत नाही. व्यावसायिक आठवडा (इंग्रजी) या नियतकालिकाने अहवाल दिला की, १,२००-लोकांच्या अभ्यासाने दर्शविले “खिडकीतून बाहेरील जगाचा देखावा पाहणारे कामगार हे त्यांच्या कामामध्ये अधिक आवेश, अधिक धीर, चांगली एकाग्रता दाखवतात, आणि त्यांच्यामध्ये कमी निराशा, आणि कमी शारीरिक आजारपणा जाणवतो.” त्याच्या तुलनेत, खोल्यांना खिडक्या नसलेल्या घरांमध्ये ते “कमीकल्पना शक्‍ती असणारे आणि अधिक चिडखोर” आणि एकाग्रतेबद्दल अधिक समस्या असणारे असू शकतात. (g94 6/22)

स्त्रियांविरुध्द हिंसाचार

भूमंडळ आणि टपाल (इंग्रजी) या कॅनडीयन वृत्तपत्राच्या अलीकडील परीक्षणाने दर्शविले त्याप्रमाणे, ५१ टक्के कॅनडीयन स्त्रियांपैकी, १६ वर्षांच्या किंवा त्याहीपेक्षा मोठ्या असणाऱ्‍या, त्यांच्या प्रौढ जीवनामध्ये पुरुषांच्या हिंसाचाराच्या बळी ठरल्या होत्या. त्यांची एकूण संख्या पन्‍नास लाखापेक्षा अधिक होती. ह्‍या कॅनडीयन वृत्तपत्राने अहवाल दिला की, अर्ध्यापेक्षा अधिक स्त्रियांची मुलाखत घेण्यात आली तेव्हा त्यांनी असे म्हटले, जोराचा हल्ला हा “त्यांच्या प्रियकराद्वारे, पतीद्वारे, मित्राद्वारे, कौटुंबिक सदस्यांद्वारे किंवा परिचित असणाऱ्‍या इतर पुरुषांद्वारे झाला,” बळी पडणाऱ्‍यांमध्ये फक्‍त १० टक्के स्त्रिया ह्‍या बचावणाऱ्‍यांपैकी होत्या, व ५ पैकी १ हल्ला हा खरोखरीच गंभीर अशा शारीरिक इजेस कारणीभूत होता. पुष्कळ स्त्रियांनी अहवाल दिला की, त्यांना ढकलण्यात आले, पकडण्यात आले, लोटण्यात आले, चापट मारण्यात आली, लाथा मारण्यात आल्या, त्यांना दातांनी चावण्यात आले, किंवा त्यांच्या पतीद्वारे किंवा सोबत राहत असलेल्या पुरुषांकडूनही तडाखा देण्यात आला. (g94 6/22)

मानवजातीच्या मोठ्या भागाला दुष्काळ पीडित करतो

मानवजातीला भरविण्यासाठी पृथ्वीने कधीही एवढे अन्‍न उत्पन्‍न केले नाही; तरीही, मानवजात दुष्काळाने एवढी कधीही परिणामीत झाली नाही. फ्रॉन्स-प्रेस बातमीदार अहवाल देतो की, जागतिक बँकेतील अलिकडच्या आकडेवारीनुसार, पूर्वी कधीही नव्हता इतका १९९० मध्ये दुष्काळाने १.१३ अरब लोकांच्या जीवनावर परिणाम केला. त्याचा बहुतेक परिणाम विकसनशील देशातील ३० टक्के लोकांच्या जीवनावर झाला. सर्वात भयंकर परिणाम झालेले प्रदेश म्हणजे दक्षिणेचा आशिया, जेथे ५६.२ कोटी लोकांना दुष्काळाने पीडा भोगावी लागत आहे (४९ टक्के लोकसंख्येच्या); आफ्रिका, २१.६ कोटी (४७.८ टक्के लोकसंख्येच्या); पूर्व व उत्तर आफ्रिकेच्या जवळ, ७.३ कोटी (३३.१ टक्के लोकसंख्येच्या); व लॅटीन अमेरिकेच्या व कॅरिबियन, १०.८ कोटी (२५.२ टक्के लोकसंख्येच्या). या आकडेवारीमध्ये इतर शंभर कोटी जे कुपोषणाने दु:खित झाले त्यांचा समावेश नाही. (g94 7/8)

खळबळजनक मार्गाने उत्पन्‍न वाढविणे

१९९३ च्या सुरवातीला, पॅरॅसायन्समध्ये विज्ञानाच्या संशोधनाचे सहकारी यांनी जर्मनीमध्ये फल-ज्योतिषीद्वारे करण्यात आलेले ७० भविष्यकथन जमा केले व वर्षाच्या शेवटी त्यांच्या परिणामाची किंमत ठरविली. पूर्वीच्या वर्षांतील अपयशाच्या दृष्टिने पाहता (पहा अवेक! जून ८, १९९२, पृष्ठ २९ व जुलै ८, १९९३ पृष्ठ २९) ह्‍या फल-ज्योतिषांना १९९३ मध्ये योग्यप्रकारचे यश प्राप्त झाले का? “त्यांनी पुष्कळ खोटे सांगितले,” असे नॉससुश नाय प्रेस यांनी अहवाल दिला. एका प्रवक्त्याने निरीक्षण केले की, “पुष्कळ फल-ज्योतिषी त्यांच्या स्वत:च्या वार्षिक पूर्वकथेवरही विश्‍वास ठेवत नाही.” परंतु, जर्मनीमध्ये फल-ज्योतिषांचा हा मोठा व्यापार आहे. त्यांचा हा वार्षिक व्यापार ५.७ डॉलर्स वार्षिक रक्कमेची उलाढाल आहे (१० कोटी जर्मन मार्कस). अनेक फल-ज्योतिषी ह्‍यांना खळबळ उडवून देणारे भविष्य सांगणे, उत्पन्‍न वाढविण्यासाठी “प्रचलित होण्याचा एक परिणामकारक मार्ग आहे,” असे वाटत असल्याचा वर्तमानपत्राने अहवाल दिला. (g94 7/8)

