व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

त्यांनी आपला शब्द पाळला!

त्यांनी आपला शब्द पाळला!

त्यांनी आपला शब्द पाळला!

ॲन्टोनियो, बारावीत शिकत होता आणि आपल्या वर्गातल्या मुलांना अनौपचारिक साक्ष देण्याची त्याची खूप इच्छा होती. त्यामुळे त्याच्या वर्गात इतिहास शिकविणाऱ्‍या शिक्षिकेस त्याने जेहोवाज विटनेसस स्टॅण्ड फर्म अगेंस्ट नात्सी असॉल्ट ही व्हिडिओ कॅसेट दाखवण्याची विनंती केली. काहीशा अनिच्छेनेच, तिने दुसऱ्‍या दिवशी ती कॅसेट दाखवण्याचे मान्य केले.

ॲन्टोनियो म्हणतो, “सुरवातीला शिक्षिका तो व्हिडिओ पाहत देखील नव्हती, पण जेव्हा तिला दिसले की सुप्रसिद्ध इतिहासकार यहोवाच्या साक्षीदारांच्या छळछावण्यातील अनुभवांविषयी आपले विचार मांडत आहेत तेव्हा ती कान देऊन ऐकू लागली. शेवटी तिने हा व्हिडिओ दाखवण्याचे सुचवल्याबद्दल माझे आभार मानले.”

पुढच्या तासाला, शिक्षिकेने जर्मनीत त्याकाळी बीबेलफॉर्शरच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्‍या यहोवाच्या साक्षीदारांच्या कामाबद्दल काही सांगण्याचा प्रयत्न केला. पण, आपण काही सांगण्याऐवजी ॲन्टोनियोच या विषयी चांगल्याप्रकारे सांगू शकेल हे तिच्या लक्षात आले. समाजात साक्षीदारांची काय भूमिका आहे याबद्दल आणि आपण विश्‍वास करत असलेल्या काही तत्त्वांचे ॲन्टोनियोने स्पष्टीकरण दिले. शेवटी तो म्हणाला: “साहजिकच, जर कोणी आमचा संदेश ऐकला नाही किंवा तोंडावर धाडकन दार बंद केले किंवा आमच्या पत्रिका वाचल्या नाहीत तर या बहुमोल संदेशाचा त्यांना काहीच लाभ होणार नाही.”

ॲन्टोनियोच्या म्हणण्यावर सर्वजण सहमत झाले आणि शिक्षिकेने वर्गासमोर एक संकल्प सुचविला: संधी मिळताच ते साक्षीदारांचे ऐकतील, आणि त्यांनी दिलेल्या पत्रिकांचा स्वीकार करतील. काही वेळ व्हिडिओबद्दल वर्गात चर्चा होत राहिली. काही दिवसानंतर वर्गातल्या मुलांच्या हातात संस्थेची प्रकाशने पाहून आणि त्यांना असे म्हणताना ऐकून “पाहिलंस, मी माझा शब्द पाळला” ॲन्टोनियोला किती आनंद झाला असेल याचा तुम्ही अंदाज लावू शकता.