व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आमच्या वाचकांचे मनोगत

आमच्या वाचकांचे मनोगत

आमच्या वाचकांचे मनोगत

मूळ अमेरिकन भाषेतले बायबल “अमेरिकन इंडियन्सकरता बायबलची भाषांतरे” (जून ८, १९९९) हा लेख वाचताना तुम्ही मॅसाच्युसेट इंडियन लोकांसाठी जॉन एलीयेटच्या बायबल भाषांतराचे जे संदर्भ दिलेत त्यांनीच विशेषतः माझी आस्था वाढली. माझे पती आणि मी कॅलिफोर्नियाच्या सॅन मॅरिनो येथील हंटिंग्टन ग्रंथालयात गेलो होतो तेव्हा आम्ही ते बायबल पाहिलं होतं. त्यावेळी त्याचं स्तोत्रसंहिता हे पुस्तक उघडून ठेवलेलं होतं आणि त्यामध्ये यहोवा हे नाव वारंवार दिसून येत होतं. १७ व्या शतकातल्या या बायबल आवृत्तीत देवाचं नाव पाहून आम्हाला केवढा आनंद झाला!

बी. जे., अमेरिका

बालमजुरी “बालमजुरी—उच्चाटन दृष्टिपथात!” (जून ८, १९९९) ही लेखमाला सादर केल्याबद्दल आभारी आहे. मी पहिल्यांदा जेव्हा हे मासिक पाहिलं तेव्हा मनातल्या मनात म्हणाले होते की ही समस्या माझ्या देशात नाही. पण वाचायला सुरवात केल्यावर मला वाचन पूर्ण केल्याशिवाय राहावलं नाही. मला खूप मोठा धक्का बसला होता. मी परवाच हातानं बनवलेलं एक टेडी बेअर विकत घेतलं जे जपानमध्ये बनवल्या जाणाऱ्‍या खेळण्यांच्या तुलनेत खूपच कमी किंमतीचं होतं. लहान मुलांना निर्दयपणे राबवून त्यांनी बनवलेल्या या वस्तू कमी किंमतीत विकल्या जातात याचा विचार करून माझं मन तीळतीळ तुटतं.

एस. ओ., जपान

वजन मी दहा वर्षांची आहे. “तरुण लोक विचारतात . . . लठ्ठ होण्याची भीती मी कशी घालवू शकते?” (जून ८, १९९९) हा लेख सादर केल्याबद्दल आभारी आहे. मी खूप जाड आहे असं मला सारखं वाटायचं. पण हा लेख वाचल्यावर मला कळालं की, सुडौल बांधा सर्वात महत्त्वाचा नाहीये, त्या व्यक्‍तीचे गुण जास्त महत्त्वाचे असतात.

एम. एस., रशिया

“तरुण लोक विचारतात . . . लठ्ठ होण्याची भीती मी कशी घालवू शकते?” (जून ८, १९९९) या लेखासाठी मी तुमचे मनापासून आभार मानू इच्छिते. कित्येक दिवसांपासून माझ्या डोक्यात एकच विचार घोळत होता—माझा बांधा, माझं वजन. मला आरशात पाहिल्यावर स्वतःचीच लाज वाटायची आणि मी तर वजन करायचंच सोडून दिलं होतं. पण हा लेख वाचल्यावर मला जाणवलं की, बाहेरच्या दिसण्यापेक्षा आंतरिक व्यक्‍तिमत्त्व जास्त महत्त्वाचं असतं.

एल. आर., फ्रान्स

देवाच्या नजरेत बहुमोल पुष्कळदा मी दुःखी होते आणि मला असं वाटू लागतं की मी जास्त मेहनत करत नाही म्हणून पूर्ण-वेळेची सेविका असून माझा काही फायदा नाही. पण “बायबलचा दृष्टिकोन: देवाला तुमची किंमत आहे!” (जुलै ८, १९९९) हा लेख वाचून मला खूप बरं वाटलं. त्या लेखामुळं मी हे ओळखू शकले की, आपण यहोवाची सेवा सोडून द्यावी म्हणून सैतान मुद्दामहून असले विचार आपल्या मनात घालतो.

एल. डब्ल्यू., कॅनडा

कया लेखानं खूपच सांत्वन मिळालं. आतापर्यंत मला असं वाटायचं की यहोवा माझ्या प्रार्थना ऐकतच नाही. पण, तुमचा तो लेख वाचल्यावर माझा यहोवावरचा आणि स्वतःवरचा भरवसा आणखीनच वाढलाय. सांत्वन देणारे असे लेख आपण या पुढेही प्रकाशित कराल ही आशा.

आर.व्ही.टी., बेल्जियम

मला जीवनात असे काही वाईट अनुभव आलेत की ज्यांच्या जखमा माझ्या मनावर अजूनही ताज्या आहेत; खरं तर त्या माझ्याच चुका होत्या. त्यांच्यामुळे माझा आत्म-सन्मान मी गमावून बसले होते. पण आज, यहोवासोबतचा नातेसंबंध आणि त्याचे प्रेम मानवी समजबुद्धीच्या पलीकडे आहे या विचारामुळे माझ्या मनाला फार शांती मिळते आणि मला सुरक्षित वाटतं.

व्ही.एस.सी., ब्राझील

मी इतक्यातच कॅसेटवरून तो लेख ऐकला. गेल्या ४४ वर्षांपासून मी अंधळी आहे आणि बाप्तिस्मा घेतल्यावरही मला वाटायचं की आपण काहीच कामाचे नाही. पण हा लेख माझ्या हृदयाला स्पर्शून गेला. आपण स्वतःबद्दल जसा विचार करतो तसा देव आपल्याबद्दल विचार करत नाही म्हणून मी त्याचे खूप खूप आभार मानते.

ए. के., इटली

माझ्या मनात सारखे नकारात्मक विचार येत राहतात. पण, तो लेख वाचताना असं वाटलं जणू यहोवाच मला समजावून सांगत आहे. आपली विचार करण्याची पद्धत बदलणं तितकं सोपं नसतं, पण त्या लेखातल्या या शब्दांची मी स्वतःला सारखी आठवण करून देत राहीन; ते म्हणजे, “यहोवा एखाद्या प्रेमळ पालकाप्रमाणे आपल्या ‘सन्‍निध’ असतो—सतत दक्ष, लक्षपूर्वक आणि मदतीला सदैव तयार असतो.—स्तोत्र १४७:१,.”

के. एफ., जपान