व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“अतिशय उत्कृष्ट मासिकं”

“अतिशय उत्कृष्ट मासिकं”

“अतिशय उत्कृष्ट मासिकं”

अलीकडेच, अमेरिकेतल्या एका हायस्कूलमध्ये शिकणाऱ्‍या १८ वर्षांच्या लीसलने सावध राहा! नियतकालिकाच्या संपादकांना एक पत्र लिहिले. पत्रात ती म्हणते:

“सध्या मी इतिहासाचा कोर्स करत आहे. हा कॉलेज स्थरावरचा कोर्स असून त्यात प्रत्येक विद्यार्थ्याला सविस्तर संशोधन करून निरनिराळ्या विषयांवर लेख लिहावे लागतात. त्यामुळे मी, जर्मनीतील नात्सी राजवटीत यहोवाच्या साक्षीदारांनी घेतलेला नैतिक पावित्रा या विषयावर एक लेख लिहिण्याचा विचार केला आहे. त्यामुळे, जुलै ८, १९९८ च्या सावध राहा! (इंग्रजी) मासिकात ‘नात्सी छळसंकटांतही यहोवाचे साक्षीदार निश्‍चल’ या लेखाच्या शेवटी दिलेली संदर्भांची यादी मला पाठवून द्यावी अशी विनंती आहे. सदर लेख बरीच माहिती गोळा करून लिहिला होता हे प्रकर्षानं जाणवलं. शिवाय, तो इतक्या तर्कशुद्धपणे लिहिला होता की माझं सर्वस्व पणाला न लावताही मी माझा लेख लिहिला तरी माझा पेपर तपासणाऱ्‍या शिक्षण मंडळातील सर्वांना मोठ्या प्रमाणात साक्ष दिली जाईल हे निश्‍चित.

“तुम्ही अतिशय उत्कृष्ट मासिकं प्रकाशित करता याबद्दल मी तुमचे आभार मानू इच्छिते. तुमच्या प्रत्येक अंकात प्रकाशित होणारं साहित्य शाळेतील ‘साहित्यापेक्षा’ कितीतरी सरस असतं आणि त्यामुळेच प्रत्येक वेळा पहिल्यापेक्षा अधिक चांगल्याप्रकारे लेख लिहिण्याची प्रेरणा मला मिळत राहते. तुमच्या प्रयत्नांची, तुमच्या परिश्रमांची मी मनस्वी कदर करते.”

[२५ पानांवरील चित्राचे श्रेय]

मधले चित्र: Państwowe Muzeum Oświęcim-Brzezinka, courtesy of the USHMM Photo Archives