व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तारे आणि मनुष्य—यांच्यामध्ये काही संबंध आहे का?

तारे आणि मनुष्य—यांच्यामध्ये काही संबंध आहे का?

तारे आणि मनुष्य—यांच्यामध्ये काही संबंध आहे का?

ताऱ्‍यांचे निरीक्षण करण्याची प्रथा नवीन नाही. द वर्ल्ड बुक एन्सायक्लोपिडिया याच्यानुसार, हजार वर्षांआधी शेतकरी, “पिकांची पेरणी कधी करावी हे जाणण्यासाठी ताऱ्‍यांकडे पाहात होते. प्रवाशांनी, दिशा सांगण्यासाठी ताऱ्‍यांचा वापर करण्याचे शिकून घेतले.” आज देखील अंतराळातील प्रवासात, मार्गदर्शक या नात्याने ताऱ्‍यांचा अजूनही उपयोग केला जातो. प्राचीन लोकांनी मनुष्य व प्राण्यांच्या दंतकथा देखील बनवल्या. त्यांना असे वाटत होते की, तारकापुंज किंवा नक्षत्रांमध्ये त्यांचे प्रतिबिंब पडले आहे. कालांतराने लोकांना असे वाटू लागले की, ताऱ्‍यांचा त्यांच्या जीवनावर प्रभाव होऊ शकतो.

अगणित तारे

तारकांची केवळ संख्या आणि आकारच भीतीयुक्‍त आदर निर्माण करतो. असा अंदाज केला जातो की, विश्‍वामध्ये अदमासे शंभर अरब आकाशगंगा किंवा मोठे तारकापुंज आहेत! द इंटरनॅशनल एन्सायक्लोपिडिया ऑफ ॲस्ट्रोनॉमी म्हणते: “एका सर्वसाधारण चर्चमध्ये भरू शकतील एवढ्या तांदळाच्या दाण्यांएवढी ती संख्या आहे.” आमची सूर्यमाला जिचा भाग आहे, त्या दूध आकाशगंगेत एवढे तारे असल्याचा अंदाज केला जातो. (सूर्याऐवजी) आपल्या पृथ्वीच्या जवळचा तारा, जो नरतुरंगाच्या समूहातील आहे तो, जवळजवळ ४.३ प्रकाशवर्षे दूर आहे. एका वर्षात प्रकाश जेवढे अंतर तोडतो ते एक प्रकाश वर्ष आहे. याचा अर्थ, आपण एखाद्या तारकाकडे पाहतो तेव्हा आपल्या डोळ्यात जो प्रकाश उतरतो तो, त्या तारकापासून ४.३ वर्षांआधी निघाला होता व या सर्व वेळेपर्यंत अंतराळातून प्रत्येक सेकंदाला २,९९,७९२ किलोमीटर वेगाने प्रवास करीत होता. त्यातील अंतर किती आहे याची कल्पना करणे आपल्या मानसिक क्षमतेपलिकडील गोष्ट आहे. तरीसुद्धा, तोच सर्वात जवळचा तारा आहे. काही तारे आमच्या आकाशगंगेपासून शेकडो अब्ज प्रकाशवर्षांनी दूर आहेत. यासाठी देवाच्या संदेष्ट्याने असे म्हटले यात काही आश्‍चर्य नाही की, “पाहा, त्याच्या हिशोबी रा पोहऱ्‍यातल्या जलबिंदूसमान, तराजूतल्या रजासमान आहेत; पाहा द्वीपेहि तो धुळीच्या कणांसारखी उचलितो.” (यशया ४०:१५) एका सूक्ष्म धुळीच्या कणाबद्दल कोण काळजी करतो?

पृथ्वीच्या सर्वात जवळील आकाशातील गोल हा चंद्र आहे. तो आपल्या पृथ्वीवर एक निश्‍चित प्रभाव पाडतो. काही भागांमध्ये, त्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे भरती व ओहोटी यात १५ मीटरचा फरक देखील होऊ शकतो. तीन फ्रेंच वैज्ञानिकांनुसार, ज्यामुळे पृथ्वीचा अक्षांश २३ अंशावर कलता ठेवला जातो तेच आता चंद्राचे गुरुत्वाकर्षण आहे असा विश्‍वास केला जातो. त्यामुळे ऋतुंमध्ये बदल होण्याची खात्री मिळते. (निसर्ग, (इंग्रजी) फेब्रुवारी १८, १९९३) चंद्र आपल्या ग्रहावर असा नैसर्गिक प्रभाव पाडतो तेव्हा, शेकडो अब्ज ताऱ्‍यांबद्दल काय, असे विचारणे तर्कशुद्ध आहे. परंतु प्रथमतः, पवित्र शास्त्रासारखे प्राचीन उगम आम्हाला ताऱ्‍यांबद्दल काय सांगतात?

