संकटांनी आम्हाला यहोवावर भरवसा ठेवण्यास शिकवलं
संकटांनी आम्हाला यहोवावर भरवसा ठेवण्यास शिकवलं
रोझी मेजर यांनी कथित केल्याप्रमाणे
मार्च १९९२ चा तो दिवस. माझा पाचवा महिना सुरू होता. माझं हे पहिलंच बाळंतपण. माझे पाय जरा जास्तच सुजल्याचं माझ्या सासूनं लगेच ताडलं. नजीकच्या भविष्यात आमच्यासाठी काय वाढून ठेवलंय आणि त्यामुळे यहोवावरील आमच्या भरवशाची कशी परीक्षा होईल याची मला आणि माझे पती जोई यांना पुसटशी देखील कल्पना नव्हती.
दुसऱ्याच आठवडी आम्ही डॉक्टरांकडे गेलो. माझं ब्लड प्रेशर कमालीचं वाढलं होतं. पुढील टेस्ट आणि निरीक्षणासाठी डॉक्टरांनी मला ॲडमिट व्हायला सांगितलं तेव्हा नाही म्हटलं तरी मी काळजीतच पडले. साहजिक आहे. हॉस्पिटलमध्ये केलेल्या टेस्टवरून समजलं, की मला प्रीएक्लेम्पशिआ झाला आहे; हा गर्भार स्त्रियांना होणारा गुंतागुंतीचा रोग असून कधीकधी यामुळे मृत्यूही संभववतो. *
या रोगामुळे माझ्या आणि बाळाच्या जीवाला धोका पोहंचू नये म्हणून डॉक्टरांनी लगेच डिलिव्हरी करण्याचा सल्ला दिला. हे ऐकून आम्ही दोघंही सुन्न झालो. “अहो पण, बाळ २४ आठवड्यांचंही नाही! ते जिवंत कसं राहणार?” असं जिवाच्या आकांतानं मी डॉक्टरांना सांगत होते. त्यावर डॉक्टर म्हणाले: “ठिक आहे. आपण थोडा वेळ थांबू. पण, तुमची तब्येत आणखीनच बिघडली तर माझ्यापुढे दुसरा पर्याय राहणार नाही.” तेरा दिवस होऊन गेले आणि माझी तब्येत फारच ढासळली. डॉक्टरांनी माझ्या पतीला माझ्या खोलीत बोलावलं आणि आम्ही दोघांनी डिलिव्हरीला संमती देण्याचा कठीण निर्णय शेवटी घेतला.
डिलिव्हरी
डिलिव्हरीच्या आदल्या रात्री प्रसूती तज्ज्ञ डॉ. मॅकनील यांनी आम्हाला समजावून सांगितलं, की आम्हाला होणारं बाळ अकालिक (प्रिमेच्युअर) असल्यामुळे कोणती ना कोणती विकृती घेऊन ते जन्माला येईल. कदाचित, त्याच्या मेंदूवर परिणाम झालेला असेल, किंवा फुफ्फुसाची पूर्ण वाढ न झाल्यामुळे ते फुफ्फुस कदाचित ठिक काम करणार नाही आणि अशा अनेक फिलिप्पैकर ४:७) दुसऱ्याच दिवशी सकाळी सिझरियन करण्यात आलं आणि आमच्या मुलीचा जन्म झाला. अवघं एक पाउंड ७०० ग्राम वजन होतं तिचं. आम्ही तिचं नाव जोअन शेली ठेवलं.