मुलांच्या नोकरीचे ठिकाण

ओ.एसटॉडो दा एस. पौलूने अहवाल दिला की, ब्राझील येथे, अंदाजे ८० लाख मुलांना नोकरीवर ठेवले आहे. मोठे करु शकतील, तेच काम ही लहान मुले तडीस नेऊ शकतात. नेहमी योग्यतेपेक्षा कमी उत्पन्‍न मिळत असले तरी, ते कुटुंबाच्या उत्पन्‍नाला कमी हातभार लावत असतात. बहुतेक करुन, पुरेसे शिक्षण न घेता ही काम करणारी लहान मुले अल्पशिक्षित, व त्यांच्या पालकांप्रमाणे गरीब राहतात. मिनिस्ट्री ऑफ लेबरच्या लुईस क्लॉडयो दा वॉसकॉनसेलोसने म्हटले, “ही काम करणारी लहान मुले इतर कुटुंब प्रमुखाचे काम काढून टाकतात, कारण ती प्रौढाच्या मजुरीच्या तिसऱ्‍या भागापेक्षा कमी मजुरी पत्करतात.” (g94 7/8)

हजारो वनस्पतींकडे दुर्लक्ष करण्यात आले

अमेरिकेच्या अन्‍न व शेतकी संस्थेने म्हटले: “इतिहासात अनेक हजारो वनस्पतींच्या गटाचा मानवाच्या अन्‍नासाठी उपयोग केला होता पण, आता फक्‍त १५० वाढविली जात आहेत व तीन जाती जवळजवळ ६० टक्के कॅलरीज व प्रोटीन वनस्पतीपासून मिळविले जाते.” आतंरराष्ट्रीय शेतकी अभ्यास याला बळकटी दर्शवितो. मानव त्याच्या मुख्य आहारावर—तांदूळ, मका, आणि गहू ह्‍यालाच चिटकून राहतात—पण हजारो इतर पौष्टिक वनस्पतींकडे दुर्लक्ष करतात. (g94 6/22)

एड्‌स-दूषित रक्‍ताद्वारे अपघात

अलिकडील जपानच्या आरोग्य आणि कल्याण मंत्रिमंडळाने सर्व रुग्णालयास, संसर्ग झालेल्या रक्‍ताद्वारे वेळोवेळी होणाऱ्‍या अपघाताचे अहवाल देण्यास सांगितले ज्यामध्ये, वैद्यकीय कामगारांचा समावेश आहे. खास आस्था ही गेल्या दहा वर्षांमध्ये झालेल्या अपघातांमध्ये होती. दैनिक योमीयुरी (इंग्रजी) यानुसार, २७६ रुग्णालयांच्या प्रतिसादाच्या अहवालानुसार सुयांच्या अपघाताची “एकूण संख्या १२,९१४ होती, त्यांच्यापैकी २,९९७ दूषित रक्‍ताचा संबंध आल्याने अपघात झाले होते.” यापैकी शेकडो प्रकरणामध्ये एच. आय. व्ही. विषाणू ने बाधलेल्या दूषित रक्‍ताचा समावेश होता. ह्‍या कारणामुळे, एड्‌स या अपघातात बळी पडणाऱ्‍या सर्वांचा एच. आय. व्ही. निगेटीव्ह याकरिता चाचणी झाली होती: हा विषाणू एड्‌सला कारणीभूत ठरतो. (g94 6/22)

बौद्धिक खेळणी

भूमंडळ आणि टपाल हे निरीक्षण करते: “पालकांनी लाभदायक मनोरंजकांचा भविष्यातील चढाओढीची कुशलता शिकविणाऱ्‍या खेळण्यात बदल केल्यामुळे त्याच्या विक्रीत बेसुमार वाढ झाली आहे,” या अहवालाने अशी भर घातली की, काही पालक त्यांच्या मुलांना “केवळ मौज म्हणून खेळावयाच्या खेळण्यावर अडथळा आणत आहेत. त्याऐवजी, शक्यतो खेळण्याचा प्रत्येक क्षण कुशलता शिकविणाऱ्‍या खेळांनी गच्च भरलेला असावा अशी त्यांची इच्छा आहे.” जरी अनेकजण विश्‍वास बाळगतात की, ही कला मुलांमध्ये उच्च बुद्धी आणि चांगली क्षमता उत्पन्‍न करते, तरीही काही अपवाद दाखवतात. मुलांना मौल्यवान खेळण्याच्या वेळेमध्ये आवर घालून फजीत करण्याने यांच्या नवकल्पकतेला दाबून टाकते “व शेवटी ते खुपच कमी शिकतील” असे त्यांना वाटते, असे वर्तमानपत्राने म्हटले. (g94 6/22)