शास्त्रवचनातील तारे

पवित्र शास्त्र, दोन्ही म्हणजे खऱ्‍या व लाक्षणिक अर्थाने ताऱ्‍यांचा पुष्कळ संदर्भ देते. उदाहरणार्थ, एका स्तोत्रकर्त्याप्रमाणे, तारे पृथ्वीला प्रकाश पुरवू शकतील यासाठी, निर्माणकर्त्याने “रात्रीवर प्रभुत्व चालविण्यासाठी चंद्र व तारे” बनवले. (स्तोत्र १३६:९, तनाख) नंतर, विश्‍वासू अब्राहामाशी करार करताना देवाने म्हटले: “आकाशाकडे दृष्टि लाव; तुला हे मोजवतील तर मोज. मग त्याने त्याला सांगितले तुझी संतति अशीच होईल.” (उत्पत्ती १५:५) ताऱ्‍यांमध्ये फरक आहे याकडे निर्देश करून प्रेषित पौलाने म्हटले: “सूर्याचे तेज निराळे, चंद्राचे तेज निराळे, ताऱ्‍यांचे तेज निराळे कारण ताऱ्‍याताऱ्‍यांच्या तेजात भेद आहे.” * (१ करिंथकर १५:४१) त्याच वेळी, ताऱ्‍यांची ही प्रचंड संख्या व त्यांचे वैभव त्यांच्या निर्माणकर्त्याच्या हाताबाहेर किंवा नियंत्रणाच्या पलिकडे नाही: “तो ताऱ्‍यांची गणती करितो; तो त्या सर्वांना त्यांची त्यांची नावे देतो.”—स्तोत्र १४७:४.

दुसऱ्‍या बाजूला पाहता, आम्हास असे आढळेल की, शास्त्रवचनांमध्ये, व्यक्‍ती, राजे व देवदूतांना सूचित करण्यासाठी बहुतेकवेळा ताऱ्‍यांचा उपयोग केला आहे. याकोबाचा पुत्र योसेफ याला एक स्वप्न पडते. त्यात त्याचे पालक, ‘सूर्य व चंद्र’ यांनी आणि त्याचे भाऊ “तारे” यांनी चित्रित केले आहेत. देवदूतांना, ‘प्रभातनक्षत्र’ असे म्हणण्यात आले आहे. बाबेलच्या राजाला, “देवाच्या तारांगणाहून” म्हणजेच दाविदाच्या घराण्यातील इस्राएलाच्या राजांहून उंच होण्याची इच्छा होती याबद्दल म्हटले गेले आहे. ख्रिस्ती मंडळीतील अस्थिर लोकांची तुलना, ‘भ्रमण करणाऱ्‍या ताऱ्‍यांशी’ करण्यात आली आहे. त्याउलट, मंडळीतील वडिलांच्या विश्‍वासू वर्गाला ख्रिस्ताच्या उजव्या हातातील “तारे” असे म्हटले गेले आहे.—उत्पत्ती ३७:९, १०; ईयोब ३८:७; यशया १४:१३; यहूदा १३; प्रकटीकरण १:१६.

पवित्र शास्त्रातील एक अहवाल असे म्हणतो की, ‘ताऱ्‍यांनी आपआपल्या कक्षांतून सीसराशी लढाई केली.’ तो कनानचा याबीन राजा, ज्याने इस्राएल राष्ट्राचा २० वर्षांसाठी छळ केला होता त्याचा सेनापती होता. यहोवाने इस्राएलाची दास्यत्वातून मुक्‍तता करण्यासाठी इस्राएलाच्या न्यायाधीश बाराकाला नेमले. सीसरापाशी नऊशे लोखंडी रथ होते तरी देखील, त्याने त्याला त्याच्यावर संपूर्ण विजय मिळवून दिला. विजयाच्या गीतामध्ये, इस्राएलांनी असे गायिले: “आकाशातून तारे लढले; त्यांनी आपआपल्या कक्षांतून सीसराशी लढाई केली.” ताऱ्‍यांनी लढाई कशी केली याबद्दल कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. लढाईमध्ये ताऱ्‍यांचा थेट प्रभाव होता असे गृहीत धरण्याऐवजी, इस्राएलासाठी देवाने कोणत्या तरी प्रकारचा हस्तक्षेप केला असे त्या वक्‍तव्यावरून सूचित होते असा विश्‍वास करणे अधिक योग्य ठरेल.—शास्ते ५:२०.

