व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सरस ओढणे—ते मला खरोखरच इजा करु शकते का?

सरस ओढणे—ते मला खरोखरच इजा करु शकते का?

तरुण लोक विचारतात. . . .

सरस ओढणे—ते मला खरोखरच इजा करु शकते का?

“खूप मज्जा वाटते—एखादे कार्टून पाहण्यासारखेच आहे.” असे मॉस्को, रशिया येथील एका १३ वर्षिय श्‍वेता या मुलीने म्हटले. * पण श्‍वेता अलिकडील चित्रपट किंवा व्हिडीयोबद्दल अतिउत्साही नाही. ती तिचा मादक द्रव्याच्या दुरुपयोगाचा एक अनुभव सांगते, जे जगभरामध्ये हजारो युवकांना लोकप्रिय वाटते, ते आहे—सरस ओढणे.

तरीदेखील, युवक जी कित्येक मादक द्रव्य ओढत असतात त्यापैकी सरस हा एक आहे. उदाहरणार्थ, ब्रिटनमध्ये सध्याचे तरुण लोक (इंग्रजी) या नियतकालिकानुसार एअर फ्रेशनर्स, प्रज्वलित इंधन, आणि “२० ते ३० इतर सर्वसामान्य घरगुती साधनांचा गैरवापर केला जात आहे.” यामध्ये, “दु:ख निवारण करणारे द्रव्य, लाकडाच्या सामानांचे पॉलिश, आणि सर्व पंक्चर दुरुस्तीसाठी असलेले साहित्य यांचा समावेश आहे.” इतकेच काय पण, काही युवक अग्नीशामक रसायनाच्या धुराचा ओढण्यास वापर करतात! यास्तव, या लोकप्रिय परंतु अपायकारक सवयीला, काही तज्ज्ञांप्रमाणे “द्रावकाचा गैरवापर” किंवा “चटकन वायुरुप होणाऱ्‍या पदार्थाचा गैरवापर” असे म्हणणे अगदी बरोबर आहे.

तो सरसचा किंवा लाकडाच्या साहित्याचा पॉलिश यांचा गैरवापर असो, ओढणारे एकाच प्रकारचे परिणाम उपभोगतात. एका उगमाप्रमाणे, त्याची अशी इच्छा आहे की, मद्य प्राशन केल्यावर जी नशा येते त्याप्रमाणेच अत्यानंदाची स्थिती असावी. कोकेनसारख्या व्यसनी व शरीराला अति हानीकारक असणाऱ्‍या मादक द्रव्यापेक्षा द्रावक हे स्वस्त आणि अधिक मिळण्यासारखे आहे. ब्रिटनच्या नवा वैज्ञानिक (इंग्रजी) नियतकालिकाने असा अहवाल दिला: “द्रावक हे पुन्हा एकदा गरीबांचे, युवकांचे आणि ताबा नसलेल्यांचें मादक औषध बनले आहे. ग्वातेमाला येथील बेघर मुले आणि उत्तर अमेरिकेतील स्थानिक रहिवाशी त्याचप्रमाणे वसतिगृहातील युवक आणि ब्रिटनमधील रात्रीचा आसरा घेणारे” हे ते होत. ब्रिटन येथील काही अधिकारी, असा विश्‍वास बाळगतात की, यौवनावस्थेतील युवक व युवतींपैकी १० पैकी १ द्रावक ओढत होते. यामुळे निश्‍चितच परिणाम हा अपायकारक आहे.

मादक पदार्थांचा गैरवापर (इंग्रजी) ह्‍या पुस्तिकेने वर्णन केले की, “श्‍वसनाने आत घेतले जाणारे द्रावक बाष्परुपाने फुप्फुसाद्वारे शोषून घेतले जाते, आणि वेगाने मंदूकडे पोहोचते.” द्रावक मध्य चेतासंस्थेवर परिणाम करते, आणि मद्याप्रमाणे ते तात्पुरते अत्यानंदाची स्थिती आणू शकते. वापर करणाऱ्‍या काहीमध्ये ते वेगवेगळ्या प्रकारे थोड्या काळासाठी भ्रम उत्पन्‍न करते पण, आरंभी श्‍वेताने वर्णन केल्याप्रमाणे सर्वच काही सुखावह नाही. डेविड नावाच्या युवकाने त्याच्या वयाच्या १४ व्या वर्षी सरस ओढला त्याने म्हटले: “मी अनेक उंदरं पाहिली, तेथे हजारो होती व त्यांच्यामधून लहान बाहेर येत होती. मला वाटले ते माझ्या मित्रांना खात होते.” कॉझूहिको नामे एक जपानचा युवक ज्याने त्याच्या वयाच्या १७ व्या वर्षी सरस ओढले, त्याने स्मरण केले: “मी जमीन दुभागत असताना व श्‍वापदाचा माझ्यावर हल्ला होत असताना पाहिले.”

