व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वेदनांचा उपचार करण्यात प्रगती

वेदनांचा उपचार करण्यात प्रगती

वेदनांचा उपचार करण्यात प्रगती

अलिकडील वर्षांपर्यंत फारच कमी डॉक्टरांना वेदनांबद्दल अधिक माहिती होती व पुष्कळांना अजूनही नाही. इंटरनॅशनल पेन फॉउन्डेशनचे माजी अध्यक्ष, डॉ. जॉन लीबेसकाईंड यांनी काही वर्षांआधी असे निरीक्षले: “चार वर्षांमधील चार पेक्षा अधिक तासांसाठी विद्यार्थ्यांना वेदनांच्या समस्यांचे निदान करण्यास व त्यावर उपचार करण्यास शिकवणारी वैद्यकीय शाळा जगात असेल असे मला वाटत नाही.”

तथापि, वेदना समजण्यामध्ये जी प्रगती झाली ती वेदनांवर उपचार करण्याच्या मोठ्या प्रयत्नांशी योगायोगाने जुळली आहे. अशाप्रकारे, वेदना सहन करणाऱ्‍यांचा दृष्टिकोन उजळला आहे. अमेरिकन आरोग्य (इंग्रजी) या नियतकालिकाने असा अहवाल दिला की, “कायमची वेदना केवळ लक्षण नसून, ती स्वतःमध्ये एक उपचार करण्याजोगा रोग आहे असे वैद्यकशास्त्र मानते याबद्दल आपण सर्वजण कृतज्ञ असू शकतो.” या दृष्टिकोनामुळे, वेदनेचा उपचार करणाऱ्‍या चिकित्सालयांच्या संख्येत प्रचंड वाढ होण्यास मदत मिळाली.

वेदनेचा जेथे उपचार होतो

डॉ. जॉन जे. बॉनीका यांनी अमेरिकेत सर्वात प्रथम बहुविषय वेदना चिकित्सालय उघडले. “१९६९ पर्यंत जगात अशी केवळ १० चिकित्सालये होती,” असा अहवाल त्यांनी दिला. परंतु, वेदनांचा उपचार करणाऱ्‍या चिकित्सालयांची संख्या गेल्या २५ वर्षात नाट्यमयरित्या वाढली आहे. आता, हजारापेक्षा अधिक वेदना चिकित्सालये आहेत. नॅशनल क्रॉनिक पेन आऊटरीच असोसिएशनच्या एका प्रतिनिधीने म्हटले की, “नवीन चिकित्सालये जवळजवळ दररोज उघडतात.” *

त्याचा काय अर्थ होतो याचा विचार करा! “ज्या रुग्णांना गंभीर वेदनांपासून आराम मिळण्यासाठी, शेकडो हजारो मैलांचा प्रवास करावा लागत होता त्यांना तो घराजवळच मिळू शकतो,” असे न्यू यॉर्क शहरातील डॉ. गॅरी फेल्डस्टाईन नावाच्या अनेस्थेसियोलॉजिस्टने म्हटले. तुम्ही पीडित आहात तर, वेदनेचा उपचार करण्यामध्ये प्रशिक्षित असणाऱ्‍या विशेषतज्ज्ञांच्या गटाकडून मदत मिळवणे हा किती मोठा आशीर्वाद ठरेल!

यहोवाच्या साक्षीदारांच्या प्रवासी पर्यवेक्षकांची पत्नी, लिंडा पार्सन्स्‌ ही, पुष्कळ वर्षांपासून पाठ दुखीने पीडित होती. तिने पुष्कळ वैद्यांकडून मदत घेतली तरीसुद्धा, तिच्या वेदनांचा तीव्रपणा कायम राहिला. मागील वर्षी मेमध्ये एके दिवशी, अगदी निराश होऊन तिच्या पतीने दूरध्वनी माहिती पुस्तक उचलले आणि वेदना या सदराखाली पाहिले. तेव्हा ते सेवा करीत असलेल्या दक्षिण कॅलिफोर्नियापासून जवळच एका वेदना चिकित्सालयाचा फोन नंबर तेथे दिला होता. भेटण्याची वेळ निश्‍चित केली गेली. थोड्या दिवसांनी लिंडा प्रथम सल्ला घेण्यासाठी आणि पूर्वनिदान करण्यासाठी एका डॉक्टरांना भेटली.

