व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

लोकांना खरी आशा देणे

लोकांना खरी आशा देणे

लोकांना खरी आशा देणे

मॉल्डोवाच्या भूतपूर्व सोव्हिएत प्रजासत्ताक राज्यातील एका १७ वर्षांच्या युवकाने ऑक्टोबर ८, १९९८ च्या सावध राहा! मासिकातील “आजच्या युवकांसाठी काय आशा?” या मुख्य विषयावरील लेखमालेची प्रशंसा करणारे एक पत्र तेथील यहोवाच्या साक्षीदारांच्या दफ्तराला लिहिले. त्यातील मजकूर असा होता:

“तुमचे आभार मानल्याशिवाय मला राहावत नव्हतं. ते लेख वाचून मला माझे अश्रू आवरताच आले नाहीत. अलीकडेच त्या लेखांमध्ये वर्णन केलेल्या स्थितीतून मी गुजरलो आहे; ते लेख वाचल्यावर माझ्या सगळ्या आठवणी ताज्या झाल्या. मी आत्महत्या करायचे ठरवले होते, पण यहोवाच्या साक्षीदारांनी नकळत मला जीवदान दिलं. त्यांच्याशी भविष्यातील आशेविषयी बोलल्यामुळे आणि निर्माणकर्त्याच्या दयाळुपणावर माझा भरवसा अधिक मजबूत झाल्यामुळे मी हळूहळू निराशेतून बाहेर निघू शकलो. . . .

“देव लवकरच चांगली परिस्थिती आणणार आहे हा त्याचा उद्देश शिकायला तुम्ही लोकांची मदत करता यातूनच तुमचं शेजाऱ्‍यांवरील खरं प्रेम प्रकट होतं. तुमचे हे प्रयत्न वाया जात नाहीत. तुम्ही समाजातल्या सर्वात महत्त्वाच्या समस्यांना सामोरे आणण्याचा प्रयत्न करता हे खरोखरच वाखाणण्याजोगं आहे. जनतेच्या हितासाठी तुम्ही करत असलेलं हे काम असंच अखंड चालू राहू द्या. मी या मासिकाच्या प्रत्येक अंकाची वाट पाहीन.”

सावध राहा! मासिकाच्या प्रत्येक अंकात पृष्ठ ४ वर छापल्या जाणाऱ्‍या “सावध राहा! का प्रकाशित केले जाते” या परिच्छेदात असे म्हटले आहे: “हे नियतकालिक, निर्माणकर्त्याच्या शांती व निर्भयतेच्या नवीन जगाच्या अभिवचनावर आत्मविश्‍वास वाढवते, जे सध्याच्या दुष्ट व भक्‍तीहीन व्यवस्थीकरणाला काढून टाकील.” बायबलमध्ये दिलेल्या देवाच्या अभिवचनामुळे पृथ्वीवरील कोट्यवधी लोकांना या त्रासदायक काळात समस्यांना तोंड द्यायला शक्‍ती मिळत आहे.

निर्माणकर्त्याने दिलेल्या खऱ्‍या आशेचे सुंदर वर्णन तुम्हाला जीवनाचा काय उद्देश आहे? तो तुम्हाला कसा शोधता येईल? या ३२ पानी माहितीपत्रकात मिळेल. त्यामध्ये विशेषतः, “देवाचा उद्देश लवकरच पूर्ण होणार” आणि “नंदनवनमय पृथ्वीवर चिरकाल जगा” हे भाग पाहा. तुम्हाला या ३२ पानी माहितीपत्रकाविषयी आणखी माहिती हवी असल्यास येथे दिलेले कुपन भरून त्यावर दिलेल्या पत्त्यावर किंवा या मासिकातल्या पृष्ठ ५ वरील उचित पत्त्यावर पोस्टाने पाठवा.

◻ कृपया तुमच्या प्रतिनिधीला माझ्या घरी पाठवा.

◻ मोफत गृह बायबल अभ्यासासाठी कृपया मला संपर्क करा.