मग, काही युवकांना द्रावक ओढणे इतके आकर्षक का वाटत आहे? ली ज्याने वयाच्या १३ वर्षी सरस ओढण्यास सुरवात केली त्याने म्हटले: “मूलभूतपणे, लोकांनी असे करण्याचे कारण म्हणजे जी सत्यता आहे त्यापासून सुटका मिळविण्याचा प्रयत्न करतात.” होय, काही युवकांसाठी अधिक नशा चढणे हा एक समस्या विसरण्याचा मार्ग आहे. इतर जण तो आनंद प्राप्त करण्यास धडपडतात; त्यांना वाटते घाबरविणारा भास मनोरंजक भीतीच्या चित्रपटासारखा आहे. आयर्लंडचे आरोग्य खाते म्हणते, “इतरही कारणांमध्ये जिज्ञासा, समवयीनांच्या गटाच्या दबावास प्रतिसाद, प्रतिष्ठा प्राप्त करण्याचा प्रयत्न, स्वत:विषयी चांगले मत नाही या गोष्टीला भरुन काढणे, व अपुरेपणाच्या भावना यांचा समावेश आहे.”

अचानक मृत्यू

ते काहीही असो, द्रावक ओढणे ही अपायकारक सवय आहे! त्यामुळे ब्रिटनमध्ये १९९० या वर्षी १४९ जणांचा मृत्यू घडला; काही वेळेस तर ही सवय काही क्षणातच ठार करते. त्याला “ओढण्याने अचानक मृत्यू” असे म्हटले जाते. उदाहरणार्थ, रेचेल टाईप केलेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्‍या द्रावकाला आपल्या बाहीवर लावून ते शाळेत असताना ओढत असे. एके दिवशी बसमध्ये प्रवास करत असताना तिने ते ओढले. ती बसमधून उतरली व खाली पडली. काही क्षणासाठी ती उठली पण पुन्हा कोसळून—मरण पावली! रेचेल १५ वर्षांची होती.

विशेषत: भीतीची वस्तुस्थिती ही आहे की, अगदी पहिल्या वेळेस त्याचा तुम्ही दुरुपयोग केला तर ते द्रावक तुम्हाला ठार मारु शकते! री-सॉल्व्ह, ही ब्रिटीश धर्मादाय संस्था द्रावकाच्या दुरुपयोगाविरुध्द लढत देत होती तिने अहवाल दिला: “१९७१ ते १९८९ च्या दरम्यान जेवढे द्रावकाच्या दुरुपयोगामुळे ठार झाले, त्यांच्यापैकी १८% हे पहिल्यांदाच ‘ओढणारे’ होते.” मृत्यू पावणाऱ्‍यांपैकी सर्वात लहान हा फक्‍त नऊ वर्षांचा होता. मद्यार्काच्या दुरुपयोगाप्रमाणे, द्रावकाचा दुरुपयोग “सर्पासारखा दंश करितो, फुरश्‍याप्रमाणे झोंबतो” असे म्हणू शकतो.—नीतिसूत्रे २३:३२.

द्रावकाच्या प्रभावाखाली असताना अचानक अपघाताच्या परिणामामुळे देखील ओढणाऱ्‍यांचा मृत्यू घडून येऊ शकतो. काही जण इमारतीच्या वरुन पडले किंवा पाण्यात बुडून मेले. काही बेशुद्ध होऊन आणि स्वत: ओकारी करत असताना क्षणातच गुदमरुन मेले. काहींचा मृत्यू डोक्यावर प्लॅस्टिकची पिशवी ठेवून ओढल्याने देखील झाला. त्यांना इतकी नशा चढली की, ती पिशवी ते काढू शकले नाहीत व त्यामुळे ते गुदमरले मेले. इतर जण, द्रव्यांना आग लागल्यावर जळून मेले.