विकृती नवजात बालकामध्ये असण्याची शक्यता होती. त्या क्षणी, ‘सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेल्या देवाच्या शांतीसाठी’ आणि आमच्यासाठी जे काही वाढून ठेवलं होतं ते स्वीकारून त्याचा सामना करता यावा म्हणून शक्ती, सामर्थ्यासाठी मी देवाला प्रार्थना केली. (डिलिव्हरीनंतर पाचव्या दिवशी मी घरी गेले खरं पण रिकाम्या हाती. माझी तान्ही मुलगी हॉस्पिटलमध्येच खास बाल निगा विभागात जीवन-मृत्यूच्या सीमेवर मरणाशी झुंजत होती. दोन आठवड्यांनंतर जोअनला न्यूमोनिआ झाला. त्यातून ती सावरली म्हणा; पण, काही दिवसांतच तिच्या आतड्यांत इंफेक्शन झालं. त्यामुळे तिला अति दक्षता विभागात हलवावं लागलं. पुढच्याच आठवड्यात तिला थोडं बरं वाटू लागलं आणि अंगानंही ती भरू लागली. हे पाहून आम्हा दोघांना आभाळाइतका आनंद झाला! पण, जोअन ॲनेमिक (रक्तक्षयी) असल्याचं डॉक्टर मॅकनीलनं आम्हाला सांगितलं तेव्हा आमच्या आनंदावर विरजण पडलं. जोअनच्या रक्तामधील लालपेशींची संख्या वाढवण्यासाठी डॉक्टरांनी आम्हाला लगेच सिंथेटिक हॉरमोन एरिथ्रोपॉयेटिन (इपिओ) नावाचं औषध आणायला सांगितलं. इथल्या म्हणजे बाहामातील यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा दफ्तरानं ब्रूकलीन, न्यूयॉर्कमधील हॉस्पिटल इन्फर्मेशन सर्व्हिसेसशी संपर्क साधला; इपिओच्या उपलब्धतेविषयी आणि त्याच्या उपयुक्ततेविषयीची अद्ययावत माहिती त्यांनी ताबडतोब डॉ. मॅकनीलला दिली आणि डॉक्टरांनी उपचार सुरू केले.
आणखीन समस्या
कित्येक दिवस, नव्हे कित्येक आठवडे चिंतेमुळे आमची झोप उडाली होती. जोअनच्या आतड्यांना झालेलं इन्फेक्शन, तिला येणारे ॲपनीआचे झटके (यात श्वसनक्रिया तात्पुरती बंद होते), तिच्या शरीरातील हिमोग्लोबीनचं घसरलेलं प्रमाण आणि तिला झालेला श्वास नलीकेसंबंधित न्यूमोनिआ या सर्व मरणप्राय आजारांशी तिचा इवलासा जीव झुंजत होता. यांपैकी कुठलाही आजार जोअनच्या जीवावर बेतला तर! असे नको ते विचार आमच्या मनात यायचे. पण, जोअनची तब्येत हळूहळू सुधारली. जोअन आता तीन महिन्यांची झाली होती परंतु ती अद्यापही हॉस्पिटलमध्येच होती. तिचं वजन फक्त १.४ किलो होतं. पण, तिच्या जन्मानंतर पहिल्यांदाच कृत्रिम प्राणवायूशिवाय ती श्वासोच्छ्वास करत होती. तिचं हिमोग्लोबीनचं प्रमाण देखील नॉर्मलवर येत होतं. तरीसुद्धा डॉक्टरांनी तिला घरी सोडलं नाही. तिचं वजन आणखीन ५०० ग्राम वाढल्यानंतर तुम्ही तिला घरी घेऊन जाऊ शकता असं त्यांनी आम्हाला सांगितलं.
याच्या तीनच आठवड्यांनंतर जोअनला ॲपनीआचा जबरदस्त झटका आला. टेस्ट वगैरे करण्यात आल्या पण याचं नेमकं कारण गवसलं नाही. त्यानंतर तिला नेहमीच असे झटके येऊ लागले. हे झटके तिनं काही प्यायल्यानंतरच यायचे. डॉक्टरांना शेवटी समजलं, की जोअनला गॅस्ट्रोइसोफेजीअल रिफ्लक्स (जठर-आहारनलिकासंबंधित आजार) झाला आहे. अन्न खाल्ल्यानंतर तिची अन्ननलिका बंद होत नसे; त्यामुळे पोटातलं अन्न पुन्हा वर घशात यायचं. त्यामुळे तिला गुदमरायला होऊन तिचा श्वास तात्पुरता बंद व्हायचा.
