व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ताऱ्‍यांजवळ तुमच्यासाठी एक संदेश आहे!

ताऱ्‍यांजवळ तुमच्यासाठी एक संदेश आहे!

ताऱ्‍यांजवळ तुमच्यासाठी एक संदेश आहे!

आधीच्या लेखांमध्ये दाखवल्याप्रमाणे, तारे तेज प्रकट करीत असले तरी, ते जे आहेत म्हणजेच, निर्माणकर्त्याने त्याच्या उद्देशास्तव त्यांना आकाशात निर्जीव वस्तू या नात्याने ठेवले आहे तसाच विचार माणसाने करावयाचा होता. त्यांची उपासना करावयाची नव्हती. यहोवाच्या अद्‌भुत निर्मितीचा एक आवश्‍यक भाग असल्यामुळे व त्याच्या नियमांच्या अधीन असल्यामुळे, ताऱ्‍यांना ‘देवाचा महिमा वर्णन’ करावयाचा होता. त्याचवेळी, मनुष्य देवाचा उद्देश पूर्ण करीत असताना त्यांना त्याच्याकरता प्रकाशाचा उगम म्हणून कार्य करावयाचे होते.—स्तोत्र १९:१; अनुवाद ४:१९.

पवित्र शास्त्रात आम्ही वाचतो: “चेटूक करणारा, शकुनमुहूर्त पाहणारा, मंत्रतंत्र करणारा, जादूगार, वशीकरण करणारा, पंचाक्षरी, छांछू करणारा, अथवा मृतात्म्याला विचारणारा असा तुमच्यापैकी कोणी नसावा, कारण जो कोणी असली कृत्ये करितो त्याचा परमेश्‍वराला [यहोवा, NW] वीट आहे.” (अनुवाद १८:१०-१२) यशयाने म्हटले: “[मसलती देणारे,] ज्योतिषि व नक्षत्र पाहणारे पुढे येवोत; त्यांच्याने तुझा बचाव होईल तर ते करोत . . . पाहा, ते धसकटासारखे झाले आहेत.”—यशया ४७:१३, १४.

आम्ही ताऱ्‍यांपासून काय शिकू शकतो

तथापि, आम्हाला ऐकण्याची इच्छा असली तर, हे निर्जीव तारे आम्हाला काहीतरी सांगू शकतात. एडवीन वे टेले यांनी लिहिले: “समयाच्या प्रदीर्घ अनंतकाळात, तारे, मनुष्याच्या क्षुद्रतेविषयी सांगतात.” होय, आमच्या उघड्या डोळ्यांनी, निरभ्र आकाशातील ताऱ्‍यांची दिसत असलेली प्रचंड संख्या, पुष्कळ शतकांआधी आमच्या पूर्वजांनी देखील पाहिली होती हे कळल्यावर, आम्ही लीन होऊ नये का? ज्या ऐश्‍वर्यशाली व्यक्‍तीने त्यांना “प्रारंभी” निर्माण केले व नंतर मानवजातीला निर्माण केले तिच्याबद्दल आम्हाला भीतीयुक्‍त आदर वाटू नये का? इस्राएलाच्या राजा दाविदाने भीतीयुक्‍त आदरासह असे लिहिले: “आकाश जे तुझे अंगुलीकार्य, व त्यात तू नेमलेले चंद्र व तारे ह्‍यांच्याकडे पहावे तर, मर्त्य मनुष्य तो काय की तू त्याची आठवण करावी? मानव तो काय की तू त्याला दर्शन द्यावे.” आकाशामुळे आम्ही लीन झाले पाहिजे व आमचे जीवन कसे व्यतित करत आहोत त्याबद्दल स्वतःला विचारले पाहिजे.—उत्पत्ती १:१; स्तोत्र ८:३, ४.

एके प्रसंगी दाविदाने प्रार्थना केली: “तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास मला शिकीव; कारण तू माझा देव आहेस.” (स्तोत्र १४३:१०) दाविदाच्या जीवनाच्या अहवालावरून हे सूचित होते की, त्याच्या प्रार्थनेचे उत्तर दिले गेले. देवाच्या नियमात दिल्यानुसार तो त्याची इच्छा करावयास शिकला. त्याने निर्माणकर्त्याचा मानवजातीसाठी असलेला उद्देश देखील शिकून घेतला व लिहिले: “थोडक्याच अवधीत दुर्जन नाहीसा होईल . . . पण लीन जन पृथ्वीचे वतन पावतील; ते उदंड सुखाचा उपभोग घेतील . . . वाईटापासून दूर राहा, बरे ते कर; म्हणजे तुझी वस्ती कायम राहील . . . नीतिमान पृथ्वीचे वतन पावतील, तिच्यात ते सर्वदा वास करितील.” त्या उद्देशाच्या ज्ञानासह एक जबाबदारी आली: “वाईटापासून दूर राहा बरे ते कर.”—स्तोत्र ३७:१०, ११, २७-२९.

ताऱ्‍यांकडे सर्व मानवजातीकरता तोच संदेश आहे. त्यांची उपासना किंवा त्यांचा ‘सल्ला’ घेतल्याविना आपण त्यांच्यामध्ये निर्माणकर्त्याची प्रीती, बुद्धी, व शक्‍ती प्रतिबिंबित झाल्याचे पाहू शकतो. फल-ज्योतिषाऐवजी खगोलशास्त्राच्या अभ्यासामुळे आमच्या अंतःकरणात भीतीयुक्‍त आदर उत्पन्‍न झाला पाहिजे. त्याहून अधिक ते आमच्यामध्ये देवाबद्दल अधिक शिकून घेण्याची इच्छा रुजवत नाही का? त्याने त्याच उद्देशास्तव आम्हाला त्याचे वचन, पवित्र शास्त्र पुरवले आहे. तुम्हाला ताऱ्‍यांकडून हा संदेश समजला तर, मानवजातीसाठी यहोवाने काय राखले आहे व त्याहून महत्त्वाचे म्हणजे, त्यांच्यासाठी तयार केलेल्या आशीर्वादांमध्ये कसा सहभाग घेऊ शकता याबद्दल तुम्ही शिकू शकता. तुम्हाला देव व जीवनाच्या उद्देशाबद्दल काही प्रश्‍न असतील तर, तुमच्या भागातील यहोवाच्या साक्षीदारांशी संपर्क साधा किंवा पृष्ठ ५ वर दर्शवल्याप्रमाणे जवळच्या पत्त्यावर लिहून पाठवा. (g94 7/8)

[२० पानांवरील चित्रं]

तारे आम्हाला लीनता शिकवू शकतात