व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

विशाल चर्मकश्‍यपांची वार्षिक भेट

विशाल चर्मकश्‍यपांची वार्षिक भेट

विशाल चर्मकश्‍यपांची वार्षिक भेट

जवळजवळ मध्यरात्रच आहे. आकाशातील पौर्णिमेच्या चंद्राने, शांत व निश्‍चल समुद्रावर त्याची सोनेरी छटा पसरवलेली आहे. रॉनटॉऊ ऑबाँगच्या किनाऱ्‍यावर पुष्कळ लोक, त्या थंड, मऊ रेतीवर उभे असलेले, कोणी पाय दुमडून, किंवा आरामात बसलेले आहेत. या भलत्याच समयी ते येथे काय करत आहेत? ते धीर धरून, चार वल्हे असलेल्या एका मोठ्या कवचाची—विशाल चामडी समुद्रकासवाची, किंवा चर्मकश्‍यपाची—किनाऱ्‍यावर येण्यासाठी वाट पाहात आहेत.

या विलक्षण उभयचर अभ्यागतांनी, या दुर्लक्षित किनाऱ्‍याला आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी दिली आहे. रॉनटॉऊ ऑबाँग हे पेनीनसुलार मलेशियाच्या पूर्व किनाऱ्‍यावर वसलेले आहे. ते डुंगुनच्या उत्तरेकडे आहे व सिंगापूरपासून वर ४०० किलोमीटर अंतरावर आहे. हे जगाच्या काही भागांतील एक आहे जेथे चर्मकश्‍यप चांगल्या उद्देशासाठी वार्षिक भेट देतात.

येथे अंडी घालण्याचा हंगाम, जवळजवळ मेपासून सप्टेंबरपर्यंत असतो. जून, जुलै व ऑगस्टच्या महिन्यांमध्ये, अंडी घालण्याचे काम अधिक होते. त्यावेळी, या पद्धतीचे निरीक्षण करणे फारच सोपे आहे. बहुधा, अंधार पडल्यावर, हे समुद्रकासव वर येऊ लागतात. मलेशिया, सिंगापूर व पश्‍चिम भागातील हे अभ्यागत उगीचच थांबले असतील का?

ते समुद्रातून बाहेर येतात!

अचानक, किनाऱ्‍यापासून थोड्याच अंतरावर प्रकाशाने लुकलुकणाऱ्‍या पाण्यात, एक काळी आकृती वर खाली होत असताना दिसते. जमाव फारच उत्साहित होतो! ती किनाऱ्‍याजवळ येते तशी, घुमटाकारासारखे काही पाण्यातून वर येऊ लागते. ते किनाऱ्‍यावर येणारे समुद्रकासव आहे! ते घाबरून पुन्हा जाईल यासाठी, तेथे उपस्थित असलेले काही मार्गदर्शक सर्वांना होता होईल तितक्या शांततेने पाहण्यास सावध करतात.

प्रथम डोके दिसते, नंतर मान, त्यानंतर कवचाचा पुढील भाग व पुढील वल्हे आणि शेवटी संपूर्ण समुद्रकासव किनाऱ्‍यावर दिसते. त्याची शेपटी व मागील वल्ह्यांवर सौम्य लाटा येत असतात. खरेच किती मोठे, नाकापासून शेपटीच्या टोकापर्यंत जवळजवळ दोन मीटर किंवा त्याहूनही अधिक लांब! तेथे किनाऱ्‍यावर ते स्तब्ध अवस्थेत पडते.

अचानकपणे, हे समुद्रकासव स्वतःला पुढील वल्ह्यांनी उचलते व जमिनीवर धब्ब अशा आवाजासह त्याचे शरीर पुढे फेकते. जणू पुढील उचलणे व फेकण्यासाठी श्‍वास व शक्‍ती जमा करण्यास, ते एका क्षणासाठी स्तब्ध राहते. अशाप्रकारे ते जमिनीवर चालते. त्याच्या दोन्ही बाजूवरील जमावांना दूर ठेवले जाते. या बाबतीत मार्गदर्शक फारच कडक असतात. प्रत्येक पुढील हालचालीसह, जमाव देखील पुढे सरसावतो—परंतु शांतपणे.

