व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“आम्ही तुमचे किती आभारी आहोत!”

“आम्ही तुमचे किती आभारी आहोत!”

“आम्ही तुमचे किती आभारी आहोत!”

“कॅनडातील यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा दफ्तराला कॅरल नावाच्या एका स्त्रीने पत्र लिहिले होते. पत्रात ती म्हणते: “मला तुम्हाला अगदी आवर्जून सांगावंसं वाटतं, की मस्तिष्काघाताविषयी सावध राहा! [मार्च ८, १९९८] नियतकालिकात दिलेल्या लेखांमुळेच आज माझी आई जिवंत आहे.” एकदा कॅरलच्या आईचा डावा हात पूर्णपणे बधिर झाला होता. दुसऱ्‍या दिवशी सकाळी तिला नीटसं दिसेनासं झालं. कॅरल म्हणते: “आणखी एक दिवस थांबून मग डॉक्टरांकडे जावं असे आईला वाटत होतं. त्यावर मी तिला सावध राहा! मासिकातली मस्तिष्काघातावर लिहिलेली माहिती वाचण्याचा आग्रह केला. आईनं लेख वाचायला सुरवात केली आणि पंधराच मिनिटांत तिनं मला म्हटलं की, “मला आत्ताच्या आत्ता हॉस्पिटलला गेलं पाहिजे. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टरांनी एक पूर्ण रात्र आईला ऑब्सरव्हेशनवर ठेवलं. दुसऱ्‍या दिवशी डॉक्टरांकडून आम्हाला समजलं, की आईला खरं तर मस्तिष्काघाताचा जबरदस्त झटका आला असता; कारण तिला आधीच दोन सौम्य झटके येऊन गेले होते. पण, ताबडतोब हॉस्पिटल गाठल्यामुळे आईवरचं एक मोठं संकटच टळलं होतं. खरंच, मस्तिष्काघातावरील ही लेखमाला प्रकाशित केल्याबद्दल आम्ही तुमचे किती आभारी आहोत!”

अर्थात, बायबलमध्ये शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य राखण्यासंबंधी उपयुक्‍त मार्गदर्शन दिले आहे हे जाणून कदाचित तुम्हाला आश्‍चर्य वाटेल. हीच गोष्ट सर्व लोकांसाठी असलेले एक पुस्तक या आकर्षक ३२ पानी माहितीपत्रकाच्या पृष्ठ २० आणि २१ वर तसेच पृष्ठे २५ आणि २६ वर सांगण्यात आली आहे. सर्व लोकांसाठी असलेले एक पुस्तक या प्रकाशनाविषयी तुम्हाला अधिक जाणून घ्यायचे असल्यास तुमची मदत करण्यास आम्हाला आनंद वाटेल. तुमच्या परिसरात राहणाऱ्‍या आमच्या एका प्रतिनिधीला तुमची भेट घेण्याची व्यवस्था आम्ही करू शकतो. तुमची तशी इच्छा असल्यास कृपया पुढील कूपन भरून ते टपालाने आम्हाला पाठवून द्यावे किंवा या नियतकालिकाच्या पृष्ठ ५ वर दिलेल्या योग्य पत्त्यावर पत्र लिहावे.

□ कृपया तुमच्या प्रतिनिधीला माझ्या घरी पाठवा.

□ मला मोफत गृह बायबल अभ्यास हवा आहे; तेव्हा पुढील पत्त्यावर माझ्याशी संपर्क साधा.