व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कॉफीने तुमचे कॉलेस्ट्रॉल तर नाही वाढत?

कॉफीने तुमचे कॉलेस्ट्रॉल तर नाही वाढत?

कॉफीने तुमचे कॉलेस्ट्रॉल तर नाही वाढत?

ब्राझीलमधील सावध राहा! नियतकालिकाच्या बातमीदाराकडून

नेदरलंड येथील वॉकनिंजेन कृषी विद्यापीठातल्या संशोधकांच्या मते, फिल्टर न केलेल्या कॉफीमुळे शरीरातल्या कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते.

“फिल्टर न केलेली” ही अभिव्यक्‍ती फार महत्त्वाची आहे. का? वैज्ञानिक संशोधनाची नेदरलंड संघटना याच्या रिसर्च रिपोट्‌र्स या बातमीपत्रात असे म्हटले आहे की, कॉफीच्या बियांमध्ये कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढवणारा कॅफेस्टॉल नावाचा एक पदार्थ असतो. दळलेल्या कॉफीत गरम पाणी ओतण्यात येते तेव्हा कॅफेस्टॉल हा पदार्थ बाहेर पडतो. पाण्यात कॉफी खूप वेळापर्यंत उकळण्यात येते (टर्कीश कॉफीमध्ये करतात तसे) किंवा कागदाचा फिल्टर वापरण्याऐवजी धातूची गाळणी वापरली जाते (फ्रेंच प्रेस्समध्ये असते तशी) तेव्हासुद्धा कॅफेस्टॉल हा पदार्थ बाहेर पडतो. अशा वेळी, कागदाचा फिल्टर वापरला नाही तर आपल्या कॉफीमध्ये कॅफेस्टॉल तसाच राहतो.

फिल्टर न केलेल्या एक कप कॉफीत चार मिलीग्रॅम कॅफेस्टॉल असते; त्यामुळे कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण १ टक्क्याने वाढू शकते. एस्प्रेस्सो कॉफीतही कॅफेस्टॉल असते कारण त्यासाठीही कागदाचा फिल्टर वापरला जात नाही. परंतु, जर तुमचा कप लहान असेल तर मग कॉलेस्ट्रॉलही जास्त वाढत नाही. कमी एस्प्रेस्सो म्हणजे कमी कॅफेस्टॉल—एका कपात फक्‍त दोन किंवा तीन मिलीग्रॅम कॅफेस्टॉल. पण रिसर्च रिपोट्‌र्स असा इशारा देते की, एका दिवसात असेच लहान लहान पाच कप एस्प्रेस्सो कॉफी प्यायल्याने शरीरातल्या कॉलेस्ट्रॉलच्या प्रमाणात २ टक्क्यांनी वाढ होऊ शकते.

म्हणून, कागदाच्या फिल्टरमधून गाळलेली कॉफी सर्वात उत्तम कारण त्यात कॅफेस्टॉलचा अंश नसतो.