हे चर्मकश्‍यप किनाऱ्‍यावर लंगडत येते तसे त्याला उपजत ज्ञानामुळे त्याची जागा माहीत असते. अंडी यशस्वीरित्या उबवली जाण्यास अनुकूल अशी जागा शोधून काढण्यात त्याची उपजत बुद्धी त्याला मदत करते. तेथे ते खड्डा खोदायला लागते. मागील वल्हे फावड्यासारखे काम करून वाळू खणून काढतात.

पुष्कळ वेळानंतर, एक मार्गदर्शक, ज्याला अंडी गोळा करण्यासाठी परवाना मिळालेला आहे तो, पुढे येतो व त्याचा हात त्या खड्यात घालतो. तो खड्डा इतका खोल आहे की त्याचा कोपरा त्यात झाकला जातो. खड्यातून हात काढल्यावर सर्वजण आश्‍चर्य व उत्साहाने आ वासतात. तो एक अंडे बाहेर आणतो!

चर्मकश्‍यपाचे अंडे फिकट पांढऱ्‍या रंगाचे असते. त्याचा आकार टेबल टेनीस किंवा कोर्ट टेनीसच्या चेंडूएवढा असतो. त्यातील शेवटची काही अंडी बहुधा गोटीच्या आकाराएवढीच लहान असतात. पाळीव पक्ष्यांच्या अंड्यांसारखी नसून, त्याच्या कवचाची त्वचा चिवट असते व दाबाने त्यावर सहजपणे खाच पडू शकते. परंतु, विलक्षण गोष्ट अशी की, अंड्याचा पांढरा भाग (श्‍वेतकल्क) उकडल्यावरही प्रवाहीच राहतो. त्याची चव काहीशी तीव्र व माशासारखी असते. एक समुद्रकासव साधारणतः एका वेळी ८५ अंडी घालते. परंतु, १९६७ मध्ये १४० अंडी असल्याचा अहवाल आहे.

आता जमाव अधिक मोकळेपणाने वावरू शकतो. काहीजण समुद्रकासवाला दचकत दचकत हात लावतात व त्याचे परीक्षण करतात. इतर त्यावर चढतात किंवा कौटुंबिक अल्बममध्ये ठेवण्यासाठी त्याला टेकून फोटो काढतात. समुद्रकासवाला जवळून पाहिल्यावर त्याच्या डोळ्यातून एका घट्ट पारदर्शक असा चिकट पदार्थ पडत असल्याचे दिसते. त्यावर वाळूचे कण चिकटलेले असतात. पाण्यातून हवेमध्ये येण्याच्या बदलामुळे हे घडते असे म्हटले जाते. वेळोवेळी, हे समुद्रकासव श्‍वास घेण्यासाठी त्याचे तोंड उघडते व हांबरते.

अंडी पुरणे

काही काळानंतर, हा प्राणी खड्यामध्ये पुन्हा वाळू घालण्यासाठी त्याचे मागील वल्हे हलवू लागतो. खड्डा भरल्यावर, चर्मकश्‍यप त्याच्या मागील वल्ह्यांनी मोटारीच्या समोरील काचेवरचे पाणी पुसण्याच्या यंत्राप्रमाणे हालचाल करते. वाळू सर्व दिशांना उडते! जमाव त्यांच्या तोंडाचे व शरीराचे संरक्षण करण्यासाठी पटकन मागे सरकतो. हेलकावणारे वल्हे काही काळासाठी झुलत राहतात. केवढी शक्‍ती व सामर्थ्य उपयोगात आणली जाते! शेवटी वल्हे थांबल्यावर, जमावाला चर्मकश्‍यपाने खोदलेल्या खड्याचा लवलेशही सापडत नाही. खरोखर उपजत बुद्धी! परंतु, या समुद्रकासवाच्या निर्माणकर्त्याची बुद्धी कितीतरी पटीने असीम आहे!

हे चर्मकश्‍यप पुन्हा समुद्राकडे चाल करण्याआधी अंडी गोळा करण्यास परवाना असणारा त्याच्या पुढील वल्ह्यावर बिल्ला अडकवतो. हे अशासाठी केले जाते की जेणेकरून, जमिनीवर व समुद्रातील त्याच्या त्यानंतरच्या भेटींवर लक्ष ठेवले जाऊ शकते. दर हंगामात ते सहा ते नऊ वेळेला अंडी घालते. अंडी घालण्यामधील कालावधी ९ ते १४ दिवसांचा असतो.