शरीराचे प्रदूषण आणि इतर धोके

अशाप्रकारे घातक परिणामांचा अनुभव सर्वांनाच येत नसला, तरी एक, तज्ज्ञ लिहितात: “नियमित दुरुपयोग करणाऱ्‍याला हे माहीत आहे की, तो त्याची पद्धत ‘भ्रष्ट’ करत आहे आणि त्याचा अनुभव जसे छाती दुखणे, तोल गमावणे, डोकेदुखी, स्मरणशक्‍ती गमावणे, व इतर अनेक लक्षणे जी तो क्वचितच कबूल करतो.” ली आठवतो: “माझ्या जीवनात मी कधीही अनुभवले नाही इतकी डोकेदुखी होती.” री-सॉल्व्ह ही संस्था म्हणते की, द्रावक ओढणे हे मुत्रपिंडाला व यकृताला खराब करु शकते. ते मानसिक दुर्बळता, व औदासीनतेस कारणीभूत होऊ शकते.

मग, काही नैतिक धोके आहेत. काही ओढणारे त्यांच्या सवयीला चालू ठेवण्यासाठी चोर बनले आहेत. जपानच्या दैनिक योमीयूरी (इंग्रजी) या वर्तमानपत्राने काय अहवाल दिला ते विचारात घ्या: “मुलीची हत्या करणाऱ्‍या तीघा आरोप्यांपैकी एकाने म्हटले की, मुलीची हत्या करत असताना कुठल्याही गुन्ह्याचा भास झाला नाही कारण, त्यावेळी तो पूर्णपणे द्रव्याच्या प्रभावाखाली होता.”

शेवटी, द्रावकाच्या उपयोगाने त्याचा परिणाम त्याच्यावर भावनात्मकपणे त्याच्यावर विसंबून राहण्यामध्ये घडतो—म्हणजेच द्रावकाचे व्यसन. स्कॉटलंडचे ग्लासगोव हेरल्ड म्हणते: “द्रावकाचा दुरुपयोग करणाऱ्‍यांपैकी काही १०% यांची ओढणे ही सवय झाली आहे.” हे एखाद्याच्या फक्‍त भावनिक व अध्यात्मिक वाढीस अडथळा होऊ शकेल. १ करिंथकर १४:२० मधील पवित्र शास्त्रातील शब्द विचारात घ्या: “बालबुद्धीचे होऊ नका; पण  . . समजुतदारपणाबाबत प्रौढांसारखे व्हा.” ह्‍याच्यामध्ये एखाद्याची वाढ कशी होते? इब्री ५:१४ मध्ये पवित्र शास्त्र स्पष्टीकरण करते: “पण ज्याच्या ज्ञानंद्रियांना वहिवाटीने चांगले आणि वाईट समजण्याचा सराव झाला आहे अशा प्रौढांसाठी जड अन्‍न आहे.” या सवयीच्या आहारी गेलेल्या माणसाला स्वत:च्या आकलन शक्‍तीची वाढ करण्यास जमत नाही. तो समस्यांना तोंड देण्याऐवजी, मादक औषधाने आलेल्या गुंगीद्वारे त्या समस्यांपासून सुटका मिळविण्याचा प्रयत्न करतो. सध्याचे तरुण लोक या नियतकालिकाने म्हटले की, “नियमित ओढणारे, युवक अवस्थेतच पकडले जातात, ते प्रौढावस्थेपर्यंत जाऊ शकत नाहीत.”

ओढण्याचा कधीही प्रयत्न करु नका!