बेथलेहेमाचा “तारा”

पवित्र शास्त्रात उल्लेखलेला सर्वात प्रसिद्ध तारा म्हणजे, बेथलेहेमाचा “तारा.” तबेल्यातील येशूच्या जन्मानंतर त्याच्या पालकांनी त्याला ज्या घरात नेले तेथे त्याने “पूर्वेकडील” फल-ज्योतिषांना मार्गदर्शित केले. तो तारा कोणता होता? निश्‍चितच तो सर्वसाधारण तारा नव्हता, कारण फल-ज्योतिषी त्याचा मागोवा १,६०० किलोमीटरपर्यंत घेऊ शकले एवढ्या खाली तो होता. त्या ‘ताऱ्‍याने’ त्यांना प्रथम यरुशलेमेत नेले. याबद्दल ऐकल्यावर, हेरोद राजाने त्यांना प्रश्‍न विचारले आणि नंतर येशू बाळाला ठार मारण्याचा निश्‍चय केला. त्यानंतर, येशू जेथे राहत होता त्या विशिष्ट घराकडे त्या ‘ताऱ्‍याने’ फल-ज्योतिषांना नेले. निश्‍चितच कोणताही सर्वसाधारण तारा तसे करू शकला नसता. ही ताऱ्‍यासमान वस्तू देवाकडून होती का? फल-ज्योतिषांच्या भेटीमुळे अप्रत्यक्षपणे, ‘बेथलेहेमात व आसपासच्या सर्व प्रदेशात जे दोन वर्षांचे व त्याहून कमी वयाचे बालक होते,’ त्यांची कत्तल झाली. यामुळे, देवाचा शत्रू सैतान याने देवाच्या पुत्राचा नाश करण्यासाठी हा “तारा” उपयोगात आणला असावा असा निष्कर्ष काढणे उचित ठरणार नाही का?—मत्तय २:१-११, १६.

हे देखील लक्षात ठेवायला हवे की, ते फल-ज्योतिषी पूर्वेकडून म्हणजेच कदाचित बाबेलमधून, जे जादूटोणा, चेटूक व फल-ज्योतिषाचे प्राचीन केंद्र होते तेथून आले होते. पुष्कळ आकाशातील गोलांना बाबेलच्या दैवतांची नावे देण्यात आली आहेत. नबुखेदनेस्सर राजाच्या दिवसात, त्याच्या युद्धाच्या मोहीमेने कोणता मार्ग निवडावा याचा निर्णय करण्यासाठी शकुनचा उपयोग केला होता.—यहेज्केल २१:२०-२२.

यशया संदेष्ट्याने बाबेलाच्या सल्लागारांना आव्हान देत म्हटले: “तू [बाबेल] पुष्कळ मसलती करिताकरिता थकलीस; तर तुजवर काय काय येणार हे तुला दर चंद्रदर्शनाच्या वेळी कळविणारे ज्योतिषि व नक्षत्र पाहणारे पुढे येवोत; त्यांच्याने तुझा बचाव होईल तर ते करोत. पाहा, ते धसकटासारखे झाले आहेत, अग्नीने त्यास भस्म केले आहे; ज्वालेच्या तडाख्यातून त्यांना स्वतःचा बचाव करिता येईना . . . तुझा बचाव करणारा कोणी नाही.” यशयाच्या भविष्यवाणीच्या सत्यतेत, बलवान बाबेल, सा. यु. पू. ५३९ मध्ये कोरेश सम्राटाच्या हाती पडले. त्या बाबेलोनी फल-ज्योतिषांनी ताऱ्‍यांकडून जे मार्गदर्शन घेण्याचा दावा केला होता ते, संबंधित असलेल्या सर्वांसाठी अनर्थकारक ठरले.—यशया ४७:१३-१५, टुडेज इंग्लीश व्हर्शन.

याचा अर्थ, आम्ही ताऱ्‍यांकडून काहीच शिकू शकत नाही असा होतो का? (g94 7/8)

[तळटीपा]

^ आधुनिक खगोलशास्त्र पौलाच्या शब्दांच्या सहमतात आहे कारण ताऱ्‍यांमध्ये रंग, आकार, उत्पन्‍न करणाऱ्‍या प्रकाशाचे प्रमाण, तापमान व तुलनात्मक घनता यांचा फरक असतो.

[१७ पानांवरील चौकट]

काहींनी काय म्हटले आहे

फल-ज्योतिष: “खगोलशास्त्राचा अनुबंध व त्याच्याशी संबंधित असणारी गोष्ट.”—योहॉनेस केप्लर (१५७१-१६३०) जर्मन खगोलशास्त्रज्ञ.