अचानक चर्मकश्‍यप स्वतःला हळूहळू उचलून पुढे फेकू लागते. ते वळते व पुन्हा समुद्राकडे वाट काढते व ज्या वेगाने ते आले होते त्याच्या तुलनेत अधिक वेगाने लंगडत जाते. पाण्यात गेल्यावर आधी डोके व नंतर कवच जाते. शेवटी ते दृष्टिआड होते. नंतर, ते डोके वर काढते तेव्हा हे समुद्रकासव फारच दूरवर पोहंचलेले असते. ते समुद्राकडे वेगाने पोहते. त्याच्या नाकाच्या टोकावर चंद्राचा प्रकाश चमकत असतो. ते पाण्यात किती चपळ व जलद असते! जमिनीवरील बेडौल व मंद हालचालीपेक्षा हे अतिशय वेगळे आहे.

संरक्षणाचे प्रयत्न

इतर प्राण्यांच्या जातींच्या वाढत्या संख्येला होत आहे तसेच, दूषित वातावरण व मानवी लोभामुळे चर्मकश्‍यपांचा नाश होण्याचा धोका आहे. १९७० च्या मध्यात, शेकडो अपूर्ण वाढ झालेले हे समुद्रकासव पाहांगच्या शेजारील राष्ट्राच्या किनाऱ्‍यांवर पडलेले आढळले—मृत स्थितीत! तसेच समुद्रकासवांची अंडी, लोकांची असामान्य चव पुरवण्यासाठी दुष्टपणे गोळा केली जातात.

सुदैवाने, मलेशियामध्ये या समुद्रकासवांच्या कमी होणाऱ्‍या संख्येबद्दल बरीच चिंता असल्यामुळे, १९५१ मध्ये टर्टल इनॅक्टमेंट हा कायदा काढला. खाजगीरित्या अंडी गोळा करण्याचे कार्य कायद्याविरुद्ध केले गेले. तथापि, पैशाचे लोभी असणारे लोक या कायद्याचा भंग करतात कारण, त्यातील फायदा हा अतिशय मोहविणारा आहे. तरीसुद्धा, संरक्षणाचे प्रयत्न व्यर्थ ठरलेले नाहीत.

रॉनटॉऊ ऑबाँगच्या किनाऱ्‍यावर, माहिती लिहून ठेवलेल्या कागदांच्या लहान ओळी पाहण्यास आंनद वाटतो. प्रत्येक कागदाने, चर्मकश्‍यपाची काही अंडी पुरलेली आहेत त्या जागी खूण केली जाते. त्या कागदावर अंड्यांची संख्या, घालण्याची तारीख व अंड्यांच्या मूळच्या घरट्याचा सांकेतिक क्रमांक असतो. अंडी घालण्याच्या ४५ दिवसांनंतर पिल्लांनी निसटून जाऊ नये यासाठी प्रत्येक कागदाच्या भोवती एक तारेचे कुंपण लावले जाते. अंडी उबवण्याचा कालावधी ५२ ते ६१ दिवसांचा असतो. सायंकाळी, बहुधा सूर्यास्तानंतर, पिल्ले बाहेर येऊ लागतात तेव्हा, प्रत्येक खड्याच्या क्रमांकाची नोंद केली जाते. त्यांना डब्यात ठेवण्यात येते व नंतर समुद्राच्या किनाऱ्‍याला सोडले जाते.

या संरक्षणाच्या कार्यक्रमाने यशस्वीपणे हजारो पिल्लांचे संगोपन करून त्यांना त्यांच्या पाण्याच्या मूलस्थानाकडे पुन्हा पाठवले आहे. परंतु, त्यांच्या वाचण्याच्या कमी प्रमाणामुळे तसेच रॉनटॉऊ ऑबाँगला येणाऱ्‍या चर्मकश्‍यपांच्या कमी होत चाललेल्या संख्येमुळे चिंता वाटते. (g94 7/8)

[२७ पानांवरील चित्रं]

डोक्यापासून शेपटीपर्यंत जवळजवळ दोन मीटरचे असणारे चर्मकश्‍यप पुष्कळ अंडी घालते. जवळजवळ आठ आठवड्यांनंतर, पिल्ले बाहेर निघतात

[चित्राचे श्रेय]

Leathery turtle, Lydekker

C. Allen Morgan/Peter Arnold

David Harvey/SUPERSTOCK

[२६ पानांवरील चित्राचे श्रेय]

C. Allen Morgan/Peter Arnold