हे सर्व कमी म्हणून की काय, ऑक्टोबर महिन्याच्या सुरवातीला मुलांच्या वॉर्डमध्ये असताना जोअनला विषाणूची लागण झाली. यामुळे वॉर्डमधली बरीच प्रिमॅच्युअर मुलं दगावत होती. त्यातच, जोअनला पुन्हा ॲपनीआचा झटका आला. तिला आजवर आलेला हा सगळ्यात भयंकर झटका होता. तिला शुद्धीवर आणण्यासाठी डॉक्टरांनी कुठंही कसूर सोडली नाही. पण, त्यांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. आता डॉक्टरांनीही आशा सोडून दिली होती. तोच एकाएकी जोअनचा श्वासोच्छ्वास पुन्हा सुरू झाला. परंतु, लगोलग तिला झटकेही येऊ लागले. पुन्हा एकदा तिला कृत्रिम श्वासोच्छ्वास देण्यात आला. आता यातच जोअनचा शेवट होणार याची खात्री आम्हाला झाली होती. पण, त्यातूनही ती सावरली आणि आम्ही सुटकेचा निःश्वास सोडला.
यहोवावर अधिक भरवसा ठेवण्यास शिकलो
जोअनच्या जन्माआधी आम्ही ज्या ज्या समस्यांना सामोरे गेलो त्याची तुलना बोटीतनं धक्क्याजवळ पडण्याशी केली जाऊ शकते जिथून एखाद्याला किनारा गाठणं फार कठीण नसतं. परंतु, आता आम्ही धक्क्याजवळ नाही तर धक्क्यापासून फार फार दूर कुणाच्याही मदतीची आशा करता येणार नाही अशा एका अथांग महासागरात होतो. मागे वळून पाहता, आमच्या लक्षात आलं, की जोअनचा जन्म होण्याआधी काही वेळा आम्ही मत्तय ६:३४) कधी कधी काय प्रार्थना करावी हेसुद्धा आम्हाला सुचत नसे. पण तरी आम्ही सर्व काही यहोवावर सोडून देण्यास शिकलो. आम्हाला बायबलमधून सुज्ञान आणि ‘पराकोटीचे सामर्थ्य’ दिल्याबद्दल आज आम्ही यहोवा परमेश्वराचे किती कृतज्ञ आहोत! त्यांमुळेच तर अशा खडतर काळातून तरुन जाणं आम्हाला शक्य झालं.—२ करिंथकर ४:७.
सर्वस्वी स्वतःवर भरवसा ठेवला होता. परंतु, समस्यांची ही मालिकाच आमच्या वाट्याला आल्यावर मात्र यहोवावर भरवसा ठेवायला आम्ही शिकलो; खासकरून मनुष्याच्या हातांत काहीच नसतं तेव्हा. येशूनं सल्ला दिला त्याप्रमाणे उद्याची चिंता न करता त्या दिवसाची चिंता त्याच दिवशी करण्यास आम्ही शिकलो. (कधी कधी अचानक आमच्यावर संकटं यायची तेव्हा मी भावनाविवश व्हायचे. एकसारखा जोअनचाच विचार मला सतवायचा. पण, अशावेळी माझा आध्यात्मिक तोल सांभाळण्यास माझे पती जोई माझ्या पाठीशी असायचे. त्यासाठी मी त्यांची मनस्वी आभारी आहे.
जोअन घरी येते
हळूहळू का होईना पण जोअनच्या तब्येतीत फरक पडत होता. एकदा तर तिनं तोंडाला लावलेली कृत्रिम श्वसन नलिका अक्षरशः ओढून काढली. जोअनला आता घरी घेऊन जाण्यात काही हरकत नाही असं डॉ. मॅकनील यांनी आम्हाला सांगितलं. हे ऐकून आमचा आनंद गगनात मावेनासा झाला! जोअनला घरी नेण्याआधी नलिकेच्या साह्यानं तिला दूध कसं पाजायचं हे आम्ही शिकून घेतलं. शिवाय, कृत्रिम ऑक्सिजनचा पुरेसा साठा आम्ही सोबत घेतला, हृदयाचं आणि श्वसनाचं मॉनिटर भाड्यानं घेतलं आणि तातडीनं शुद्धीवर आणण्याचं प्रशिक्षणही आम्ही घेतलं. अखेरीस, ऑक्टोबर ३० १९९२ रोजी आम्ही जोअनला हॉस्पिटलमधून घरी आणलं. जोअननं आणि तिच्यासोबत आम्ही देखील एकूण २१२ दिवस हॉस्पिटलच्या खास बाल निगा विभागात काढले होते.