“फल-ज्योतिष विज्ञान नसून एक रोग आहे. . . . तो असा वृक्ष आहे, ज्याच्या छायेखाली सर्व प्रकारच्या अंधश्रद्धा वाढतात.”—मोझेस मेमोनीडस्‌ (११३५-१२०४), मध्ययुगातील यहूदी विद्वान.

“एक प्राचीन शास्त्र जे, व्यक्‍तिगत व्यक्‍तित्व व वर्तणूकीबद्दल अंदाज बांधणे व आकाशातील गोलांच्या स्थितीवरून भविष्यातील हालचाली व घटनांबद्दल भाकीत करणे शक्य आहे असा दावा करते. . . . कदाचित सा. यु. ६ व्या शतकाच्या आसपास—इराकच्या दक्षिणेकडील खाल्डी लोकांनी व्यक्‍तिगत जन्म-कुंडलीची सुरवात केली असा विचार केला जातो. जन्माच्या वेळी स्थिर तारे तसेच सूर्य, चंद्र व पाच ग्रहांचा जो प्रभाव पडतो त्याच्याशी हे संबंधित होते. . . . फल-ज्योतिषाच्या पद्धती व जन्म-कुंडलीद्वारे केलेले कथन, अशा कल्पनांवर आधारित असते जे खगोलशास्त्रज्ञांना व इतर वैज्ञानिकांना व्यक्‍तिगत मत असल्याचे व अस्वीकारणीय वाटते.”—सी. ए. रोनन, प्रोजेक्ट कुऑरडिनेटर, विज्ञान विश्‍वस्तसंस्थेचा पूर्व आशियाचा इतिहास, केंब्रिज, इंग्लंड व हा उतारा जेथून घेतला आहे त्या द इंटरनॅशनल एन्सायक्लोपिडिया ऑफ ॲस्ट्रोनॉमी याचा वर्गणीदार.

या व्यक्‍तिगत मताचे स्पष्टीकरण देण्यासाठी, रोनन याचे स्पष्टीकरण देतात की, पाश्‍चिमात्य लोकांसाठी मंगळ हा लाल ग्रह, युद्ध व लढत असण्याच्या स्थितीशी संबंधित आहे. परंतु, चीनी लोकांसाठी लाल हा सुंदर रंग आहे व मंगळाचा प्रभाव सौम्य असतो असा त्यांचा दृष्टिकोन आहे. त्याच्या विरुद्धतेत, पाश्‍चिमात्य पौराणिक कथा शुक्र ताऱ्‍याचा संबंध श्‍वेत व सौंदर्याशी जोडतात. चीनी लोकांकरता “श्‍वेत रंग . . . हा मृत्यू, कुजणे व नाशाचा रंग आहे; यास्तव शुक्र तारा हा ‘युद्धाचा अंधारमय ग्रह,’ असा मानला जातो.”

रोनन पुढे म्हणतात: “फल-ज्योतिषाचे प्राचीन स्वरुप शास्त्रोक्‍त रुपातील असताना देखील, त्याने आरंभाला खगोलशास्त्रीय निरीक्षणास हातभार लावण्यामध्ये व ते साध्य करण्यासाठी निधी पुरवण्यात एक उपयुक्‍त भूमिका पार पाडली आहे.”

नोबेल बक्षीसाचे एकोणीस विजेत्यांसोबत इतर वैज्ञानिकांनी मिळून १९७५ मध्ये एक जाहीरनामा दिला ज्याचे शीर्षक “फल-ज्योतिषावरील आक्षेप—१९२ प्रमुख वैज्ञानिकांचे वक्‍तव्य,” असे होते. त्याने घोषित केले:

“प्राचीन काळी, लोकांना . . . पृथ्वी व ग्रह तसेच ताऱ्‍यांमधील प्रचंड अंतराबद्दल काहीच कल्पना नव्हती. आता हे अंतर मोजले जाऊ शकते व मोजले गेले आहे तेव्हा, दूरचे ग्रह व त्याहून दूरचे तारे यामुळे निर्माण होणारे गुरुत्वाकर्षण व इतर परिणाम किती अतिसूक्ष्म आहेत हे आपण पाहू शकतो. जन्माच्या वेळी तारे व ग्रहांचा जो परिणाम होतो त्याने आपले भविष्य घडते अशी कल्पना करणे केवळ चुकीचे आहे.” *

[तळटीपा]

^ फल-ज्योतिषाबद्दल अधिक माहितीसाठी मे ८, १९८६ चा अवेक! पृष्ठ ३-९ पाहा.