लिंडावर, बाह्‍यरुग्ण या नात्याने उपचार करण्यासाठी योजना केली. ती उपचारासाठी आठवड्यातून तीनदा चिकित्सालयात येऊ लागली. त्याचप्रमाणे, तिला घरी देखील एक उपचार कार्यक्रम करण्यासाठी दिला. काही आठवड्यांतच, तिला सुधारणा दिसून आली. तिचे पती सांगतात: “मला आठवतंय की एके सायंकाळी ती अगदी आश्‍चर्याने म्हणाली, ‘मला काहीच वेदना होत नाहीत यावर माझा विश्‍वासच बसत नाही!’” काही महिन्यातच, चिकित्सालयात नियमितपणे जाणे कमी केले जाऊ शकत होते.

लिंडाला तिच्या वेदना संयमित करण्यामध्ये जी मदत मिळाली तशीच मदत पुष्कळ बहुविषय वेदना चिकित्सालयांमध्ये पुरवली जाते. अशा चिकित्सालयात आरोग्य धंदेवाईकांच्या विशेषतज्ज्ञांचा गट असतो. डॉ. बॉनीका यांच्याप्रमाणे, तो “कायमच्या वेदनेवर मात करण्याचा सर्वात उत्तम प्रस्ताव आहे.” उदाहरणार्थ, लिंडावर तिच्या वेदनांसाठी कसा उपचार करण्यात आला?

वेदनेचा उपचार कसा केला जाऊ शकतो

एका चिकित्सालयाचे माहितीपत्रक तेथे गेल्यावर जी कार्यपद्धत आहे तिचे वर्णन देते: “वेदनांचा आधार ठरवण्यासाठी, एक वैद्य प्रत्येक व्यक्‍तीची तपासणी करतो. त्यानंतर, वास्तविक ध्येये व उपचार कार्यक्रम सांगितले जातात. . . . वेदना व चिंता नाहीशी करण्यासाठी व औषधांवर अवलंबून राहण्याचे टाळण्यासाठी शरीराने, ‘एन्डॉर्फीन्स्‌’ (शरीरातील नैसर्गिकरित्या निर्माण होणारी रसायने) निर्माण करण्यात मदत देण्यास विशेष तंत्र व पद्धती वापरल्या जातात.”

लिंडाला मिळालेल्या उपचारांपैकी अक्युपंक्चर व टेन्स्‌ म्हणजेच, त्वचेद्वारे केलेले (त्वचेच्या पलिकडे) विद्युत चेता उद्दीपन हे उपचार होते. तिला चिकित्सालयात विद्युत उद्दीपन उपचार मिळत होते व घरामध्ये वापरण्यासाठी एक छोटेसे टेन्स्‌चे साधन पुरवले होते. बायोफिडबॅकचा—रुग्णाला त्याच्या शरीराच्या प्रतिसादांवर लक्ष ठेवण्यासाठी व वेदनांचा प्रभाव कमी करण्यास त्यांच्यात बदल करण्यासाठी शिकवले जाते अशा पद्धतीचा—देखील उपयोग केला गेला.

शारीरिक उपचाराशिवाय खोल ऊतींची मालीश हे या उपचार पद्धतीचे वैशिष्ट्य होते. लिंडा त्यासाठी तयार झाल्यानंतरच कालांतराने, चिकित्सालयाच्या व्यायामशाळेत एक व्यायाम कार्यक्रम सुरू करण्यात आला. नंतर, तो उपचाराचा एक अत्यावश्‍यक भाग बनला. व्यायाम अत्यावश्‍यक आहे कारण ते, कायमच्या वेदनांनी कमी झालेले एन्डॉर्फीन्स्‌ पुन्हा मिळवून देते असे आढळले आहे. तथापि, वेदना सहन करणाऱ्‍या लोकांना लाभदायक व्यायाम कार्यक्रम कायम ठेवण्यासाठी मदत करणे हे एक आव्हान आहे.

