व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आमच्या वाचकांचे मनोगत

आमच्या वाचकांचे मनोगत

आमच्या वाचकांचे मनोगत

आफ्रिकी वादळ मी १२ वर्षांचा आहे आणि “वादळानंतर, ख्रिस्तीत्वाचा प्रत्यय” हा लेख प्रकाशित केल्याबद्दल मी तुमचे आभार मानू इच्छितो. (एप्रिल ८, १९९९) वादळग्रस्त लोकांच्या मदतीला धावून आलेल्या बांधवांचं मला फार कौतुक वाटतं! हा लेख वाचत असताना जपानमध्ये झालेल्या प्रचंड मोठ्या हॉनशीन भूकंपाच्या वेळी आपल्या बांधवांनी कशाप्रकारे इतरांची मदत केली त्याची आठवण झाल्याशिवाय राहिले नाही. तुमच्या लेखानं, मला धाडसी बनण्याचं तसेच इतरांचं भलं करण्यासाठी झटण्याचं उत्तेजन दिलं.

आर. के., जपान

पाच मुलं “पाच मुलांसाठी यहोवाची आभारी” (एप्रिल ८, १९९९) या लेखातल्या हेलन सॉल्सबेरीमध्ये आणि माझ्या आईमध्ये विलक्षण साम्य असल्यामुळे मला हा लेख विशेष आवडला. उदाहरणार्थ, दोघींचाही एकाच वर्षी बाप्तिस्मा झाला. वडिलांच्या कंपनीचे दिवाळे निघाल्यामुळे आमची आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची झाली तेव्हा हेलनप्रमाणेच आई देखील घरी राहून आम्हा मुलांचा सांभाळ करू लागली. हेलनप्रमाणेच ती देखील पूर्ण वेळेची प्रचारक अर्थात पायनियर बनली आणि क्षेत्रात आलेले अनेक मनोरंजक अनुभव ती आम्हाला सांगायची. त्यामुळेच तर पायनियरींग करण्याची इच्छा माझ्या मनात जागी झाली. माझा विवाह होऊन आज मला दोन मुली आहेत. त्यामुळे आमचं संगोपन करण्यासाठी आईला किती कठीण गेलं असेल हे मला समजू शकतं.

एम. एस., जपान

या लेखासाठी मला तुमचे विशेष आभार मानावेसे वाटतात. मलाही मुलंबाळं असल्यामुळे बायबलमधील सल्ला लागू करण्याचा मी प्रयत्न करतो. तरीसुद्धा, स्वतःबद्दल मला नेहमीच कमीपणा वाटायचा. पण, सॉल्सबेरी कुटुंबाचा अनुभव वाचून मला उत्तेजन मिळालं.

आर. एम. आर., ब्राझील

मिळत नसलेल्या गोष्टींची आस धरणे मी १२ वर्षांची आहे आणि “तरुण लोक विचारतात  . . मला हव्या असलेल्या वस्तू मी का घेऊ शकत नाही?” (एप्रिल ८, १९९९) या लेखासाठी मी तुमचे आभार मानू इच्छिते. सायकल, गिटार अशा बऱ्‍याच गोष्टी आपल्याकडे असाव्यात असं मला वाटतं. पण, माझे बाबा या सर्व गोष्टी माझ्यासाठी विकत घेऊ शकत नाहीत. त्यामुळे मी फार निराश होते. परंतु, तुमच्या या लेखानं माझी निराशा दूर करून मला खरोखरच उत्तेजन दिलं. असा पालकीय सल्ला दिल्याबद्दल मी तुमची आभारी आहे.

सी. यु., नायजेरिआ

“तरुण लोक विचारतात . . . मला हव्या असलेल्या वस्तू मी का घेऊ शकत नाही?” (एप्रिल ८, १९९९) हा लेख मी नुकताच वाचून काढला. त्या लेखासाठी मला तुमचे आभार मानावेसे वाटतात कारण आपल्याला हव्या असलेल्या सर्वच वस्तू आपल्याला मिळू शकत नाहीत याची जाणीव या लेखाने मला करून दिली. पण, लेखात म्हटल्याप्रमाणे यहोवाला आपली काळजी आहे आणि एक साधंसुधं जीवन जगण्यात मी आता खूप समाधानी आहे.

सी. के., कॅनडा