द्रावक ओढणारे तुमचे काही सोबती तुम्हाला माहीत असतील, आणि ती फक्‍त स्वाभाविक जिज्ञासा आहे. पण पवित्र शास्त्र म्हणते: “देहाच्या व आत्म्याच्या सर्व अशुध्दतेपासून आपण स्वत:ला शुध्द करु आणि देवाचे भय बाळगून पावित्र्याला पूर्णता आणू.” (२ करिंथकर ७:१) जे तुमच्या शरीराला दूषित करते, किंवा मनावरील तात्पुरता ताबा नियंत्रण करण्यास कारणीभुत होते त्याचा प्रयोग का करावा? आम्हासाठी पवित्र शास्त्राचा सल्ला “सावध रहावे” असा आहे. (१ थेस्सलनीकाकर ५:६) या वाक्य्‌प्रचाराचा शब्दश: अर्थ, “आम्ही शांतचित्त असु” असा आहे. त्याच्या बहुमोल विचारांची योग्यता दूषित करण्याऐवजी एखादा ख्रिस्ती सुज्ञपणे त्यांचे संरक्षण करतो.—नीतिसूत्रे २:११; ५:२.

कॉझूहिको म्हणतो: “मला वाईट वाटते, मी ती सवय कधीही सुरु करणार नाही.” ली म्हणते: “ते खूपच मुर्खपणाचे आहे. ती खूपच धोकेदायक गोष्ट आहे.” स्वत:ला अधिक दु:ख आणि क्लेश यापासून वाचवा, व सरस ओढण्याची सुरवात करण्याचा कधीहि प्रयत्न करु नका. पवित्र शास्त्र म्हणते त्याप्रमाणे वागा जसे: “चतुर मनुष्य अरिष्ट येता पाहून लपतो; भोळे पुढे जातात आणि हानि पावतात.”—नीतिसूत्रे २२:३.

तरीहि, हा सल्ला पाळणे सोपे नाही. असे म्हटले जाते की, युवकांनी द्रावक ओढण्याच्या पाशामध्ये पडण्याचे सर्वसाधारण कारण म्हणजे, “समवयीन गटाचा दबाव.” डेविड म्हणतो, “माझ्या थोरल्या भावाने माझ्यामध्ये सरस ओढण्याची आस्था वाढविली.” कॉझूहिको भर घालतो, “माझ्या मित्रांनी मला त्याची सुरवात करुन दिली.” होय, जसे १ करिंथकर १५:३३ म्हणते: “कुसंगतीने नीती बिघडते.” तुमच्या सोबत्यांना तुमच्या जीवनाचा नाश का करु द्यावा? यहोवा आमचा स्वर्गीय पिता, विनवितो: “माझ्या मुला, पापी जन तुला भुलथाप देतील तर तिला वश होऊ नको.”—नीतिसूत्रे १:१०

इतर तुम्हावर मादक द्रव्याचा वापर करण्यास दबाव आणत असतील तर सुज्ञपणे तुमच्या पालकांना ते कळू द्या. तुमच्या नकार देण्याच्या निर्णयाला ते अधिक मजबूत करु शकतील. दुसऱ्‍या बाजूला, द्रावक ओढण्याचा प्रयत्न करण्यास तुम्हाला भुरळ घातली जाईल, कारण तुम्हावर दबाव आल्यासारखे किंवा समस्यांनी भारावून गेल्यासारखे वाटेल. समस्यांपासून सूटका मिळविण्याचा उत्तम मार्ग म्हणजे, तुमच्या समस्यांबद्दल तुमच्या पालकांशी किंवा इतर काही अनुभवी, परिणामकारी प्रौढांशी बोलणी करणे. तुम्हाला मार्गदर्शनाची गरज आहे, मादक द्रव्याद्वारे मिळणारी तथाकथित सुटका नव्हे. तुम्हाला विरोधात लढा देण्यासाठी तुम्ही प्रार्थना या तरतुदीचाही फायदा घेऊ शकता. “सर्वदा [देवावर] भाव ठेवा,” असे स्तोत्रकर्ता म्हणतो. “त्याच्या पुढे आपले मन मोकळे करा.”—स्तोत्र ६२:८

द्रावक ओढणे हे आनंदाचे दिसत असेल, तरीपण ते तुमच्या समस्या सोडवू शकणार नाही. खरोखर, ते तुमच्या जीवनाचा नाश करु शकते. हुशार व्हा. ओढण्याचा कधीही प्रयत्न करु नका. (g94 6/22)

[तळटीपा]

^ काही नावे बदलण्यात आली आहेत.

[१३ पानांवरील चित्रं]

घातक सवयीकडे स्वत:ला आकर्षवू देण्यास सोबत्याच्या दबावाला परवानगी देऊ नका