व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

‘तर आपलं जगंच निराळं असतं’

‘तर आपलं जगंच निराळं असतं’

‘तर आपलं जगंच निराळं असतं’

गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात मॉस्कोतील यहोवाच्या साक्षीदारांचे एक अधिवेशन रद्द करण्याचा प्रयत्न करण्यात आला; तो मोठा चर्चेचा विषय बनला. (सविस्तर माहितीसाठी पृष्ठे २७ आणि २८ पाहा.) ऑगस्ट २१, १९९९ च्या द मॉस्को टाईम्स यात ॲन्ड्रे झॉलॉटॉव्ह ज्युनियर यांनी असे वृत्त दिले की, “क्रिडांगणाचे उप-संचालक, व्ह्लदीमयर कॉझअरयेव यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचे व्यवस्थापन मंडळ यहोवाच्या साक्षीदारांच्या सभेच्या विरोधात नव्हते. [सभा रद्द करण्याचा] आदेश कोठून येत होता हे आपल्याला ठाऊक नाही असे ते म्हणाले.”

एका आठवड्यानंतर द मॉस्को टाईम्स यात एका वाचकाचे पत्र छापून आले; त्यात त्या वाचकाने “खरोखर निःपक्षपाती” लेख छापल्याबद्दल त्या बातमीपत्राची प्रशंसा केली आणि तो म्हणाला की, “हा लेख खरोखर वाचण्याजोगा आहे.” तो पुढे म्हणाला: “यहोवाच्या साक्षीदारांना आपले हे वार्षिक अधिवेशन भरवण्याकरता किती अडथळे पार करावे लागले याची सविस्तर माहिती देणाऱ्‍या तुमच्या लेखामुळे त्यांच्यावर केलेल्या अन्यायाचा [पर्दाफाश झाला].”

पत्र लिहिणाऱ्‍या व्यक्‍तीने पुढे म्हटले की, यहोवाच्या साक्षीदारांची “संपूर्ण जगभरात (आणि आता रशियात देखील) चांगली ख्याती आहे . . . त्यांच्या . . . चांगल्या, नम्र स्वभावासाठी ते प्रसिद्ध आहेत, ते लोकांवर कधीच दबाव आणत नाहीत आणि कोणत्याही धर्माच्या लोकांबरोबर मग ते ऑर्थोडॉक्स ख्रिश्‍चन, मुस्लिम किंवा बौद्ध असोत त्यांच्याशी खेळीमेळीने राहतात. त्यांच्यामध्ये लाच घेणारे, मद्यपी किंवा मादक पदार्थ घेणारे कोणी नाही. याचे साधेसोपे कारण हेच आहे की, ते आपल्या प्रत्येक कार्यात बायबलचे मार्गदर्शन स्वीकारतात. जगामध्ये सगळ्यांनीच यहोवाच्या साक्षीदारांप्रमाणे बायबलनुसार चालण्याचा निदान प्रयत्न केला असता, तर आपल्या या क्रूरतेनं भरलेल्या जगाचं चित्र निराळं असतं.”

यहोवाच्या साक्षीदारांची चौकशी केलेले आणि त्यांच्याशी व्यवहार करणारे अधिकारीही याच्याशी सहमत आहेत. अशाच अधिकाऱ्‍यांनी यहोवाच्या साक्षीदारांना रशियात सेंट पीटर्झबर्ग येथे हे सुंदर संमेलन गृह बांधायला परवानगी दिली. गेल्या वर्षी सप्टेंबर १८ रोजी त्या इमारतीचे समर्पण करण्यात आले तेव्हा तेथे २,२५७ जण उपस्थित होते; शिवाय, सेंट पीटर्झबर्ग येथील राज्य सभागृहांमध्ये आणि सोलनेचनॉये या जवळच्याच परिसरातील यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा दफ्तरात जमलेल्या आणखी २,२२८ जणांनी हा कार्यक्रम ऐकला.