अगदी सुरवातीपासून आमच्या कौटुंबिक सदस्यांनी आणि यहोवाच्या साक्षीदारांच्या ख्रिस्ती मंडळीच्या सदस्यांनी या दुःखाच्या प्रसंगी आम्हाला मोलाचा आधार दिला. तेच आमच्या घरी येऊन आमचं घर, आमची बाग स्वच्छ करायचे; स्वयंपाक करायचे; आम्हाला हॉस्पिटलमध्ये जाता यावं म्हणून आमची मदत करायचे आणि मला थोडीफार विश्रांती मिळावी म्हणून हॉस्पिटलमध्ये जोअनची देखभाल देखील करायचे. या सबंध काळादरम्यान, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू जे पूर्वी कधी आम्हाला दिसले नव्हते ते आम्हाला पाहायला मिळाले. उदाहरणार्थ, यांच्यापैकी काहींनी त्यांना स्वतःला संकटप्रसंगी साह्यभूत ठरलेल्या आध्यात्मिक गोष्टी सांगितल्या.
आजचं आमचं जीवन
जोअनच्या उपचारात आम्ही काहीएक कसूर ठेवली नाही. तिच्यावर उत्तमातला उत्तम उपचार केला. तरी ती १९ महिन्यांची झाली तेव्हा, मेंदूला इजा पोहंचल्यामुळे तिला सेरिब्रल पॅलसी नावाचा रोग झाल्याचं आम्हाला समजलं. त्यानंतर, सप्टेंबर १९९४ मध्ये तिच्यावर गॅस्ट्रोइसोफेजीअल रिफ्लक्सचं मोठं ऑपरेशन करण्यात आलं. पुढे, १९९७ मध्ये जोअनला जीवघेणे झटके येऊ लागले. परंतु, आहारात थोडाफार बदल केल्यानंतर झटके येण्याचं बंद झालं. या आजारांपायी जोअनची शारीरिक वाढ चारचौघांसारखी होत नाही. पण, आता ती एका खास शाळेत जाते आणि पहिल्यापेक्षा फार बरी आहे. तिला चालता येत नाही की नीट बोलताही येत नाही; पण, तरीही ती आनंदानं आमच्यासोबत सर्व ख्रिस्ती सभांना आणि घरोघरच्या प्रचार कार्यालाही येते.
आमच्या या दुःखाच्या आणि संकटाच्या काळात यहोवानं आम्हाला सतत सांत्वन दिलं. त्यामुळे, अचानक येणाऱ्या संकटांतही नेहमी त्याच्यावर भरवसा ठेवण्याचं आणि ‘यहोवाच्या ठायी हर्ष करण्याचं’ आम्ही मनाशी पक्कं ठरवलं आहे. (हबक्कूक ३:१७, १८; उपदेशक ९:११) आता मोठ्या उत्सुकतेनं आम्ही देवाच्या नवीन जगाची वाट पाहत आहोत कारण तेव्हा आमची लाडकी जोअन देखील चारचौघांसारखी आनंदानं कोणत्याही आजाराविना बागडेल.—यशया ३३:२४.
[तळटीपा]
^ प्रीएक्लेम्पशिआ या रोगामुळे गरोदर स्त्रीच्या रक्तवाहिन्या प्रतिबंधित होतात. त्यामुळे शरीराच्या इतर भागांत तसेच गर्भवेष्टनास आणि त्यातील अर्भकास रक्ताचा अत्यल्प पुरवठा होतो. याचे नेमके कारण आजपर्यंत कुणालाही माहीत नसले तरी हा अनुवंशिक रोग असावा असे काही पुराव्यावरून दिसते.
[२५ पानांवरील चित्र]
आमची लाडकी जोअन
[२७ पानांवरील चित्र]
आजारानं जर्जर झाली असली तरी जोअन आनंदी आहे