चिकित्सालयात येणारे कायमच्या वेदनेने पीडित असलेले पुष्कळ जण खूप वेदनाशामक औषधे घेत आहेत. यामध्ये लिंडा अपवाद नव्हती. परंतु लवकरच तिची औषधे बंद झाली. हे, वेदना चिकित्सालयांचे महत्त्वपूर्ण ध्येय आहे. लिंडाने औषधे सोडल्यामुळे कोणतीही शारीरिक किंवा मानसिक लक्षणे अनुभवली नाहीत, तरीसुद्धा ती असामान्य गोष्ट नाही. वेदना तज्ज्ञ डॉ. रोनल्ड मेलजॅक यांनी सांगितले की, “भाजलेल्या १०,००० पेक्षा अधिक बळींच्या अभ्यासात . . . , नंतर व्यसनाधीन झालेल्या एकही केसचा संबंध, हॉस्पिटलमध्ये राहात असताना, वेदना शमविण्यासाठी देण्यात आलेल्या झोपेच्या औषधाशी जोडला जाऊ शकत नाही.”

कायमच्या वेदनेची एक मोठी मानसिक बाजू असल्यामुळे, चिकित्सालये रुग्णांना त्यांच्या वेदनांकडे हेतूपुरस्सर लक्ष न देण्यास मदत देतात. हार्व्हड वैद्यकीय शाळेतील प्राध्यापक, डॉ. ऑर्थर बॉर्स्की यांनी म्हटले, “तुम्ही कशाचा विचार करता, तुम्ही कशाची अपेक्षा करता, भावनांकडे तुम्ही किती लक्ष देता—या सर्व गोष्टींचा, तुम्हाला खरोखर काय वाटते यावर एक प्रचंड प्रभाव पडतो.” यास्तव, रुग्णांना वेदनांशिवाय इतर गोष्टींवर लक्ष देण्यास मदत दिली जाते.

बरे होण्याचा संभव

ही नवी वेदना चिकित्सालये मानवी वेदनांच्या समस्यांचे उत्तर आहेत का? येथे वर्णिलेल्या वेदना-उपचार पद्धती मदतदायी असल्या तरी, योग्य चिकित्सालय किंवा वेदना विशेषतज्ज्ञ निवडण्यात एखाद्याने काळजी घ्यावी. तरीसुद्धा, अपेक्षा वास्तविक असाव्यात.

एका विशिष्ट यशस्वी गोष्टीचे उदाहरण देऊन सांगायचे तर: पूर्वी ऑलंपिकमध्ये वजन उचलणारा, स्टीफन कॉफमॅनच्या मानेत एका लुबाडणाऱ्‍या हल्लेखोराने गोळी झाडल्यामुळे तो पीडित झाला. कायमच्या वेदनेमुळे तो अगदीच निकामी झाला. आठ महिन्यांच्या वेदना-उपचार कार्यक्रमानंतर, तो कामावर पुन्हा रुजू होऊ शकला आणि कालांतराने, स्पर्धात्मक वजन उचलणे हे देखील करू शकला. तरीसुद्धा त्याने म्हटले: “बहुधा, उकळत्या पाण्यात असल्याप्रमाणे माझ्या पायांच्या बोटांची आगआग होते.”

यास्तव, सर्व उत्साहात्मक प्रगतीनंतरही ‘वेदना ही नाहीत,’ या पवित्र शास्त्रीय अभिवचनाची पूर्णता घडवून आणणे हे मानवी क्षमतेच्या पलिकडे आहे. (प्रकटीकरण २१:४) मग, हे ध्येय कसे मिळवले जाऊ शकते? (g94 6/22)

[तळटीपा]

^ आम्ही कोणत्याही विशिष्ट वेदना चिकित्सालय किंवा उपचार पद्धतीची शिफारस करीत नाही.

[९ पानांवरील चित्रं]

वेदनांचा उपचार करण्याच्या पद्धती, शिवाय विद्युत चेता उद्दीपन

[चित्राचे श्रेय]

Courtesy of Pain Treatment Centers of San Diego